मुंबईत राजकीय घडामोडींना आला वेग, भाजपच्या कोअर कमिटीची 5 तास खलबतं, पडद्यामागे चाललंय काय ?

शुक्रवारी रात्री भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक झाली. सागर या निवासस्थानी रात्री 8 ते मध्यरात्री 1 अशी तब्बल 5 तास ही बैठक चालली आणि त्यामध्ये अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाजपचं नेमकं काय ठरलं ?

मुंबईत राजकीय घडामोडींना आला वेग, भाजपच्या कोअर कमिटीची 5 तास खलबतं, पडद्यामागे चाललंय काय ?
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 11:06 AM

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता संपली असून अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा फटका बसल्याने त्यांनी विधानसभेतील विजयासाठी कंबर कसली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल रात्री ( शुक्रवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रात्री 8 ते मध्यरात्री 1 अशा 5 तास झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीतीबाबत प्राथमिक चर्चा झाली. भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार करण्यात येणार असून येत्या काळात अशा अनेक बैठका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रावसाहेब दानवे पाटील, पंकजा मुंडे उपस्थित होते

विधान परिषदेच्या नावांबद्दल झाली चर्चा

पुढील महिन्यात विधानपरिषद निवडणूक होणार असून भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत या निवडणुकांसदर्भात चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून 10 नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यातून पाठवलेल्या 10 नावावर दिल्लीत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याचं गणित लक्षात घेऊन फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. उमेदवारी देताना त्या उमेदवाराचा प्रभाव किती आहे, त्याच्यामुळे पक्षाला निवडणुकांमध्ये किती फायदा होऊ शकतो अशा 10 जणांची नावे दिल्लीला राज्यातून पाठवली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे यावर चर्चा केली. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली . सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा केली. आम्ही यादी केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेईल , असे बावनकुळे यांनी नमूद केले.

ओबीसी आरक्षणावर काय झाली चर्चा ?

केंद्रातील बैठक महत्त्वाची होती. त्यावरही मंथन केलं. जिथे कमी पडलो त्या ठिकाणी पुन्हा काम करणार अजून चांगलं काम करणार. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा झालेली नाही . तो सरकारचा विषय आहे, ही संघटनात्मक बैठक होती असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

मविआने खोटारडेपणा केला

मविआने खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं. आदिवासी जनतेला फसवलं, महिलांना फसवलं.. अशा अनेक विषयातून महाविकास आघाडीने मत घेतली . आता लोकांना वाटतं आहे की मोदीजी पंतप्रधान झालेले आहे, मोदीजी वचन दिल्यानुसार काम करतील त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल . केंद्रातील सरकार आताचे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल , ते फक्त केंद्राच्या योजना थांबवण्याचे काम करते . प्रचाराला अनेक मुद्दे असणार आहेत मात्र डबल इंजिन सरकार असेल तर जनतेचा फायदा असतो . जसं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये झालं, मोदीजी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयार होते मात्र उद्धवजी कधीही मंत्रालयात आले नाहीत. कधीही मोदीजींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं . आम्हाला मोदीजी नको, आम्हाला मोदीजींच्या सरकार चालत नाही या भूमिकेतून ते काम करत होते म्हणून जनतेचे नुकसान झालं. दोन्हीकडे एका विचाराचा सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.