नागपुरात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजभवनाला घेराव, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

नागपूर : केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज (16 जानेवारी) काँग्रेसने नागपुरात राजभवनाला घेराव घातला. यावेळी शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी भव्य रॅलीत सहभाग घेतला. यावेळी इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी […]

नागपुरात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजभवनाला घेराव, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 5:05 PM

नागपूर : केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज (16 जानेवारी) काँग्रेसने नागपुरात राजभवनाला घेराव घातला. यावेळी शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी भव्य रॅलीत सहभाग घेतला. यावेळी इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला (Congress Tractor March in Nagpur against Farm Laws and Fuel Price Hike).

“केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही,” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

‘शेतकरी 50 दिवसांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडीत आंदोलन करत आहे’

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मोदींनी काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचा विडाच उचलला आहे. शेतकरी 50 दिवसांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडीत आंदोलन करत आहेत. या कायद्यामुळे साठेबाजी, महागाई वाढणार, या कायद्यामुळे उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफेखोरीची मुभा मिळणार आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे काहीही नाही. पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे राहिलेले दिसत नाही. उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून हे कायदे बनवले आहेत. 50 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची थकित कर्ज माफ केली. अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 10 हजार कोटींचे पॅकेज दिले.”

‘इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले’

“आम्ही फक्त बोलत नाही तर शेतकऱ्यांना मदत करतो आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी शेतकरी विरोधी केंद्र सरकार विरोधात संघर्षही करतो. केंद्र सरकारने एकीकडे शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे उद्योग सुरु केले. तर दुसरीकडे इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. काँग्रेस सरकारच्या काळात कच्च्या इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही त्याचा भार जनतेवर टाकला नाही. भाजप सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले असतानाही देशात दररोज इंधनाच्या किंमती वाढवून केंद्र सरकार सर्वसामान्याची लूट करत आहे. केंद्र सरकार जोपर्यंत काळे कायदे व इंधनदरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत संघर्ष थांबवणार नाही, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

‘काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असून कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही’

यावेळी बोलताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, “मोदी सरकार सातत्याने संसद आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्रातील सरकारला सर्वसामान्य जनतेची चिंता नाही, तर फक्त निवडक उद्योगपतींची चिंता आहे. शेतकऱ्यांच्या पाठींशी आमचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ताकद उभी केली आहे. आता संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत असून कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.”

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार म्हणाले, “ही शेतकऱ्यांसाठी करो वा मरोची स्थिती आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द झाले तरच शेतकरी जगतील. बिहार, मध्य प्रदेशच्या बाजार समित्या संपवल्या. तिथे 10 शेतकऱ्यांनाही हमीभाव मिळत नाही. बाजार समित्या संपल्या, तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणार नाही. ही परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

‘शेतकऱ्यांना मन की बात नाही, तर काम की बात पाहिजे’

प्रदेश काँग्रसच्या कार्याध्यक्षा व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, “शेतकऱ्यांना मन की बात नाही, तर काम की बात पाहिजे. मोदींच्या भाषणबाजीला शेतकरी भुलणार नाहीत. देशात भाजप विरूद्ध शेतकरी असा संघर्ष उभा राहिला आहे. काळे कायदे रद्द केल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. इंधनदरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मदत पुनर्वसन आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, “कायदे बनवताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. कायद्याच्या समर्थनात भाषणे करणाऱ्या लबाडांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला असून देशातील शेतकरी भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.”

यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री तथा प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत, पुनर्वसन आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, खासदार बाळू  धानोरकर, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकूर, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, सचिन नाईक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, अनिस अहमद, सतिश चतुर्वेदी, आमदार संग्राम थोपटे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार राजू पारवे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार वजाहत मिर्झा, इंटकचे अध्यक्ष एच. क्यू. जामा, आ. सुलभा खोडके, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, सरचिटणीस मोहन जोशी, रामकिशन ओझा, अभिजीत सपकाळ, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आ. मोहन जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी आभार मानले.

हेही वाचा :

राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा 23 जानेवारीपासून एल्गार, आंदोलनाची रुपरेषा ठरली

Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?

Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’, राजभवन आणि LG ना घेराव घालणार

व्हिडीओ पाहा :

Congress Tractor March in Nagpur against Farm Laws and Fuel Price Hike

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.