“महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांचा शोध घ्या”, सचिन सावंत यांची भाजपावर टीका
सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे कारस्थान उघड झाले आहे (Sachin Sawant on BJP), असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे कारस्थान उघड झाले आहे (Sachin Sawant on BJP), असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. सुशांत सिंह प्रकरणात एम्सचा विशेष अहवाल आल्यानंतर सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली (Sachin Sawant on BJP).
सुशांत सिंहची हत्या झाली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचा अहवाल दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. या अहवालानंतर सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली. “महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या तसेच या कारस्थानाचे मास्टरमाईंड शोधण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एसआयटी गठीत केली पाहिजे”, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
“सुशांतसिंह राजपूत केसमध्ये तपासणी करणाऱ्या एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला रिपोर्ट सीबीआयकडे सुपूर्त केला आहे. या फॉरेन्सिक टीमने आपल्या अखेरच्या रिपोर्टमध्ये सुशांतचा मृत्यू आत्महत्येनेच झाल्याचं म्हटलं आहे. एम्सच्या एक्सपर्ट पॅनेलने सुशांतचा गळा दाबून हत्या करण्याच्या संभावलेला धुडकावून लावलं आहे”, असंही सचिन सावंत यांनी सांगितले.
अहवाल सांगतोय हत्या नव्हे आत्महत्या!
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हत्येसह अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते. मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावरदेखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला.
एम्सच्या (AIIMS) या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार सुशांतवर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली आहे. सगळ्या तपासाअंती सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, तर सगळ्या गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी याकडेच इशारा करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा
Sushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!
Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी
ड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी