Maharashtra Coronavirus LIVE Update : ऑक्सिजन ट्रेन गोंदिया जिल्ह्यात दाखल

| Updated on: May 02, 2021 | 12:09 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : ऑक्सिजन ट्रेन गोंदिया जिल्ह्यात दाखल
कोरोना रुग्णांना मोठा दिलासा

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 May 2021 10:10 PM (IST)

    राज्यात दिवसभरात तब्बल 802 रुग्णांचा मृत्यू, 63,282 नवे कोरोनाबाधित

    राज्यात आज 63,282 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झालेय. राज्यात आज रोजी एकूण 6,63,758 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 46,65,754 झालीय. तर राज्यात राज्यात आज 802 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 % एवढा आहे

  • 01 May 2021 10:08 PM (IST)

    ऑक्सिजन ट्रेन गोंदिया जिल्ह्यात दाखल

    गोंदिया :- विशाखपट्टणम येथून निघालेली  ऑक्सिजन ट्रेन महाराष्ट्रात गोंदिया जिल्हात दाखल झाली आहे. या रेल्वेत ऑक्सिजनचे 5 कंटेनर आहेत. ही रेल्वे नाशिक, मुंबई याठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणार आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातील रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे

  • 01 May 2021 09:32 PM (IST)

    वसई-विरारमध्ये दिवसभरात 831 नवे रुग्ण

    वसई-विरार कोरोना अपडेट :

    मागच्या 24 तासात 831 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, तर आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू, 648 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या : 54,674

    कोरोना मुक्त झालेली रुग्णसंख्या : 42,237

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या : 1111

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या : 11326

  • 01 May 2021 08:38 PM (IST)

    केडीएमसीत गेल्या दहा दिवसांत नव्या कोरोनाबाधित रुग्नांची संख्या घटली तर मृत्यूची संख्या वाढली

    कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात एकीकडे कोरोना बाधित रुगणांची संख्या आटोक्यात येत असताना दुसरीकडे कोरोनाबाधित मृत्यूची संख्या वाढत चालली असल्याने ही बाब चिंतेची बनली आहे. गेल्या दहा दिवसांत 22 एप्रिलपासून आज 1 मे या कालावधी कोरोनाबाधित रुगणांची संख्या कमी होत चालली आहे. गेल्या दहा दिवसात ११ हजार ६१० रुगण सापडले तर दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णालच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दहा दिवसांत 102 रुग्णांचा मृत्यू झाला.

  • 01 May 2021 08:36 PM (IST)

    सातारा जिल्हयात 24 तासात 2383 जण कोरोनाबाधित, 34 रुग्णांचा मृत्यू

    सातारा जिल्हयात आज 1444 रुग्ण झाले कोरोनामुक्त

    जिल्हयात 24 तासात 2383 जण कोरोनाबाधित तर 34 कोरोना बाधितांचा मृत्यू

    जिल्हयात 18,876 रुग्णांवर उपचार सुरु

    जिल्हयात एकूण 83,819 रुग्ण कोरोनामुक्त

    जिल्हयात आतापर्यंत एकूण 2530 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ सुभाष चव्हाण यांची माहिती

  • 01 May 2021 08:34 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 1125 नवे कोरोनाबाधित, 24 रुग्णांचा मृत्यू

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात, 1125 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 24 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 61437

    एकूण कोरोनामुक्त : 44088

    सक्रिय रुग्ण : 16420

    एकूण मृत्यू : 929

    एकूण नमूने तपासणी : 381053

  • 01 May 2021 08:32 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात तब्बल 4069 नव्या कोरोनाबाधितांची वाढ, 88 रुग्णांचा मृत्यू

    पुणे : – दिवसभरात ४०६९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४३३९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ८८ रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील. – १४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४२३५८७. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४२९०७. – एकूण मृत्यू -६८६४. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३७३८१६. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९३३६.

  • 01 May 2021 07:22 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात आढळले 368 नवे पॉझिटिव्ह रुग्ण  

    अकोला कोरोना अपडेट

    आज दिवसभरात 368 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

    1733 अहवालापैकी 1365 जणांचे अहवालात निगेटिव्ह

    कोरोनाबाधितांचा आकडा 40723 वर

    आज दिवसभरात 13 जणांचा मृत्यू

    कोरोनामुळे आतापर्यंत 702 जणांचा मृत्यू

    आज दिवसभरात 470 जणांना डिस्चार्ज

    तर एकूण 34639 जणांनी कोरोनावर मात केली

    उपचार घेत असलेले रुग्ण- 5382

  • 01 May 2021 07:17 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 428 नवे रुग्ण

    वाशिम कोरोना अलर्ट

    जिल्ह्यात आज एका रुग्णाचा मृत्यू

    नव्याने 428 रुग्ण आढळले

    387 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 31 दिवसात 110 रुग्णांचा मृत्यू

    तर नवे 11813 कोरोना रुग्ण आढळले आहेत

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 27888

    सध्या सक्रिय रुग्ण – 4049

    आतापर्यंत एकूण 23541 जणांना डिस्चार्ज

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 297

  • 01 May 2021 06:40 PM (IST)

    नागपूर जिल्हयात गेल्या 24 तासांत 7575 रुग्ण कोरोनामुक्त

    नागपूर जिल्ह्याला दिलासा, नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

    – जिल्हयात गेल्या 24 तासांत 7575 रुग्ण झाले कोरोनामुक्त

    – जिल्हयात 24 तासांत 6576 नव्या कोरोना रुग्णांची भर

    – जिल्ह्यात 24 तासांत 99 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    – दिवसभरात 23259 जणांची कोरोना चाचणी

    – जिल्ह्यात 75608 सक्रिय कोरोना रुग्ण

  • 01 May 2021 06:39 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये आडळले कोरोनाचे 2037 नवे रुग्ण

    पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट

    आज आढळलेले कोरोना रुग्ण -2037

    दिवसभरातील कोरोनामुक्त रुग्ण -2368

    आज झालेले  मृत्यू -97

    एकूण कोरोना रुग्ण -212460

    एकूण कोरोनामुक्त -187936

    मृत्यू -2978

  • 01 May 2021 06:38 PM (IST)

    पंढरपुरात राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल सुरु

    पंढरपूर : पंढरपुरात राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल सुरु

    नवजात आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बालरोगतज्ज्ञ डॉक्टर शितल शहा यांनी घेतला निर्णय

    सुरुवातीला 15 बेडचे हॉस्पिटल केले सुरु

    सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून डॉक्टर शितल शहा यांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय भूमिका

    दवाखान्यात विविध आजारावर 55 बालके घेत आहेत उपचार

    तीन बालकांना झाली आहे कोरोनाची लागण

    त्यामुळे मंजुरी मिळण्याच्या आगोदरच सुरु केले कोविड हॉस्पिटल

  • 01 May 2021 06:35 PM (IST)

    जयंत पाटलांनी घेतला लसीचा पहिला डोस

    सांगली- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेतला

    यावेळी पाटील यांनी प्रतिक जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरूकेलेल्या#Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन केले.

    जयंत पाटील यांनी दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिला

  • 01 May 2021 06:05 PM (IST)

    अमरावती जिल्हात दिवसभरात 980 नवे कोरोना रुग्ण

    अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच

    अमरावती जिल्हात दिवसभरात 980 नवे कोरोना रुग्ण

    दिवसभरात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

    470रुग्णांनी केली कोरोनावर मात

    जिल्हात आतापर्यंत 66697 जण कोरोना पॉझिटिव्ह

    आतापर्यंत 57596 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    आतापर्यंत 966 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    जिल्हात 8135 रुग्णांवर उपचार सुरू

  • 01 May 2021 05:23 PM (IST)

    चंद्रकांत पाटलांकडून पुण्यातील गरवारे महाविद्यालयात तयार होणाऱ्या कोविड सेंटरची पाहणी

    पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे दौऱ्यावर

    चंद्रकांत पाटील यांच्याकडून गरवारे महाविद्यालयात तयार होणाऱ्या कोविड सेंटरची पाहणी

  • 01 May 2021 03:48 PM (IST)

    ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटर बाहेर लस मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून निषेध

    ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटर बाहेर लस मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून निषेध

    शासनाची गाडी प्रवेशद्वारावर अडवून केला निषेध

    लस मिळत नसल्यामुळे नागरिक संतापले

    लसबाबत प्रशासन काहीही कळवत नसल्यामुळे मोठा  गोंधळ

    18 ते 44 वयोगतील लोकांसाठी लस असून इतरांसाठी ठाणे शहरात लस केंद्र बंद असल्याची माहिती पालिका अधिकारी यांनी दिली

  • 01 May 2021 02:10 PM (IST)

    नागपुरात १८ वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला होणार सुरुवात

    – थोड्याच वेळात नागपुरात १८ वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला होणार सुरुवात

    – नागपुरात १८ ते ४४ वयोगटासाठी तीन केंद्रावर लसीकरणाची सोय

    – इंदीरा गांधी, पाचपावली महिला रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालयात लसीकरण

    – दुपारी दोन ते पाच या वेळात तरुणांचं लसीकरण

    – १८ ते ४४ वयोगटातील नागपूरात १९ लाख ७८७ लाभार्थी

  • 01 May 2021 01:31 PM (IST)

    मुंबईच्या कुपर रुग्णालयात 200 डोज साठी 18 च्या वरील आणि 45 च्या आतील व्यक्तींना आत घेण्यात आलं

    मुंबईच्या कुपर रुग्णालयात 200 डोज साठी 18 च्या वरील आणि 45 च्या आतील व्यक्तींना आत घेण्यात आलं

    – ज्यांची कुपरची अपाॅइंटमेंट नाही त्यांची विनाकारण पायपीट…

    – केवळ ज्यांना मेसेज आले त्यांनाच मिळणार लस….

    – १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने २०० व्यक्तींचा लसीकरणाला सुरवात..

  • 01 May 2021 12:41 PM (IST)

    कोल्हापुरात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू

    कोल्हापूर

    ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू

    कोल्हापुरातील घटना

    गिरगावमधील सर्जेराव कुरणे या रुग्णाचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू

    रंकाळा टॉवर परिसरातील खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार

  • 01 May 2021 11:28 AM (IST)

    मनमाड शहारत असलेल्या लसीकरण केंद्र बंद, लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद

    मनमाड –

    मनमाड शहारत असलेल्या लसीकरण केंद्र बंद

    लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद

    मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू होते लसीकरण केंद्र

    मागणी केली असून अद्याप ही लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद असल्याचे वैद्यकीय अधीक्षक गोविंद नरवणे यांची माहिती

  • 01 May 2021 07:56 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांचे आजपासून प्रायोगिक तत्वावर होणार लसीकरण

    कोल्हापूर

    जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांचे आजपासून प्रायोगिक तत्वावर होणार लसीकरण

    जिल्ह्यात पाच केंद्रांवर होणार लसीकरण

    कोविन अॅपमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांनाच मिळणार लस

    दररोज 200 डोस दिले जाणार

    दरम्यान जिल्ह्यासाठी आज पुन्हा नवीन साडेसात हजार दोस उपलब्ध होणार

  • 01 May 2021 07:51 AM (IST)

    नागपूर जिल्हयात एप्रिल महिन्यात कोरोनाने घेतले 2282 बळी

    – नागपूर जिल्हयात एप्रिल महिन्यात कोरोनाने घेतले 2282 बळी

    – महिनाभरात एक लाख 82 हजार 768 जणांना कोरणाची लागण

    – कोरोनाच्या संकटात एप्रिल महिना ठरला सर्वात घातक

    – गेल्या 24 तासांत जिल्हयात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

    – 24 तासांत 7294 जण कोरणामुक्त, 6461 नव्या कोरोना रुग्णांची भर

    – नागपूर जिल्हयात 24 तासांत 88 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  • 01 May 2021 07:45 AM (IST)

    शासनाच्या सुधारित मार्गदर्शन नुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हिडं 19 चे मोफत लसीकरण उपलब्ध होणार

    वसई विरार

    – शासनाच्या सुधारित मार्गदर्शन नुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हिडं 19 चे मोफत लसीकरण उपलब्ध होणार

    – पालघर जिल्ह्यात 3 केंद्रावर हे लसीकरण घेता येणार असून 3 पैकी 2 केंद्र हे वसई विरार महापालिका हद्दीत असणार आहेत

    – वसई विरार महापालिका हद्दीत वसईतील सर डी एम पेटिट रुग्णालय, आणि विरार गार्डनच्या समोरील बोलींज बहुउद्देशिय इमारतीत हे लसीकरण होणार आहे…

    – लसीकरण घेणाऱ्या नागरिका साठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. ऑन दि स्पॉट या वयोगटातील नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही

  • 01 May 2021 07:28 AM (IST)

    नागपूर जिल्हयात काल अवघा 10 हजार लसीचा साठा

    – नागपूर जिल्हयात काल अवघा 10 हजार लसीचा साठा

    – इतका कमी साठा, युवकांना आजपासून कोरोनाची लस कशी देणार?

    – लसीचा पुरेसा पुरवठा न झाल्याने नागपूरातील लसीकरणावर संकट?

    – नागपुरात 18 ते 44 वयोगटासाठी तीन केंद्रावर लसीकरणाची सोय

    – इंदीरा गांधी, पाचपावली महिला रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालयात लसीकरण

    – दुपारी दोन ते पाच या वेळात तरुणांचं लसीकरण

    – 18 ते 44 वयोगटातील नागपूरात 19 लाख 787 लाभार्थी

  • 01 May 2021 06:53 AM (IST)

    चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

    चंद्रपूर :

    चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू,

    डॉ. प्रशांत चांदेकर असं मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव,

    डॉ. चांदेकर हे औषधी विभागात असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते,

    त्यांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,

    ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना नागपूरला नेत असताना वरोरा शहराजवळ वाटेतच झाला मृत्यू

  • 01 May 2021 06:52 AM (IST)

    उस्मानाबादेत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे सोमवारपासून लसीकरण होणार

    उस्मानाबाद –

    18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे सोमवारपासून लसीकरण होणार

    उस्मानाबाद जिल्ह्यात लस शिल्लक नसल्याने खोळंबा

    जिल्ह्यातील केवळ 5 शासकीय लसीकरण केंद्रावर दररोज प्रत्येकी 200 डोस चे होणार लसीकरण

    ऑनलाइन नाव व स्लॉट नोंदणी असेल तरच दिली जाणार लस

    लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांची माहिती

  • 01 May 2021 06:50 AM (IST)

    पुणे शहरात शनिवारी आणि रविवारी कोरोना लसीकरण बंद राहणार, महापौरांची माहिती 

    पुणे मनपा हद्दीत ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठीचे लसीकरण शनिवारी आणि रविवारी बंद राहणार असून लसीचा पुरवठा झाल्यानंतर पुढील सूचना निर्गमित करण्यात येतील. याची पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी.

  • 01 May 2021 06:48 AM (IST)

    राज्यात 1 कोटी 58 लाखपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

    लसीकरण सद्यस्थिती

    1 कोटी 58 लाखपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण, दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट

    राज्यात सर्वाधिक ६,१५५ लसीकरण केंद्र

    राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता

    लसी उपलब्ध होत आहेत तसतसे या वयोगटात लस देण्यात येईल. सुरुवात हकुहळू असली तरी कृपया गोंधळ उडू देऊ नका. गर्दी करू नका

    केंद्राला विनंती की नोंदणी एप सर्व राज्यांना वेगवेगळे उपलब्ध करून घ्यावे म्हणजे एकाच यंत्रणेवर ताण येणार नाही

    मोठया प्रमाणावर लसीचा पुरवठा झाल्यास 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे सुरळीतपणे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे

    सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडे पाठपुरावा सुरु

  • 01 May 2021 06:47 AM (IST)

    सोलापुरात शनिवार-रविवार वैद्यकीय सेवा आणि मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन असेल

    सोलापूर –

    शनिवार-रविवार वैद्यकीय सेवा आणि मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन असेल

    भाजीपाला, किराणा दुकाने सुद्धा बंद राहणार

    शनिवार-रविवारी कडक लॉकडाऊन राहणार

    पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची माहिती

Published On - May 01,2021 10:10 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.