Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 2014 नवे रुग्ण आढळले

| Updated on: May 09, 2021 | 12:19 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 2014 नवे रुग्ण आढळले
Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 May 2021 10:12 PM (IST)

    ठाण्यात दिवसभरात 961 रुग्ण कोरोनामुक्त, 479 नव्या रुग्णांची नोंद   

    ठाणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 961 रुग्ण कोरोनामुक्त

    आज दिवसभरात 479 जणांना कोरोनाची लागण

    कोरोनाबाधितांचा आकडा 1,23,717 वर पोहोचला

    संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- 1,15,605

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.4 टक्क्यांवर

    सध्या 6,350 रुग्णांवर  उपचार सुरु

    आज दिवसभरात  9 जणांचा मृत्यू झाला

    आतापर्यंत एकूण 1,762 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 08 May 2021 10:07 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 1720 नवे कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1720 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 46 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 2602 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 17028 वर

    तर उपचार घेणारे 1380 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 69783 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 89413 वर

  • 08 May 2021 09:56 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस हेच आता आभासी झाले, अरविंद सावंत यांचा टोला

    “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात जनतेला कशी मदत करावी याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शन केलं. तिसरी लाट येत आहे .यामध्ये लहान मुलंही करोनाच्या संकटात बाधित होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांचे वॉर्ड अधिक प्रमाणात विभागात निर्माण करा, असा सल्ला मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिलाय”, असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.

    “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी चित्र मुंबईत रंगवलं जात आहे, अशी टीका केलीय. पण आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फोन करून कौतुक केलंय. सुप्रीम कोर्टानेही राज्याची आणि मुंबईच्या कामाची दखल घेतलीय. देवेंद्र फडणवीस हेच आता आभासी झाले आहेत”, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावलाय

  • 08 May 2021 09:35 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 2014 नवे रुग्ण आढळले

    सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचे 2014 नवे रुग्ण

    दिवसभरात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    1747 जणांनी केली कोरोनावर मात

    ग्रामीण भागात कोरोनाचा मोठा उद्रेक

    54 मृतांपैकी  ग्रामीण भागातील 45 जणांचा तर शहरातील 9 जणांचा समावेश

    ग्रामीण भागात आज 1889 जणांचा तर शहरातील 125 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

    जिल्ह्यात 17830 तर शहरात 1735 सक्रिय रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • 08 May 2021 09:33 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात दिवसभरात 968 नव्या रुग्णांची नोंद

    रायगड कोरोना अपडेट

    दिवसभरात 968 नव्या रुग्णांची नोंद

    पनवेल मनपा भागात- 255  रुग्ण

    रायगड ग्रामीण भागात 713 रुग्ण

    आज बरे झालेले रुग्ण- 745

    दिवसभरात 8 जणांचा मृत्यू

    सध्या  12749 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

    आतापर्यंत एकूण 100336 रुग्ण कोरोनामुक्त

    आतापर्यंत एकूण 2516 रुग्णांचा मृत्यू

    कोरोनाबाधितांचा आकडा 1,15,601 वर पोहोचला

  • 08 May 2021 08:37 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 629 नवे रुग्ण

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 629 रुग्ण आढळले

    दिवसभरात एकूण 11 कोरोनाग्रस्तांता मृत्यू झाल

    तर आज दिवसभरात  841 जणांना डिस्चार्ज देण्यात आला

    उस्मानाबाद तालुका 235, तुळजापूर 48,उमरगा 61, लोहारा 36, कळंब 45, वाशी 93, भूम 33 व परंडा 78 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6913 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद – 2 लाख 41 हजार 177 नमुने तपासले त्यापैकी 43 हजार 986 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट

    36 हजार 049 रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचा दर 82.53 टक्के

    रुग्णांचा मृत्यू 1023 तर 2.31 टक्के मृत्यू दर

  • 08 May 2021 08:32 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीमध्ये एकाच दिवसात 18 जणांचा मृत्यू

    ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज एकाच दिवशी कोरोनामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात झालेल्या मृतांच्या आकड्यांध्ये आजचा आकडा हा सर्वांत जास्त आहे. महापालिका हद्दीत आज कोरोनाचे नवे 533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 161 वर पोहोचली आहे. बऱे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजार 369 वर पोहोचली आहे. आज एकाच दिवसात 1 हजार 103 रुग्ण बरे झाले आहेत.

  • 08 May 2021 08:30 PM (IST)

    अकोल्यात दिवसभराता आढळले 379 नवे कोरोना रुग्ण

    अकोला कोरोना अपडेट

    आज दिवसभरात 379 रुग्ण पॉझिटिव्ह  आढळले

    2345 अहवालापैकी 1966 जणांचे अहवालात निगेटिव्ह

    कोरोनाबाधितांचा आकडा 45038 वर पोहोचला

    आज दिवसभरात 22 जणांचा मृत्यू

    कोरोनामुळे आतापर्यंत 787 जणांचा मृत्यू

    आज दिवसभरात 550 जणांना डिस्चार्ज

    एकूण 37898 जणांनी केली कोरोनावर मात

    उपचार घेत असलेले रुग्ण-6353

  • 08 May 2021 08:29 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात एकूण 4069 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

    नाशिक जिल्हा कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 4069

    दिवसभरात 2795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नाशिक मनपा- 1429 रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 1298 रुग्ण

    मालेगाव मनपा- 0017 रुग्ण

    जिल्हा बाह्य रुग्ण- 51 रुग्ण

    – नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 3825

    दिवसभरात एकूण 41 जणांचा मृत्यू

  • 08 May 2021 07:45 PM (IST)

    वसई विरारमध्ये 734 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

    वसई-विरार कोरोना अपडेट

    मागच्या 24 तासात 734 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात 10 जणांचा मृत्यू

    614 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,362 वर

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 46,675 वर

    आतापर्यंत एकूण 1188 रुग्णांचा मृत्यू

    सध्या 11499 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

  • 08 May 2021 07:43 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 2837 कोरोना रुग्णांची वाढ 

    पुणे कोरोना अपटेड

    – दिवसभरात 2837 कोरोना रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 4673 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात दिवसभरात 82 रुग्णांचा मृत्यू, 23 रूग्ण पुण्याबाहेरील

    – 1403 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 444539 वर

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 36586

    – एकूण मृत्यू -7304

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 400649

  • 08 May 2021 07:41 PM (IST)

    सातारा जिल्हयात 24 तासात 2379 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह 

    सातारा जिल्हा कोरोना अपडेट

    सातारा जिल्हयात 24 तासात 2379 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

    जिल्हयात सध्या 21,847  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु

    जिल्ह्यात एकूण 2828 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    जिल्ह्यात एकूण 1,20,804 कोरोनाबाधित रुग्ण

    जिल्हयात एकूण 96,070 रुग्ण कोरोनामुक्त

  • 08 May 2021 07:39 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1160 नव्या रुग्णांची नोंद

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात 1160 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 21 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 70548

    एकूण कोरोनामुक्त : 54448

    सक्रिय रुग्ण : 15010

    एकूण मृत्यू : 1080

    एकूण नमूने तपासणी : 408623

  • 08 May 2021 07:38 PM (IST)

    नांदेडमध्ये 24 तासात 497 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

    नांदेड  कोरोना अपडेट

    24 तासात 497 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    2840 टेस्ट पैकी 497 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह

    आतापर्यंत 84624 जनांना कोरोनाची लागण

    आतापर्यंत 76944 जण कोरोना मुक्त

    24 तासात 13 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत एकूण 1696 जणांचा मृत्यू

    नांदेडमध्ये सध्या 5691 सक्रीय रुग्ण

    सक्रिय रुग्णांपैकी 184 रुग्ण गंभीर

  • 08 May 2021 07:37 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 2131 नवे कोरोना रुग्ण

    पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट

    आज कोरोना रुग्ण -2131

    दिवसभरातील कोरोनामुक्त -1919

    दिवसभरातील  मृत्यू -64

    एकूण कोरोना रुग्ण -228203

    एकूण कोरोनामुक्त -202552

    एकूण मृत्यू -3298

  • 08 May 2021 06:22 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 310 नव्या रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 310

    आज झालेले मृत्यू – 07

    आज बरे झालेले – 476

    तालुकानिहाय रुग्णसंख्या

    गोंदिया————–165

    तिरोडा————–22

    गोरेगाव————–38

    आमगाव————–20

    सालेकसा————-13

    देवरी——————15

    सडक अर्जुनी ———–19

    अर्जुनी मोरगाव——–14

    इतर राज्य————–04

    एकूण रुग्ण – 36411

    एकूण मृत्यू – 587

    एकूण बरे झालेले रुग्ण – 31752

    एकूण उपचार घेत असलेले रुग्ण – 4072

  • 08 May 2021 06:21 PM (IST)

    नागपूरकरांना दिलासा, 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

    नागपूर : नागपूरकरांना दिलासा, 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

    – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 7799 रुग्ण झाले कोरोनामुक्त

    – जिल्ह्यात 42 तासांत 3727 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – जिल्ह्यात 24 तासांत 81 जणांचा मृत्यू, मृत्यूंच्या संख्येमुळे चिंता कायम

    – जिल्ह्यात 24 तासांत 20335 जणांच्या चाचण्या

    – जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 58245 वर

  • 08 May 2021 06:10 PM (IST)

    नागपूर जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे पोलिसांना आदेश

    नागपूर – लाट थोपवण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांचे कडक निर्देश

    – जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे पोलिसांना आदेश

    – पोलिसांनी पकडलेल्या रिकामटेकड्यांना 14 दिवस सोडू नका-  नितीन राऊत

    – मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करण्याचे निर्देश

    – जिल्ह्यात 25 ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं नियोजन

    – जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारणार

    – कोरोना रुग्णांसाठी 5 हजार जंबो सिलिंडर उपलब्ध केले जाणार

    – दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन

    – 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार

    – प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करणार

    – ट्रिटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार

    – लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकार्‍यांची टीम गावांच्या भेटीवर जाणार

  • 08 May 2021 05:43 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आढळले 491 नवे कोरोना रुग्ण

    वाशिम कोरोना अलर्ट

    जिल्ह्यात दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यात आढळले 491 नवे रुग्ण

    तर 524 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 8 दिवसात 36 रुग्णांचा मृत्यू

    मागील आठ दिवसांता  3641 रुग्ण कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 31605

    सध्या अ‌ॅक्टिव्ह रुग्ण – 4477

    आतापर्यंत एकूण 26795 रुग्णांना डिस्चार्ज

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 332

  • 08 May 2021 04:12 PM (IST)

    डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप

    ठाणे : कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांतील कोरोनाबाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघातील गरजू रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी आज डोंबिवली मध्यवर्ती शाखेमध्ये या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांना ऑक्सिजन कंस्ट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले

  • 08 May 2021 03:46 PM (IST)

    कोरोनामूळे अनाथ झालेल्या मुलांचा कनेरी मठ व्यवस्थापन सांभाळ करणार

    कोल्हापूर : कोरोनामूळे अनाथ झालेल्या लहान मुलांचा कनेरी मठ व्यवस्थापन सांभाळ करणार

    मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची माहिती

    कोरोनाकाळात आईवडिलांचे छत्र हरवलेल्या चिमुकल्यांना मिळणार आधार

    मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची पूर्ण जबाबदारी कनेरी मठ व्यवस्थापन पार पाडणार

    अनाथ झालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी कनेरी मठ व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचं अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीचं आवाहन

  • 08 May 2021 02:43 PM (IST)

    कोरोनामूळे अनाथ झालेल्या लहान मुलांचा सांभाळ कोल्हापुरातील कनेरी मठ व्यवस्थापन करणार

    कोल्हापूर

    कोरोनामूळे अनाथ झालेल्या लहान मुलांचा सांभाळ कोल्हापुरातील कनेरी मठ व्यवस्थापन करणार

    मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची माहिती

    कोरोना काळात मातृ पितृ छत्र हरवलेल्या चिमुकल्यांना मिळणार आधार

    मुलांच्या शिक्षणा पासून ते लग्नापर्यंतची पूर्ण जबाबदारी कनेरी मठ व्यवस्थापन पार पाडणार

    अनाथ झालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी कणेरी मठ व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचं अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीच आवाहन

  • 08 May 2021 01:24 PM (IST)

    वांगणीतील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. उमाशंकर गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    वांगणी :

    वांगणीतील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. उमाशंकर गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    आपण गंभीर कोरोना रुग्णांना काही तासात बरं करत असल्याचा दावा गुप्ता यांनी केला होता

    याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुप्ता यांच्याविरोधात केला गुन्हा दाखल

    गुप्ता यांना कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसतानाही उपचार करत असल्याबद्दल केला गुन्हा दाखल

  • 08 May 2021 01:23 PM (IST)

    कोरोनाबाधितांवर उपचारात हयगय नको, अजित पवार यांच्या सूचना

    बारामती :

    – कोरोनाबाधितांवर उपचारात हयगय नको

    – ऑक्सिजन, रेमडीसीव्हरची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या..

    – नव्याने कोव्हिड केअर सेंटर उभारणीवर लक्ष द्या..

    – रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लक्ष केंद्रीत करा..

    – कोरोना लसीकरण अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्न करा..

    – बारामतीत प्रशासनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

  • 08 May 2021 01:20 PM (IST)

    इस्लामपुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि मयत रुग्णाच्या नातेवाईकामध्ये शाब्दिक बाचाबाची

    सांगली –

    इस्लामपुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि मयत रुग्णाच्या नातेवाईकामध्ये शाब्दिक बाचाबाची

    पेठ-सांगली रस्त्यावरील डॉ.सचिन सांगरुळकर यांच्या लक्ष्मी-नारायण हॉस्पिटल मधील प्रकार

    या वादानंतर डॉक्टरांने दिलेल्या तक्रारीनंतर रात्री 55 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल

    जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल

    काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 5-6 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा होता आरोप

  • 08 May 2021 01:17 PM (IST)

    मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या एक वर्षात कोविड पीडित गरोदर स्त्रियांमध्ये हजाराहून अधिक मुले जन्माला

    मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या एक वर्षात कोविड पीडित गरोदर स्त्रियांमध्ये हजाराहून अधिक मुले जन्माला आली.

    विशेष बॉब हे आहे की जन्माला आलेला मूल कोरोना पोजिटिव्ह नाही , हे निसर्गाचा चमत्कार आहे कारण ही मुले आपल्या आईजवळ राहतात आणि आईचे दूध पीतात पण त्यांना संक्रमण झाले नाही.

    मागील कोरोना लाट मध्ये 750 प्रसूती झाली आणि 7 महिलाच्या मृत्यु झाला

    दुसरीं लाटेत 250 महिलांचे प्रसूती करण्यात आले आणि 20 गर्भवती स्त्रियांचा मुलाला जन्म होण्यापूर्वीच मृत्यू झाला.

    तरी देखील एका वर्षात 1000 पेक्षा जास्त सुरक्षित डिलीवरी करण्यात आली

    जे स्वतः कोरोना ग्रस्त महिलां मध्ये एक रिकार्ड आहे

  • 08 May 2021 11:39 AM (IST)

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरची कमतरता भासते – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर

    चंद्रकांत पाटील –

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरची कमतरता भासते

    या दोन्हीचं कंट्रोल केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे

    मात्र अनेक ठिकाणी सामान्य लोकांना ते मिळत नाही

    म्हणून भाजप राज्यभर ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची सेवा देणार

    योग्य ती काळजी घेऊन मशीन देणार

    हवेतील ऑक्सिजन शोषून ते साठवण्यासाठी या मशीनमध्ये क्षमता

  • 08 May 2021 11:38 AM (IST)

    शरद पवार यांनी सगळ्यात आधी कोरोना आणि मराठा आरक्षण यावर बोललं पाहिजे – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर

    चंद्रकांत पाटील –

    शरद पवार यांनी सगळ्यात आधी कोरोना आणि मराठा आरक्षण यावर बोललं पाहिजे

    हसन मुश्रीफ यांनी खुशाल माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा

    मी घाबरत नाही, माझी सर्व प्रॉपर्टी विकली तरी 100 कोटी काय 1 कोटी पण होणार नाही

    मुश्रीफ त्यात यशस्वी झाले तर मग मलाच विकावं लागेल, असाही चंद्रकांत पाटील यांचा टोला

  • 08 May 2021 09:50 AM (IST)

    पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, 500 वर गेलेली मायक्रो कंन्टेंमेंट झोनची संख्या दहा दिवसात घटली

    पुणे

    पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी !

    500 वर गेलेली मायक्रो कंन्टेंमेंट झोनची संख्या दहा दिवसात घटली,

    शहरात रुग्णसंख्येत घट झाल्यानं मायक्रो कंन्टेंमेंट 178 नी घटले, …

    दहा दिवसात 497 वरून मार्ग कंन्टेंमेंट झोनची संख्या थेट 312 वर,

    तरीही पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन,

    5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिका करते जाहीर …

    तरीही हडपसर मुंढवा, धनकवडी कोरोनाची हॉटस्पॉट

    हडपसरमध्ये 62 तर धनकवडीत 54 मायक्रो कंन्टेंमेंट झोन

  • 08 May 2021 09:08 AM (IST)

    औरंगाबादेत काल दिवसभरात 988 रुग्णांची वाढ

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत काल दिवसभरात 988 रुग्णांची वाढ

    कोरोनामुळे दिवसभरात 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

    जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 130836

    आजपर्यंत एकूण 2709 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात 119117 कोरोनामुक्त

    तर 9010 रुग्णांवर उपचार सुरू

  • 08 May 2021 09:07 AM (IST)

    औरंगाबाद महापालिका उभारणार लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय

    औरंगाबाद –

    औरंगाबाद महापालिका उभारणार लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय

    एमजीएम परिसरात उभं राहणार 100 खाटांचे कोविड बाल रुग्णालय

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची तयारी सुरू

    कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्यामुळे तयारी

    तर गरोदर मातांसाठीही उभारणार 50 खाटांचे रुग्णालय

    10 ते 15 दिवसात रुग्णालय उभं करण्याचा महापालिकेचा मानस

  • 08 May 2021 09:07 AM (IST)

    महिलेला आईच्या जीवाची भीती दाखवून खाजगी अॅम्ब्युलन्स चालकाने 14 हजार रुपये उकळले

    पिंपरी चिंचवड

    – महिलेला आईच्या जीवाची भीती दाखवून खाजगी अॅम्ब्युलन्स चालकाने 14 हजार रुपये उकळले

    – पीडित महिलेचा विनयभंग ही केला पीडित महिलेची तक्रार

    – किशोर शंकर पाटील या 45 वर्षीय आरोपीला अटक

    – महिलेची आई गंभीर असताना थेरगाव हुन वाय सी एम रुग्णालयात आईला परत नेण्यासाठी मागितले 14 हजार रुपये

    – पैसे दिले नाही तर आईला रस्त्यावर सोडून देण्याची दिली धमकी पैसे स्वीकारताना महिलेचा केला विनयभंग पोलिसांनी केली अटक

  • 08 May 2021 09:06 AM (IST)

    तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिका अलर्ट मोडवर

    पुणे

    तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका अलर्ट मोडवर

    पुण्यात देशातलं पहिलं उभारलं जाणार चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल

    येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात करणार चाईल्ड केअर सेंटर

    200 ऑक्सिजन बेडची करणार व्यवस्था

    हॉस्पिटलसाठी चार कोटी रुपयांचा येणार खर्च, दीड महिन्यात हॉस्पिटलचं काम करणार पूर्ण

    महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची माहिती

    तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग अधिक होण्याचा धोका लक्षात घेऊन चाईल्ड हॉस्पिटल उभारण्याचा घेतला निर्णय

  • 08 May 2021 09:05 AM (IST)

    नागपुरात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

    मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

    नागपूर जिल्ह्याच्या कन्हान सत्रापुर शिवारातील नदीपात्रात बुडून मृत्यु,

    13 वर्षीय रोहन भिसे आणि 15 वर्षीय हसीन पुरवले असं मृत्यु झालेल्या मुलांची नावे,

    रोहन खोल पाण्यात बुडत असताना हसीन त्याला वाचविण्यासाठी सरसावला असता दोघेही बुडाले पाण्यात,

    सत्रापुर गावात शोककळा

  • 08 May 2021 09:04 AM (IST)

    नागपुरातही म्युकरमायकोसिसचे संकट

    – नागपुरातही म्युकरमायकोसिसचे संकट

    – नागपुरात 150 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याची माहिती

    – म्युकरमायकोसिसमुळे आठ जणांनी दृष्टी गमावल्याचीही माहिती

    – लक्षणं आढळल्यास वेळीच उपचार घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

  • 08 May 2021 09:03 AM (IST)

    कोल्हापुरात ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या युवा संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

    कोल्हापूर

    ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या युवा संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

    कोल्हापूरच्या डॉ भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत मृत्यू

    डॉ. काकडे चेन्नईचा एस आर एम यूनिवर्सिटी मध्ये होते कार्यरत

    ऑक्सिजन चे सूक्ष्म गुणधर्म यावर काकडे यांच होत संशोधन

    इंधन निर्मिती आणि प्लॅटिनम संशोधनातील सात पेटंट ही काकडे यांच्या नावावर

    मात्र कोरोना वर उपचार सुरू असताना ऑक्सिजन न मिळाल्याने झाला मृत्यू

  • 08 May 2021 09:02 AM (IST)

    लोणावळा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

    पुणे

    -लोणावळा शहरात विनाकारण फिरणाऱ्याची कोरोना चाचणी

    -170 पैकी 25 पॉझिटिव्ह रुग्ण आले आढळून

    -लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने लॉकडाऊन काळात विनाकारण मोकाट फिरणाऱ्याची कोरोना अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या

  • 08 May 2021 09:02 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये 45 च्या पुढील वयोगटासाठी लस उपलब्ध नाही

    पिंपरी-चिंचवड

    – 45 च्या पुढील वयोगटासाठी लस उपलब्ध नाही; आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच 08 केंद्रांवर लसीकरण

    – शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे आज वय वर्षे 45 च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही

    – 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण होणार आहे. अँपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

  • 08 May 2021 09:01 AM (IST)

    नागपुरात अटक टाळण्यासाठी मिळवलं कोरोनाबाधिताचं बनावट प्रमाणपत्र

    – नागपुरात अटक टाळण्यासाठी मिळवलं कोरोनाबाधिताचं बनावट प्रमाणपत्र

    – सराईत गुन्हेगार सिराज शेख ची बनवाबनवी आली अंगलट

    – प्रमाणपत्र बनावट असल्याचं शोधून आरोपीला केली अटक

    – नमुने एका व्यक्तींचे आणि रिपोर्टवर नाव दुसऱ्या व्यक्तींचं

    – गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपीला अटक

  • 08 May 2021 09:00 AM (IST)

    पुणे शहरात सलग ८ व्या दिवशी नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड कायम

    पुणे –

    – पुणे शहरात सलग ८ व्या दिवशी नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड कायम,

    – पुणे शहरात आज सलग ८ व्या दिवशीही कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक,

    – शहरात काल २ हजार ४५१ नवीन कोरोना बाधित रूग्णांची तर ३ हजार ४९१ कोरोनामुक्त रूग्णांची नोंद,

    – ३८,४८१ रुग्णांवर उपचार सुरुय,

    – काल दिवसभरात २४५१ नवे रुग्ण,

    – काल दिवसभरात ३४९१ रुग्णांना डिस्चार्ज.

  • 08 May 2021 08:59 AM (IST)

    पुण्यात आज फक्त चार लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू राहणार

    पुणे –

    – पुण्यात आज फक्त चार लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू राहणार,

    – ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आज बंद असणार,

    – १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ४ केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे

    – या चारही केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध असणार,

    – लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे 45 पुढील नागरिकांचे आज लसीकरण बंद असणार आहे,

    – महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

  • 08 May 2021 08:59 AM (IST)

    कागल तालुक्‍यात उद्यापासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू

    कोल्हापूर

    कागल तालुक्‍यात उद्यापासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू

    ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनासोबत च्या बैठकीत आदेश

    तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी निर्णय

    जनता कर्फ्यू काळात फक्त वैद्यकीय सुविधा सुरू राहणार

    अत्यावश्य सेवेतील लोकांसाठीच पेट्रोल पंप हे सुरू राहणार

    गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर कागलमध्ये ही ऑक्सिजन प्रकल्प आणि एचआरसीटी स्कॅन यंत्रणा सुरू करण्याचा बैठकीत निर्णय

  • 08 May 2021 08:58 AM (IST)

    नागपुरातील 13 खाजगी रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेची नोटीस

    – नागपुरातील 13 खाजगी रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेची नोटीस

    – कोविड रुग्णांची लूट, 80-20 नियंमांचं पालम न करणे भोवले

    – कोरोना रुग्णांच्या लुटीबाबत माजी महापौर संदिप जोशींनी केली होती तक्रार

    – होक्वार्ट, सेव्हनस्टार, विवेका हॅास्पीटल, किंग्जवे सह अनेक मोठ्या हॅास्पीटलला नोटीस

    – माजी महापौर संदिप जोशी यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

    – संदिप जोशींच्या इशाऱ्यानंतर मनपा प्रशासनाला आली जाग

  • 08 May 2021 08:57 AM (IST)

    जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद देणाऱ्या कोल्हापूरकरांवर आता कारवाईचा बडगा

    कोल्हापूर

    जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद देणाऱ्या कोल्हापूरकरांवर आता कारवाईचा बडगा

    अकरा नंतर दुकाने उघडी दिसल्यास होणार थेट गुन्हा दाखल

    विनाकारण फिरणाऱ्यांवर ही होणार पोलीस कारवाई

    पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांचे आदेश

    आज पासून होणार आदेशाची अंमलबजावणी

    वारंवार सूचना करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आता कोल्हापूर पोलिसांकडून कडक भूमिका

  • 08 May 2021 08:57 AM (IST)

    नाशकात सिव्हिलमध्ये 150 बेडचा प्रस्ताव पुन्हा लांबणीवर

    नाशिक – सिव्हिलमध्ये 150 बेडचा प्रस्ताव पुन्हा लांबणीवर

    ऑक्सिजन नसल्याने सिव्हिल मध्ये बेड वाढवण्याचा प्रस्ताव लांबणीवर

    ऑक्सिजन ची तूट भरून निघे पर्यंत नवीन रुग्णाण वाट पाहावी लागणार

    मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील ऑक्सिजन चा पुरवठा सुरळीत नसल्याने रुगणांचे हाल

  • 08 May 2021 08:56 AM (IST)

    कोरोना आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल

    बारामती : कोरोना आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल..

    बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान सभागृहात होतेय बैठक..

    अधिकारी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होतेय बैठक..

    बारामतीतील लॉकडाऊन आणि कोरोनाचा अजित पवार घेणार आढावा..

  • 08 May 2021 08:55 AM (IST)

    सोलापुरात भाजी विक्रेत्यांना, भाजी खरेदीदारांना पोलिसांनी लावली शिस्त

    सोलापूर – भाजी विक्रेत्यांना, भाजी खरेदीदारांना पोलिसांनी लावली शिस्त

    रेल्वे स्टेशन परिसरात शिस्तीत भाजीपाला विक्री सुरू

    काल भाजी विक्रीसाठी झाले होते यात्रेचे स्वरूप

    पोलिसांनी पुढाकार घेतल्याने सोशल डिस्टंसिंग पाळत भाजी विक्री

  • 08 May 2021 08:55 AM (IST)

    जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी, औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

    औरंगाबाद –

    औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड

    जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी

    प्रत्येक रुग्णासोबत एक किंवा दोन नातेवाईक थांबतात कॉट शेजारी

    कोट शेजारी थांबणाऱ्या नातेवाईकांमुळे कोरोना स्प्रेड होण्याची भीती

    जिल्हा रुग्णालयातील जनरल वार्डपासून आयसीयू पर्यंत नातेवाईकांची गर्दी

    रुग्णांसोबत थांबणाऱ्या नातेवाईकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

    रुग्णांसोबत दिवस रात्र थांबलेले असतात नातेवाईक

    रुग्णालय नीट काळजी घेत नसल्याच्या शंकेने नातेवाईक राहतात थांबून

    रुग्णालयात थांबणाऱ्या नातेवाईकांमुळे कोरोना पसरण्याची भीती

  • 08 May 2021 08:53 AM (IST)

    भिवंडीत आज फक्त एकच लसीकरण केंद्रावर लसीकरण, दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य

    भिवंडी भिवंडीत आज फक्त एकच लसीकरण केंद्रावर लसीकरण राहणार सुरू , लसीचा तुटवडा असल्याने फक्त दुसरा डोस असणाऱ्यांना दिली जाणार लस ,18 + व 45 वर्षांवरील नागरीक राहणार वंचित भिवंडीत करोन रुग्ण वाढ मंदावली ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 283 पर्यंत आली आटोक्यात . ऑनलाईन लसीकरणात भिवंडीकर नागरीकांना समावेश अत्यल्प ,ऑनलाईन नाव नोंदणी करून लसीकरणाचा फायदा घेतला बाहेरील व्यक्तींनी .

  • 08 May 2021 08:44 AM (IST)

    शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील तीन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

    पुणे

    -कोरोनाने घेतला तीन भावांचा बळी

    -शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे

    -पोपट धोंडिबा नवले वय 58 यांचा कोरोना अहवाल 15 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आणि उपचारादरम्यान 23 एप्रिल ला निधन झाले

    -त्यांनतर अवघ्या चार दिवसांनी 27 एप्रिल ला दुसरा भाऊ सुभाष धोंडिबा नवले वय 55 यांच्यावर काळाने झडप घातली

    -आणि 6 मे रोजी तिसरा भाऊ विलास धोंडिबा नवले वय 52 यांचे निधन झाले

    -शिरूर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे आरोग्य यंत्रणा कमी पडू लागल्याने वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू होत आहेत

  • 08 May 2021 08:38 AM (IST)

    उत्तरप्रदेशातील ईटाव्हा पार्कमध्ये दोन सिंहांना कोरोनाची लागण

    उत्तर प्रदेश : उत्तरप्रदेशातील दोन सिंहांना कोरोनाची लागण,

    दोन्ही सिंहावर उपचार सुरु

    उत्तरप्रदेशातील प्रसिद्ध ईटाव्हा सफारी पार्कमधील घटना

  • 08 May 2021 07:23 AM (IST)

    नागपुरात आज 45 वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण होणार नाही

    – नागपुरात आज 45 वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण होणार नाही

    – लसीचा पुरवठा न झाल्याने आज 45 वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण बंद

    – ‘लसीचा मुबलक पुरवठा झाल्यावर लसीकरण पुन्हा सुरु होणार’

    – नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती

    – नागपूरात आज सहा केंद्रांवर 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरु राहणार

  • 08 May 2021 07:05 AM (IST)

    निवृत्तीनाथ महाराजांची उटीची वारी सलग दुसऱ्या वर्षीही भक्तांशिवाय साजरी

    नाशिक – निवृत्तीनाथ महाराजांची उटीची वारी यंदा भक्तांशिवाय साजरी

    प्रत्येक वर्षी त्रंबकेश्वर निवृत्तीनाथ मंदिरात साजरी होते उटीची वारी

    सलग दुसऱ्या वर्षी वारी भाविकांविना

    सात आठ दिवस चंदनाचे खोड उगाळून एकादशीला लावले जाते निवृत्तीनाथ समाधीला

    देवाला उष्म्याचा त्रास होऊ नये यासाठी लावतात चंदनाची उटी

  • 08 May 2021 06:53 AM (IST)

    नागपूर प्रशासन लागलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीला

    – नागपूर प्रशासन लागलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीला

    – नागपूरात लहान मुलांमधील कोरोना रोखण्यासाठी विभागीय टास्क फोर्सची निर्मिती

    – मुलांसाठी एम्समध्ये 200 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर

    – तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी

    – बालकांसाठी व्हेंटीलेटर, एनआयसीयू, उपचारासाठी खासगी डॉक्टरसह परिचारिकांना प्रशिक्षण

    – मुलांसाठी लवकरंच फिवर क्लिनिक सुरु करणार

    – विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची माहिती

    – टास्क फोर्समध्ये डॉ. विनिता जैन, डॉ. उदय बोधनकर, डॉ. देवपुजारी, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. दिप्ती जैन एम्सच्या डॉ. मिनाक्षी गिरीश

  • 08 May 2021 06:42 AM (IST)

    लहान मुलांसाठी मुंबईत पालिकेचे 500 खाटांचे ‘जम्बो कोरोना केंद्र’

    करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोनाचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो, हे तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन ५०० खाटांचे लहान मुलांचे स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येणार असून याशिवाय सहा हजार खाटांची तीन स्वतंत्र जम्बो कोविड केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले

  • 08 May 2021 06:37 AM (IST)

    बदलापूर नगरपालिका क्षेत्रात अखेर कडक लॉकडाऊन लागू

    बदलापूर नगरपालिका क्षेत्रात अखेर कडक लॉकडाऊन लागू

    उद्या सकाळी 7 वाजतापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत असेल कडक लॉकडाऊन

    बदलापूर पालिकेच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आदेश

    या कालावधीत फक्त दवाखाने आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार

    किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी

    अखेर बदलापुरात मुरबाड पॅटर्नप्रमाणे लॉकडाऊनची घोषणा

  • 08 May 2021 06:34 AM (IST)

    अकोला जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन,जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

    अकोला जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन,जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

    15 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन

    9 में च्या रात्री 12 वाजेपासून ते 15 में च्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन

    कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आदेश

    दररोज सकाळी 7 ते 11 पर्यंत भाजीपाला फेरीवाल्यांना मुभा

    तर सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत शिवभोजन थाली, रेस्टॉरंट, हॉटेलला पार्सलची सुविधा सुरू राहील

    अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे

  • 08 May 2021 06:33 AM (IST)

    रेमडेसीव्हीर काळाबाजार धाड प्रकरणात चंद्रपूर पोलिसांची धक्कादायक कारवाई, एका डॉक्टरला अटक

    चंद्रपूर –

    शहरातील रेमडेसीव्हीर काळाबाजार धाड प्रकरणात पोलिसांची धक्कादायक कारवाई

    शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील ICU चे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना अटक

    क्राईस्ट रुग्णालयातील या डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेस देखील पोलिसांच्या ताब्यात

    क्राईस्ट रुग्णालयाला शहरातील मुख्य शासकीय कोविड केंद्राएवढेच महत्व

    शहर-जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसीव्हीर काळाबाजाराचे धक्कादायक टोक

    या रुग्णालयाला वितरित होणारे इंजेक्शन चढ्या किंमतीत बाहेर विकत असल्याचा झालाय खुलासा

    या टोळीने किती इंजेक्शन बाहेर विकले याची पोलीस चौकशीत कळणार सत्यता

  • 08 May 2021 06:28 AM (IST)

    कल्याण महापालिका वगळता कल्याण तहसील अंतर्गत ग्रामीण परिसरात कडक लॉकडाऊन

    कल्याण महापालिका वगळता कल्याण तहसील अंतर्गत ग्रामीण परिसरात कडक लॉकडाऊन

    कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी पाठवला होता जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव

    ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रस्तावाला मान्यता

    अत्यावश्यक सेवा वगळता 10 में सकाळी 7 ते 15 मे संध्याकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन

    इतर दुकानांसाठी घरपोच सेवा करण्याची परवानगी

Published On - May 08,2021 10:12 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.