महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
सातारा कोरोना अपडेट
सातारा जिल्ह्यात दोन महिन्यात आज पहिल्यांदा बाधित रुग्णांची संख्या हजारच्या आत
आज 875 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
तर दिवसभरात 25 बाधितांचा मृत्यू
1986 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
आज अखेर सातारा जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी
एकूण नमुने चाचणी -873975
एकूण बाधित रुग्ण – 176663
घरी सोडण्यात आलेले रुग्ण -159980
एकूण मृत्यू -3912
उपचारार्थ रुग्णांची संख्या-12629
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती
सांगली कोरोना, म्युकरमायकोसिस अपडेट
जिल्ह्यात आज दिवसभरात 921 नवे कोरोना रुग्ण
म्युकरमायकोसिस – एकूण रुग्ण 226, आज आढळलेले रुग्ण 8
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 25 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील मृतांचा आकडा 3622 वर
सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 9150 वर
तर उपचार घेणारे 1210 जण आज कोरोनामुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 112764 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंदसंख्या 125566 वर
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 64 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकाच मृत्यू झाला
आतापर्यंत 1105 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 53376 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 2323 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 284 जण कोरोनामुक्त झाले आहेत
नाशिक कोरोना अपडेट
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 750
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 356
नाशिक मनपा- 123 नवे रुग्ण
नाशिक ग्रामीण- 207 नवे रुग्ण
मालेगाव मनपा- 15 नवे रुग्ण
जिल्हा बाह्य- 11 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 5031
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -57
नाशिक मनपा- 39 जणांचा मृत्यू
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 18 39 जणांचा मृत्यू
जिल्हा बाह्य- 00
नागपूर – नागपूरला कोरोना पासून मोठा दिलासा,
रुग्णसंख्या आली 100 च्या खाली
नागपुरात आज 81 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
389 जणांनी केली कोरोनावर मात
तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्णसंख्या – 476007
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 464112
एकूण मृत्यूसंख्या – 8973
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 279 रुग्णांची वाढ
– दिवसभरात 529 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 24 रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील 12 रुग्ण
– 589 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 472728
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 3699
– एकूण मृत्यू -8422
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 460607
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5052
वाशिम कोरोना अपडेट
जिल्ह्यात आज नवे आढळले 71 रुग्ण आढळले
तर आज 108 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
तसेच आज दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40743
सध्या सक्रिय रुग्ण – 845
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 39306
आतापर्यंत एकूण मृत्यू – 591
कोल्हापूर: कोल्हापूरमधील व्यापारी लॉकडाऊन विरोधात आक्रमक
उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय
अत्यावश्यक सेवेतील दुकानही उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार
कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूरमधील लॉकडाऊन अन्यायकारक असल्याची भावना
सकाळी 10 ते 12 या वेळेत बंद दुकानांबाहेर व्यापारी सरकार विरोधात प्रतिमात्मक आंदोलनसुद्धा करणार
इचलकरंजी : शहरातील सांगली रोडवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये लग्न सोहळा पार पडत असताना पोलिसांचा छापा
शहरातील हॉटेलमध्ये विवाह समारंभ सुरू होता. या वेळी 300 लोक उपस्थित होते.
पोलिसांनी या लग्नसोहळ्यावर छापा टाकला तर काही काळ तारांबळ उडाली होती
शासनाने लग्नसोहळ्यासाठी पंचवीस लोकांना परवानगी दिली आहे. शेख व कापसे परिवारावर केली कारवाई
नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे
कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून राज्यासाठी नवी नियमावली
डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना बसणार फटका
राज्याची लोकसंख्या , कोरोना लसीकरणाची गती आणि कोरोना रूग्णांची संख्येचा प्रमाणात लस मिळणार
राज्य़ांकडून लस वाया घालणार त्यांचे निगेटीव्ह मार्कींग केलं जाणार
21 जूनपासून देशात 18 वर्षावरील नागरिकांचं मोफत लसीकरण
विरारच्या विजय वल्लभ कोव्हिड हॉस्पिटलमधील आग दुर्घटनेतील मयताच्या नातेवाईकांना शासनाची मदत
15 मयताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखा प्रमाणे 75 लाख रुपय धनादेश द्वारे वाटप
राज्य सरकारकडून 4 लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख असे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत
वसई च्या तहसीलदार उज्वला भगत यांची माहिती
लसीकरणाच्या 6,500 कोटींचा ‘तो’ चेक आता विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्यासाठी वापरा
आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी.
मोफत लसीकरण, मोदी सरकारचे जाहीर आभार
राज्याच्या तिजोरीतून वाचलेले सात हजार कोटी तातडीने गरीबांना द्या
भाजपचे खासदार गिरीश बापट यांची मागणी
सांगली –
पंधराशे रुपयासाठी रिक्षा चालकांची सुरु आहे 2 महिन्या पासून कसरत
कोरोना लॉक डाऊन च्या पशवभूमी वर राज्य सरकारने रिक्षा चालक याना पंधराशे रुपयांची मदत केली होती जाहीर
2 महिने झाले तरी अनेक रिक्षा चालकांना मिळत नाही मदत
सांगली जिल्ह्यात आहेत 10 हजार रिक्षा चालक
त्यापैकी साडे नऊ हजार रिक्षा चालक आहेत परवाना धारक
पैशे मिळवण्यासाठी अनेक आहेत राज्य शासनाच्या जाचक अटी
जिल्ह्यात अनेक आहेत अल्प शिक्षित रिक्षा चालक
त्यामुळे वैतागले अनेक रिक्षा चालक
ऑनलाईन ऐवजी सरसकट रिक्षा चालकांना मिळावी मदत
रिक्षा संघटना ची होत आहे मागणी
नागपूर –
ब्रेक द चेननंतर सुरू झालेली हॉटेल, रेस्टॉरंट, मॅरेज हॉल, लॉंन, फॉर्म हाऊस रिसॉर्ट कोरोना वाढीस कारणीभूत ठरू नये
हॉटेल, रेस्टॉरंट व्यापारी व उद्योजक जगतातील मान्यवरांशी पालक मंत्री नितीन राऊत यांनी साधला संवाद
कोरोना संपला नाही ;सर्व कर्मचाऱ्यांचे आधी लसीकरण करा
जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकी घेऊन सूचना देण्याचे निर्देश
काळजी न घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांसोबत हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन, नागपूर व उद्योग, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
कोल्हापूर :
कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न देणाऱ्या 15 हून अधिक लॅब चे परवाने रद्द होण्याची शक्यता
जिल्हा प्रशासनाकडून कारवाई ला सुरवात
अहवालाची माहिती आयसीएमआर पोर्टलवर न भरणाऱ्या जिल्ह्यासह बाहेरील 20 लॅब ना प्रशासनाने पाठवली होती कारणे दाखवा नोटीस
पंधरा दिवसानंतर हे बहुतांशी लॅब कडून नोटिशीला उत्तर नाही
उत्तर न देणाऱ्या लॅब वर परवाना रद्द साठी हालचाली
कोल्हापूर –
अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतरही दुकाने उघडायला परवानगी द्या अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इशारा
इतर जिल्ह्यातील रुग्ण कोल्हापूर मध्ये उपचार घेत असल्यान जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट वाढत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा
प्रशासनाने लवकरात लकवर निर्णय घ्यावा अन्यथा आक्रमक भूमिका घेण्याचा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत व्यापाऱ्यांचा निर्णय
नाशिक – नियमांचा भंग केलेल्या दुकानांकडून 9 कोटी 38 लाखांचा दंड वसूल
मार्च ते जून महिन्या दरम्यान झाली कारवाई
लॉक डाऊन काळात विनामास्क , सोशल डिस्टनसिंग न पाळणे, दुकान उघडे ठेवणे यामुळे केली कारवाई
संचारबंदी काळात 6865 नागरिकांची केली अरटीपीसीआर टेस्ट
नाशिक – खुद्द कृषी मंत्री दादा भुसे झाले हतबल
गैरव्यवहार करत असलेल्या मालेगावातील दोन खाजगी हॉस्पिटलवर कारवाईची मागणी
हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई न केल्यास सेना स्टाईल आंदोलनाचा दादा भुसे यांचा इशारा
दादा भुसे यांनी स्टिंग ऑपरेशन करत केला होता हॉस्पिटल मधील गैरप्रकाराचा भांडाफोड
मात्र अधिकारी कारवाई करत नसल्याने कृषी मंत्री हतबल
येत्या गुरुवार पर्यंत कारवाई केली नाही, तर सेना स्टाईल आंदोलनाचा इशारा
सोलापूर –
आता शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांची लसीकरण केंद्रात होणार नाही
त्यांची नावे शोधून त्यांच्या घरापर्यंत जाऊन ऑनलाईन नोंदणी करून लस देण्यात येणार
या मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती
पालिका आयुक्त पी शिवशंकर यांची माहिती
सोलापूर –
शहरात गेल्या 24 तासात कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही
तर ग्रामीण भागात 18 जणांचा कोरोनाने मृत्यू
ग्रामीण भागात कोरोनाचे 331 नवे रुग्ण तर शहरात 15 नवे रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 55 हजार 100 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद
यापैकी एक लाख 47 हजार 299 जण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन घरी परतले
आत्तापर्यंत जिल्ह्यात 4 हजार 136 जणांचा कोरोनाने मृत्यू
नागपूर :
नागपुरात गेल्या 24 तासांत 134 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
430 जणांनी केली कोरोना वर मात
तर 8 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
एकूण रुग्ण संख्या – 475926
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 463723
एकूण मृत्यू संख्या – 8967
मुंबईत गेल्या २४ तासांत 728 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या २४ तासांत 980 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत गेल्या २४ तासांत 28 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 10 हजार 219 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात 154 रुग्णांचा मृत्यू, तर 21 हजार 81 रुग्णांची कोरोनावर मात