VIDEO | काँग्रेस आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर

डॉ. वजाहत मिर्झा हे कुटुंबासह यवतमाळहून नागपूरकडे जात असताना कारला अपघात झाला, यामध्ये सर्व जण सुखरुप आहेत (Vajahat Mirza Car Accident)

VIDEO | काँग्रेस आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 11:40 AM

यवतमाळ : काँग्रेस आमदार डॉ. वजाहत मिर्झा कार अपघातातून बालंबाल बचावले. यवतमाळहून सहकुटुंब नागपूरला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Congress MLC Dr Vajahat Mirza met with Car Accident in Yawatmal)

डॉ. वजाहत मिर्झा हे कुटुंबासह यवतमाळहून नागपूरकडे जात होते. यावेळी पांढरकवडा बायपासवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

कारच्या धडकेत मिर्झांच्या गाडीचा चक्काचूर

‘चाचा का ढाबा’ जवळ त्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या फोर्ड कारने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोण आहेत डॉ. वजाहत मिर्झा?

डॉ. वजाहत मिर्झा हे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. मिर्झा हे महाराष्ट्र विधानपरिषदेवरील आमदार आहेत. जुलै 2018 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर डॉ. वजाहत मिर्झा बिनविरोध आमदारपदी निवडून आले.

श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर

भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. कर्नाटकात झालेल्या अपघातात नाईक यांच्या पत्नी विजया आणि पीए यांचा मृत्यू झाला होता. नाईकही अपघातात गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा दिसत आहे. (Congress MLC Dr Vajahat Mirza met with Car Accident in Yawatmal)

खडसेंच्या कार अपघाताच्या आठवणी ताज्या

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला एक नोव्हेंबर 2020 रोजी किरकोळ अपघात झाला होता. खडसेंच्या कारचे टायर फुटून जळगावमध्ये हा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नव्हती. चालकाच्या प्रसंगावधाने आणि सर्वांच्या आशीर्वादाने आपण सुखरुप आहोत, अशी माहिती खडसेंनी अपघातानंतर ट्विटरवरुन दिली होती.

संबंधित बातम्या :

चालकाच्या प्रसंगावधानाने सुखरुप, कार अपघातानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

हायवेवरील शॉर्टकट जीवघेणा, अपघातात श्रीपाद नाईक अत्यवस्थ, पत्नी आणि पीएचा मृत्यू

(Congress MLC Dr Vajahat Mirza met with Car Accident in Yawatmal)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.