महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
रत्नागिरी – कडक लॉकडाऊनमध्ये खासगी आरामबसवर खेड येथे कारवाई :
एक प्रवासी निघाला पॉझिटिव्ह
विनापरवाना रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर खेड पोलिसांनी केली कारवाई
बसमधील 29 प्रवाशांची केली रॅपिड अँटिजेन टेस्ट, यामध्ये एक प्रवाशी पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 123 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला
आतापर्यंत 1088 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 51503 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 3648 रुग्ण उपचार घेत आहेत
दिवसभरात 419 जण कोरोनामुक्त झाले आहेत
सातारा कोरोना अपटेड
साताऱ्यात 2337 नागरिकांना दिला डिस्चार्ज
आज 1531 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह
दिवसभरात 28 बाधितांचा मृत्यू
आज अखेरची सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी
एकूण नमुने तपासणी -822200
एकूण बाधित रुग्ण – 170845
डिस्चार्ज करण्यात आलेले रुग्ण -150389
एकूण मृत्यू -3758
उपचारार्थ रुग्ण-16677
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 450 सक्रिय रुग्णांची वाढ
– दिवसभरात 515 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 39 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 12
– 742 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 471228
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 5213
– एकूण मृत्यू -8340
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 457675
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8166
वाशिम कोरोना अलर्ट
जिल्ह्यात मागील 105 दिवसात एका दिवशी आढळली सर्वात कमी नव्या कोरोना रुग्णांचा संख्या
जिल्ह्यात आज आढळले 78 नवे रुग्ण
तर आज 335 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
तसेच 01 रुग्णाचा झाला मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40353
एकूण सक्रिय रुग्ण – 1593
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 38172
आतापर्यंत एकूण मृत्यू – 587
गोंदिया : जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही
जिल्ह्यात नवे 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले
63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची कोरोनावर मात
आजपर्यंत 40,845 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
39,832 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली
आतापर्यंत जिल्ह्यातील 690 रुग्णांचा मृत्यू
मालेगाव : राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने मालेगावच्या व्यापाऱ्यांनी केला जल्लोष
फटाके वाजून व्यापारी वर्गाने केला जल्लोष
नागपूर ब्रेकिंग
नागपुरला आज मोठा दिलासा ,मृतांची संख्या आली 10 च्या खाली
नागपुरात आज 190 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
529 जणांनी केली कोरोनावर मात
तर 8 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
चौथी लेव्हल
अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु
सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहणार
क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार
सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही
लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार
अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार
बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार
ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
संचार बंदी लागू असणार
सलून, जिम ५० टक्के क्षमता सुरु राहणार,
बसेस ५० टक्के विना उभे राहणारे प्रवाशी
लेव्हल ३ – यात असेल
अत्याआवश्यक दुकाणे
सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील
माॅल्स थेटर्स सर्व बंद राहतील
सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
लोकल. रेल्वे बंद राहतील
मांर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पाहते ५ ते सकाळी ९ मुभा
५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार ,
स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
लग्नसोहळ् ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा
कृषी सर्व कामे मुभा
ई काॅम्रस दुपारी २ पर्संत
जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील
लेव्हल १ यात सर्व सुरू असेल….
लेव्हल २ त्यात
–
५० टक्के हाॅटेल सुरू
माॅल चित्रपट गृह – ५० टक्के
लोकल नाही
सार्वाजिनक जागा, खुले मैदान , मांॅरेन्ंग वाॅक सायकल सुरू
शासकीय आणि खासगी सगळे खुली
क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९
सध्सकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर
शुटींग चित्रपट सुरू
सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले
लग्न सोहळा मंरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत
अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल
मिटींग आणि निवडणूक ५० टक्के उपस्थितीत
बांधकाम, कृषी काम खुली
आ काॅमर्स सुरू
जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के सुरू
शासकीय बस आसाम क्षमता १०० टक्के सुरू
जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल
पाच लेव्हल कशा आहेत.
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
मुंबई : राज्यात कोरोनाचा पाच टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे
ज्या ठिकाणी 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडची व्यापलेले आहेत, आहे तिथं अनलॉक असेल
अनलॉक करण्यासाठी साधारण पाच लेव्हल ठरवण्यात आल्या आहेत.
अशा जिल्ह्यामंध्ये रेग्युलर लॉकडाऊन राहणार नाही. येथे रेस्टॉरंट, म़ॉल्स सुरु करता येतील. तसेच दुकाने उघडे ठेवण्याची वेळ सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
गार्डन, सायकल वॉकिंग ट्रॅक हे पहिल्या लेव्हलमध्ये सुरु राहिल. तसे स्पोर्टसुद्धा सुरु ठेवता येतील. तसेच शुटिंगही या लेव्हलमध्ये सुरु करता येईल.
दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
विजय वडेट्टीवर यांची माहिती
मुंबईला सध्या लोकल ट्रेन बंद असतील
लेवल एकमध्ये येणारे जिल्हे :औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे गडचिरोली गोदिंया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक परभणी,ठाणे ,वर्धा. वाशिम .यवतमाळ
तिसऱ्या लेव्हलमध्ये अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत.
जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल. दर शुक्रवारी हा आढावा घेतला जाईल. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजनची आवश्यकता यावरुन जिल्ह्यांची लेव्हल ठरवली जाईल.
मुंबई लेव्हल 2 मध्ये आहे. येथे बससेवा पूर्ण सेवेमध्ये सुरु राहील.
राज्यात रुग्णसंख्ये वाढ कमी झाली आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगावर जस्टीस आनंद निगरुडे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात प्रवास करण्यासाठी कोणतीही कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.
राज्यात दुसऱ्या ते पाचव्या टप्प्यात जमावबंदी असेल.
मुंबई : सुप्रीम कोर्टानं लसीकरणीवरुन केंद्र सरकारला झापलं
लसीसाठीचे 35 हजार कोटी रुपये कुठे गेले आहेत असे विचारले
त्याचा हिशेब द्यायला कोर्टाने सांगितले आहे.
पण केंद्र सरकार राजकारण करत आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची केंद्र सरकारवर टीका
उस्मानाबाद – कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फेव्हीमॅक्स गोळ्या बनावट
मुबंई येथे जप्तीची मुख्य कारवाई , तशाच बनावट गोळ्यांचे साठे उस्मानाबाद जिल्ह्यात
उमरगा ,उस्मानाबाद तालुक्यात झाली आहे बनावट गोळ्याची विक्री
गोळ्यात फेरीपिराव्हर घटक आवश्यक असताना कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार्चचा गोळ्या बनवण्यासाठी केला उपयोग
गोळ्या बनवणारी कंपनी हिमाचल प्रदेशातील सोलन येथील असून नाव मॅक्स रिलीफ हेल्थकेअर असे आहे
तपास केला असता कंपनीच अस्तिवात नसल्याची धक्कादायक माहिती उघड
उस्मानाबाद जिल्यात फेविमॅक्स गोळ्या विकण्यास बंदी
उमरगा येथे 300 उस्मानाबाद येथे 220 गोळ्याच्या स्ट्रिप्स जप्त
अन्न व औषध प्रशासनाने केल्या जप्त गोळ्या
मुंबई : लाॅकडाऊनमधील शिथिलतेबाबत आज महत्वाचे निर्णय घेण्याची तसेच घोषणा करण्याची राज्य शासनाची तयारी
जिथं रूग्णसंख्या कमी तिथं जिल्हाबंदी शिथील होण्याची शक्यता
रूग्णसंख्या कमी तिथं माॅल्स, सिनेमागृहे, क्रीडांगण यांना ही परवानगी देण्याची शक्यता
आॅक्सिजन बेड आणि रूग्णसंख्या आलेख बघून नियमावली शिथिल करण्याच्या हालचाली – सूत्रांची माहिती
इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा रद्द करण्याची भूमिका, आपत्कालीन विभागाच्या बैठकीत यावर चर्चा
बारावी निकाल आणि गुण याबाबत शिक्षण विभाग निकष ठरवेल.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातही कोरोना लसीकरणाला मोठा प्रतिसाद
कोरोणा लसीकरणासाठी पायदळ खरतळ प्रवासात आरोग्य पथक पोहोचले भामरागड तालुक्यातील दुर्गम भागात
भामरागड तालुक्यातील अबुजमाड पहाडीवर 20 किलोमीटर पायदळ प्रवास करुन कोरोणा लसीकरणासाठी आरोग्य पथक पोहोचले
बिना गुंडा तोरेमारका कोलामा्का गाव मूळ आदिवासी गावे असल्यामुळे ढोल वाजवून आदिवासी नागरिकांना येथे जमा करण्यात आले मोठा उत्साह
यावेळी दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांमध्ये दिसला
आरोग्य पथकाला दुर्गम व जंगल भागात पोहोचण्यासाठी भामरागड येथील तहसीलदारांनी खूपच प्रयत्न केले
आदिवासी नागरिकांनी मोठ्या उत्साहात पहिले लसीकरण घेतले
– नागपूरच्या मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज तिसऱ्या दिवशीही सामूहिक रजेवर
– ‘नॅान कोवीड रुग्णांवर उपचाराची जबाबदारी द्यावी’
– सामुहिक रजेवर गेलेल्या निवासी डॅाक्टरांची मागणी
– मेयोचे १८० निवासी डॅाक्टर आजंही आहे सामुहिक रजेवर
– डॅाक्टरांच्या सामुहिक रजेमुळे रुग्णसेवेवर परिणाम
अमरावती : राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन सुरू केला होता . हॉटस्पॉटमध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होती . यामुळे नागरिकांचा व्यवसाय ठप्प झाल्याने शासनाने कोरोना निर्बंध शिथिल करून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली . मात्र , एकाचवेळी नागरिक बाहेर पडल्याने पुन्हा शहरातील रस्ते गजबजले असून , सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे . भाजीपाला मार्केटमध्ये पुन्हा नागरिकांची गर्दी कायम झाल्याने कोरोनाचे भय कुणालाही उरले नसल्याचे चित्र आहे
देशात कोरोना लसीची टंचाई दरम्यान केंद्राचा मोठा निर्णय
परदेशातील मान्यता प्राप्त लसींना भारतात मानवी चाचणीची गरज नाही
अमेरिका , ब्रिटेन , युरोपियन देश , जपान आणि WHO ने मान्यता दिलेला लसीना मानवी चाचण्याची गरज नाही
देशात लसीचा साठ्याची कमतरता असताना मोठा निर्णय
याआधी लसीच्या चाचण्या घेवून घेतला जात होता निर्णय
मुंबई माँडेल आसपासच्या महापालिकेत राबवा
हायकोर्टाच्या महापालिका आणि राज्य सरकारला सूचना
ठाणे, वसई – विरार , कल्याण , उल्हासनगर भागात मुंबई माँडेल राबवा
सुप्रीम कोर्टाकडूनही मुंबई माँडेलचं कौतुक
सांगली
मिरज रेमडेसिव्हर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर
18 एप्रिल ला चव्हाट्यावर आले होते प्रकरण
मिरज सिव्हिल मधील 5 जणांचे जवाब नोंद
इंजेक्शन चोरी झालेची माहिती आली समोर
आणखी 8 इंजेक्शन गायब
मिरज सिव्हिल चा यु टर्न
विश्रामबाग चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील यांचा तपास वेगाने सुरूच
बुलडाणा
विलगीकरण कक्षातील शौचालयाची लहान मुलांकडून स्वच्छता प्रकरण, मारोड येथील शिक्षक आणि मुख्याध्यापक निलंबित, तर गटविकास अधिकाऱ्यांवरही निलंबनाची टांगती तलवार, यापूर्वी ग्रामसेवक ला सुद्धा निलंबित करण्यात आलेय, त्यामुळे या लहान मुलाला स्वच्छता करायला लावणे चांगलेच महागात पडलेय.
– वसई विरार महापालिकेत मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरणाला सुरवात…
– 15 जून पर्यंत दररोज पालिकेच्या 9 प्रभागात सकाळी साडे नऊ ते 5 या वेळेत होणार कोवी शिल्ड लसीचे होणार लसीकरण… शासनाच्या लस उपलब्ध तेनुसार यात काही वेळा होणार बदल
– 45 व 45 वर्षावरील नागरिक, मतिमंद ,गतिमंद, दुर्धर आजाराने ग्रस्त (कॅन्सर, डायलिसिस) इत्यादी नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार
– महापालिका हद्दीतील आदिवासी पाडे, वाड्या, गाव खेडे या परिसरात ठरल्या वेळेत,आणि तारखे नुसार त्या ठिकाणी जाऊन केले जाणार लसीकरण
– 1 ते 15 जून पर्यंत चा प्रभाग निहाय व तारिख निहाय महापालिकेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे..
– गरीब, गरजू, जेष्ठ नागरिक, गतिमंद, मतिमंद, दुर्धर आजार ग्रस्त नागरिकांसाठी वसई विरार महापालिकाचा स्तुत्य उपक्रम
– लसीकरण ची मोबाईल व्हॅन येताच नागरिकांनी लसीकरणा चा लाभ घ्यावा असे अहवान महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे
पिंपरी चिंचवड
-शहरातील कोरोना रुग्ण संख्येबरोबरच कंटेनमेंट झोनची संख्या घटली
-मागील पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.
– परिणामी, शहरातील मेजर आणि मायक्रो कंटेनमेंटची संख्याही घटली आहे
-शहरात 1 मे ला 316 मेजर कंटेनमेंट झोन होते. तर, 2 हजार 232 मायक्रो कंटेनमेंट झोंन होते
-महापालिकेच्या 1 जूनच्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 143 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 186 आहेत
नाशिक – लस खरेदी लवकरच सुरू होण्याची चिन्ह
मुंबई ठाणे महापालिकेच्या जागतिक पातळीवरच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
नाशिक मनपा करणार 5 लाख लसींचा खरेदी
5 जून रोजी कोणत्या कंपनीची लस मिळणार आणि किती मिळणार हे स्पष्ट होणार
नाशिकमध्ये 14 लाख लोकांचे लसीकरण आवश्यक
आतापर्यंत 3 लाख लोकांनी लस घेतल्याचं स्पष्ट
मुंबईतील कोरोना लसीकरण केंद्र आज बंद
मुंबई महापालिकेची ट्वीट करत माहिती
मुंबईतील सर्व शासकीय लसीकरण केंद्र बंद राहणार
मुंबईकरांनो,
आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (३ जून, २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही.
आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.#MyBMCvaccinationUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 2, 2021
पुण्यात दिवसभरात 467 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 651 रुग्णांना डिस्चार्ज, 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू (पुण्याबाहेरील 14 जणांचा समावेश), 761 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू, एकूण कोरोना बाधित रूग्णसंख्या 4,70,778, सक्रीय रुग्ण संख्या 5,305, एकूण मृत्यू 8313, आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 4,57,160, आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी 7483
मुंबईत बुधवारी (2 जून) सायंकाळी 6 वाजता 24 तासात 925 बाधित रुग्णांची नोंद, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1632, आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 674296, बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्के, एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 16,580, दुप्पटीचा दर 477 दिवस, कोविड वाढीचा दर (26 मे ते 1 जून) 0.14 टक्के
राज्यात काल (2 जून) 15,169 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली.
नव्याने 29,270 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 54,60,589 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 2,16,016 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54 टक्के झाले आहे.