निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक; 6 प्रमुख नेत्यांची राहुल गांधींसोबत चर्चा

Congress Meeting For Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक; 6 प्रमुख नेत्यांची राहुल गांधींसोबत चर्चा
राहुल गांधी, काँग्रेस नेतेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 12:02 PM

आज राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित आहेत. हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.

बैठकीला कोण- कोण उपस्थित?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला दिल्लीत दाखल झाले आहेत. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात देखील दाखल झाले आहेत. आज विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार रणनितीबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पटोले काय म्हणाले?

काँग्रेसच्या बैठकीआधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थित आमची बैठक होत आहे. महाविकास आघाडीचं सव्वा दोनशे जागा वाटप झालं आहे. या सरकारने 200 हून अधिक जीआर काढले. महामंडळ जाहीर झाले मात्र सरकारकडे पैसा नाही. कॉंग्रेसमध्ये समन्वय आहे. हे सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री येत्या काळात होणार आहे, असं पटोले म्हणाले.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही या बैठकीआधी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा आज वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला बोलावलं आहे. जाहीरनामा बाबत चर्चा होऊ शकते. आम्ही एकत्र निवडणुकीला पुढे जात आहोत. आमच्या आघाडीचा राज्यात विजय होईल. महायुती, भ्रष्ट युती गेली पाहिजे हे आम्ही पाहत आहोत. राज्यात आमचं सरकार येणार आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करण्याची आता आवश्यकता नाही,अ थोरात म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.