Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्याला काहिसा दिलासा, नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, 59,500 रुग्णांची कोरोनावर मात

| Updated on: May 03, 2021 | 11:26 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्याला काहिसा दिलासा, नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, 59,500 रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिकात्मक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 May 2021 10:30 PM (IST)

    ठाण्यात दिवसभरात 516 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    ठाणे कोरोना अपडेट :

    # आज 1,121 रुग्ण कोरोनातून झाले बरे # आज 516 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,20,925 इतकी आहे # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 1,11,054 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 91.8% इतकं आहे ) # 8,155 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत # आज 9 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,716 जणांचा मृत्यू झाला

    # मागील 24 तासात एकूण 4,070 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 516 ( 12.68%) कोरोना बाधित झाले आहेत

  • 03 May 2021 08:58 PM (IST)

    पुण्यात मंगळवारीही कोरोना लसीकरण बंद राहणार

    पुण्यात मंगळवारीही कोरोना लसीकरण बंद राहणार,

    – लस न आल्याने पुणे महापालिकेचा निर्णय,

    – पुण्यातील लसीकरण बंद असण्याचा उद्या चौथा दिवस.

  • 03 May 2021 07:59 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 2579 नवे रुग्ण, 79 जणांचा मृत्यू

    पुणे : – दिवसभरात २५७९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४०४६ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७९ रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील. – १४११ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३०२१०. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४०७०१. – एकूण मृत्यू -६९९१. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३८२५१८. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२७६

  • 03 May 2021 07:52 PM (IST)

    राज्याला काहिसा दिलासा, नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, 59,500 रुग्णांची कोरोनावर मात

    राज्याला काहिसा दिलासा, नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, दिवसभरात 48,621 नवे कोरोनाबाधित, 567 रुग्णांचा मृत्यू, 59,500 रुग्णांची कोरोनावर मात

  • 03 May 2021 07:39 PM (IST)

    वसई-विरारमध्ये दिवसभरात 443 नवे कोरोनाबाधित

    वसई-विरार कोरोना अपडेट :

    गेल्या 24 तासांत 443 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, तर आज दिवसभरात 10 जणांचा मृत्यू, 646 जणांची कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या : 55,832

    कोरोनामुक्त झालेली रुग्णसंख्या : 43,515

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या : 1131

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्णसंख्या : 11186

  • 03 May 2021 07:36 PM (IST)

    येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील 250 रुग्णांना कोरोनाची लागण

    पुणे :

    येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील 1080 रुग्णांपैकी तब्बल 250 रुग्णांना कोरोनाची लागण

    त्यापैकी 150 जण बरे झाले असून 100 जणांवर उपचार सुरू

    रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी दिली माहिती

  • 03 May 2021 07:33 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 973 नवे कोरोनाबाधित, 22 रुग्णांचा मृत्यू

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात, 973 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 22 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 63868

    एकूण कोरोनामुक्त : 46125

    ऍक्टिव्ह रुग्ण : 16767

    एकूण मृत्यू : 976

    एकूण नमूने तपासणी : 387023

  • 03 May 2021 06:27 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात 1399 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 28 जणांचा मृत्यू

    यवतमाळ :

    यवतमाळ जिल्ह्यात आज 1399 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 1161 जण कोरोनामुक्त जिल्ह्यात आज 28 जणांचा मृत्यू एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 6701 आहेत तर एकूण रुग्ण संख्या 56 हजार 159 झाली आहे जिल्ह्यात एकूण 1354 मृत्यूची नोंद आहे जिल्याचा पॉझिटिव्ह रेट 12.88 तर मृत्यू रेट 2.41 आहे

  • 03 May 2021 06:19 PM (IST)

    नागपुरात आज बधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

    नागपूर :

    नागपुरात आज बधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

    नागपुरात आज 6601 जणांनी केली कोरोना वर मात

    4987 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    मात्र 76 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने वाढली चिंता

    एकूण रुग्ण संख्या – 424357

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 344245

    एकूण मृत्यू संख्या – 7675

  • 03 May 2021 05:59 PM (IST)

    नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोना लसींचा तुटवडा

    – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोना लसींचा तुटवडा

    – नागपूर विभागात गेल्या दोन दिवसांपासून लसींचा पुरवठा नाही

    – आरोग्य विभागानुसार उद्याही नागपूरात लस येण्याची शक्यता नाही

    – नागपूरसह पूर्व विदर्भातील लसीकरण रखडणार

    – नागपूर शहरात उद्याही ४५ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण बंद राहणार?

    – लसीचा साठा नसल्याने ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर १८ वर्षांवरील लसीकरण सुरुच झालं नाही

  • 03 May 2021 05:55 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात 559 कोरोनामुक्त, 11 मृत्यूसह 239 नवे कोरोनाबाधित

    गडचिरोली : जिल्ह्यात आज 239 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 22496 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 17662 वर पोहचली. तसेच सध्या 4386 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 448 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.50 टक्के तर मृत्यू दर 1.99 टक्के झाला.

  • 03 May 2021 05:52 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 424 नवे रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्यात आज दोन रुग्णांचा मृत्यू, 424 नवे रुग्ण, तर 503 जणांना डिस्चार्ज, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 33 दिवसात 123 रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे 12917 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 28992

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 3919

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 24762

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 310

  • 03 May 2021 05:46 PM (IST)

    महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, 12 जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण घटले

    महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण घटले औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातुर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे , वाशिम या 12 जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली गेल्या 15 दिवसात रुग्णसंख्या घटली केद्रींय आरोग्यमंत्रालयाची माहिती

  • 03 May 2021 05:20 PM (IST)

    मोदी-शाह यांच्या रॅलीमुळे देशात कोरोनाचा उद्रेक : विजय वडेट्टीवार

    देशात लॉकडाऊन लागण्याची गरज आहे. कोरोना उद्रेकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीमुळे कोरोनाचा उद्रेक झाला, असा आरोप विजय वडेट्टीवर यांनी केला. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलं.

  • 03 May 2021 05:13 PM (IST)

    कर्नाटकात चामराजनगरमध्ये आँक्सिजन अभावी 24 जणांचा मृत्यू

    कर्नाटकात चामराजनगरमध्ये आँक्सिजन अभावी 24 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री येदियुरप्पांकडुन चौकशीचे आदेश, आँक्सिजन अभावी मृत्यु झाल्याचा आरोप, जिल्हा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले

    दरम्यान, चामराजनगर दुर्घटनेतील दोषींवर होणार कठोर कारवाई, चामराजनगर सरकारी जिल्हा इस्पितळात एका रात्रीत तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना.

    मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असून त्याचा अहवाल आल्यावर दोषींवर हलगर्जीपणाबद्दल कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

    चामराजनगर सरकारी जिल्हा इस्पितळात रविवारी एकाच रात्रीत 24 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री सुधाकर यांना आपल्या निवासस्थानी पाचारण करून त्याच्याकडून दुर्घटनेची माहिती घेतली.

  • 03 May 2021 04:46 PM (IST)

    सातारा जिल्हयात आज रात्रीपासून कडक लाॅकडाऊन

    सातारा जिल्हयात आज रात्रीपासून कडक लाॅकडाऊन

    कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    आज रात्रीपासून लाॅकडाऊनची नवीन नियमावली होणार जाहीर

    सातारा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

  • 03 May 2021 04:41 PM (IST)

    सांगली मनपा क्षेत्रात बुधवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू, सकाळी फक्त 11 वाजेपर्यंत किराणा आणि भाजी विक्रीसाठी होम डिलिव्हरीला परवानगी

    सांगली :

    सांगली मनपा क्षेत्रात बुधवारपासून जनता कर्फ्यू

    मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या रुग्णाच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने घेतला निर्णय

    बुधवार 5 मे पासून सात दिवस जनता कर्फ्यू लागणार

    सकाळी फक्त 11 वाजेपर्यंत किराणा आणि भाजी विक्रीसाठी होम डिलिव्हरीला परवानगी

  • 03 May 2021 04:27 PM (IST)

    …तर सीरमची एकही लस बाहेर जाऊ देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

    इचलकरंजी : माजी खासदार राजू शेट्टी यांचा राज्य आणि केंद्र सरकारला इशारा, राज्यामध्ये लसींचा पुरवठा सुरळीत करा, सीरमची लस आधी महाराष्ट्राला मिळायला हवी, त्याचे उत्पादन पुण्यात होते, महाराष्ट्र राज्याला लस जर नाही मिळाली तर लसी घेऊन जाणारी एकही गाडी पुण्यातून बाहेर जाऊ देणार नाही, सीरम इन्स्टीट्यूट जवळ आंदोलन करण्याचा इशारा

  • 03 May 2021 03:34 PM (IST)

    कोरोना विरोधाच्या लढाईत Pfizer चा मदतीचा हात, भारतासाठी 7 कोटी डॉलर्सची औषधे पाठवण्याची घोषणा

    कोरोनाविरोधात Pfizer करणार भारताची मदत; 7 कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याची घोषणा, कोरोनाच्या लसीसाठी मंजुरी देण्यासाठीही सरकारशी चर्चा, गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद, शिवाय लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 03 May 2021 02:54 PM (IST)

    पनवेलमध्ये लसीकरण केंद्रावर हमरी तुमरी

    पनवेलमध्ये लसीकरण केंद्रात हमरी तुमरी

    संतप्त नागरिक आणि लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद

    नागरिकांशी अरेरावी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

    पनवेल पालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र-१ मधील प्रकार

    लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे गर्दी

  • 03 May 2021 02:53 PM (IST)

    जव्हार मधील पतंग शहा कुटीर रुग्णालय लसीकरण केंद्रावर गोंधळ

    जव्हारमधील पतंग शहा कुटीर रुग्णालय लसीकरण केंद्रावर गोंधळ

    ठाणे, मुंबई, नाशिक, वसई, विरार येथील नागरिक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आल्याने गोंधळ

    जव्हार भागातील नागरिक संतप्त, लसीकरण केंद्रावर गोंधळ घालून लसीकरण केलं बंद

    लसीकरण करण्याची ऑनलाइन प्रणाली असल्याने परजिल्ह्यातील नागरिकांनी पालघर जिल्ह्यात नोंदणी केल्याने येथूनच केंद्र देण्यात आली,,मात्र ह्याचा त्रास स्थनिकाना होत असल्याने उडाला गोंधळ

    जव्हार सारखा अतिदुर्गम भाग असल्याने आणि शिक्षित वर्ग जास्त नसल्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार कसं असा प्रश्नही या नागरिकांसमोर असून  रजिस्ट्रेशन करण्यात नागरिकांना अडचणी

  • 03 May 2021 01:55 PM (IST)

    अहमदनगरमध्ये लसीकरणादरम्यान नागरिकांचा गोंधळ

    अहमदनगरमध्ये लसीकरणादरम्यान नागरिकांचा गोंधळ,

    रांगेत उभे राहून लस न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप

    नगरच्या माळीवाडा महात्मा फुले अरोग्य केंद्रावर नागरिकांनी घातला गोंधळ

  • 03 May 2021 01:00 PM (IST)

    नागपुरात कोरोनाची भयावह स्थिती, रुग्णांना हॅास्पिटलमध्ये नेण्यासाठी वेळेवर ॲम्ब्यूलन्स मिळेना!

    नागपूरात कोरोनाची भयावह स्थिती आहे, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ७५ हजार पार गेलीय. अशा स्थितीत रुग्णांना हॅास्पिटलमध्ये नेण्यासाठी वेळेवर ॲम्ब्यूलंस मिळत नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेनं आपल्या २५ मिनी बसेस रुग्णवाहिका म्हणून परिवर्तित केल्याय. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते आजपासून या २५ रुग्णवाहीका रुग्णसेवेत रुजू झाल्याय. “खाजगी ॲम्ब्यूलंस वाल्यांकडून होणारी लूट थांबावी, आणि रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळावी, म्हणून मनपाने २५ मिनी बसेस रुग्णवाहिका म्हणून परिवर्तित केल्याय, यात ॲाक्सीजनची सोय असून, कंडक्टर्सला ॲाक्सीजन देण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय, ही सेवा निःशुल्क असेल” असं यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

  • 03 May 2021 11:42 AM (IST)

    सातारा जिल्हयात 24 तासात 2 हजार 502 कोरोना बाधितांची नोंद

    सातारा जिल्हयात 24 तासात 2,502 कोरोना बाधितांची नोंद…

    जिल्हयात 23,122 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार…

    आतापर्यंत 2574 कोरोना बाधितांचा मृत्यु….

    जिल्हयात आतापर्यन्त 109,974 कोरोना बाधितांची नोंद

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ सुभाष चव्हाण यांची माहिती

  • 03 May 2021 11:02 AM (IST)

    वडवणी शहरातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार

    वडवणी शहरातील कोविड सेंन्टरमधील कोरोना रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार

    बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील प्रकार

    कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट खाद्यपदार्थ खरेदीसाठी रस्त्यावर

    कोविड सेंटर कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

    कोविड सेंटर उभारले मात्र व्यवस्था नसल्याचा आरोप

    वारंवार सूचना करूनही कोरोना रुग्ण कोविड सेंटर च्या पडतात बाहेर

  • 03 May 2021 10:25 AM (IST)

    पालघरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने मृ्त्यू, गावावर शोककळा

    पालघर जिल्ह्यतील वाडा तालुक्यात ऐनशेत गावात एकाच कुटुंबातील आई, वडील व ३४ वर्षीय मुलगा या तिघांचा कोरोना मूळे मृत्यू झाल्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे तर सून व नातवंडे कोरोनावर मात करून घरी परतली

    वाडा तालुक्यतील ऐनशेत गावातील ठाकरे कुटुंबातील मुलगा ,आई, वडील,सून व नातवंडे असे कोराना बाधित झाले होते सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना आई सविता ठाकरे हीचा ११ एप्रिल ला मृत्यू झाला  त्यानंतर ३४ वर्षीय मुलगा सागर ठाकरे याचा २२ एप्रिल मृत्यू झाला तर वडील मृत्यूशी झुंज देत असताना अखेर १ मे ला वडील सदानंद ठाकरे यांचा मृत्यू झल्यामुळे हस्ते कुटुंब पूर्ण या कोरोना मूळे  उध्वस्त होऊन गेले. फक्त या कोरोनावर मात करून सून व दोन नातवंडे घरी परतले आहेत या घटने मूळे या गावावर शोक कळा पसरली आहे

  • 03 May 2021 09:17 AM (IST)

    सोलापुरात गेल्या 24 तासात 42 जण कोरोनाचे बळी

    गेल्या 24 तासात 42 जण ठरले कोरोना महामारीचे बळी

    तर कोरोना बाधितांची संख्या 1878 वर

    शहरात कोरोनाचे 210 नवीन रुग्ण तर ग्रामीण भागात 1668 रुग्ण

    जिल्ह्यात पंढरपूर ,माळशिरस, मंगळवेढा तालुक्यात बाधितांचे प्रमाण जास्त

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडूकीमुळे प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र

  • 03 May 2021 08:58 AM (IST)

    मोफत धान्यासाठी ई- पॉस वरील अंगठ्यामुळे कोरोनाचा धोका

    सोलापूर-  मोफत धान्यासाठी ई- पॉस वरील अंगठ्यामुळे कोरोनाचा धोका

    यावर काय उपाय योजना करावी असा प्रश्न रेशन दुकानदारांना समोर

    कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्र शासनाने रेशन दुकानातून मोफत स्वस्त धान्य देण्याचा घेतला आहे निर्णय

    स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाला ई-पॉस वर प्रेस करावा लागतो अंगठा

  • 03 May 2021 08:57 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारणार कोव्हिड सेंटर

    नाशिक – जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारले कोव्हिड सेंटर

    कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जिल्हा परिषदेचा निर्णय

    सिन्नर, मालेगाव, नांदगाव , सटाणा, देवळालीसह 10 ठिकाणी उभारणार कोव्हिड सेंटर

  • 03 May 2021 08:56 AM (IST)

    सोलापुरात ऑक्सीजन नर्स या संकल्पनेतून होणार प्राणवायूची बचत

    ऑक्सीजन नर्स या संकल्पनेतून होणार प्राणवायूची बचत

    ऑक्सिजनच्या तुटवडा याला सामोरे जात असताना त्याच्या बचती विषयी रुग्णालयांना घ्यावी लागत आहे काळजी

    यासाठी आरोग्य विभागाकडून ऑक्सिजन नरसी संकल्पना राबविण्याच्या सूचना

    आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई केल्यास 30 ते 40 टक्के बचत होणार

    रुग्णालयात 50 रुग्णामागे एक ऑक्सिजन नर्स म्हणजे एक परिचारिका किंवा ब्रदर असे नियोजन करण्यात येणार

    प्रत्येक रुग्णाकडे जाऊन त्याचे ऑक्सिजनची पातळी तपासून त्याची नोंद करून ऑक्सिजनचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात करण्यात येणार

  • 03 May 2021 08:55 AM (IST)

    औरंगाबादेत 9 महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू

    औरंगाबादेत 9 महिन्याच्या बालिकेचा कोरोनामुळे मृत्यू

    आरेफ कॉलनीतील 9 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

    गेल्या महिनाभरात 8 बालकांचा मृत्यू

    5 दिवसात 3 बालकांचा कोरोनामुळे बळी

    याआधी 6 वर्षीय बालिकेचा,एक महिन्याच्या मुलाचा तर आता 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

    लहान मुलांची बारकाईने काळजी घेण्याची गरज

  • 03 May 2021 08:30 AM (IST)

    औरंगाबादकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

    औरंगाबादकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना होतोय हळूहळू कमी

    कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, आज फक्त 835 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

    जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 126176 वर

    दिवसभरात 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    आजपर्यंत एकूण 2557 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात 112542 कोरोनामुक्त, 11077 रुग्णांवर उपचार सुरु

  • 03 May 2021 08:30 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारले कोव्हिडं सेंटर

    नाशिक – जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारले कोव्हिडं सेंटर

    कोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे जिल्हा परिषदेचा निर्णय

    सिन्नर, मालेगाव, नांदगाव , सटाणा, देवळा सह 10 ठिकाणी उभारणार कोव्हिडं सेंटर

  • 03 May 2021 08:29 AM (IST)

    औरंगाबादमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

    औरंगाबाद मधील 48 रेमडीसीवर इंजेक्शन चोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

    औषध निर्माण अधिकारी,सहायक फार्मसिस्ट यांना निलंबित केल्यानंतर आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल

    रेमडीसीवर चोरी प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    48 रेमडीसीवर इंजेक्शन लंपास करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप

  • 03 May 2021 08:28 AM (IST)

    नाशिकमध्ये दोन दिवसांपासून लसीकरण बंद, नागरिकांना मनस्ताप

    नाशिक – नाशिकमध्ये दोन दिवसांपासून लसीकरण बंद

    लसीकरण केंद्रांवर मात्र रुग्णांच्या रांगा

    लसीकरणाबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप

    प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभाराचा नागरिकांना फटका

    नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर लस संपल्याचा फलक

  • 03 May 2021 08:27 AM (IST)

    नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यात 9 रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास परवानगी, पालकमंत्र्यांकडून सूचना

    नाशिक – ऑक्सिजन टंचाईच्या पार्शवभूमीवर सर्व सरकारी रुग्णालयांमधे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याच्या सूचना

    पहिल्या टप्प्यात 9 रुग्णालयात प्लांट उभारण्यास परवानगी

    पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

    पहिल्या टप्प्यातील 9 रुग्णालयां साठी वार्षिक योजनेतून 10 कोटी 88 लाख रुपयांची मंजुरी

    इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर मधून 3 ठिकाणी बसवले जाणार प्लांट

    उर्वरित 16 रुग्णालयात देखील लवकरच बसवणार ऑक्सिजन प्लांट

  • 03 May 2021 06:59 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 112 रुग्णांचा मृत्यू

    नागपूर जिल्ह्यात मृत्यूचं तांडव

    काल दिवसभरात तब्बल 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    तर 5007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 419370 च्या पार

    तर एकूण मृत्यूसंख्या 7599 आहे.

    नागपूर जिल्ह्यातील 6376 जणांनी कोरोनावर मात

  • 03 May 2021 06:57 AM (IST)

    पुण्यात कोरोनाची नेमकी परिस्थिती काय?

    पुणे शहरात काल दिवसभरात 4044 नवे रुग्ण

    तर 66 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

    पुण्यात सध्या 42 हजार 229 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

    दिवसभरात 4 हजार 656 रुग्णांना डिस्चार्ज

    पुण्याची परिस्थिती चिंताजनक

    पुणे जिल्ह्यात दिवसभरात 11 हजार 661 नवे रुग्ण बाधित झाले.

    159 रुग्णांचा मृत्यू झाला.

    दुसरीकडे जिल्ह्यातील 9 हजार 566 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

  • 03 May 2021 06:55 AM (IST)

    मुंबईत 3672 नवे कोरोनाबाधित रुग्ण, सद्यस्थितीत 57 हजार 342 रुग्ण सक्रिय

    मुंबईत काल दिवसभरात 3672 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    तर 5544 रुग्णांची कोरोनावर मात

    मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तरी शहरात दिवसभरात तब्बल 79 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    मुंबईत सद्यस्थितीत 57 हजार 342 रुग्ण सक्रिय

  • 03 May 2021 06:53 AM (IST)

    महाराष्ट्रात दिवसभरात तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    राज्यात काल दिवसभरात तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 22 हजार 401 पार

    तर 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात

    काल दिवसभरात 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात

    राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 669 रुग्णांचा मृत्यू

Published On - May 03,2021 10:30 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.