ईव्हीएम हॅकवरून गदारोळ सुरू असतानाच आता मतदान केंद्रावरील पोलीस निलंबित, असं घडलं तरी काय ?

ईव्हीएमच्या मुद्यावरून सध्या मविआ नेत्यांनी आवाज उवल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच अमेरिकेतील हॅकरने अमेरिकेतील संरक्षण विभागाचे तंत्रज्ञान वापरुन ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला .

ईव्हीएम हॅकवरून गदारोळ सुरू असतानाच आता मतदान केंद्रावरील पोलीस निलंबित, असं घडलं तरी काय  ?
ईव्हीएमImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 9:05 AM

ईव्हीएमच्या मुद्यावरून सध्या मविआ नेत्यांनी आवाज उवल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच अमेरिकेतील हॅकर सैयद शुजा याने अमेरिकेतील संरक्षण विभागाचे तंत्रज्ञान वापरुन ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला होता. यामुळे नवीन गदारोळ माजला, मात्र (देशात) निवडणूक आयोगाने हे सर्व दावे फेटाळत आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. तसेच या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचेही निवडणूक आयोगने स्पष्ट केले. या मुद्यावरून सध्या सर्वत्र चर्चा सुरू असतानाचा आत

मतदानानंतर मतपत्रिकेचा फोटो काढणारा पोलीस निलंबित आता मतदान केंद्रावरील एका पोलिसावक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. शिवडी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. रियाझ पठाण असे निलंबित हलावदाराचे नाव असून त्याच्या पोस्टल बॅलेट पेपरचा फोटो शेअर केल्यानंतर निवडणूक गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रियाज पठाण ( वय 40) हे शिवडी पोलीस ठाण्यात तैनात होते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात त्यांनी मतदान केलं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या चिन्हांकित मतपत्रिकेचा फोटो काढून साताऱ्यातील मित्राला पाठवला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच गदारोळ माजला. त्यानंतर याप्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करत चौकशीला सुरुवात झाली.

त्या अंतर्गत केलेल्या चौकशीअंती पोलिसांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पठाण यांची चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या हॅकरवर आयोगाकडून गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद सुजाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ कॉलिंगवर दोन व्यक्ती कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओबाबत निवडणूक आयोगाने मुंबईतील दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच सोशल मीडियात स्पष्टीकरण देऊन ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्याचे खंडन केले आहे . मात्र विरोधक टीका करीत असतानाच व्हिडीओ समोर आल्याने निवडणूक आयोग अडचणीत सापडलं आहे.

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.