Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात दिवसभरात तब्बल 49 हजार 447 नवे रुग्ण, तर 277 बाधितांचा मृत्यू

| Updated on: Apr 03, 2021 | 11:11 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात दिवसभरात तब्बल 49 हजार 447 नवे रुग्ण, तर 277 बाधितांचा मृत्यू
सांकेतिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Apr 2021 08:17 PM (IST)

    सांगलीत दिवसभरात 306 नवे रुग्ण, तर चार रुग्णांचा मृत्यू

    सांगली कोरोना अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 306 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 4 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1810 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 2470 वर

    तर उपचार घेणारे 146 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 48236 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 52516 वर

  • 03 Apr 2021 08:09 PM (IST)

    राज्यात दिवसभरात तब्बल 49 हजार 447 नवे रुग्ण, चिंता वाढली

    राज्यात दिवसभरात 49 हजार 447 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज दिवसभरात 37 हजार 821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात दिवसभरात 277 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 55 हजार 565 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.

  • 03 Apr 2021 07:51 PM (IST)

    पुण्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ, दिवसभरात तब्बल 5720 नवे रुग्ण

    पुण्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ :

    – दिवसभरात ५७२० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३२९३ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील. – ८३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८३८१९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५१८. – एकूण मृत्यू -५४११. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३८८९०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००६६.

  • 03 Apr 2021 07:40 PM (IST)

    मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ, दिवसभरात 9090 नवे कोरोनाबाधित

    मुंबईत दिवसभरात 9090 नवे कोरोना रुग्ण, गेल्या वर्षभरातील सर्वाधिक मोठी रुग्णवाढ, तर दिवसभरात 5,322 रुग्ण बरे, बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 83 टक्के, सध्या मुंबईत 62,187 सक्रिय रुग्ण, मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 44 दिवसांवर

    कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या : 

  • 03 Apr 2021 07:35 PM (IST)

    नांदेडमध्ये दिवसभरात 26 मृत्यू, तर 1207 नवे रुग्ण

    नांदेडमध्ये दिवसभरात 26 रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत 869 रुग्णांचा मृत्यू, 24 तासात 1207 पॉझिटिव्ह, आतापर्यंत एकूण 46483 पॉजिटिव्ह रुग्ण, 156 रुग्ण अत्यवस्थ

    सध्या सक्रीय रुग्ण – 10725

  • 03 Apr 2021 07:31 PM (IST)

    भिवंडीत दिवसभरात 206 नवे रुग्ण

    भिवंडी कोरोना अपडेट :

    आज रुग्ण : 206 आज मृत्यु : 2 आज अॅक्टिव्ह रुग्ण : 1139

    एकूण रुग्ण : 15813 एकूण मृत्यू : 00599 एकूण बरे झाले रुग्ण : 14075

  • 03 Apr 2021 07:29 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत दिवसभरात 1244 नवे रुग्ण, तर चार रुग्णांचा मृत्यू

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी 82 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज तब्बल 1244 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 876 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार जणांचा मृत्यू झाले आहेत. आजच्या या १२४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 82,423 झाली आहे. यामध्ये 9599 रुग्ण उपचार घेत असून 71558 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत 1266 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 03 Apr 2021 07:28 PM (IST)

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक, स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची एकाच गावातून प्रचाराला सुरुवात

    पंढरपूर : मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा नारळ उध्या सकाळी 8 वाजता फुटणार

    रांझणि गावात खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात होणार

    सकाळी 10 वाजून 10 मी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ

    मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रांझणी गावातच भालकेंच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे

  • 03 Apr 2021 07:26 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 1267 रुग्ण पॉझिटिव्ह

    चंद्रपूर : गेल्या 24 तासात 1267 नमुने तपासणीतून 335 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 1 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 28742

    एकूण कोरोनामुक्त : 25760

    अॅक्टिव्ह रुग्ण : 2550

    एकूण मृत्यू : 432

    एकूण नमूने तपासणी : 279590

  • 03 Apr 2021 06:36 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 3720 नवे रुग्ण, तर 47 जणांचा मृत्यू

    नागपूर : गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात कोरोना मुळे 47 रुग्णांचा मृत्यू,

    3720 नवीन पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद

    3600 रुगणांनी केली कोरोनावर मात

    अॅक्टिव्ह रुग्ण संख्या -40,820

    टेस्ट – 15,593

    एकूण रुग्ण संख्या – 237496

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 191411

    एकूण मृत्यू संख्या – 5265

  • 03 Apr 2021 06:35 PM (IST)

    शहापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड

    शहापूरमध्ये रोजच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तालुक्यात चालू असलेले कोविड केअर सेंटर आणि फिव्हर क्लिनिक सेंटर हे बंद केले असल्यामुळे रुग्णांना सव्याब चेकपसाठी आणि पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी भिवंडी किंवा ठाणे येथे पाठवावे लागते. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असते. त्यामुळे शहापूरमधील कोविड केअर सेंटर व फिवर क्लिनिक सेंटर हे पुन्हा चालू करण्यात यावेत म्हणून नागरिकांची सतत मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष शहापूरमधील गोठेघर आश्रम येथे येऊन पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकरकोविड केअर सेंटर व फिव्हर क्लिनिक सेंटर चालू करण्यात यावे, असे आदेश दिले.

  • 03 Apr 2021 06:31 PM (IST)

    वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात दिवसभरात 347 नवे रुग्ण

    वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुगणाची वाढ सुरूच

    मागच्या 24 तासात 347 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह. तर आज दिवसभरात एकही मृत्यू नाही. 123 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 34,201

    कोरोनामुक्त झालेली रुग्ण संख्या – 30,658

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 918

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या –  2625

  • 03 Apr 2021 06:28 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 262 नवे रुग्ण

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 262 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज 244 जण झालेत कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आज कोरोना बाधित 01 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील एका महिन्यात 33 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील सात दिवसात आढळले 1734 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 16961

    सद्यस्थितीत सक्रीय रुग्ण – 2675

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 14096

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 189

  • 03 Apr 2021 05:30 PM (IST)

    गडचिरोलीत दिवसभरात दोघांचा मृत्यू, तर 63 नवे कोरोनाबाधित

    गडचिरोली : आज जिल्ह्यात 63 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10866 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10218 वर पोहचली. तसेच सद्या 535 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 113 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज नवीन दोन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष (चिमूर) व 30 वर्षीय पुरुष (आलापल्ली) यांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.04 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4. 92 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला. नवीन 63 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 38, अहेरी 1, आरमोरी 4, भामरागड 02, चामोर्शी 03, धानोरा तालुक्यातील 06, कुरखेडा 02 ,एटापल्ली 3, तर वडसा तालुक्यातील 04 जणांचा समावेश आहे.

  • 03 Apr 2021 05:29 PM (IST)

    नागपुरात लसीकरण जोरात सुरु, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

    नागरपूर कोरोना परिस्थितीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया :

    नागपुरात लसीकरण मोहीम तीव्र गतीने सुरू केली. एका दिवशी 30 हजारपर्यंत पोहचली ती 70 हजार पर्यंत न्यायची आहे. सोमवारपासून 78 नवीन लसीकरण सेंटर सुरू होतील. एकूण 164 सेंटर वर लसीकरण होणार. औषध म्हणून केवळ लसीकरण आहे त्यामुळे ते घ्यावे. त्याबद्लद कुठलाही गैरसमज ठेऊ नये. जीव वाचविण्यासाठी आवश्यक आहे. ग्रामीण भागात अनेक तक्रारी होत्या. आता तालुका निहाय अधिकारी नियुक्त केले आहेत.

    बेड वाढविण्या संदर्भात मागणी होती. त्यात वाढ करण्यात आली. 100 बेड मेडिकलमध्ये वाढविले ते सोमवार पासून सुरू होतील. मनुष्यबळ लागतं. त्याची भरती केली. मात्र काही लोक ज्वाइंट झाले नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

    ऑक्सिजन बाबत राज्य सरकारशी संवाद साधला. त्यात कमतरता नाही. आणखी वाढ केली जाणार. ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती ठेवली जाणार. रुग्णांची टेस्टिंग करायला सांगण्यात येईल. आंबेडकर हॉस्पिटल अनुसंधान केंद्रामध्ये कोविड हॉस्पिटल करणार. मृत्यूसंख्या कमी करण्यावर आमचा जोर आहे.

    आढावा बैठकी संदर्भात मुख्यमंत्री यांना कळविण्यात येणार. त्यानंतर राज्य सरकार जे निर्णय घेणार ते आम्हाला मान्य असेल. जनतेचं सहकार्य मिळत आहे. टेस्टिंग वाढल्या त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र मृत्यचे प्रमाण कमी करण्यावर आमचा भर आहे

  • 03 Apr 2021 05:24 PM (IST)

    निफाड तालुक्यात दिवसभरात 206 नवे कोरोनाबाधित

    निफाड तालुका कोरोणा अपडेट

    नवीन कोरोना बाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण – 206

    आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 199

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 7371

    आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 5497

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 1675

  • 03 Apr 2021 05:23 PM (IST)

    नांदेडमध्ये कोरोना तपासणीत खाजगी लॅबकडून लूट, प्रशासनाने टाळे ठोकले

    नांदेड : कोरोना तपासणीत खाजगी लॅबकडून लूट, आरटीपीसीआर टेस्टसाठी प्रत्येक रुग्णाकडून उकळले दोन हजार, जिल्हाधिकाऱ्यांना कुणकुण लागताच लॅबवाल्यावर गुन्हा दाखल, मनपा प्रशासनाने लॅबला ठोकले सील, या टेस्टसाठी सहाशे रुपये घेण्याचा आहे सरकारी आदेश

  • 03 Apr 2021 02:37 PM (IST)

    छगन भुजबळांचा येवला-लासलगाव मतदारसंघात अचानक कोविड सेंटर पाहणी दौरा

    नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांचा येवला-लासलगाव मतदारसंघात अचानक कोविड सेंटर पाहणी दौरा

    कोविड सेंटरची पाहणी दरम्यान भुजबळांकडून रुग्णाची विचारपूस

    होम क्वांरटाईन रुग्णामुळे कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

    होम क्वांरटाईन रुग्ण घरात विलगीकरण नसेल तर पोलिसांजवळ तक्रार करण्याचे जनतेला भुजबळांचे आवाहन

    लॉकडाऊन झाल्यास 8 ते 15 दिवस करुन काही होणार नाही

    किमान तीन आठवडे लॉकडाऊनचे भुजबळांचे संकेत

    कोरोना विरोधात लढाई सुरू असून सर्वांनी एकत्र येत सहभागी होण्याचे आह्वान

    लॉकडाऊन या विषयावर राजकारण करण्याचा विषय येत नाही

    मैदाने गाजवण्याचा ही विषय नाही

    तज्ञांचे मार्गदर्शन घेत चर्चा करावी, उपाय योजना सुचवावे

    आंदोलन ,मैदाने मारण्याची गरज नसल्याची कोपर खिळी भाजपला यावेळी  भुजबळांनी लगावली

  • 03 Apr 2021 02:35 PM (IST)

    येवल्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

    येवला :- एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

    आतापर्यंत ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यातील २१४३कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली

    कोरोनावर १७११जणांनी मात करत केली घरवापसी

    उर्वरित ३६१ जण कोरोणा उपचार घेत आहे

  • 03 Apr 2021 12:44 PM (IST)

    पुण्यात अंशत: लॉकडाऊन, श्री क्षेत्र भीमाशंकर आणि आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर दर्शसांसाठी बंद

    भीमाशंकर,पुणे

    -पुणे जिल्ह्यातील अंशतः लॉकडाऊन मध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर भाविकांना दर्शसांसाठी आज पासून बंद

    -जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काल जिल्ह्यतील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

  • 03 Apr 2021 12:08 PM (IST)

    पालकमंत्री नितीन राऊतांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

    नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊतांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

    संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार

  • 03 Apr 2021 12:05 PM (IST)

    सैलानी यात्रेत गर्दी जमावल्याप्रकरणी 10 ते 12 जणांसह अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करणार

    बुलडाणा : सैलानी यात्रेत गर्दी जमावल्याप्रकरणी 10 ते 12 जणांसह अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करणार, बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांची माहिती, रात्री सैलानी येथील संदल निघताना जमली होती हजारो लोकांची गर्दी , धार्मिक विधीला फक्त 10 लोकांची परवानगी असताना झाली होती गर्दी

  • 03 Apr 2021 11:10 AM (IST)

    मुख्यमंत्री कार्यालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

    वर्षा बंगल्यावर एकामागोमाग एक कोरोनाची लागण

    मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका कर्मचा-याला कोरोनीची लागण

    रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही झाली होती कोरोनाची लागण

    रश्मी ठाकरे एच एन रुग्णालयात दाखल आहेत

    आदित्य ठाकरे दुसरी चाचणी निगेटिव्ह येण्याची वाट बघत आहे

  • 03 Apr 2021 09:13 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात तब्बल 887 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 21 हजाराहून अधिक होम क्वारंटाईन

    सोलापूर

    काल जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल 887 नवीन कोरोना बाधित रुग्ण,

    तर 15 जेष्ठ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू

    ग्रामीण भागात 21 हजाराहून अधिक लोक होम क्वारंटाईन

  • 03 Apr 2021 09:12 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ, लासलगाव कडकडीत बंद 

    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याकरणाने राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ

    वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन

    नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची आवाहन

    लासलगावकरांकडून या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद

    लासलगाव कडकडीत बंद

  • 03 Apr 2021 09:08 AM (IST)

    सोलापुरात विकेंड लॉकडाऊन नाही

    सोलापूर- शनिवार-रविवार सोलापुरात बंद नाही

    सकाळी सात ते संध्याकाळी आठपर्यंत सर्व आस्थापना सुरू असणार

    मात्र ग्रामीण भागात शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना राहणार बंद

  • 03 Apr 2021 09:06 AM (IST)

    रत्नागिरीतील कोरोना चाचणी प्रयोगशाळा 24 तास कार्यरत राहणार

    रत्नागिरी- जिल्ह्यातील कोरोना चाचणी प्रयोगशाळा 24 तास कार्यरत रहाणार

    रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्णय

    जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिक्षांच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सुचना

    दिवसाला १२०० ते १३०० चाचण्या सुरु चाचण्या आणखी वाढवण्याच्या सूचना

  • 03 Apr 2021 08:32 AM (IST)

    नागपुरात कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढले

    नागपूर –

    नागपुरात कोरोनाच संकट वाढत आहे

    रुग्ण संख्या आणि मृत्यू च प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची वाढली चिंता

    शहारा सोबत ग्रामीण मध्ये सुद्धा वाढत आहे प्रमाण

    काल जिल्ह्यात 60 मृत्यू झाले त्यातील ग्रामीणमध्ये 30 तर शहरात 27 मृत्यू नोंदविण्यात आले

    ग्रामीण भागातील मृत्यू शहरांपेक्षा जास्त झाल्याने वाढली चिंता

    गेल्या 24 तासात 4 हजार 108 रुग्णांची नोंद झाली

  • 03 Apr 2021 08:28 AM (IST)

    बुलडाणा : सैलानी यात्रेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, फक्त 10 लोकांना परवानगी असताना भाविकांची मोठी गर्दी

    बुलडाणा : सैलानी यात्रेत भाविकांची मोठी गर्दी,

    फक्त 10 लोकांना परवानगी असताना गर्दी,

    दरवर्षी लाखो भाविक येतात सैलानीला,

    मात्र कोरोनामुळे यावर्षी फक्त 10 लोकांना होती परवानगी

  • 03 Apr 2021 08:12 AM (IST)

    अमरावतीत कोरोना लसीकरण मोहिमेबाबत उदासीनता

    अमरावती : अमरावतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे अमरावती शहर, जिल्ह्यातही लसीकरण केंद्र साकारण्यात आले आहेत. मात्र , लसीकरण करून घेण्याबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे . नव्या वर्षात १६ जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली असली तरी ७५ दिवसांत जिल्ह्यात १ लाख ३९ हजार ३९८ जणांनी लस घेतल्याची नोंद झालेली आहे

  • 03 Apr 2021 07:59 AM (IST)

    पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन

    पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे दुःखद निधन झाले

  • 03 Apr 2021 07:38 AM (IST)

    मनमाड शहरात आजपासून 2 दिवसीय वीकेंड लॉकडाऊन

    मनमाड :- मनमाड शहरात आजपासून 2 दिवसीय वीकेंड लॉकडाऊन सुरू

    लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद

    वीकेंड लॉकडाऊनला व्यापारी ,नागरिकांचा चांगला प्रतिसाद

    शहरातील प्रमुख बाजारपेठ सह इतर सर्व दुकाने कडकडीत बंद

  • 03 Apr 2021 07:18 AM (IST)

    पुण्यातील नव्या निर्बंधांना व्यापारी संघाचा विरोध

    पुणे : मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अद्यापही व्यापारी वर्ग पूर्णपणे सावरलेला नाही. त्यातच आता पुन्हा एकदा शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले व्यावसायिक पुन्हा एकदा कात्रीत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नवीन नियमावलीला विरोध दर्शविला आहे. तसेेेच आपल्या निर्णयावर फेरविचार करत व्यापारी वर्गाला सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली आहे.

  • 03 Apr 2021 07:13 AM (IST)

    औरंगाबाद शहरात पुन्हा 1427 कोरोनाबधित रुग्णांची वाढ

    औरंगाबाद :-

    औरंगाबाद शहरात आज पुन्हा 1427 कोरोनाबधित रुग्णांची वाढ

    कोरोनाबधितांचा आकडा पोचला 85587 वर

    तर औरंगाबाद शहारत आज पुन्हा 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

    त्यामुळे मृतांचा आकडा हा 1737 वर पोचला आहे

    सध्या शहरात 15484 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  • 03 Apr 2021 06:39 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील टॉप 10 कोरोना हॉटस्पॉटची यादी, दहापैकी सात गावं शहरालगतची

    पुणे जिल्ह्यातील टॉप टेन कोरोना हॉटस्पॉटची यादी तयार

    यादीतील दहापैकी सात गावे ही पुणे शहरालगतची

    यात वाघोली, मांजरी बुद्रूक, उरुळीकांचन, नऱ्हे (सर्व ता. हवेली), बावधन, हिंजवडी व सूस (ता. मुळशी) ही सात गावे आहेत. उर्वरित तीन गावांमध्ये शिक्रापूर व रांजणगाव गणपती (दोन्ही ता. शिरूर) आणि मंचर नंबर १ (ता. आंबेगाव) यांचा समावेश

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १३२ हॉटस्पॉट आ

    हवेली तालुक्यात सर्वाधिक २४ हॉटस्पॉट असून दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात केवळ एक हॉटस्पॉट

  • 03 Apr 2021 06:38 AM (IST)

    बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना कोरोनाची लागण

    अकोला जिल्हातील बाळापूरचे आमदार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देशमुख हे क्वारंटाईन झाले आहेत. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आव्हान आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे.

  • 03 Apr 2021 06:21 AM (IST)

    नागपुरातील कोरोना स्थिती

    नागपुरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अत्यंत चिंताजनक बनलं आहे. आज दिवसभरात 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 108 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात 3 हजार 214 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 33 हजार 776 वर पोहोचली आहे. त्यातील 18 लाख 7 हजार 751 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 हजार 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 03 Apr 2021 06:19 AM (IST)

    पुण्यातील कोरोना स्थिती

    पुणे शहरात काल दिवसभरात 4 हजार 653 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 3 हजार 337 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यातील मृतांची संख्या काल वाढली आहे. दिवसभरात 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 37 हजार 126 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 475 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    नव्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 27 लाख 8 हजार 99 झाला आहेत. त्यातील 23 लाख 5 हजार 597 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 5 हजार 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पाहिला तर तो अतिशय चिंताजनक आहे. कारण पुण्यात काल तब्बल 9 हजार 86 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 03 Apr 2021 06:17 AM (IST)

    मुंबईतील कोरोना स्थिती

    मुंबईतील कोरोना स्थितीही दिवसेंदिवस बिघडत आहे. मुंबईत काल दिवसभरात 8 हजार 832 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 हजार 352 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 16 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे.

    मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 46 दिवसांवर आला आहे. 26 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.46 टक्के झाला आहे.

  • 03 Apr 2021 06:17 AM (IST)

    राज्यात सध्या 3 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण

    राज्यात सध्या 3 लाख 89 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.62 टक्के झालं आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 21 लाख 1 हजार 999 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 19 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • 03 Apr 2021 06:16 AM (IST)

    राज्यातील कोरोनाची स्थिती

    राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होते आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक बनला आहे. राज्यात काल दिवसभरात तब्बल 47 हजार 827 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Published On - Apr 03,2021 8:17 PM

Follow us
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.