Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात दिवसभरात 133 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 3 जणांचा मृत्यू

| Updated on: Jun 02, 2021 | 12:10 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात दिवसभरात 133 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 3 जणांचा मृत्यू
corona

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jun 2021 11:04 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात 133 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 3 जणांचा मृत्यू

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 133 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला

    आतापर्यंत 1072 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 50676 जणांनी कोरोनावर मात केली

    तर सध्या 4121 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 419 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 01 Jun 2021 09:12 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 89 नवे रुग्ण आढळले

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 89 रुग्ण आढळले

    दिवसभरात 08 मृत्यू तर 565 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 32, तुळजापूर 01,उमरगा 04, लोहारा 03, कळंब 18, वाशी 00, भूम 26 व परंडा 05 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 2515 सक्रिय रुग्ण

    51 हजार 272 रुग्ण बरे,

    रुग्ण बरे होण्याचा दर 93.16 टक्क्यांवर

    एकूण  1249 रुग्णांचा मृत्यू

    2.26 टक्के मृत्यू दर

  • 01 Jun 2021 09:07 PM (IST)

    पुण्याचे महापौर दोन दिवसानंतर महापौर दिल्लीला जाणार 

    पुणे : दोन दिवसानंतर महापौर दिल्लीला जाणार

    केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची डब्ल्यूएचो बरोबर बैठक असल्यानं दौरा दोन दिवस लांबणीवर

    सीरमकडून लस खरेदीची परवानगी मिळावी यासाठी घेणार केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट

    सीरमनं केंद्राची परवानगी आवश्यक असल्याचं महापालिकेला दिलंय स्पष्टीकरण

    केंद्राची महापालिकेला लस खरेदीची परवानगी मिळणार का ?

  • 01 Jun 2021 07:05 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात 1499 रुग्ण कोरोनामुक्त, 430 नव्या रुग्णांची वाढ

    नाशिक : आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1499

    आज रोजी पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 430

    नाशिक मनपा- 216 नवे रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 181 नवे रुग्ण

    मालेगाव मनपा- 15 नवे रुग्ण

    जिल्हा बाह्य- 18 नवे रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4754

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -30

    नाशिक मनपा- 16 रुग्णांचा मृत्यू

    मालेगाव मनपा- 01 रुग्णांचा मृत्यू

    नाशिक ग्रामीण- 13 रुग्णांचा मृत्यू

  • 01 Jun 2021 07:01 PM (IST)

    नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय, उद्यापासून कोविड रुग्ण दाखल करून घेणार नाही

    नाशिक – शहरातील खासगी रुग्णालयांचा धक्कादायक निर्णय

    उद्यापासून कोविड रुग्ण दाखल करून घेणार नाही

    पत्रक काढून खासगी डॉक्टरांनी दिली माहिती

    रुग्ण संख्या कमी झाल्याने आता सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन

    खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण वेगळं असल्याची चर्चा

  • 01 Jun 2021 06:36 PM (IST)

    नागपुरात आज 203 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 833 जणांनी केली कोरोनावर मात

    नागपूर : नागपुरात आज 203 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    833 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 474808

    बरं होणाऱ्यांची संख्या – 460275

    एकूण मृत्यूसंख्या – 8914

  • 01 Jun 2021 05:53 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले 110 नवे कोरोना रुग्ण 

    वाशिक कोरोना अलर्ट

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले 110 नवे कोरोना रुग्ण

    तर आज  270  जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    तसेच 05 रुग्णांचा झाला मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40173

    सध्या सक्रिय रुग्ण – 1993

    आतापर्यंत डिस्चार्ज करण्या आलेले रुग्ण – 37596

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 583

  • 01 Jun 2021 04:28 PM (IST)

    तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या, पण रुग्णांची फरफट होतेय : प्रविण दरेकर

    पालघर : तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण पालघर जिल्ह्यात तशा उपाययोजना नसल्याने करोनाची लागण झालेल्या नवजात मुलीची उपचारासाठी फरफट होणे ही लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. काल अश्विनी काटेला या मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर बाळ पॉझिटिव्ह आले होते त्याच्या उपचारासाठी अनेक तासाची फरफट झाल्यायानंतर बाळाला जवाहर येतील ग्रामीण रुग्णालय येथे नेले होते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी नकार दिला होता. या बाळाला  ते दीड तास रुग्णालयाच्या बाहेर उभे राहावे लागले होते. प्रवीण दरेकर आज पालघर जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तना मदत करण्यासाठी पालघर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलाताना त्यांनी वरील भाष्य केले.

  • 01 Jun 2021 01:54 PM (IST)

    पुणे महापालिकेने परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन लसीकरण केलं सुरु

    पुणे महापालिकेने परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन लसीकरण केलं सुरु

    लसीकरणाला विद्यार्थ्यांचा तुफान प्रतिसाद,

    नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोठी गर्दी,

    गर्दीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा,

    दोन तासात 200 लसीचा कोटा संपला,

    उद्याच्या लसीकरणासाठी आज नोंदणी सुरू,

    विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजीस्ट्रेशन नाही ऑफलाईन पद्धतीने रजीस्ट्रेशन करून लसीकरण,

  • 01 Jun 2021 01:14 PM (IST)

    नाशकात निर्बंध शिथिल होताच नाशिकच्या बाजार पेठांमध्ये तुफान गर्दी

    नाशिक – निर्बंध शिथिल होताच नाशिकच्या बाजार पेठांमध्ये तुफान गर्दी

    तर मेन रोड परिसरात चक्क ट्रॅफिक जाम

    वाहनांच्या लांबच लांब रांगा

    कोरोना नियमांच्या नाशिकमध्ये चिंधड्या

    मोबाईल,कपडे,भांडे, किराणा खरेदीसाठी नाशिककरांची तोबा गर्दी

    शहरात कोरोना चा धोका पुन्हा वाढला

  • 01 Jun 2021 12:49 PM (IST)

    अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादेत तुफान गर्दी

    औरंगाबाद –

    अनलॉकच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादेत तुफान गर्दी

    गुलमंडी, पैठण गेट, सिटी चौक, निराला बाजार या परिसरात गर्दी

    गुलमंडी परिसरात झाली ट्रॅफिक जॅम

    अर्धा तासापासून झाली ट्रॅफिक जॅम

    अनलॉकच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचे तीनतेरा

  • 01 Jun 2021 12:12 PM (IST)

    सिंधुदुर्गात निर्बंधाना पंधरा दिवसांची मुदतवाढ

    सिंधुदुर्ग –

    सिंधुदुर्गात निर्बंधाना पंधरा दिवसांची मुदतवाढ

    जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    पुर्वी प्रमाणेचं अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने व आस्थापणा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत.

    जिल्हा बाहेरू येणा-या प्रवाशांसाठी जिल्हा बंदीचे आदेश.

    जिल्ह्यातील सर्व सिमा 1 जून ते 15 जून पर्यंत राहणार बंद.

    फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणा-या वाहणांना परवानगी.

  • 01 Jun 2021 12:06 PM (IST)

    देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 25 हजारांनी घट

    देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

    देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,27,510

    देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,55,287

    देशात 24 तासात मृत्यू – 2,795

    एकूण रूग्ण –  2,81,75,044

    एकूण डिस्चार्ज –2,59,47,629

    एकूण मृत्यू – 3,31,895

    एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 18,95,520

    आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 21,60,46,638

  • 01 Jun 2021 09:19 AM (IST)

    सांगलीत त्रिशला कोरोना हेल्थ सेंटर बंद करण्याचे मनपाचे आदेश

    सांगली –

    त्रिशला कोरोना हेल्थ सेंटर बंद करण्याचे मनपाचे आदेश

    पुरेसे मनुष्यबळ, सुविधेचा अभाव तरी सेंटर सुरु

    नागरिकाच्या सतत तक्रारी

    या सर्व कारणांमुळे अखेर मनपा ने कारवाई करत बंद चे दिले आदेश

  • 01 Jun 2021 08:56 AM (IST)

    बुलडाण्यात कोरोनामुळे जिल्ह्यातील 18 बालकांचा आधार हिरावला

    बुलडाणा

    कोरोनामुळे जिल्ह्यातील 18 बालकांचा आधार हिरावला

    यामध्ये चार बालकांचे दोन्ही पालकांचा मृत्यू झाला

    तर 14 बालकांच्या एका पालकांचा मृत्यू झालाय

    अनाथ झालेल्या बालकांना लवकरच शासन निर्णयान या बालकांना मदत मिळेल

    तर या बालकांना परस्पर मदत न करता ज्यांना मदत करायची आहे अशांनी महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करण्याचे प्रशासनाचे आवाहन

  • 01 Jun 2021 08:23 AM (IST)

    सोलोपुरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबलेसाठी  प्रशासन करणार 30 टन ऑक्सिजन निर्मिती

    सोलापूर – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबलेसाठी  प्रशासन करणार 30 टन ऑक्सिजन निर्मिती

    जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये 30 टन ऑक्सिजन निर्मिती करण्याचे नियोजन

    यापैकी 15 टन ऑक्सीजन जून अखेर पासून तयार करण्यात येणार

    लहान मुलांना कोरोना बाधा झाल्याने  प्रत्येक रुग्णालयात 20 टक्के बेड राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

  • 01 Jun 2021 08:21 AM (IST)

    सोलापुरात लस उपलब्ध झाल्याने लसीकरण केंद्रावर आज लस मिळणार

    सोलापूर – लस उपलब्ध झाल्याने लसीकरण केंद्रावर आज लस मिळणार

    काल लसीचा तुटवडा असल्यामुळे झाले नव्हते लसीकरण

    प्रत्येक केंद्रावर  फक्त पन्नास जणांना मिळणार लस

  • 01 Jun 2021 08:20 AM (IST)

    नागपूर महापालिकेची आरोग्य सेवेसाठी 255 कोटींची तरतुद

    नागपूर –

    नागपूर महापालिकेची आरोग्य सेवेसाठी 255 कोटींची तरतुद

    आठ तास चर्चेनंतर मनपाचे अंदाजपत्रकास सभागृहाची मंजुर

    नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर व्दारे प्रस्तुत रु. २७९६ कोटीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली.

    सत्तापक्ष आणि ‍विपक्ष च्या सदस्यांनी अर्थसंकल्पावर साधारण: आठ तास चर्चा करुन आपली मते व्यक्त केली.

    ही रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या ९.४६ टक्के आहे.

  • 01 Jun 2021 08:14 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्याला लॉकडाऊनमधून शिथिलता नाहीच

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्ह्याला लॉकडाऊनमधून शिथिलता नाहीच

    जिल्ह्यातील लॉकडाऊन ला 15 जून पर्यंत मुदतवाढ

    जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले मुदतवाढीचे सुधारित आदेश

    दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार

    जिल्ह्यातील कोरोना स्थिती आद्यप गंभीर असल्याने लॉकडाऊन मुदतवाढीचा निर्णय

  • 01 Jun 2021 08:11 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी 55 टक्क्यांनी घटली

    पुणे

    पुणे विभागात पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी 55 टक्क्यांनी घटली ,

    मात्र सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मात्र ऑक्सिजनची मागणी वाढलीये,

    या तीनही जिल्ह्यात 2 मे.टनानी ऑक्सिजन पुरवठा हा वाढवण्यात आलाय आणि सुरळीतपणे पुरवठा केला जातोय,

    सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 13 मे.टनानी गेल्या दहा दिवसात ऑक्सिजन मागणीत वाढ झालीये,

    विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्याच्या ऑक्सिजन पुरवठ्याचं नियोजन केलं जातंय,

    साधारण पुणे जिल्ह्याला 420 मे.टन ऑक्सिजन लागत होता तो आज 223 मे.टनावर आलाय,

    रुग्णसंख्या घटल्यानं ऑक्सिजन मागणीत घट झालीये

  • 01 Jun 2021 08:11 AM (IST)

    सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणे लॉकच राहणार

    सोलापूर-

    सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणे लॉकच राहणार

    राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा काढले आदेश

    जीवनावश्यक वस्तूंचे दुकान आहे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत तर कृषी संबंधित दुपारी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा

    अत्यावश्यक सेवा प्रकाराचे दुकाने आहेत त्या दुकान मालकांनी व तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे गरजेचे

  • 01 Jun 2021 08:09 AM (IST)

    नागपुरात म्यूकरमायकोसिसकरिता मनपाच्या पाच पोस्ट कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ

    नागपूर  –

    म्यूकरमायकोसिसकरिता मनपाच्या पाच पोस्ट कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ

    कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांकरिता म्यूकोरमायकोसिस लक्षणे तपासणी करीता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरामधील पाच पोस्ट कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत.

    नागपूर महानगरपालिका, टुगेदर वी कॅन, आयुर्वेद विद्यालय व पक्वासा विद्यालय आणि मैत्री परिवार संस्थेच्यावतीने के.टी. नगर रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह, सदर रोगनिदान केंद्र आणि पक्वासा आयुर्वेदिक रुग्णालय या पाच रुग्णालयांमध्ये पोस्ट कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले

    येथील म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) तपासणीचा शुभारंभ झाला

  • 01 Jun 2021 08:07 AM (IST)

    कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेणार

    कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेणार,

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यावर ठाम

    फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा 25 एप्रिल ला घोषित करण्यात आली मात्र ती 23 मे ला ढकलण्यात आली तीही तारीख पुढे ढकलण्यात आली,

    मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा घेणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलंय,

    पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तब्बल 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीये,

    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षेची तारीख होणार जाहीर

  • 01 Jun 2021 07:01 AM (IST)

    पुण्याच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात निर्बंध आणखी आठवडाभर कायम राहणार

    पुणे –

    – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात निर्बंध आणखी आठवडाभर कायम राहणार,

    – पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आलीय,

    – ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट दहापेक्षा जास्त असल्याने निर्बंध हटविण्याबाबत निर्णय घेतलेला नाही,

    – २९ मे रोजी जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह दर ११.३ टक्के असल्याने ग्रामीण भागातील निर्बंध कायम राहणार,

    – ग्रामीण भागात निर्बंध कायम असले तरी शेती उपयोगी खते, औषधे, बी-बियणे, शेती अवजारे आदी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी,

    – जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची माहिती

  • 01 Jun 2021 06:59 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमधील ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद; महापालिका आयुक्तांचे आदेश

    पिंपरी-चिंचवड

    – पिंपरी-चिंचवडमधील ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद; महापालिका आयुक्तांचे आदेश

    -शहरातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे

    -सद्यपरिस्थितीत ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही.त्यामुळे रुग्णसंख्येअभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद करण्यात आले आहे

    -मे महिन्याच्या पंधरवाड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे सध्या रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली

    -रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर (सीसीसी) यापूर्वीच बंद केले आहेत

  • 01 Jun 2021 06:50 AM (IST)

    औरंगाबादेत म्युकरमायकोसिसची स्थिती चिंताजनक; 57 जणांचा मृत्यू

    औरंगाबाद :

    करोनातील दुसऱ्या लाटेतील मृत्युदराबरोबरच म्युकरमायकोसिसमुळे झालेले मृत्यू चिंताजनक असल्याचे सोमवारी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले

    जिल्ह्यत 345 म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत

    आतापर्यंत एकूण 608 रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळले असून त्यापैकी 206 जण बरे होऊन घरी परतले आहेत

    तर 57 मृत्यू झाले आहेत, या रुग्णांना आवश्यक उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनच्या फेरवाटपाबाबत आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी नुकतीच चर्चा झाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत सोमवारी सांगितले

  • 01 Jun 2021 06:43 AM (IST)

    अम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा केंद्राकडून राज्यांना पुरवठा

    नवी दिल्ली : अम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनच्या 30 हजार 100 कुप्या केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी सोमवारी दिली. यापैकी सर्वाधिक कुप्या महाराष्ट्राला देण्यात आल्या आहेत.

  • 01 Jun 2021 06:40 AM (IST)

    कोरोना निर्बंध काळात पुण्यात 989 नोंदणी विवाह

    पुणे : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे या काळात विवाह समारंभातील उपस्थितीवरही मर्यादा आली होती. मात्र, या काळात पुण्यात 989 नोंदणी विवाह पार पडले. त्यामध्ये एप्रिल महिन्यात 507, तर मे महिन्यात 482 नोंदणी पद्धतीने विवाह झाले.

Published On - Jun 01,2021 11:04 PM

Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.