‘फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते पण..’; त्या टीकेवरून चव्हाणांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

'फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते पण..'; त्या टीकेवरून चव्हाणांचा खोचक टोला
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 3:44 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिण मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियल नसून ते इंटरनॅशनल मटेरियल आहे, विकास कामांच्या फाईलवर सही करताना आमच्या हाताला लकवा मारत नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे, काँग्रेसकडून फडणवीसांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे, तसेच त्यांनी याबद्दल माफी मागवी अशी मागणी देखील होतं आहे. दरम्यान आता यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले चव्हाण? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिण मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियल नसून ते इंटरनॅशनल मटेरियल आहे, असं म्हटलं होतं, आता या टीकेला पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत असल्याचे मला वाटत होते, पण हा माझा गैरसमज होता. त्याच बरोबर मी आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजकारणी असल्याचं सांगत मी काही सडकछाप राजकारणी नाही हे त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं आहे,  त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असं खोचक उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की काहीही झालं तरी मी माझा सुसंस्कृतपणा सोडणार नाही. ते कराडच्या शेरे येथे झालेल्या सभेत बोलत होते.

राजकारण तापलं

दरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी चव्हाणांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. फडणवीस यांनी माफी मागवी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.