भाजपला खरचं विसर पडला? नाना पटोले यांनी लागलीच केला हल्लाबोल, भाजपची मूळ परंपरा…
पुण्यातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासूनच कॉंग्रेसकडून भाजपवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasaba Peth) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉंग्रेससह (Congress) भाजपने (BJP) कसबा पेठच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरुवातीपासूनच कसबा पेठ पोटनिवडणूक उमेदवारीवरुन चर्चेत राहिली आहे. यामध्ये भाजपने टिळक (Tilak) कुटुंबात उमेदवारी न देता हेमंत रासणे यांना उमेदवारी दिल्याने भाजपवर अन्याय केल्याचा आरोप होऊ लागला आहे. याबाबत पुण्यात फलकबाजी बघायला मिळाली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
भाजपकडून हेमंत रासणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
याचवेळी भाजपची शक्तीप्रदर्शन करत निघालेली यात्रा टिळक वाड्यासमोरून गेली. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमान्य टिळक यांच्यासह मुक्ता टिळक यांना अभिवादन केलं नाही.
इतकंच काय शैलेश टिळकही शक्तीप्रदर्शनात दिसले नाहीत, त्यामुळे भाजप लोकमान्य टिळक आणि टिळक कुटुंबाला विसरली असल्याचा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला आहे.
नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना भाजपला गरज संपली की विसरायची सवय आहे. त्यामुळे त्यांनी लोकमान्य टिळक यांच्यासहित टिळक कुटुंबाला विसरले असल्याचा टोला भाजपला लगावला आहे.
यावेळी कॉंग्रेसकडून लोकमान्य टिळक यांच्यासहित मुक्ता टिळक यांना अभिवादन करण्यात आले आहे. कॉंग्रेसने यावेळी भाजपवर टीका करत असतांना आम्ही टिळकांना विसरलो नाहीत असंही म्हंटलं आहे.
कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचे हेमंत रासणे आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात ही प्रमुख लढत होणार आहे.
भारतीय जनता पार्टीकडून मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. प्रमुख नेत्यांकडूनही महाविकास आघाडी आणि अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या पक्षांना आवाहन केले जात आहे.
निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होत नाही तोच नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये टिळकांच्या घरात उमेदवारी दिली नाही यावरूनच टोला लगावला आहे.
त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहे. येत्या काळात भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून निवडणूक काळात कोणते मुद्दे हाती घेतले जातात हे पाहणंही महत्वाचे ठरणार आहे.