खासदार श्रीकांत शिंदेंकडून रायगडावर लायटिंग, अजित पवार म्हणाले, उत्साही लोकांचा अजाणतेपणा!

Shiv Jayanti | शिवजयंतीनिमित्त रायगडवर करण्यात आलेल्या डिस्को लाईटवरुन (Raigad fort lighting) वादाला तोंड फुटलं आहे.

खासदार श्रीकांत शिंदेंकडून रायगडावर लायटिंग, अजित पवार म्हणाले, उत्साही लोकांचा अजाणतेपणा!
Raigad fort_Ajit Pawar
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 1:28 PM

रायगड : शिवजयंतीनिमित्त रायगडवर करण्यात आलेल्या डिस्को लाईटवरुन (Raigad fort lighting) वादाला तोंड फुटलं आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे (chhatrapati Sambhajiraje) यांनी आधीच उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही नापसंती दर्शवली. “रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय. त्यांचा अजाणतेपणा दिसून येतोय. पण महाराजांचा वारसा आहे, तिथं असं घडण चुकीचं आहे”, असं अजित पवार म्हणाले. (Raigad fort lighting controversy Ajit Pawar said ignorance of enthusiastic people )

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व खात्याकडून परवानगी घेऊन स्वत:च्या निधीतून रोषणाई केली. शिवजयंतीच्या पूर्व संध्येला किल्यावरील अनेक भाग रात्रीच्या अंधारात उजळून निघाले. मात्र आता यावरुन वाद उफाळला आहे.

अजित पवार काय म्हणाले?  

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात. यात काहीवेळा अजाणतेपणी म्हणा किंवा फार उत्साहामध्ये म्हणा अशा गोष्टी होतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डीजे लाईट लावणं ही बाब अतिशय गंभीर आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाला यापुढे काळजी घ्यावी लागेल”, असं अजित पवार म्हणाले.

VIDEO – रायगडावरील लायटिंगबाबत अजित पवार काय म्हणाले?

संभाजीराजे छत्रपतींचीही नाराजी

दरम्यान, या लायटिंगवरुन छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वात आधी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. “भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल”, असा हल्लाबोल संभाजीराजेंनी ट्विटरवरुन केला होता.

त्यानंतर आजही शिवजन्मोत्सवानंतर माध्यमांशी बोलताना, संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली. “माझ्या दृष्टीने रायगडचा विषय संपला. अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेतला तो योग्य नाही. साधे लाईट लावले असते तर काही नाही मात्र डिस्को लाईट लावले. मी अध्यक्ष असून काहीही करायचं तर परवानगी घेतो आणि हे कसं झालं? रायगडावर दोन दिवसासाठी लायटिंग नको. कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. लवकरच इलेक्ट्रिकचं काम होणार आहे. असं असताना डिस्को लायटिंगवरून परखडपणे भूमिका घेतली. मनमानी कारभार होत असेल तर मी सुनावतो आणि वेळप्रसंगी कौतुक ही करतो”, असं संभाजीराजे म्हणाले.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

रायगडावरील लायटिंगबाबत जे घडलं त्याबाबत मला जास्त माहिती नाही. माध्यमातून वाचनात आलं आहे. पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. याबाबत संभाजीराजे छत्रपती अधिक बोलू शकतील, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

शिवजयंतीवर निर्बंध आहेत, मात्र शिवभक्त म्हणून माझी सुद्धा भावना आहे की हे जे निर्बंध घातलेत त्यामुळे माझाही हिरमोड झाला. आपण दोन पावले मागे आलो, पण पुढच्या वर्षी जोरात शिवजयंती साजरी करू. ही शिवजयंती साधेपणाची नाही, कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

खासदार श्रीकांत शिंदेंचं चुकलं काय?  

स्वत:च्या खर्चाने रायगडावर शिवजयंतीपूर्वी आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ही लायटिंग करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना अल्पोपहाराचेही शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. विशेष शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी दोन लाखाची आर्थिक मदत दिली. तसेच श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे पालकत्वदेखील स्वीकारले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चार दिवसापूर्वी रायगडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांकडे लक्ष्य देऊन त्यांच्यावर उपाय सूचवले. निसर्ग वादळानंतर रायगड किल्यावरील विद्युत रोषणाई कोलमडली होती. त्यानंतर पुरातत्व खात्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. ही बाब शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी येथील विद्युत रोषणाईचे साहित्य स्वतः देण्याची घोषणा केली. तसेच, 19 फेब्रुवारी पूर्वी रायगड उजळला पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले होते.

रायगडावर लायटिंग

(Raigad fort lighting controversy Ajit Pawar said ignorance of enthusiastic people )

संबंधित बातम्या  

शिवजयंती पूर्वी रायगड उजळणार, श्रीकांत शिंदे यांच्या स्वनिधीतून रोषणाई

शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या प्रकाशव्यवस्थेवरुन खासदार संभाजीराजे नाराज! पुरातत्व खात्याला फटकारलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.