आमदार भास्कर जाधव यांचा मंदिरात गोंधळ; वयोवृद्ध व्यक्तिला शिवीगाळ करत मारहाण
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा रत्नागिरीतील ग्रामदैवतेच्या मंदिरात संयम सुटल्याचं समोर आलंय (Controversial Video of Shivsena MLA Bhaskar Jadhav viral).
रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा रत्नागिरीतील ग्रामदैवतेच्या मंदिरात संयम सुटल्याचं समोर आलंय (Controversial Video of Shivsena MLA Bhaskar Jadhav viral). त्यांनी शारदादेवीच्या मंदिरात जोरदार गोंधळ घातला. तसेच एका वयोवृद्ध माणसाला शिवीगाळ करत मारहाण केली. याचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार शारदा देवी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थ समिती यांच्या बैठकीदरम्यान झाला.
भास्कर जाधव यांचं मूळ गाव चिपळूण तालुक्यातील तुरंबव हे आहे. या ठिकाणी शारदा देवी मंदिर ट्रस्ट्रचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ कमिटी यांची बैठक सुरु होती. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या बैठकीत भास्कर जाधव यांनी अचानकपणे येऊन गोंधल घातला. सुरुवातीला त्यांनी मंदिरातच शिव्यांची लाखोली वाहिली. यावेळी एका वयोवृद्ध नागरिकाने या प्रकाराचा मोबाईल व्हिडिओ केला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या ज्येष्ठ व्यक्तीलाही मारहाण केली.
भास्कर जाधव मंदिरातील बैठकीत शिव्या देतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. तसेच मारहाणीचा व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद झालाय. यासंदर्भातील कुठलीच तक्रार अद्याप नोंदवलेली नाही. संबंधित मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ 6 ऑक्टोबरचा आहे.
याबाबत टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, “गावच्या वादावर पडदा पडावा म्हणून मी तिथं गेलो होतो. वाद वाढू नये अशीच माझी भूमिका होती. मला कुठलंही समर्थन करण्याची आवश्यकता नाही.”
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अजूनही मंदिरं खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिरं बंद असताना मंदिरात सुरु असलेली बैठक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हेही वाचा :
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी
मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी
पक्षांतरानंतरही मैत्र कायम, अजितदादांच्या गाडीचं भास्कर जाधवांकडून सारथ्य
संबंधित व्हिडीओ :
Controversial Video of Shivsena MLA Bhaskar Jadhav viral while beating old man