Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात कोरोनाचे 42 हजार 582 नवे रुग्ण, 850 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: May 14, 2021 | 1:07 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात कोरोनाचे 42 हजार 582 नवे रुग्ण, 850 रुग्णांचा मृत्यू
Maharashtra Corona Virus

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 May 2021 09:45 PM (IST)

    वसई-विरार कोरोना अपडेट

    वसई : मागच्या 24 तासात 563 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    आज दिवस भरात 09 जणांचा मृत्यू तर 654 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 61,990

    कोरोना मुक्त झालेली रुग्ण संख्या 50299

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या 1233

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 10458

  • 13 May 2021 08:59 PM (IST)

    राज्यात दिवसभरात कोरोनाचे 42 हजार 582 नवे रुग्ण, 850 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात एकूण 46 लाख 54 हजार 731 रुग्ण कोरोनामुक्त

    सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर

    दिवसभरात कोरोनाचे 42 हजार 582 नवे रुग्ण

    राज्यात दिवसभरात 850 रुग्णांचा मृत्यू

    राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्क्यांवर

  • 13 May 2021 07:49 PM (IST)

    लसीकरणासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून द्या, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांचे आवाहन

    नागपूर : नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने लसीकरणासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून द्या, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांचे शहरातील सर्व मंगल कार्यालय संचालकांना केले आहे. शहरात सुरू असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळता यावी. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळता यावी यासाठी शहरातील सर्व मंगल कार्यालये लसीकरणासाठी मनपाला उपलब्ध करुन देण्यात यावेत,  असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

  • 13 May 2021 07:30 PM (IST)

    बंदी असतानाही नागपुरात सुरु होते दोन कोचिंग क्लासेस, पोलिसांची धाड

    बंदी असतानाही नागपूरात सुरु होते दोन कोचिंग क्लासेस

    -कोचिंग क्लासेसवर पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी टाकली धाड

    – वर्गात विद्यार्थ्यांना बोलवून सुरु होते कोचिंग क्लासेस

    – क्लास संचालकांवर गुन्हा दाखल

    – मनपाच्या एनडीएस स्कॅाडने क्लासेसचा परिसर केला साल

    – विद्यार्थांना आपापल्या घरी परत पाठवले

  • 13 May 2021 07:27 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात 272 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, दिवसभरात 6 जणांचा मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 272

    आज झालेले मृत्यू – 06

    आज बरे झालेले – 240

    तालुकानिहाय  रुग्णसंख्या

    गोंदिया————–97

    तिरोडा————–19

    गोरेगाव————–13

    आमगाव————–38

    सालेकसा————-33

    देवरी——————32

    सडक अर्जुनी ———–19

    अर्जुनी मोरगाव——–20

    इतर राज्य————–01

    एकूण रुग्ण – 38944

    एकूण मृत्यू – 622

    एकूण बरे झालेले – 34245

    एकूण उपचार घेत असलेले – 4077

  • 13 May 2021 07:25 PM (IST)

    त्र्यंबकेश्वर देवस्थानचा महत्वपूर्ण निर्णय, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय

    नाशिक – त्र्यंबकेश्वर देवस्थानचा महत्वपूर्ण निर्णय

    त्रंबकेश्वरला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

    देवस्थान ट्रस्टचा ऐतिहासिक निर्णय

    हवेतून ऑक्सिज निर्मिती करणारी यंत्रणा उभारणार

    संपूर्ण खर्च देवस्थान कमिटीकडून करण्याचा निर्णय

    अध्यक्षांनी केलेल्या आवाहनाला विश्वस्त मंडळाची एकमतानं मंजुरी

    शिवप्रसाद भक्तनिवास परिसरात असणार हे ऑक्सिजन प्लांट

  • 13 May 2021 06:28 PM (IST)

    नागपुरात 5884 जणांनी केली कोरोनावर मात, 2224 नव्या रुग्णांची नोंद

    नागपुरात आज कोरोना बधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

    नागपूर जिल्ह्यात आज 5884 जणांनी केली कोरोनावर मात

    2224 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 77 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 458604

    एकूण बरे होणाऱ्यांची- 410586

    एकूण मृत्यूसंख्या – 8402

  • 13 May 2021 06:27 PM (IST)

    पुण्यातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह आढळला

    पुण्यात कोव्हीड पॉझिटिव्ह महिला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून बेपत्ता

    आज सकाळी थेट महिलेचा मिळाला मृतदेह

    भवानी पेठेतली होप हॉस्पिटलमधून महिला झाली होती बेपत्ता

    समर्थ पोलीस ठाण्यात दिली होती बेपत्ता असल्याची तक्रार

    मात्र आज हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळाला मृतदेह

    बायमाबी कमरुद्दीन तांबोळी असं मृत महिलेचं नावं

  • 13 May 2021 06:19 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आढळले 588 नवे रुग्ण, सहा जणांचा मृत्यू 

    वाशिम कोरोना अलर्ट

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 06 रुग्णांचा मृत्यू

    नवे आढळलेले 588  रुग्ण

    तर 582 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 13 दिवसात 58 रुग्णांचा मृत्यू

    तर 13 दिवसांत 6669 नवे कोरोना रुग्ण आढळले

    या तेरा दिवसांत 6203 रुग्ण कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 34029

    सध्या सक्रिय रुग्ण – 4317

    आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्ण – 29357

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 354

  • 13 May 2021 06:17 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 2393 कोरोना रुग्णांची वाढ, 4135 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात 2393 कोरोना रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 4135 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधित 75 रुग्णांचा मृत्यू, 25 रूग्ण पुण्याबाहेरील

    – 1372 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 454457 वर

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 25222 वर

    – एकूण मृत्यू -7563

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज-421662

  • 13 May 2021 05:40 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील 3 बाजार समित्यांमध्ये भाजीपाला विक्रीस परवानगी

    नाशिक – जिल्ह्यातील 3 बाजार समित्यांमध्ये भाजीपाला विक्रीस परवानगी

    पालकमंत्री , जिल्हाधिकारी आणि बाजार समिती सभापती यांच्या बैठकीत निर्णय

    भाजीपाल्या व्यतिरिक्त इतर माल विकण्यास परवानगी नाही

    सोशल डिस्टनसिंग ठेवत भाजी विक्रीचे आदेश

  • 13 May 2021 05:05 PM (IST)

    लसीच्या ग्लोबल टेंडरवरून पुणे पालिका आणि राज्य सरकारमध्ये वाद   

    – ग्लोबल टेंडरवरून आता पुणे पालिका आणि राज्य सरकार यांच्यात वाद

    – मुंबई महापालिकेला ग्लोबल टेंडरची परवानगी मिळते मग पुण्याला का नाही? भाजपाचा सवाल

    – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 एप्रिलला पत्र पाठवण्यात आलं. मात्र त्याला अजूनही परवानगी किंवा कोणताही प्रतिसाद राज्य सरकारकडून आला नाही

    – मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत, मात्र ते केवळ मुंबईचेच मुख्यमंत्री असल्याची भूमिका घेतात, भाजपचा घणाघात.

  • 13 May 2021 04:41 PM (IST)

    काही जिल्ह्यांत रुग्ण वाढतायत, सातत्याने काळजी घ्यावी लागणार- टोपे

    परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सध्या ग्राफ कमी होत आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी होत आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा मराठवाड्यातील बीड येथे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सातत्याने काळजी घ्यावी लागणार आहे. जागरुक राहावे लागणार आहे.

    चाचण्या कमी होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, आज झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री महाराष्ट्राची परिस्थिती सुधारत आहे, ही चांगली बाब आहे. महाराष्ट्र चाचण्यामंध्ये चांगले काम करत आहे, असे म्हणाले आहेत. बारा कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात आतापर्यंत तीन कोटी चाचण्या झाल्या आहेत.

    आजच्या आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मी लसीच्या उपलब्धतेवर जोर दिला. लसीकरणाबाबत योग्य व्यवस्थापन होत नाहीये. कारण आज आम्हाला वीस ते बावीस लाख लोकांना लसीचा दुसरा डोस हवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जेवढ्या लसी लागत आहेत, त्या देण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. ती आमची अपेक्षा आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मी सांगितले.

    वीस लाख लसी द्याव्या – राजेश टोपे 

    आम्हाला त्वरीत लसीच्या लसीचे वीस लाख डोस द्यावेत अशी मागणी मी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. केंद्राने सहा लाख लसी पाठवल्या. राज्याने खरेदी केलेले तीन लाख डोस असे एकूण जवळपास नऊ लाख डोस आम्ही 44 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना देत आहोत. त्यामुळे केंद्र सरकारने वीस लाख लसी त्वरीत देणे गरजेचे आहे.

    लसी आयात करण्यासाठी ग्लोबल पॉलिसी हवी

    जवळ-जवळ सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की लसी आयात करण्यासाठी एक ग्लोबल पॉलिसी असावी. यामध्ये मीसुद्धा होतो. असे नसेल तर सगळ्या राज्यांमध्येच स्पर्धा सुरु होईल. त्याचा फायदा देशाबाहेरच्या कंपन्यांना होईल. ही अनहेल्दी पॉलीसी नको, अशी मागणी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांनी केली.

    आपल्या राज्यात 1500 च्या जवळपास म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. ज्या लोकांना मधुमेह आहे, ज्या लोकांची प्रतिक्रारशक्ती कमी झालेली आहे. तसेच ज्या लोकांमध्ये लोहाचे प्रामाण जास्त झालेले आहे. त्यांना या काळ्या बुरशीची लागण झाली आहे. त्यामुळे आम्ही केंद्राकडे तीन मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये  अ‌ॅम्फोटेरेसीन- बी इंजेक्शनचा कोटा आम्हाला वाढवून देण्यात यावा, अशी मागणी मी केली. तसेच अ‌ॅम्फोटेरेसीन- बी  या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना द्याव्यात, असे मत मी मांडले. तसेच म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना एका वेळेस वीस ते चाळीस इंजेक्सन द्यावे लागतात. त्यामुळे रुग्णांचा खर्च कमी व्हावा म्हणून त्यासाठी एमआरपी हा कमी झाला पाहिजे अशी मागणीसुद्धा मी केली आहे. तसेच म्युकर मायकोसिस या काळ्या बुरशीबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचीसुद्धा आम्ही केंद्राकडे मागणी केली आहे.

  • 13 May 2021 04:34 PM (IST)

    मृतदेह नदीत दिसणे धक्कादायक, देशाची व्यवस्था अपयशी ठऱतेय- जयंत पाटील

    कोरोना रुग्ण संख्या कमी होत चालली आहे, यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे.  लोकांचे मृतदेह नदीत दिसणे धक्कादायक आहे. त्या भागात व्यवस्था अपय़शी ठऱत आहेत. हे लोकांच्या लक्षात येत आहे. सध्या कोरोनापासून वाचायचे असेल तर लस हाच एकमेव उपाय आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करणं हाच एकमेव मार्ग आहे, असं मला वाटतं.

    देशातील सर्व लोकसंख्येला लस देण्यासाठी आपल्या देशात लस निर्माण करणाऱ्या कारखान्यांकडून फ्रेंचायझी घेऊन नवे कारखाने उभे करावे  लागतील. मोठ्या प्रमाणात लस निर्माण करुन लोकांचे लसीकरण करणे. पुढच्या काही दिवसांमध्ये तसेच महिन्यांमध्ये लोकांचे लसीकरण करणे हाच एक मार्ग आहे.

    लोकांची लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. लस उपलब्ध होत नाहीये म्हणून आपल्याला 18 ते 44 वर्षे वय असलेल्या लोकांचे आपल्याला लसीकरण करता येत नाहीये. सध्या लसीकरण केंद्रावर  मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे आपल्याला नाईलाजाने लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 13 May 2021 03:21 PM (IST)

    शहापूरमध्ये 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन, नागरिकांकडून नियमांची पायमल्ली 

    ठाणे : शहापूरमध्ये 1 मे ते 15 मे पर्यंत प्रशासनाने कडक लॉकडाऊन

    मात्र जनतेकडून नियमांची पायमल्ली

    अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल आणि दवाखाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे

    तर दूध डेरी आणि शेतीविषयक  दुकानदारांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

    मात्र या संधीचा फायदा घेत अनेक दुकानदार आपली तिजोरी वाढवण्यासाठी दुकाने खोलून बसतायत

    त्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे

  • 13 May 2021 02:35 PM (IST)

    बुलडाण्यात ओळखीच्या लोकांना लसीकरणाचे टोकन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला नागरिकांचा चोप

    बुलडाणा

    लसीकरणाचे टोकन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला नागरिकांचा चोप

    आपल्या ओळखीच्या लोकांना टोकन वाटप करत असल्याचा कर्मचाऱ्यावर आरोप

    मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात सावळा गोंधळ सुरूच. लसीकरणाच नियोजन कोलमडले

    उपलब्ध 200 लसी आणि जवळपास 2000 नागरिक जमल्याने उपजिल्हा रुग्णालयात मोठा गोंधळ

  • 13 May 2021 01:04 PM (IST)

    सहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर लोणावळा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

    पुणे

    – सहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर लोणावळा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

    – लोणावळा शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरीता ब्रेक द चैन अंतर्गत लोणावळा शहरात मागील सहा दिवस कडक लॉकडाउन पाळण्यात आला होता

    – शासनाच्या आदेशानुसार आज लोणावळा शहरातील अत्यावश्यक सेवेमधील भाजीपाला व किराणा ही दुकाने सकाळी सात ते अकरा दरम्यान उघडण्यात आली होती त्यावेळी मोठी गर्दी उसळली

    – रमजान ईद आणि अक्षय तुतीया च्या पार्श्वभूमीवर साहित्य खरेदी करिता नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली

  • 13 May 2021 12:18 PM (IST)

    लसीकरण केंद्रांवर लावलेल्या याद्या मराठीत लावा, मनसेची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी

    नाशिक – लसीकरण केंद्रांवर लावलेल्या याद्या मराठीत लावा

    मनसेची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी

    अनेकांकडे अँड्रॉइड फोन नाही

    तर अनेकांना इंग्रजी येत नसल्याने करावा लागतोय अडचणींचा सामना

  • 13 May 2021 12:17 PM (IST)

    सोलापुरात भाजपच्या सर्व आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण

    सोलापूर –

    सोलापुरात भाजपच्या सर्व आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण

    रेमडेसीव्हीर, ऑक्सिजन आणि लसींच्या पुरवठ्यात सोलापूरवर अन्याय होत असल्याचा आरोप

    आंदोलनाला 8 आमदार, 1 खासदार सध्या उपस्थित

  • 13 May 2021 12:15 PM (IST)

    मुंबईत कोरोनामुळे गेल्या 48 तासांत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    कोरोनामुळे आणखी 2 पोलिसांच मृत्यू

    मुंबईत कोरोनामुळे मागील 48 तासात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    कांस्टेबल कुंदन घाडगे ( लोकल आर्म्स ) तर कांस्टेबल शिवाजी देसाई ( स्पेशल ब्रांच ) ह्या दोघांच कोरोनामुळे मृत्यु

    कोरोनामुळे आतापर्यंत 115 मुम्बई पोलिस कर्मचारयांचा मृत्यू झाला आहे

    मुंबईत कोरोनामुळे एकूण 8759 पोलिस कर्मचारी संक्रमित झाले

    सध्या ऐक्टिव केसेस 331

  • 13 May 2021 11:22 AM (IST)

    DCGI कडून 2 ते 18 वयोगटातील व्यक्तीसाठी कोव्हॅक्सिनच्या चाचणीला परवानगी

    DCGI कडून 2 ते 18 वयोगटातील व्यक्तीसाठी कोव्हॅक्सिनच्या चाचणीला परवानगी

    दुसरी आणि तिसऱ्या चाचणीला दिली परवानगी

    525 स्वयंसेवकावर होणार चाचणी…

  • 13 May 2021 10:39 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात घटलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढली

    पुणे –

    जिल्ह्यात घटलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढली,

    काल दिवसभरात झाली 9 हजार 766 नवीन कोरोनाबाधितांची वाढ,

    131जणांचा दिवसभरात कोरोनानं झाला मृत्यू

    एकुण रुग्णसंख्या पोहोचलीये 9 लाख 43 हजार 282 वरती,

    दिवसभरात 11 हजार 592 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज,

    प्रशासन जरी रुग्णसंख्या कमी झाली असं सांगत असलं तरीसुद्धा रुग्णसंख्येत मोठी वाढ,

    पुण्यातला संसर्ग खरंच कमी झालाय का ? यावरती मात्र प्रश्नचिन्ह,

    जिल्ह्यात अँन्टीजन चाचण्या होत नसल्यानं रुग्णसंख्या घटल्याचा संशय….

  • 13 May 2021 09:49 AM (IST)

    बार्शीत बनावट रेमडोसीव्हीरचा  काळाबाजार

    सोलापूर – बार्शीत बनावट रेमडोसीव्हीरचा  काळाबाजार

    चार जणांवर गुन्हा दाखल त्यातील दोन जण पोलिसांच्या ताब्यात

    गरजेपोटी जादा पैसे मोजून घेतलेले इंजेक्शन बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी केली तक्रार

    दोन इंजेक्शन साठी घेतले होते 50 हजार रुपये

    अमित सुभाष वायचळ, विकास काशिनाथ जाधवर, निखील सगरे, भैय्या इंगळे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे

    तर राजकुमार सगरे आणि भैय्या इंगळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

    बार्शीतील महेश पवार यांना कोरूना बाधित नातेवाईकांसाठी हवे होते रेमडिसिव्हर

    इंजेक्शन मिळवून  देणारया  सगरे  याच्याकडे चौकशी केली असता मित्राकडे उपलब्ध असल्याची दिली होती माहिती

    दोन इंजेक्शन साठी पवार यांच्याकडे केली 50 हजार रुपयांची मागणी

    गरज असल्याने महेश पवार यांनी केले रेमडिसिव्हर खरेदी

    इंजेक्शनबाबत शंका आल्याने त्यांनी त्यावरील टोल फ्री नंबर वर फोन केला असता तो क्रमांक बनावट असल्याचे आले लक्षात

    आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधितांना परत घेण्यास सांगितल्यावर त्यांनी दिला स्पष्ट नकार

    बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 13 May 2021 09:48 AM (IST)

    शात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार

    दिल्ली –

    देशात 24 तासात नवे रूग्ण – 3,62,727

    देशात 24 तासात मृत्यू – 4,120

    देशात 24 तासात डीस्चार्ज – 3,52,181

    एकूण रूग्ण – 2,37,03,665

    एकूण मृत्यू – 2,58,317

    एकूण डीस्चार्ज – 1,97,34,823

    एकूण एक्टीव्ह रूग्ण – 37,10,525

    आत्तापर्यंत लसीकरण झालेली संख्या -17,72,14,256

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

  • 13 May 2021 09:44 AM (IST)

    कोवॅक्सिन लस नसल्याने कमला नेहरु रुग्णालयात गोंधळ

    पुणे

    कोवॅक्सिन लस नसल्याने कमला नेहरु रुग्णालयात गोंधळ

    रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी, सोशल डिस्टटिंगचा फज्जा

  • 13 May 2021 09:43 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कोरोनाबाधित रुग्णांसाठी खरेदी करणार 10 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन

    पिंपरी-चिंचवड

    – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कोरोनाबाधित रुग्णांसाठी खरेदी करणार 10 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन

    – या इंजेक्शनसाठी तीन कोटी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित

    -महापालिकेची विविध रुग्णालये व जम्बो सेंटरमधील रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिले जाणार

    -महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत झाला निर्णय

  • 13 May 2021 09:42 AM (IST)

    रेमडेसिव्हीर इंजेक्शनची चोरी झालीच नाही, सांगली सिव्हिल प्रशासनाचा पोलिसांना अवहाल

    सांगली –

    रेमडेसिव्हीर इंजेक्शनची चोरी झालीच नाही

    सिव्हिल प्रशासनाचा पोलिसांना अवहाल

    मात्र पोलीस म्हणतात आवहाल त्रोटक आहे

    सिव्हील प्रशासनाने पाठवलेल्या आवहालत म्हंटले आहे की सर्व इंजेक्शन वापरली आहेत

    त्यामुळे चोरी झाली च नाही

    18 एप्रिल ला मिरज सिव्हिल ला रेमडेसिव्हर इंजेक्शन ची चोरी उगड झाली होती

    पोलिसांनी या प्रकरणात 2 जणांना अटक केली होती

    सद्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत

  • 13 May 2021 09:38 AM (IST)

    मुंबईच्या राजावाडी हाॅस्पिटलमध्ये आज पाहाटे 5 वाजेपासून लशीसाठी नागरीकांची रांग

    मुंबईच्या राजावाडी हाॅस्पिटलमध्ये आज पाहाटे 5 वाजेपासून लशीसाठी नागरीकांची रांग

    दुसऱ्या डोजसाठी नागरीकांची प्रचंड गर्दी, मनपाकडून वॅक्सिनेशनच्या सूचना जारी

    12 वाजेनंतर 45 वर्ष अधिक लोकांना कोव्हिशिल्ड लस दिली जाणार

    कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोज मिळणार नाही

    दुसऱ्या लसीचा ड्यू झालेल्यांची संख्या जास्त

    ते बाद होण्याची दाट शक्यता

  • 13 May 2021 09:35 AM (IST)

    सातारा जिल्हयात विनाकारण बाहेर फिरणारया व्यक्तीला होणार 500 रुपयाचा दंड

    सातारा जिल्हयात विनाकारण बाहेर फिरणारया व्यक्तीला होणार 500 रुपयाचा दंड…

    जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढला आदेश…

    पोलीस विभाग,ग्रामपंचायत,नगरपालिका, नगरपंचायत यांना कारवाईचे दिले आदेश

  • 13 May 2021 09:34 AM (IST)

    कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारचा सर्व खर्च कडेगाव नगरपंचायत करणार, कृषीराज्य मंत्री विश्वजित कदम याच्या आदेशानंतर नगरपंचायतला आली जाग

    सांगली-

    कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारचा सर्व खर्च कडेगाव नगरपंचायत करणार

    कृषीराज्य मंत्री विश्वजित कदम याच्या आदेशानंतर नगरपंचायतला आली जाग

    आढावा बैठक मध्ये कोरोना मृत्यू च्या अंत्यसंस्कार साठी पैशाची मागणी केली जाते अशी तक्रार सर्वांनी केली होती

    याची गंभीर दखल घेत मंत्री विश्वजित कदम यांनी प्रांताधिकारी याना चौकशी करून कडक कारवाई च्या दिल्या होत्या सूचना

    आता नगरपंचायत कोरोना मृत्यू चा सर्व अंत्यसंस्कारचा खर्च करणार असा फलक च आला लावण्यात

  • 13 May 2021 09:33 AM (IST)

    कोल्हापुरात मोफत श्रीखंडासाठी शेकडोची रांग

    कोल्हापूर

    मोफत श्रीखंडासाठी शेकडोची रांग

    वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी सुरू आहे वाटप

    कोल्हापूरच्या दाभोलकर कॉर्नर जवळील दूध विक्री केंद्रात गर्दी

    कोरोनाचे आकडे वाढत असताना ही अक्षम्य चूक

    कोणतीही परवानगी घेतली नसतानाही सुरू आहे वाटप

  • 13 May 2021 09:31 AM (IST)

    सातारा जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी आणि लसीकरण वेगवेगळे सुरु करा

    सातारा जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी आणि लसीकरण वेगवेगळे सुरु करा

    लस घेतल्यानंतर आठवडा भरात होतीये जेष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण….

    कोरेगाव विधानसभेचे आ.महेश शिंदे यांची जिल्हाधिकारयांकडे निवेदना द्वारे मागणी

  • 13 May 2021 08:38 AM (IST)

    अचानक करोना मृत्यू का वाढू लागलल्याचा पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने यामागचे कारण शोधले आहे

    कोल्हापूर –

    अचानक करोना मृत्यू का वाढू लागलल्याचा पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने यामागचे कारण शोधले आहे

    उपचार प्रणालीतील त्रुटीमुळे करोना बाधितांच्या मृत्यूदरात

    वाढ झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष टास्क फोर्सने काढला

    करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी

    टास्क फोर्स बारीकसारीक तपशील गोळा करत असून

    टास्क फोर्स सदस्यांनी कोल्हापुरातील छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय (सीपीआर) व इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाची पाहणी केली

    डॉ. सुभाष साळुंके यांच्या नेतृत्वाखाली समितीने बुधवारी कोल्हापूरला भेट दिली

    आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करताना विविध रुग्णालयांनाही भेटी दिल्या.

    समिती आपला अहवाल पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना देणार

    पंधरा दिवसांत मृत्यूचा दर ३० ते ४० टक्के कमी कसा करता येईल

    याबाबत समितीन काही सूचना देणार आहे

    यासाठी आवश्यक औषधे व सुविधाही देण्यात येणार

  • 13 May 2021 08:10 AM (IST)

    पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचे पुन्हा होणार स्ट्रक्चरल ऑडिट

    पुणे –

    – जम्बो कोविड सेंटरचे पुन्हा होणार स्ट्रक्चरल ऑडिट,

    – शहरातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्यानंतर २२ मार्च रोजी जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले,

    – मात्र त्यापूर्वी जम्बोच्या सांगाड्याचे दिल्ली आयआयटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले होते,

    – त्यांनी तीन महिन्यांची मुदत दिलेली होती. ही मुदत जून महिन्यात संपते आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुन्हा एकदा जम्बोचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार,

    – शहरातील रुग्ण कमी झाल्याने १५ जानेवारी रोजी जम्बो बंद करण्यात आले होते,

    – दिल्ली आयआयटीने सांगाड्याचे सुस्थितीविषयक प्रमाणपत्र दिल्यानंतर २२ मार्चपासून प्रत्यक्ष रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली,

    – जम्बो रुग्णालयाची क्षमता ७०० खाटांपर्यंत वाढविण्यात आली आहे,

    – खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा हे ऑडिट केले जाणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला।हे काम सोपविले जाण्याची शक्यता आहे.

  • 13 May 2021 08:09 AM (IST)

    जालना जिल्ह्यातील 38 खाजगी रुग्णालय आणि डेडीकेटेड कोव्हिड सेंटरवर आता तपासणी पथकाची नजर

    जालना जिल्ह्यातील 38 खाजगी रुग्णालय आणि डेडीकेटेड कोव्हिड सेंटरवर आता तपासणी पथकाची नजर- जलना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश

    प्रत्येक रुग्णालयासाठी 4 जणांचे तपासणी पथक असणार आहे या पाठकासाठी या 38 रुग्णालयात बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे जलना जिल्हाधिकारी यांचे आदेश

    साथरोग कोव्हीड 19 प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा लाभ मिळतोय का नाही यावर हे पथक लक्ष ठेवणार आहे.

    रुग्णालयातील रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्या नंतर त्यांना आकारले बिलही हे अगोदर हे पथकाकडून तपासले जाईल आणि नंतरच रुग्णाकडून हॉस्पिटला बिल घेता येणार आहे.

  • 13 May 2021 08:06 AM (IST)

    नाशिक शहरातील जेष्ठांसाठी आज 30 केंद्रांवर मिळणार डोस

    नाशिक – शहरातील जेष्ठांसाठी आज 30 केंद्रांवर मिळणार डोस

    कोव्हीशिल्ड चे मिळणार 10 हजार डोस

    लसीकरणासाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी

    नागरिकांना नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

  • 13 May 2021 08:06 AM (IST)

    नाशिक पोलिसांनी खाक्या दाखवताच शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

    नाशिक – पोलिसांनी खाक्या दाखवताच शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

    दुपारनंतर शहरात कडक लोकडाऊन सुरू

    विना कारण फिरणार्याना पोलिसांचा चोप

    मेडिकल आणि वैद्यकीय सेवा शिवाय संपूर्ण शहर बंद

  • 13 May 2021 08:05 AM (IST)

    पुण्यात लवकरच कोव्हेक्सीनच्या मशिनरीची ड्राय – रन सुरु होणार

    पुणे –

    – पुण्यात लवकरच कोव्हेक्सीनच्या मशिनरीची ड्राय – रन सुरु होणार,

    – न्यायालयाच्या आदेशानुसार भारत बायोटेकला पुण्यातील मांजरी येथील जमीन कोवॅक्सिन तयार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलीय,

    – कंपनी एकदोन दिवसांत गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या मशिनरीची ड्राय-रन घेणार आहे,

    – कंपनीला आवश्यक असलेले रस्ते, लाईट आणि पाणी या मदतीसह अन्य सर्व सहकार्य जिल्हा प्रशासन तातडीने करणार,

    – त्यानंतर आठ दहा दिवसांत प्रत्यक्षात कोवॅक्सिन बनवण्यासाठी आवश्यक असलेला टाईमलाईन कार्यक्रम निश्चित करण्यात येईल,

    – जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची माहिती.

  • 13 May 2021 08:00 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोनाच्या रेकॉर्ड ब्रेक चाचण्या, एका वर्षात तब्बल 10 लाख 18 हजार कोरोना चाचण्या

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत कोरोनाच्या रेकॉर्ड ब्रेक चाचण्या

    एका वर्षात तब्बल 10 लाख 18 हजार कोरोना चाचण्या

    रुग्णालये, शासकीय कार्यालये, सिटी एन्ट्री पॉईंट, सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी केल्या चाचण्या

    दहा लाख चाचण्यात आतापर्यंत 1 लाख 34 हजार 484 जण आढळले पॉझिटिव्ह

    कोरोना टेस्टिंग मुळे औरंगाबाद शहरातील कोरोना नियंत्रणात

    जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

    अजूनही दिवसाकाठी तब्बल 4 हजार कोरोना चाचण्या सुरू

    कोरोना चाचण्यात औरंगाबाद जिल्हा देशात ठरला अव्वल

  • 13 May 2021 07:36 AM (IST)

    औरंगाबादेत लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकेची आत्महत्या

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकेची आत्महत्या

    औरंगाबाद शहरातील भोईवाडा परिसरातली घटना

    विलास उत्तमराव ठाकरे असं सलून व्यवसायिकचे नाव

    लॉक डाऊन मुळे सापडले होते आर्थिक अडचणीत

    आर्थिक अडचणीमुळे उचललं आत्महत्येचं टोकाचं पाऊल

  • 13 May 2021 07:34 AM (IST)

    नागपुरात दुकानाचं शटर बंद करुन बेकायदा व्यवसाय सुरु

    – नागपुरात दुकानाचं शटर बंद करुन बेकायदा व्यवसाय सुरु

    – छोट्याशा दुकानात ८ ते १० ग्राहकांना कोंबून बाहेरून शटर बंद करण्याचा धक्कादायक प्रकार

    – दुकानाच्या आत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    – शटर बंद, व्यवसाय सुरु… यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका

    – नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने एका दिवशी ३४ दुकानांवर कारवाई

    – कारवाईत मनपाने वसूल केला रु. २,६८,००० चा दंड

  • 13 May 2021 07:18 AM (IST)

    नागपूर जिल्हयात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल स्थापन

    – नागपूर जिल्हयात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल

    – चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन

    – बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी कृती दल स्थापन

    – कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी कृती दल घेणार

    – नागपुरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची माहिती

    – अनाथ मुलं तस्करीसारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता

    – महिला व बाल विकास विभागाच्या 0712-256991 यावर संपर्क साधाण्याचं आवाहन

  • 13 May 2021 07:16 AM (IST)

    अकोला जिल्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवर सकाळी 5 वाजेपासून नागरिकांनी लावल्या लांबच लांब रांगा

    अकोला –

    अकोला जिल्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवर सकाळी 5 वाजेपासून नागरिकांनी लावल्या लांबच लांब रांगा

    सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

  • 13 May 2021 07:15 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सुधारतेय, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 2532 नवे रुग्ण

    – नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सुधारतेय

    – गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 2532 नवे रुग्ण, 5708 जण कोरोनामुक्त

    – जिल्ह्यात कोरोना मृत्यूची संख्या 65 च्या वर असल्याने चिंता कायम

    – नागपूर ग्रामीणमध्ये चिंता कायम, शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त पॅाझीटीव्ह

    – रुग्णालयात भरती रुग्णांची संख्या आली 10 हजारांच्या खाली

    – जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 43353 वर

  • 13 May 2021 07:14 AM (IST)

    अकोल्यात गेल्या 24 तासांत 674 रुग्ण पॉझिटिव्ह

    अकोला –

    अकोल्यात गेल्या 24 तासांत 674 रुग्ण पॉझिटिव्ह

    तर दिवसभात 10 जणांचा मृत्यू झाला आहे

    तर आतापर्यंत कोरोनामुळे 837 जणांचा मृत्यू झाला आहे

    तर आतापर्यंत 47797 जण कोरोना पॉझिटिव्ह आले

    40148 जणांनी कोरोनावर मात किली आहे

    तर सध्या 6812 रुग्ण उपचार घेत आहेत

  • 13 May 2021 07:12 AM (IST)

    नागपुरात लसीच्या दुसऱ्या डोससाठी नागरीकांची भटकंती

    नागपूर –

    – नागपुरात लसीच्या दुसऱ्या डोससाठी नागरीकांची भटकंती

    – नागपुरात ३ लाख ३१ हजार नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतिक्षा

    – जिल्हयात अनेक कोरोना योद्धेत दुसऱ्या डोसपासून वंचीत

    – लसीचा पुरवठा कमी झाल्याने अनेक नागरिकांना मिळाला नाही दुसरा डोस

    – पहिल्या डोसला दोन महिने झाले, लसीचा दुसरा डोस मिळेना

    – वेळ निघून जात असल्याने नागरीकांमध्ये संताप

  • 13 May 2021 06:41 AM (IST)

    मुक्ताईनगर ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर लस मिळवण्यासाठी नागरिकांच्या रात्रीच्या 3 वाजेपासून रांगा

    मुक्ताईनगर –

    ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर लस मिळवण्यासाठी नागरिकांच्या रात्रीच्या 3 वाजता पासून रांगा

    मुक्ताईनगर तालुक्यातील लसीकरण केंद्रावर उचंदा, अंतुर्ली केंद्रांवर लावतायत नागरिक नंबर

    लसीचा साठा मात्र तुरळक स्वरूपात येत असल्यामुळे अनेक नागरिकांना परत जावे लागते

  • 13 May 2021 06:40 AM (IST)

    सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासांत 827 नवे कोरोनाबाधित

    सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 827 जण कोरोनामुक्त

    तर जिल्हयात 2001 जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह

    जिल्हयात गेल्या 24 तासांत 51 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात सध्या 24,100 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    सातारा जिल्ह्यात एकूण 3031 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,01991 रुग्ण कोरोनामुक्त

  • 13 May 2021 06:39 AM (IST)

    मीरा भाईंदर मनपामध्ये एकाच दिवशी 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    मीरा भाईंदर :

    मीरा भाईंदर मनपा अंतर्गत एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू

    आतापर्यंत एकूण  1154 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    गेल्या 24 तासांत 228 नवे रुग्ण आढळून आले

    दिवसभरात 209 रुग्ण कोरोनामुक्त

    मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत 46 हजार 518 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

    आतापर्यंत 43 हजार 320 जण कोरोनामुक्त

  • 13 May 2021 06:36 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 46,781 नवे कोरोनाबाधित, तर 58,805 रुग्णांना डिस्चार्ज

    राज्यात गेल्या 24 तासांत 46781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली

    गेल्या 24 तासांत 58805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत

    एकूण 4600196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत

    राज्यात एकूण 546129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत

    राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे

    अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

Published On - May 13,2021 9:45 PM

Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.