Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात संचारबंदीला सुरुवात, शिर्डीत पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त

| Updated on: Apr 14, 2021 | 11:28 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात संचारबंदीला सुरुवात, शिर्डीत पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Apr 2021 11:20 PM (IST)

    शिर्डीत पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त 

    शिर्डी :

    पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी वाहनधारकांना थांबवून पोलिसांकडून विचारपूस विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना सूचना नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस गस्त. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर विनाकारण फिरू नका, पोलिसांकडून आवाहन

  • 14 Apr 2021 11:18 PM (IST)

    नाशिक : निफाड तालुक्यात तब्बल 357 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    निफाड कोरोना अपडेट :

    – नविन कोरोना बाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 357

    – आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू –  280

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण –  10058

    आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 7317

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2461

  • 14 Apr 2021 11:16 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 613 नवे रुग्ण

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 613 रुग्ण व 14 मृत्यू तर 383 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 388, तुळजापूर 33,उमरगा 30, लोहारा 31, कळंब 45, वाशी 29, भूम 30 व परंडा 27 रुग्ण

    24 मार्च – 176 25 मार्च – 174 26 मार्च – 155 27 मार्च – 224 28 मार्च – 184 29 मार्च – 239 30 मार्च – 242 31 मार्च – 253 01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5156 अॅक्टिव्ह रुग्ण

    उस्मानाबाद – 1 लाख 79 हजार 586 नमुने तपासले त्यापैकी 27 हजार 080 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 20.62 टक्के

    21 हजार 267 रुग्ण बरे 79.94 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 657 तर 2.43 टक्के मृत्यू दर

  • 14 Apr 2021 11:13 PM (IST)

    शहापूर तालुक्यात दिवसभरात तब्बल 101 रुग्ण

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विकेंड लॉकडाऊन नंतर शहापूर मध्ये कोरोना रुग्ण संख्येत आज मात्र सेंच्युरीच गाठली आहे लॉक डाऊन काळात शहापूर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत आज सर्वात जास्त वाढ झाली आहे.

    शहापूर तालुक्यात आज एकूण 101 रुग्ण हे कोरोना बाधित असून 431 रुग्णांच्यावर उपचार सुरू आहेत.

    तर अॅक्टिव्ह रुग्ण संख्येत सुद्धा कमालीची वाढ झाली असून 531 रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत.

    आतापर्यंत 133 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे

    आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही 4650 वर पोहचली आहे

    आतापर्यंत 3986 रुग्ण हे बरे होऊन घरी सुखरूप परतलेले आहेत.

    आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संखेमध्ये शहापूर नगर पंचायत हद्दीमधील 10 रुग्ण असून शहापूर ग्रामीण भागांमधील 91 रुग्ण आहेत. तर दोन्ही मिळून एकूण 87 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत

  • 14 Apr 2021 10:16 PM (IST)

    जिल्ह्यात आज दिवसभरात 762 कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 762 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 10 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1872 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 4869 वर

    तर उपचार घेणारे 314 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 50758 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 57499 वर

  • 14 Apr 2021 10:16 PM (IST)

    ठाण्यात दिवसभरात 1677 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट :

    # आज 1,677 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,00,341 इतकी आहे # आज 1,519 रुग्ण कोरोनातून झाले बरे # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 82,147 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 82% इतकं आहे ) # 16,727 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत # आज 6 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,467 जणांचा मृत्यू झाला # मागील 24 तासात एकूण 9,980 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 1,677 ( 11.11% ) कोरोना बाधित झाले आहेत

  • 14 Apr 2021 10:15 PM (IST)

    मालेगावमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, रात्री एक वाजेपर्यंत पुरेल एवढाच साठा शिल्लक

    मालेगावमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा 

    * रात्री १ वाजेपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक

    * लिक्विड ऑक्सिजन कमरतेमुळे येतेय अडचण ..

    * खासगी रुग्णालयात तुडवडा ..

    * रुग्ण व नातेवाईकांचा जीव टांगणीला ..

    * रात्रीतून पुरवठा न झाल्यास परिस्थिती होणार गंभीर ..

  • 14 Apr 2021 09:40 PM (IST)

    चंद्रपुरात रस्ते निर्मनुष्य

    चंद्रपूर : राज्यभरात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुरू झाली पंधरा दिवसांची लॉकडाउन नियमावली, चंद्रपूर शहरातही प्रशासन आणि पोलीस सज्ज, रात्री 8 नंतर शहरातील रस्ते झाले निर्मनुष्य, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पोलीस वाहने संचारबंदीबाबत देताहेत माहिती, शहरातील शासकीय- खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने नागरिकांनी घरीच सुरक्षित राहण्याचे केले जात आज आवाहन,  वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थिती व्यतिरिक्त पुढील पंधरा दिवस बाहेर निघू नये प्रशासनाने केले आवाहन

  • 14 Apr 2021 08:54 PM (IST)

    महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 58 हजार 952 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    महाराष्ट्रात 58 हजार 952 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू, राज्यात 39 हजार 624 रुग्णांना डिस्चार्ज, पण बाधितांचा आकडा ही चिंतेची बाब

  • 14 Apr 2021 08:42 PM (IST)

    संचारबंदीत ठाण्यात विनाकारण वाहनधारक रस्त्यावर

    कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकाने 15 दिवस 144 कलम म्हणजेच संचार बंदी लागू करून देखील रस्त्यावर विनाकारण वाहनधारक रस्त्यावर दिसत आहे. सरकारच्या नियमावली चे कुठेही पालन करताना नागरिक दिसत नाही अत्यावश्यक सेवा वगळता अनेक वाहने रस्त्यावर दिसत आहे दुचाकी ,चारचाकी असो या इतर वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे कोणाला कुठलाही भान नाही पोलिस हे बेरेटिंग करून अनेकांची विचारपूस करत आहे ..अडवायचे तरी कोणाला असा प्रश्न पोलिसांना पडला आहे..मात्र अनेक कारणे देऊन वाहन धारक निघत आहे ..गेल्या 24 तासाचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी..

  • 14 Apr 2021 08:41 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात दिवसभरात 976 रुग्ण, तर 25 जणांचा मृत्यू

    सोलापूर  :

    सोलापूरात आज 976 जणांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह

    तर 25 जणांचा कोरोनाने मृत्यू

    शहरातील 348 जणांचा तर ग्रामीण भागातील 669 जणांचा अहवाल पॉजिटीव्ह

    मृतात ग्रामीण भागातील 17 तर शहारातील 8 जणांचा समावेश

    शहर जिल्ह्यातील 9776 सक्रिय रुग्णांवर विविध हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू

  • 14 Apr 2021 08:39 PM (IST)

    जळगावात दिवसभरात 984 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    जळगाव कोरोना अपडेट :

    कोरोना रुग्ण -984 कोरोनामुक्त -1195 सध्या रुग्ण–11589 मृत्यू – 21

    आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -105136 कोरोनामुक्त -91699 मृत्यू -1848

  • 14 Apr 2021 08:37 PM (IST)

    वर्ध्यात दिवसभरात कोरोनाचे 3471 नवे कोरोनाबाधित, 13 रुग्णांचा मृत्यू

    वर्धा कोरोना अपडेट :

    – जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांचा उच्चांक

    – जिल्ह्यात आज आढळले तब्बल 754 रुग्ण

    – मृत्यूदरातही वाढ , आज तब्बल १३ रुग्णांचा मृत्यू

    – जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली 3471 वर

    – जिल्ह्यात आतापर्यंत 24228 रुग्णांची नोंद तर 20242 रुग्ण कोरोनामुक्त

    – जिल्ह्यात एकूण 515 रुग्णांचा मृत्यू

  • 14 Apr 2021 08:07 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी, खासदार भावना गवळी यांची मागणी

    वाशिम : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून मुख्यमंत्री यांनी लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी अस आवाहन पंतप्रधान यांना केलं होत..आज शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद मोदी व रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांना पत्राद्वारे ऑक्सिजन अभावी राज्याची परिस्थिती गंभीर झाली असून राज्याची खासदार म्हणून आपल्याकडे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी देण्यात यावी अशी पत्राद्वारे करण्यात आली आहे…

  • 14 Apr 2021 08:05 PM (IST)

    पुणेकरांसाठी काहीशी दिलासा देणारी बातमी, कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या सर्वाधिक

    पुणेकरांसाठी काहीशी दिलासा देणारी बातमी…

    शहरात आज कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या सर्वाधिक…

    दिवसभरात 4 हजार 208 रुग्ण वाढ तर 4 हजार 800 जण कोरोनामुक्त…

    मात्र दिवसभरात 66 जणांचा कोरोनाने मृत्यू यातील 20 जण हे पुण्याबाहेरील…

    शहरात 1158 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु.

    पुणे शहरात एकूण 3 लाख 44 हजार कोरोनाबधित रुग्ण

  • 14 Apr 2021 08:04 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 666 नवे रुग्ण, 20 जणांना मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 666 आज झालेले मृत्यू – 20 आज बरे झालेले – 312

    तालुकानुसार रुग्णसंख्या :

    गोंदिया—————373 तिरोडा—————92 गोरेगाव—————40 आमगाव————–52 सालेकसा————-12 देवरी——————50 सडक अर्जुनी ———–22 अर्जुनी मोरगाव——–18 इतर राज्य————–03

    एकूण रुग्ण – 22802 एकूण मृत्यू – 265 एकूण बरे झालेले – 16844 एकूण उपचार घेत असलेले – 4888

  • 14 Apr 2021 08:02 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 4206 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 66 रुग्णांचा मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट :  – दिवसभरात ४२०६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४८९५ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील. – ११५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३४४०२९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५३३२६. – एकूण मृत्यू -५९०२. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २८४८०१. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २१३२५.

  • 14 Apr 2021 07:27 PM (IST)

    मुंबईच्या चेंबूर परिसारात वाशीनाका येथे सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा 

    मुंबईच्या चेंबूर परिसारात वाशीनाका येथे सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा

    भारतनगर एमएमआरडीए वसाहतीत हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर

    – लाॅकडाऊनपूर्वीची खरेदी करताना नियमांचा भंग

  • 14 Apr 2021 07:01 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, दिवसभरात 5993 नवे रुग्ण

    नागपुरात आज 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    5993 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    तर 3993 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 297036

    एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 228071

    एकूण मृत्यूसंख्या – 5960

  • 14 Apr 2021 06:46 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 1235 नव्या रुग्णांची नोंद

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात कोरोना बाधितांचा उच्चांक

    दिवसभरात तब्बल 1235 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 13 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 36748

    एकूण कोरोनामुक्त : 28780

    सक्रिय  रुग्ण : 7439

    एकूण मृत्यू : 529

    एकूण नमूने तपासणी : 312440

  • 14 Apr 2021 06:45 PM (IST)

    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

    नांदेड –  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

    पदवी, पदव्यूत्तर, व्यावसायिक अभ्याक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

    12 एप्रिलपासून सुरु झालेल्या आणि 15 एप्रिल पासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

    5 मे नंतर परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार होतील

    मुल्यमापन मंडळाच्या तातडीच्या बैठकीत झाला निर्णय

  • 14 Apr 2021 06:31 PM (IST)

    उत्साह नियम मोडाल तर कारवाई होणार- पोलीस महासंचालक

    मुंबई : लॉकडाऊन संदर्भात पोलीस महासंचालक संजय पांडे पत्रकार परिषदेत बोलत आहेत.  जोपर्यंत नियमांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत लाठीचा वापर होणार नाही. मात्र, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असेल तर बळाचा वापर होईल. होमगार्ड, पोलीस हे मिळून काम करत आहेत. जवळ जवळ 13 हजार होमगार्ड, 22 एसआरपीएफच्या तुकड्या सज्ज आहेत. आम्ही सर्व ग्रामपंचायत, मनपा यांच्याशी संपर्क साधून सध्याच्या संचारबंदीच्या परिस्थितीला हाताळणार आहोत.

    मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी काळजी घ्यावी. सर्वांनी मास्क वापरावे, हात धुवावे. हे नियम पाळले नाही तर आगामी काळात परिस्थिती गंभीर होईल. आपल्यासाठी हे नवे नाही. मात्र, सर्वांनी सहकार्य केले तर आपल्या राज्यात 15 दिवसांच्या आधी कोरोनाग्रस्तांचे आकडे कमी होतील. पोलिसांकडे अधिकार आहेत. पण आम्ही त्याचा वापर कमीत कमी करणार आहोत. मात्र, लोकांनी सहकार्य केलं नाही. अति उत्साहीपणा दाखवला तर आम्हाला कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. सध्या कामवर खूत तणाव आहे. मागील वेळी बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना जवळजवळ 81 टक्के लोकांना लस दिलेली आहे. त्यामुळे आमच्या पोलीस दलातील जवळजवळ सर्व पोलीस कर्तव्य बजावण्यासाठी सक्षम आहोत.

    पोलीस दल म्हणून कोरोना महामारीला थोपवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करु. यामध्ये आम्हाला लोकांच्या मदतीची गरज आहे. सर्व लोकांना नियम आणि अटी माहिती आहेत. मी  पोलिसांकडून कोणालाही त्रास देणार नाही, याची हमी देतो. मात्र, नागरिकांना अशा परिस्थितीत सहकार्य करणे अपेक्षित आहे.

  • 14 Apr 2021 06:29 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये 1517 नवे कोरोना रुग्ण

    पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट

    दिवसभरात नवे कोरोना रुग्ण –

    दिवसभरात कोरोनामुक्त रुग्ण -3352

    दिवसभरात मृत्यू -45

    एकूण कोरोना रुग्ण -1,73319

    एकूण कोरोनामुक्त -1,48628

    एकूण मृत्यू -2249

  • 14 Apr 2021 06:26 PM (IST)

    सोलापूरमध्ये ग्रामीण भागात दिवसभरात 17 जणांचा मृत्यू

    सोलापूर : ग्रामीण भागात दिवसभरात कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू

    मृतात बारा पुरुष तर पाच स्त्रियांचा समावेश

    दिवसभरात 669 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

    6004 सक्रिय रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • 14 Apr 2021 06:03 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर, मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमी अपुरी

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर, मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमी अपुरी

    कोरोनाने मृत्यू झालेल्या 19 जणांवर उस्मानाबादेत अंत्यसंस्कार,

    8 मृतदेह जागा नसल्याने अंत्यसंस्कारसाठी प्रलंबित,

    उरलेल्या 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार होणार,

    आजवर 643 मृत्यू तर सध्या 4 हजार 940 सक्रिय रुग्ण

  • 14 Apr 2021 05:56 PM (IST)

    येवल्यात दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    येवला : येवल्यात दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    दिवसभरात एकूण 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    आतापर्यंत 103 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यात कोरोनबधितांचा आकडा पोहोचला 2774 वर

    आतापर्यंत 2205 जण कोरोनामुक्त

    सध्या 468 जणांवर उपचार सुरु

  • 14 Apr 2021 04:56 PM (IST)

    नागपुरात परप्रांतीय नागरिकांची खासगी बसस्थानकावर गर्दी

    नागपूर  – परप्रांतीय नागरिकांची खासगी बसस्थानकावर गर्दी

    मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमधील नागरिक निघाले आपापल्या राज्यात

    खासगी बसेचे तिकीट मिळविण्यासाठी मोठीगर्दी

    रोजगार बंद झाल्यास काय खाणार, कुठे राहणार, असे प्रश्न उपस्थित झाल्याने परप्रांतीय निघाले आपापल्या गावाला

  • 14 Apr 2021 04:52 PM (IST)

    सोलापुरात 35 हजार 99 जणांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

    सोलापूर- आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 99 जणांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

    त्यातील 20 हजार 300 जणांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

    54 हजार 688 कोमॉरबीड रुग्णांपैकी 996 जणांनीच घेतला दुसरा डोस

  • 14 Apr 2021 04:02 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर, संपूर्ण गोवर्धन गाव कोरोना गॉटस्पॉट

    वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर

    रिसोड तालुक्यातील गोवर्धन इथं आज 123 जण कोरोनाबाधित

    आतापर्यंत एकूण 330  जण कोरोनाबाधित

    सर्व गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

    सर्वांची आरोग्य तपासणी व लसीकरण सुरू

    जिल्ह्यात उकळीपेन -100 ,शेलगाव बोदाडे -100 , चिखली इथं 44 रुग्ण कोरोनाबाधित

  • 14 Apr 2021 04:00 PM (IST)

    धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांचे त्वरित लसीकरण करावे, खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

    मुंबई : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी येथील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

    “गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल,” असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

  • 14 Apr 2021 02:24 PM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्याला 19 हजार कोरोना लसीचा पुरवठा

    रत्नागिरी –

    रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना लसीचा पुरवठा

    १९ हजार कोरोना लसीचे डोस आरोग्य यंत्रणेला मिळाले

    रत्नागिरी शहरातील कोरोनाच्या लसीकरणाला सुरवात

    लाॅक डाऊनच्या आधी लसीकरणासाठी रत्नागिरीकांची आरोग्य केंद्रावर गर्दी

    दोन दोन तास थांबून कोरोनाची लस घेण्यासाठी रत्नागिरीकरांचा रांगा

    शहरी भागानंतर उद्या ११२ हून अधिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला होणार सुरवात

  • 14 Apr 2021 02:22 PM (IST)

    हाॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग, मेडिकल कॉर्डिनेटरला अटक

    हाॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक

    अंधेरीचा एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना

    या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला केली अटक

  • 14 Apr 2021 01:13 PM (IST)

    Yogi Adityanath Corona | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

    उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

  • 14 Apr 2021 01:13 PM (IST)

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह

  • 14 Apr 2021 12:38 PM (IST)

    साताऱ्यात अल्पवयीन तरुणीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

    सातारा

    सातारा शहरातलगत असणाऱ्या यवतेश्वर घाटात अल्पवयीन युवतीची आत्महत्या

    आत्महत्येचे कारण अस्पष्ट

    घटनास्थळी तालुका पोलिसांसह शिवेंद्रराजे ट्रेकर्सची टीम दाखल,

    मुलीचा मृतदेह काढण्याचे काम सुरु

  • 14 Apr 2021 12:37 PM (IST)

    आधार कार्ड पाहून कोरेना रुग्णांवर उपचार करावा, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची मागणी

    – नागपूरात कोरोनाची भयावह स्थिती, रुग्णांना बेड मिळत नाही

    – नागपूरात मध्यप्रदेशातील कोरोना रुग्णांवर उपचार होऊ नये

    – परराज्यातील रुग्णांसाठी महाराष्ट्रातील हॅास्पीटलमधील बेड वापरु नये

    – आधार कार्ड पाहून कोरेना रुग्णांवर उपचार करावा

    – काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची मागणी

    – १४ महिने होऊनंही नागपूरात जंम्बो कोवीड रुग्णालय उभारत नाही

    – मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात जंम्बो कोवीड रुग्णालय उभारलं

    – नागपूरात माणसं नाहीत का? आम्ही महाराष्ट्रातले रहिवाशी नाहीत का?

    – काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा सरकारला सवाल

    – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहे, त्यांनी उपचारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करावा

  • 14 Apr 2021 12:13 PM (IST)

    सोलापूर शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये मोठी गर्दी

    सोलापूर –

    शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये मोठी गर्दी

    भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

    आज रात्री आठ वाजल्यापासून सुरू आहे लॉकडाऊन

  • 14 Apr 2021 11:58 AM (IST)

    कोरोना रुग्णाचा बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर प्रवास, बेडसाठी प्रतीक्षा

    चंद्रपूर –

    कोरोना रुग्णाचा बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर प्रवास

    24 तासांहून अधिक काळ धक्कादायकरित्या केवळ बेडसाठी प्रतीक्षा

    वरोरा येथील नरहरशेट्टीवार परिवाराने व्यक्त केल्या संतप्त भावना

    जिल्ह्यात कोरोना स्फोट झाल्यानंतरदेखील आरोग्य यंत्रणा ढिम्म

    ना खाटा वाढल्या- ना ऑक्सिजन-ना व्हेंटिलेटर

    एकतर बेड आणि सुविधा द्या नाहीतर इंजेक्शन देऊन जीव घ्या, अशी काळीज फोडणारी भाषा,

    अजूनही शासकीय वैद्यकीय महा. रुग्णालयापुढे रुग्णवाहिकेत आहे वृद्ध रुग्ण

  • 14 Apr 2021 11:56 AM (IST)

    पॅकेजमध्ये समावेश नसल्याने कोल्हापुरातील नाभिक समाज संतप्त

    कोल्हापूर

    पॅकेजमध्ये समावेश नसल्याने नाभिक समाज संतप्त

    येत्या दोन दिवसात सलून व्यवसाईकांसाठी पॅकेज जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरून

    कोल्हापुरातील सलून व्यवसायिकांचा इशारा

    सर्वात आधी मागणी करू नये पॅकेज मिळाले नसल्याबद्दल व्यावसायिकांनी केला सरकार चा निषेध

  • 14 Apr 2021 11:43 AM (IST)

    अकोला शहरातल्या अशोक वाटिकेत शुकशुकाट

    अकोल्यात दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस अशोक वाटिका याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो

    मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात  येत आहे

    अशोक वाटिका आज बंद ठेवण्यात आली आहे

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बाहेरूनच अभिवादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे

    आज अशोक वाटिका मध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.गणेश सोनोने,अकोला

  • 14 Apr 2021 10:46 AM (IST)

    पुण्यात आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली

    पुणे –

    – मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला राज्यमंत्र्यांनीच फासला हरताळ,

    – आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली नियमांची पायमल्ली,

    – चार लोकांना प्रवेश असतांनाही एकाच ठिकाणी केली गर्दी

    – राज्यमंत्र्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळही उपस्थित

    – पोलिसांचा आदेश झुगारून कार्यकर्त्यांनी केला प्रवेश

    – मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना केली होतं घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन,

    – या आवाहनाला राज्यमंत्र्यांची दाखवली केराची टोपली

  • 14 Apr 2021 10:44 AM (IST)

    धारावीतील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला त्वरित सुरुवात करा, खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे मागणी

    आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला त्वरित सुरुवात करावी, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.

  • 14 Apr 2021 10:17 AM (IST)

    पुणे स्टेशन परिसरात डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांची गर्दी

    पुणे –

    – पुणे स्टेशन परिसरात डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांची गर्दी,

    – स्टेशन परिसरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी,

    – स्टेशन परिसरात पुणे पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त,

    – जागोजागी बॅरीकेटिंग करून नागरिकांना प्रवेश दिला जातोय,

    – फक्त चार नागरिकांना अभिवादनासाठी प्रवेशन देण्याच्या पोलिसांच्या सूचना

  • 14 Apr 2021 09:55 AM (IST)

    सोलापुरात 781 रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध

    सोलापूर –

    सोलापुरात 781 रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध

    शहरासाठी 341 तर ग्रामीण भागासाठी 440 इंजेक्शनचा समावेश

    कोव्हीड रुग्णालयात आता खाटांच्या दहा टक्के रेमडीसिव्हरचा पुरवठा करण्याचा निर्णय

    तर शहरातील पाच रुग्णालयात 30 जनरल 32 ऑक्सिजनचे बेड वाढवले

  • 14 Apr 2021 09:49 AM (IST)

    नवी मुंबईतील डीवायपाटील हॉस्पिटलमधील कोव्हिड रुग्ण महिलांचे हाल

    नवी मुंबई –

    डीवायपाटील हॉस्पिटलमधील कोव्हिड रुग्ण महिलांचे हाल

    हॉस्पिटल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा महिलांचा आरोप

    40 महिला रुग्णांसाठी असलेल्या वॉर्ड मध्ये एकच नर्स

    2 दिवस झाले मेडिसिन, इंजेक्शन, सलाईन नसल्याचे व्हिडियोत आरोप

    वयोवृद्ध कोविड रुग्णांकडे स्टाफ करतय कानाडोळा

    व्हिडियोच्या माध्यमातून मदत करण्याची केली विनंती

    वॉर्ड मध्ये पिण्याच्या पाण्याचा अभाव

    पाण्यासाठी दिवसभर ओरडावे लागते

    मागितल्याशिवाय पाणी मिळतच नाही

    महिलां रुग्णांनी डी वाय पाटील हॉस्पिटलचा केला पर्दाफाश

  • 14 Apr 2021 09:30 AM (IST)

    कोल्हापूर गोकुळ दूध संघाचे आठ ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह

    कोल्हापूर :

    गोकुळ दूध संघाचे आठ ठरावधारक पॉझिटिव्ह

    गेल्या आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर आले पॉझीटीव्ह

    निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतला होता मेळावा

    मेळावा आयोजित करणारा नेताही पॉझीटीव्ह

    कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

    2 मे ला होणार आहे गोकुळ दूध संघासाठी मतदान

  • 14 Apr 2021 09:06 AM (IST)

    निफाडमध्ये 149 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

    निफाड तालुका कोरोना अपडेट

    नविन कोरोनाबाधित अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण – 149

    आता पर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 271

    निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण – 9701

    आजपर्यंत एकूण डिस्चार्ज – 7134

    सद्यस्थितीत उपचाराखालील रुग्ण – 2296

  • 14 Apr 2021 09:05 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात रेमेडेसिव्हीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

    कोल्हापूर

    जिल्ह्यात रेमेडेसिव्हीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

    कोविड रुग्णालय आणि केअर सेंटरना आता नियंत्रण कक्षाकडून मिळणार रेमडिसिव्हीर

    इंजेक्शन ची वाढती मागणी पाहता साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न

    अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी असणार नियंत्रण कक्षाचे प्रमुख

  • 14 Apr 2021 08:33 AM (IST)

    पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 12 हजार 797 रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा

    पुणे –

    – पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 12 हजार 797 रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा

    – सोमवारी शहर आणि जिल्ह्यात सहा हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा,

    – तर मंगळवारी दिवसभरात ३७९७ इंजेक्शनचे वाटप नियंत्रण कक्ष मार्फत केले,

    – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला अतिरिक्त ३००० इंजेक्शन्स दिले आहेत,

    – एकूण १२७९७ इंजेक्शन रुग्णालयांना वितरित करण्यात आलीत,

    – इंजेक्शनचा तुटवडा आणि औषध विक्रेत्यांकडून होणारा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय.

  • 14 Apr 2021 08:32 AM (IST)

    मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये लाॅकडाऊन लागल्यानंतर ग्राहकांची तोबा गर्दी

    मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये लाॅकडाऊन लागल्यानंतर ग्राहकांची तोबा गर्दी

    पाय ठेवायलाही जागा नाही

    भाजी खरेदीसाठी तुफान गर्दी

    सोशल डिस्टेंसिंगचा ऊडाला फज्जा

    करोना रुग्णांचा आकडा ८ हजारांच्या घरात पोहोचला असताना करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लादले

    मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अशा करोना नियमांचं पालन करणं बंधनकारक

    मात्र दादर भाजीमार्केटमध्ये करोनाच्या नियमांचा नागरीकांना विसर पडलाय

  • 14 Apr 2021 08:30 AM (IST)

    कोरोना रुग्णांची संख्या दापोली तालुक्यामध्ये कमालीची वाढत आहे

    रत्नागिरी –

    कोरोना रुग्णांची संख्या दापोली तालुक्यामध्ये कमालीची वाढत आहे

    गेल्या १३ दिवसांमध्ये २०१ रूग्ण एकट्या दापोली तालुक्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत.

    तर दापोलीमध्ये गेल्या ३० तासांमध्ये ६ रूग्ण दगावले आहेत.

    त्यातच रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंताजन परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • 14 Apr 2021 08:30 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली एक लाखाच्या घरात

    – पुणे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली एक लाखाच्या घरात,

    – सध्या जिल्ह्यात एकूण ९९ हजार ९७६ सक्रिय रुग्ण आहेत.

    – एकूण रुग्णांपैकी २२ हजार ८२६ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत,

    – जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १० हजार ११२ नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत,

    – एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ५७३ जण आहेत,

    – पिंपरी चिंचवडमधील २ हजार ८१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७६५ , महागरपालिका हद्दीतील ६२३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • 14 Apr 2021 07:57 AM (IST)

    नाशकात उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद

    नाशिक –

    उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद

    फक्त रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आदेश

    जिल्हा उद्योग केंद्राचे ऑक्सिजन वितरकांना आदेश

    100 टक्के ऑक्सिजन पुरवठा कोरोना रुग्णाणसाठी हॉस्पिटलला द्यावे अस आदेश

    पुढील आदेश मिळेपर्यंत उद्यगांकडील रिकामे सिलेंडर प्राप्त करून घेण्याचे आदेश

  • 14 Apr 2021 07:56 AM (IST)

    नाशकात कोरोनाची दाहक वाढ कायम, बाधितांच्या संख्येत 3343 रुग्णांची वाढ

    नाशिक –

    कोरोनाची दाहक वाढ कायम

    जिल्ह्यात काल दिवसभरात, कोरोना बाधितांच्या संख्येत 3343 रुग्णांनी झाली वाढ

    दिवसभरात 32 जणांचा मृत्यू

    अवघ्या 3 दिवसात 106 बळी

    बळींची संख्या झाली 2752

    नाशिक शहर हॉटस्पॉट कायम

    दिवसभरात 1853 नवे बाधीत,14 बळी

    शहरात 1305 प्रतिबंधीत क्षेत्र

  • 14 Apr 2021 07:51 AM (IST)

    नाशकात मनमानी पद्धतीने रेमडिसिव्हर खाजगी रुग्णालयांना द्याल तर याद राखा, शिवसेनेचा FDA ला इशारा

    नाशिक –

    मनमानी पद्धतीने रेमडिसिव्हर खाजगी रुग्णालयांना द्याल तर याद राखा

    शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा FDA ला इशारा

    FDA कडून अयोग्य पद्धतीने रेमडिसिव्हर च वाटप

    भुजबळां अपाठोपाठ आता शिवसेना देखिल आक्रमक

    आज घेणार FDA अधिकाऱ्यांची भेट

    शिवसैनिकांनी सर्व्हे केलेल्या शहरातील रेमडिसिव्हर लागणाऱ्या रुग्णांची देणार यादी

  • 14 Apr 2021 07:48 AM (IST)

    नांदेडमध्ये  गेल्या 24 तासात कोरोनाचे 1664 रुग्ण ,तर 27 जणांचा मृत्यू

    नांदेडमध्ये  गेल्या 24 तासात कोरोनाचे 1664 रुग्ण ,तर 27 जणांचा मृत्यू

    24 तासात 1387 जणांना सुट्टी

    एकूण टेस्ट 6150 त्यापैकी 1664 पॉझिटीव्ह

    आता पर्यंत 61072 पॉझिटीव्ह

    बरे झाले 46578

    एकूण मृत्यू – 1130

    सध्या ऍक्टिव्ह – 13107

    गंभीर – 204

    गेल्या पाच दिवसात

    9 एप्रिल – 1650 – 27 10 एप्रिल – 1750 – 27 11 एप्रिल – 1859 – 27 12 एप्रिल – 1798 – 26 13 एप्रिल – 1664 – 27

  • 14 Apr 2021 07:47 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या स्ट्रेथचा फैलाव

    रत्नागिरी-

    रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या स्ट्रेथचा फैलाव

    80 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत- आरोग्य विभाग

    गेल्या चौवीस तासात 337 कोरोना रुग्ण

    सर्व खासगी कंपन्यातील आस्थापनांची कोरोना टेस्ट होणार

    लाॅक डाऊनसाठी जिल्ह्याचा अँक्शन प्लॅन तयार

    व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा नको- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्याच्या प्रसासनाला सुचना

  • 14 Apr 2021 07:06 AM (IST)

    नागपूर मनपाच्या कोरोना कारभारावर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

    – नागपूर मनपाच्या कोरोना कारभारावर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

    – क्रीडा संकुल, सहकारी रुग्णालयाच्या निरिक्षणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे

    – ‘कोरोना स्थिती हाताळण्यात मनपा प्रशासन अपयशी’

    – ‘रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी मनपाने हवा तसा पुढाकार घेतला नाही’

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केलं निरिक्षण

    – कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे न्यायालयाने स्वत: दाखल करुन घेतली याचिका

  • 14 Apr 2021 06:57 AM (IST)

    14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली.

  • 14 Apr 2021 06:54 AM (IST)

    राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू

    राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

     

  • 14 Apr 2021 06:51 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत दिवसभरात 5 हजार 313 कोरोना रुग्णांची वाढ

    पुण्यात गेल्या 24 तासांत दिवसभरात 5 हजार 313 कोरोना रुग्णांची वाढ

    तर दिवसभरात 4 हजार 573 रुग्ण कोरोनामुक्त

    पुण्यात गेल्या 24 तासांत 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    त्यातील 18 रुग्ण पुण्याबाहेरील होते

    पुण्यात सध्या 54 हजार 61 रुग्णांवर उपचार सुरु

    त्यातील 1 हजार 86 जणांची प्रकृती चिंताजनक

  • 14 Apr 2021 06:45 AM (IST)

    मुंबईत गेल्या 24 तासांत 11 हजार 263 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले

    मुंबईत गेल्या 24 तासांत 11 हजार 263 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले

    तर 7 हजार 898 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली

    मुंबईत गेल्या 24 तासांत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    मृतांपैकी 15 जणांना काही दीर्घकालीन आजार होते

  • 14 Apr 2021 06:41 AM (IST)

    राज्यात आज दिवसभरात 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद

    राज्यात आज दिवसभरात 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद

    तर 281 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

    दिवसभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं असून, आज दिवसभरात 31 हजार 624 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले

  • 14 Apr 2021 06:35 AM (IST)

    राज्यात कडक निर्बंध, परप्रांतीय मजूरांची गावी परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी

    राज्यात कडक निर्बंध लावल्यामुळे सर्व मजुरांचा काम बंद पडले

    त्यामुळे हे सर्व मजूर आता आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळा भागामधून कुर्ला, लोकमान्य तिळक टर्मिनलवर गर्दी करत आहेत,

    सध्या मोठा संख्यामध्ये या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त करण्यात आला आहे,

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंबईचं कुर्ला, लोकमान्य तिळक टर्मिनलवर परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे

Published On - Apr 14,2021 11:20 PM

Follow us
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.