महाराष्ट्र : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून साथीच्या (Eye Flu Treatment) आजारांनी डोकं वरती काढलं आहे. अडीच लाख लोकांना डोळ्याचा संसर्ग झाल्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचे अनेक रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लोक अनेकदा गॉगल घातल्याचे पाहायला मिळत आहेत. पुणे (pune Flu Treatment) जिल्ह्यात 16, 105 रुग्ण असून पिंपरी-चिंचवडमध्ये 4,445 रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यात साथीचा आजार पसरल्यामुळे अनेकांना (Conjunctivitis Symptoms Prevention And Care) संसर्ग होण्याची शक्यता आहे.
राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 851 या आजाराने रुग्ण बाधित झाले आहेत. पुणे जिल्ह्यात 16, 105 रुग्ण असून पिंपरी-चिंचवडमध्ये 4,445 रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ऍडिनो व्हायरसमुळे डोळे येण्याचा संसर्ग होतो अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे. हा सौम्य संसर्ग असला, तरी एका व्यक्तीला डोळे आले तर संपर्कात आलेल्या दुसऱ्याला याची लागण होण्याची शक्यता आहे. राज्यातील बुलढाणा, जळगाव, पुणे, नांदेड, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत डोळे येण्याची साथ अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
नाशिक शहरात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झपाट्याने वाढ होत आहे. सध्या शहरात डोळ्यांची साथ सुरू असून, गेल्या दहा दिवसांत महापालिकेच्या रुग्णालयात आणि उपकेंद्रात ३६०० रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. महापालिकेचा वैद्यकीय विभाग देखील सतर्क झाला आहे. खाजगी रुग्णालय किंवा मेडिकल मधून ड्रॉप आणि औषध घेऊन उपचार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.