Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 रुग्णांचा मृत्यू, 63 हजार 309 नवे कोरोनाबाधित, कोरोनाने महाराष्ट्राला झोडपलं
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 872 नवे रुग्ण, 11 जणांचा मृत्यू
उस्मानाबाद कोरोना अपडेट :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 872 रुग्ण आणि 11 मृत्यू तर 466 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुक 352, तुळजापूर 92,उमरगा 72, लोहारा 46, कळंब 123, वाशी 76, भूम 56 व परंडा 55 रुग्ण
01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613 15 एप्रिल – 764 16 एप्रिल – 580 17 एप्रिल – 653 18 एप्रिल – 477 19 एप्रिल – 662 20 एप्रिल – 645 21 एप्रिल – 667 22 एप्रिल – 719 23 एप्रिल – 719 24 एप्रिल – 810 25 एप्रिल – 569 26 एप्रिल – 720 27 एप्रिल – 728 28 एप्रिल – 872
ग्राफिक्स –
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6764 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 13 हजार 880 नमुने तपासले त्यापैकी 36 हजार 665 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 27.88 टक्के
29 हजार 016 रुग्ण बरे 80.69 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 885 तर 2.32 टक्के मृत्यू दर
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर बैठक संपन्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर बैठक संपन्न
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे बैठकीला होते उपस्थित
लॉकडाऊन आढावा बाबत चर्चा झाल्याची माहिती
-
-
मोठी बातमी : दौंड तालुक्यातील केडगाव येथे ऑक्सिजनअभावी तीन रुग्ण दगावले
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे ऑक्सिजनअभावी तीन रुग्ण दगावले
मोहन जनरल ॲन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाला तिघांचा मृत्यू..
वारंवार मागणी करुनही प्रशासनाकडून ऑक्सिजन न मिळाल्याचा डॉक्टरांचा आरोप..
ऑक्सिजनअभावी मृत पावलेले तीनही रुग्ण होते अत्यवस्थ..
या हॉस्पिटलमध्ये तब्बल ४५ ते ५० गंभीर रुग्णांवर सुरु आहेत उपचार..
-
राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 रुग्णांचा मृत्यू, 63 हजार 309 नवे कोरोनाबाधित, कोरोनाने महाराष्ट्राला झोडपलं
राज्यात दिवसभरात 63 हजार 309 नवे कोरोनाबाधित, 985 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, दिवसभरात 61,181 रुग्ण बरे
#COVID19 | 985 deaths, 63,309 new cases reported in Maharashtra today; case tally reaches 44,73,394 pic.twitter.com/kw6TVcbqHt
— ANI (@ANI) April 28, 2021
-
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वस्तिक ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू
नाशिक – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वस्तिक ऑक्सिजन प्लांट पुन्हा सुरू
स्वस्तिक ऑक्सिजन कंपनी आज पूर्ववत केली आहे
सोपस्कार बाजूला ठेवून, कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने स्वस्तिक प्लांट सुरू करणार
कालपासून वीजपुरवठा सुरू झाला आहे
उद्यापासून 600 सिलेंडर बाहेर पडतील
जिल्ह्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न
600 सिलेंडर तयार होत आहे ही दिलासादायक बाब
जिल्ह्याच्या वरचा ऑक्सिजनचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे
कंपनी वीज बिल थकबाकीमुळे बंद होती
थोडक्या कागदपत्रांवर कंपनी सुरू केली आहे
-
-
देशभरातून 35 लाख लोकांकडून कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी
देशभरातून 35 लाख लोकांकडून कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी, 18 ते 44 वयाच्या कोरोना लसीची अपॉईंटमेंट, राज्यांनी लसीकरण सुरू केल्यानंतर मिळणार, कोविन अॅपकडून देण्यात आली माहिती
-
सातारा जिल्ह्यात दिवसभरात 1810 नवे कोरोनाबाधित
सातारा जिल्ह्यात आज 1810 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा : 98532
आज बरे झालेली रुग्णसंख्या : 2054
जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : 79080
जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या : 16714
आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या : 34
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 2422 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू.
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 527175 जणांचे नमुने घेण्यात आले.
-
अलिबागेत शेकापचे विविध सुविधायुक्त आयसोलेशन सेंटर कार्यरत
रायगड :
अलिबागेत शेकापचे विविध सुविधायुक्त आयसोलेशन सेंटर कार्यरत
गरजू रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत यासाठी उपक्रम.
ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही किंवा जे बरे होऊन देखरेखीखाली आहेत अशांसाठी अलिबागेत 50 बेड चे आयसोलेशन सेन्टर उभारण्यात आले आहे.
तेथे रुग्णांना जेवणापासून खेळ , टीव्ही , वायफाय अशी मनोरंजनाची साधनेदेखील मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर इथं आरोग्य सेवा देत आहेत.
शिवाय आरसीएफ कॉलनीतील सरकारी आयसोलेशन सेन्टर साठी 50 बेड आणि 25 ऑक्सिजन सिलेंडर देखील शेकापने उपलब्ध करून दिले आहेत.
महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची टीम यासाठी मेहनत घेत आहे .
-
गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात 21 रुग्णांचा मृत्यू, 622 नवे कोरोनाबाधित
गडचिरोली : आज जिल्हयात 622 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 289 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 20097 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 15047 वर पोहचली. तसेच सध्या 4678 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 372 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
-
येत्या 1 मे पासून कणकवलीत जनता कर्फ्यू
सिंधुदुर्ग : 1 मे पासून कणकवलीत जनता कर्फ्यू, कणकवली तालुक्याबरोबरच शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नगरपंचायतने घेतला निर्णय, 1 मे पासून 10 मे पर्यंत कणकवली बाजारपेठ राहणार पूर्णतः बंद, फक्त मेडिकल दुकाने आणि दवाखाने राहणार सुरू, कणकवली नगरपंचायत, व्यापारी, सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक यांच्या संयुक्त बैठकीत झाला निर्णय, या कालावधीत दुकाने उघडी दिसल्यास कठोर कारवाई केली जाणार.
-
नांदेडमध्ये दिवसभरात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू, 769 नवे कोरोनाबाधित
नांदेड :
गेल्या 24 तासात 769 रुग्ण, तर 24 जणांचा मृत्यू
24 तासात 1232 डिस्चार्ज
एकूण टेस्ट 3662 त्यापैकी 769 पॉझिटीव्ह
आता पर्यन्त एकूण 78701 पॉझिटीव्ह
बरे झाले – 65014
एकूण मृत्यू – 1507
सध्या ऍक्टिव्ह – 11917
गंभीर – 192
गेल्या पाच दिवसात
24 एप्रिल – 850 – 26 25 एप्रिल – 1105 – 26 26 एप्रिल – 873 – 24 27 एप्रिल – 1004 -29 28 एप्रिल – 769 – 24
पाच दिवसात 4601 रुग्ण 119 मृत्यू
-
पुण्यात दिवसभरात 3 हजार 987 नवे रुग्ण
पुणे –
– दिवसभरात ३९७८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४९३६ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ८५ रुग्णांचा मृत्यू. २७ रूग्ण पुण्याबाहेरील. – १३७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४१०५०४. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४०५९. – एकूण मृत्यू -६६६९. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३५९७७६. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०२७७.
-
नागपुरात आज पुन्हा 102 रुग्णांचा मृत्यू, 7503 नव्या रुग्णांची नोंद
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज पुन्हा 102 रुग्णांचा मृत्यू
आज 7503 नव्या रुग्णांची नोंद
तर 6935 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 393830
बरे होणाऱ्यांची संख्या – 309415
एकूण मृत्यूसंख्या – 7228
-
ठाण्यात सध्या 46448 सक्रिय रुग्ण, एकूण 7409 जणांचा मृत्यू
ठाणे जिल्हा कोरोना अपडेट
कोरोना बाधितांची एकूण संख्या- 456927
आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- 403070
सध्या सक्रिय रुग्ण- 46448
आतापर्यंत एकूण मृत्यू- 7409
-
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचे 476 नवे रुग्ण
गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट
आज वाढलेले रुग्ण – 476
आज झालेले मृत्यू – 14
आज बरे झालेले – 759
तालुका नुसार रुग्ण संख्या
गोंदिया————–169
तिरोडा————–106
गोरेगाव————–26
आमगाव————– 26
सालेकसा————- 28
देवरी—————— 55
सडक अर्जुनी ———– 41
अर्जुनी मोरगाव——– 18
इतर राज्य————–07
एकूण रुग्ण – 31912
एकूण मृत्यू – 510
एकूण बरे झालेले – 24480
एकूण उपचार घेत असलेले – 5922
-
वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू
वाशिम कोरोना अलर्ट
जिल्ह्यात आज दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू
नवे आढळले 330 रुग्ण
तर 395 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 28 दिवसात एकूण 95 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 26448
सध्या सक्रिय रुग्ण – 3759
आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 22446
आतापर्यंत एकूण मृत्यू – 282
-
उस्मानाबादमध्ये आढळले कोरोनाचे 728 नवे रुग्ण
उस्मानाबाद कोरोना अपडेट
काल (27 एप्रिल) कोरोनाचे 728 नवे रुग्ण आढळले
काल 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर 634 जण उपचारानंतर बरे
-
पालघर जिल्ह्यात 24 तासांत 1276 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पालघर : जिल्ह्यात 24 तासांत 1276 रुग्णांनी केली कोरोनावर मात
तर 24 तासांत 44 जणांचा दुर्दैवी मृत्यू
दिवसभरात 258 नव्या रुग्णांनी केली मात
28 एप्रिल आरोग्य विभागाच्या अहवाल
एकूण रुग्ण 82624
रिकव्हर रुग्ण : 63251
सक्रिय रुग्ण : 17845
मृत्यू : 1553
-
वाशिममध्ये दिवसभरात देण्यात आले 3 हजार लसींचे डोस
वाशिम जिल्ह्यात लसीकरण सायंकाळी पाच नंतर बंद
आज दिवसभर 3 हजार लसीचे देण्यात आले डोस
जिल्ह्यात 130 पैकी 45 केंद्रावर चालू होत लसीकरण
जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश आहेर याची माहिती
-
करोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची राज्यपालांची सूचना
मुंबई : सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या तसेच, राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका बैठकीच्या वेळी केली. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी मंगळवारी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी वरील सूचना केली. सैन्य दलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील करोनाविषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.
-
सांगली जिल्ह्यात सलग आठव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजाराच्या पुढे
सांगली कोरोना अपडेट
सांगली जिल्ह्यात सलग आठव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजाराच्या पुढे
तर आज 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आज दिवसभरात 1395 नवे कोरोना रुग्ण
तर उपचार घेणारे 870 जण आज कोरोनामुक्त
सध्या सक्रिय कोरोना रुग्ण- 7हजार 339
-
जालना शासकीय रुग्णालयात आता काम करणार बेड मॅनेजमेंट युनिट
जालना : वाढत्या कोरोनाबाधित रुग्णाची संख्या लक्षात घेता जालना शासकीय रुग्णालयात आता काम करणार बेड मॅनेजमेंट युनिट
हॉटेलमध्ये ज्या प्रमाणे टेबल वेटिंग असतात त्या प्रमाणे जो प्रथम पेशंट येईल त्याला प्राधान्य देणार
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अर्चना भोसले यांची माहिती
-
उस्मानाबाद जिल्ह्यात 10 दिवसांत कोरोनामुळे 6 वकिलांचा मृत्यू
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील 10 दिवसात कोरोनामुळे 6 वकिलांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. यात अनेक ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे. फौजदारी क्षेत्रातील ज्येष्ठ आणि नामांकित वकील अशी राज्यभर ओळख असलेले 62 वर्षीय अॅड. दत्तात्रय उर्फ आबा बारखडे, अॅड. भारती रोकडे(वय 46), अॅड. विनोद गंगावणे ( वय 45 ) अॅड. बापूसाहेब गंजे (वय 53 ) अॅड. नारायण वडणे ( वय 45 ) व उमरगा येथील अॅड. रवींद्र बिराजदार ( वय 44 ) या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान, शासनाने वकिलांच्या वारसांना तत्काळ 25 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळचे अध्यक्ष अॅड. नितीन भोसले यांनी केली आहे.
-
राज्यातील 9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारचा अर्थसहाय्य
कोल्हापूर
राज्यातील 9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारचा अर्थसहाय्य
137 कोटी 62 लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती
मजुरांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपयांची मदत खात्यावर वर्ग
कोरोना कालावधीत राज्यातील विविध ठिकाणी कामगारांना मध्यान आणि रात्रीच्या भोजन वितरणाची ही सरकारकडून व्यवस्था
कामगारांनी स्थलांतरित न होण्याचं मंत्री मुश्रीफ यांच आवाहन
-
सरसकट मोफत लसीकरणाचा कॅबिनेट निर्णय
राज्य सरकार
सरसकट मोफत लसीकरणाचा कॅबिनेट निर्णय
वय वर्ष 18 ते 44 वयोगटात 5 कोटी 71 लाख नागरिक
सगळ्यांना मोफत लस मिळणार
-
औरंगाबादेत कोरोना संसर्गाचा वृद्धीदर आटोक्यात, 13 दिवसात रुग्णवाढ ही दीड हजारावरुन आली 1 हजाराच्या खाली
औरंगाबाद –
औरंगाबादेत कोरोना संसर्गाचा वृद्धीदर आटोक्यात
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती
13 दिवसात रुग्णवाढ ही दीड हजारावरुन आली 1 हजाराच्या खाली
तर रिकव्हरी रेट 82 टक्क्यांवरून पोचला 86 टक्क्यांवर
पॉझिटिव्हीटी दरात मोठी घट
पॉझिटिव्ह रेट 20 टक्क्यांवरून घसरला थेट 13 टक्क्यांवर
100 टेस्ट मध्ये आढळतायत फक्त 13 जण पॉझिटिव्ह
कोरोना वृद्धीदारात घट झाल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला दिलासा
मात्र अजूनही धोका टाळलेला नाही जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचं सूचक विधान
-
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट
वर्धा
– जिल्हा सामान्य रुग्णालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट
– माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोबत
– जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा
देवेंद्र फडणवीस –
– मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज
– ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स महत्त्वाचे आहेत
– आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे
– नागपूर, पुणे, मुंबईत संसर्गाचं प्रमाण १५ टक्के आहे
-
एकलहरे ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव, गावात कोणतेही बांधकाम करताना त्यात ऑक्सिजन बेड बांधण्याची सक्ती
नाशिक –
एकलहरे ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव
गावात कोणतंही बांधकाम करताना त्यात ऑक्सिजन बेड बांधण्याची सक्ती
एकमताने ठराव मंजूर
ग्रामपंचायत सदस्य रत्नाबाई सोनवणे यांचं कोरोनाने निधन
मयत सदस्य रत्नाबाई सोनवणेना ग्रामस्थानची अनोखी श्रद्धांजली
बांधकाम करताना ऑक्सिजन बेड बांधल्यास घरपट्टीत मिळणार सूट
-
कराड शहरात आज कोरोना लसीकरण होवू शकणार नाही, लस संपल्याने लसीकरण केंद्र बंद
कराड
कराड शहरात आज कोरोना लसीकरण होवू शकणार नाही
लस संपल्याने लसीकरण केंद्र बंद
पुरेशी लसपुरवठा होत नसल्याने दोन दिवसांपासुन लसीकरण बंद आहे
-
मराठी कलाकरांची जनजागृती, पुणे पोलिसांच्या मदतीला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री
पुणे –
मराठी कलाकरांची जनजागृती
पोलिसांच्या मदतीला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री
कोरोनाच्या जनजागृतीसाठी उतरले रस्तावर
सिंहगड रोडवर करण्यात येत आहे जनजागृती
-
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र लसी अभावी बंद
पिंपरी-चिंचवड –
– पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र लसी अभावी बंद
– शहरात शासकीय 60 लसीकरण केंद्रांपैकी केवळ 12 केंद्रावर लसीकरण सुरु
-
मालेगावकारांना काहीसा दिलासा, गेल्या 24 तासात सापडले फक्त 16 नवीन रुग्ण
मालेगाव –
मालेगावकारांना काहीसा दिलासा
गेल्या 24 तासात सापडले फक्त 16 नवीन रुग्ण तर 48 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
तर एकटिव्ह रुग्णांची संख्खा ही होत आहे कमी
गेल्या दोन दिवसात 66 नवीन रुग्ण सापडले तर 175 रुग्णांना देण्यात आले डिस्चार्ज तर एकटिव्ह रुग्ण संख्या ही 110 ने झाली कमी
-
काळाबाजार करणाऱ्यांना कपडे काढून रस्त्यावर नागडं पळवले पाहिजे, रेमडेसीव्हीरच्या काळाबाजारावरुन इम्तियाज जलील यांची संतप्त प्रतिक्रिया
औरंगाबाद –
रेमडेसीव्हीरच्या काळाबाजारावरुन इम्तियाज जलील यांची संतप्त प्रतिक्रिया
काळाबाजार करणाऱ्यांना कपडे काढून रस्त्यावर नागडं पळवले पाहिजे
जे हॉस्पिटल काळाबाजार करतायत ते हॉस्पिटल आम्ही फोडून टाकू
इम्तियाज जलील यांचा काळाबाजारावरून संतप्त ईशारा
काळाबाजार रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याचा इम्तियाज जलील यांचा ईशारा
काळाबाजर होत असल्यामुळे इम्तियाज जलील यांची संतप्त प्रतिक्रिया
-
कुडाळच्या आठवडा बाजारात नागरीकांची मोठी गर्दी
सिंधुदुर्ग:-
कुडाळच्या आठवडा बाजारात नागरीकांची मोठी गर्दी.
ना सोशल डिस्टन्स ना तोंडावर मास्क
अनेक नागरीक विना मास्क फिरताना टीव्ही 9 च्या कॅमेरात कैद.
तोंडावर मास्क का नाही विचारल्यावर तोडं लपवताना कॅमेरात कैद.
काही नागरीक बाजारपेठत सार्वजनिक ठीकाणी थुंकताना सुद्धा कॅमेरात कैद.
तर मासळी बाजारात सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी.
प्रशासनाची माञ या सर्वाकडे डोळे झाक.
पोलीस आणि कुडाळ नगरपंचायतीचं योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांची होतेय मोठी गर्दी.
जमाव बंदी आणि कोरोनाच्या नियमांचा होतोय सर्रास भंग.
कोरोना रूग्णामधे झपाट्याने वाढ होत असताना गर्दी वर जिल्हा प्रशासनाचं नियंञण नसल्याचं उघड.
-
देशात गेल्या 24 तासात 3 लाख 60 हजार 960 नवीन रुग्ण
देशात गेल्या 24 तासात 3 लाख 60 हजार 960 नवीन रुग्ण गेल्या 24 तासात 2 लाख 61 हजार 162 जणांना देण्यात आला डिस्चार्ज गेल्या 24 तासात 3 हजार 293 जणांचा झाला मृत्यू
-
सोलापुरात लसीचा साठा संपल्याने वाट पाहून नागरिक झाले त्रस्त
सोलापूर –
लसीकरणाचा उडाला बोजवारा
लसीचा साठा संपल्याने वाट पाहून नागरिक झाले त्रस्त
कालसुद्धा कोरोना प्रतिबंधक लसीसाठी झाली होती मोठी गर्दी
तर आज लससाठा संपल्याचे लसीकरण केंद्रात लावले फलक
कोरोनाबधितांची संख्या वाढत असताना लसीकरणाची गती मंदावली
-
मोठ्या प्रमाणात सुरु असलेले लसीकरण, कोरोना चाचण्या आणि रुग्णांचे योग्य व्यवस्थापन यामुळे धारावीत रुग्णसंख्या कमी
– मोठ्या प्रमाणात सुरु असलेले लसीकरण, कोरोना चाचण्या आणि रुग्णांचे योग्य व्यवस्थापन यामुळे धारावीत रुग्णसंख्या कमी झालीये
– धारावीत आठवडाभरात रुग्णसंख्या 50 टक्कांनी कमी झालेयत
– आतापर्यंत 25 मायक्रो कंटेनमेंट झोन आणि 556 इमारती सील करण्यात आले आहेत
– धारावीत कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून कोरोना सेंटर्सची संख्या वाढवलीये
– बहूतेक रुगेण हे इथे लक्षण विरहीत आहेत, अनेक मजूर लाॅकडाऊनमुळे गावी गेलेयत
– वाढते लसीकरण आणि कोरोना चाचण्यांमुळे रुग्णांची संख्या 20 च्या खाली आली आहे, ही बाब धारावीसाठी दिलासादायक म्हणावी लागेल
-
औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन हॉस्पिटलमधून 48 रेमेडसीव्हीअर इंजेक्शन गायब झाल्याची शंका
औरंगाबाद :
महापालिकेच्या मेलट्रॉन हॉस्पिटलमधून 48 रेमेडसीव्हीअर इंजेक्शन गायब झाल्याची शंका
48 इंजेक्शनचा एक बॉक्सच आढळत नसल्याची चर्चा
बॉक्स गायब झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नोटीस बाजवल्याची माहिती
चौकशी नंतर इंजेक्शन गायब प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता
इंजेक्शन गायब प्रकरणाची पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती
-
सोलापुरात ऑक्सिजनची यंत्रणा तपासण्यासाठी 14 पथके नियुक्त
सोलापूर –
जिल्ह्यातील ऑक्सिजनची यंत्रणा तपासण्यासाठी 14 पथके नियुक्त
रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही
हे पथकामार्फत तपासणी करण्यात येणार
रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपलाईनचे निरीक्षण करणे,पाईपलाईनचे निरीक्षण करणे ,
फायरसेफ्टीबाबत कोणत्या उपाययोजना आहेत याची ही करणार पथक तपासणी
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
-
औरंगाबाद जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढीचा आलेख घसरला, 958 कोरोना बधितांचा वाढ
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढीचा आलेख घसरला
काल दिवसभरात जिल्ह्यात फक्त 958 कोरोना बधितांचा वाढ
तर 1409 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
बधितांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या अधिक
सध्या रुग्णालयात 12498 रुग्णांवर उपचार सुरू
तर काल दिवसभरात एका महिन्याच्या मुलासह 26 जणांचा मृत्यू
-
नाशकात गेल्या 24 तासांत 4,988 रुग्ण बरे, 3,661 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
नाशिक –
अनेक दिवसांनंतर दिलासादायक बातमी
सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
गेल्या 24 तासात 4988 रुग्ण बरे तर 3661 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मृत्यू संख्या मात्र अद्याप कमी होत नसल्याने अडचणी कायम ..
काल दिवसभरात 37 जणांचा मृत्यू तर आत्तापर्यंत 3382 जणांचा कोरोनामुळे झाला आहे मृत्यू
रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासनाला काहीस दिलासा
-
पिंपरी पोलीस चौकी आणि भाजी मंडईमधील कोरोना चाचणी शिबिरात 272 जणांची चाचणी; 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड –
– पिंपरी पोलीस चौकी आणि भाजी मंडईमधील कोरोना चाचणी शिबिरात 272 जणांची चाचणी; 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
– पिंपरी चिंचवड मधील मुख्य भाजी विक्रेत्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची या शिबिरात टेस्ट करण्यात आली. यात 06 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
– लक्षणे नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन तर लक्षणे असणाऱ्यांना योग्य उपचारासाठी दाखल करण्यात आले
-
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर
कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या स्थानावर
जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख 19हजार 803 लोकांचं झालं लसीकरण
45 वर्षे वयावरील 24 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण
लसीकरणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले जनतेचे आभार
-
झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरण, मृतांच्या वारसांना केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर
नाशिक – झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरण
मृतांच्या वारसांना केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर
तर गंभीर रुगणांना 50 हजारांची मदत
प्रधानमंत्री कार्यालयाचे जिल्हाधिकार्यना पत्र प्राप्त
यापूर्वी महापालिका आणि राज्य सरकार कडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
गेल्या बुधवारी ऑक्सिजन टाकी गळतीमुळे झाली होती दुर्घटना
-
नागपुरात 288 जणांवर अंत्यसंस्कार, नोंद केवळ 89 ची
– नागपुरात 288 जणांवर अंत्यसंस्कार, नोंद केवळ 89 ची
– नागपूर शहरात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूसंख्येत सावळागोंधळ
– प्रशासनाच्या आकडेवारीच्या तिप्पट कोरोना मृत्यू का?
– दहनघाटावरील कोरोनाबाधीतांचे अंत्यसंस्कार, प्रशासनाच्या आकड्यात तफावत
– सोमवारी जिल्हयात ८९ कोरोना मृत्यूची नोंद
– परंतु शहरातील दहनघाटावर सोमवारी ३९२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
– ३९२ पैकी २८८ चा कोवीडमुळे मृत्यू झाल्याची माहिती
– प्रशासनातर्फे कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचे आकडा का लपवले जातात?
-
नागपुरात गेल्या दोन दिवसात कोरोनाबधितांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांनाची संख्या वाढली
नागपूर –
नागपुरात काहीसा दिलासा
गेल्या दोन दिवसात कोरोनाबधितांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांनाची संख्या वाढली
गेल्या 24 तासात 6863 जणांनी केली कोरोना वर मात
ठणठणीत बरं होणाऱ्यांची एकूण संख्या आता 3 लाखा च्या पार पोहचली आहे
तर काल 6287 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
मृत्यू ची संख्या मात्र अजूनही चिंता वाढविणारी
गेल्या 24 तासात नागपुरात 101 जणांचा कोरोना मुळे मृत्यू चिंता वाढली
जिल्ह्यात 76 हजार सक्रिय रुग्ण आहेत
-
लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, आज मंत्रीमंडळात चर्चा होणार
मुंबई –
लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
आज मंत्रीमंडळात चर्चा होणार
15 मे पर्यंत लॉकडाऊन होण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकार निर्णय घेण्याची शक्यता ..
7 दिवसांनी लॉकडाईन वाढवावं टास्क फोर्ट मांडले होते मत
पण रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता अस्लयामुळे
15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवावाव असे काही मंत्र्यांचे मत आहे
आज मंत्रीमंडळात चर्चा होणार
-
रेल्वेकडून राज्यांसठी 4 हजार कोविड केअर कोचची निर्मिती
नवी दिल्ली –
रेल्वेकडून राज्यांसठी 4 हजार कोविड केअर कोचची निर्मिती
जवळपास 64 हजार बेज रेल्वे विभागाकडून
आतापर्यंत 169 कोच विविध राज्यांकडे सोपवण्यात आले
रेल्वे विभागाची दिली माहिती
नागपूर महानगर पालिकासोबत रेल्वेचा सामंजस्य करार
रेल्वेकडून एकूण 4 हजार डब्बे कोरोना रुग्णांसाठी सज्ज
-
लसीसाठी 3 हजार कोटी तयार वित्त विभागाकडून निधीची सज्जता
मुंबई –
लसीसाठी 3 हजार कोटी तयार
वित्त विभागाकडून निधीची सज्जता
राज्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्साठी
राज्य सरकारकडून 3 हजार कोटी सज्जता
18 ते 44 वर्षे वयोगटातील संख्या आंदाजे 5 कोटी गृहीत धरली
यातील निम्मे लोक स्व खर्चाने लस घेऊ शकतात असा सुत्रांचा आंदाज आहे
-
धारावीत आठवडाभरात रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी
मुंबई –
धारावीसाठी दिलासादायक बातमी
धारावीत आठवडाभरात रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी
धारावीत रुग्ण संख्या काल 20 च्या खाली आली आहे
काल 18 रुग्ण धारावीत सापडले
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 188 दिवसांवर पोहोचला
27 एप्रिल 18 रुग्ण 26 एप्रिल 25 रुग्ण 25 एप्रिल 37 रुग्ण 24 एप्रिल 28 रुग्ण 23 एप्रिल 50 रुग्ण 22 एप्रिल 44 रुग्ण 21 एप्रिल 30 रुग्ण 20 एप्रिल 45 रुग्ण 19 एप्रिल 42 रुग्ण 18 एप्रिल 50 रुग्ण
-
पुणे शहरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तुटवडा जाणवायला सुरुवात
पुणे :
शहरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तुटवडा जाणवायला सुरुवात
दिवसाला सव्वाशे ते दीडशे यंत्रांची मागणी
वितरकांकडे त्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध
यंत्राच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्याच्या किमतीही काही प्रमाणात वाढल्या
-
पुण्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना जम्बो कोविड सेंटरमध्ये छोट्या आणि साध्या उपाययोजनांमुळे ऑक्सिजनची मोठी बचत
पुणे :
ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना जम्बो कोविड सेंटरमध्ये छोट्या आणि साध्या उपाययोजनांमुळे ऑक्सिजनची मोठी बचत
गेल्या १० दिवसात ६० टन पेक्षा जास्त ऑक्सिजन बचत करण्यात महापालिका प्रशासनाला यश
सध्या रोज १५ ते १६ टन ऑक्सिजन जातोय वापरला
ऑक्सिजन बचतीबाबत जम्बो रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांना स्पष्ट सूचना
सीसीटीव्हीवरून देखील ठेवले जातय नियंत्रण
त्यामुळे ऑक्सिजनचा वापर २२ टनावरून १५ ते १६ टनावर
-
पुण्यात ‘डॅशबोर्ड’वर बेडची माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार
पुणे
बेडसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची वणवण सुरु असतानाही ‘डॅशबोर्ड’वर बेडची माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवर आता नोटिशी पलीकडे जाऊन कारवाई होणार
रुग्णांवरील उपचार, डिस्चार्जनंतर मोकळ्या बेडची कल्पना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना रेमडेसिव्हिर देऊ नयेत, अशी शिफारस महापालिका जिल्हाधिकाऱ्यांना करणार
-
उस्मानाबादेत कोरोनाचे 728 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू
उस्मानाबाद कोरोना अपडेट :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 728 रुग्ण आणि 5 मृत्यू तर 635 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुक 254, तुळजापूर 71,उमरगा 90, लोहारा 66, कळंब 93, वाशी 46, भूम 68 व परंडा 40 रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6368 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 10 हजार 607 नमुने तपासले त्यापैकी 35 हजार 793 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 27.27 टक्के
28 हजार 552 रुग्ण बरे 81.18 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 874 तर 2.27 टक्के मृत्यू दर
-
राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू, 66358 नवे कोरोनाबाधित
राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू,
तर 66358 नवे कोरोनाबाधित आढळळे
तर 67752 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज
राज्यात सध्या एकूण 672434 सक्रीय रुग्ण
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के
Maharashtra reports 66,358 new cases, 895 deaths and 67,752 discharges today; case tally rises to 44,100,85 pic.twitter.com/oimeU1IsZS
— ANI (@ANI) April 27, 2021
Published On - Apr 28,2021 10:40 PM