विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईची शक्यता

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाच आमदारांचा समावेश आहे. आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस […]

विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईची शक्यता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाच आमदारांचा समावेश आहे. आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होती. पण अनेक ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली आणि विरोधी उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या या आमदारांनी जाहीरपणे युतीच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली होती.

राधाकृष्ण विखे पाटील

मुलाला अहमदनगरमधून उमेदवारी न दिल्याने विखे पाटील नाराज होते. ही जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे, पण राष्ट्रवादीने सुजय विखे यांच्यासाठी जागा सोडली नाही. त्यानंतर विखे पाटील पक्षापासून दुरावले आणि ते शिर्डी मतदारसंघात शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसले होते.

नितेश राणे

सध्या काँग्रेसचेच आमदार असलेले नितेश राणे यांनी त्यांचे बंधू निलेश राणे यांच्यासाठी काम केलं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसचाही उमेदवार होता. पण नितेश राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्यासाठी काम केलं.

आमदार अब्दुल सत्तार

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. औरंगाबादमध्ये काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे सत्तार नाराज होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधातच प्रचार केला. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची आपण पक्षातून हकालपट्टी करत असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केलं होतं.

आमदार जयकुमार गोरे

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत करणार असल्याचा निर्धार केला होता. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत.  “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल,” असं ते म्हणाले होते.

आमदार कालिदास कोळंबकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या पक्षात जाईन, अशी घोषणा काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली होती. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार असल्याचंही आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटलं होतं. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे. नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.