पिता पुत्रांच्या कारवाईवर कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय? सुधीर तांबे यांना कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा राहणार की नाही, पटोले यांनी स्पष्टच सांगितलं

दुपारपर्यंत बाळासाहेब थोरात हे संपर्कात होते, मात्र त्यानंतर कुठलाही संपर्क झाला नाही, याशिवाय तांबे यांनी ही कुठलाही संपर्क केला नाही असे सांगत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पिता पुत्रांच्या कारवाईवर कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय? सुधीर तांबे यांना कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा राहणार की नाही, पटोले यांनी स्पष्टच सांगितलं
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 1:02 PM

नागपूर : नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा ही कॉंग्रेसला सोडण्यात आली होतील. त्यासाठी विद्यमान आणि तीनदा आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता आपल्या मुलाचा म्हणजेच कॉंग्रेसच्या युवकचे माजी प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यावेळी सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्याबाबत मी हायकमांडला माहिती दिली आहे. कारवाईच्या बाबत हायकमांडचे आदेश आल्यानंतर कारवाई केली जाईल असे सांगत असतांना दुसरीकडे सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही असेही जाहीर केले आहे. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या पक्षीय भूमिकेवरही नाना पटोले यांनी भाष्य केले आहे.

नाना पटोले म्हणाले सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे तांनी कॉंग्रेस पक्षासोबत फसवेगीरी केली आहे, त्यामुळे त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा राहणार नाही.

याशिवाय कॉंग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिलेला असतांना त्यांनी अर्ज दाखल न करणे हा पक्षासोबत धोका आहे, सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिलेली नव्हती, असं पटोले म्हणाले आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय कॉंग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिलेला असतांना सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही याची माहितीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मिळाली नव्हती, त्यामुळे रात्री उशिरा पर्यन्त मी लक्ष ठेवून होतो असेही पटोले म्हणाले.

याशिवाय दुपारपर्यंत बाळासाहेब थोरात हे संपर्कात होते, मात्र त्यानंतर कुठलाही संपर्क झाला नाही, याशिवाय तांबे यांनी ही कुठलाही संपर्क केला नाही असे सांगत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय तांबे यांनी सर्वच पक्षांचा पाठिंबा हवा आहे असे विधान केल्याने माझं नाशिककडे बारीक लक्ष असल्याचे देखील म्हंटले आहे. त्यामुळे तांबे भाजपचेच उमेदवार असल्याचा एकप्रकारे सुरू पटोले यांनी आवळला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.