Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2057 जण कोरोनामुक्त, नव्या 1887 रुग्णांची नोंद

| Updated on: May 15, 2021 | 12:04 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2057 जण कोरोनामुक्त, नव्या 1887 रुग्णांची नोंद
MAHARASHTRA Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 May 2021 10:34 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2057 जण कोरोनामुक्त, नव्या 1887 रुग्णांची नोंद

    नाशिक कोरोना अपडेट –

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 2057

    दिवसभरात आढळलेले रुग्ण – 1887

    नाशिक मनपा- 965 रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 915 रुग्ण

    मालेगाव मनपा- 007 रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4040

  • 14 May 2021 10:33 PM (IST)

    वसई विरारमध्ये दिवसभरात 617 जणांनी केली कोरोनावर मात

    कोरोना उपडेट कोरोना अपडेट

    मागच्या 24 तासात 617 जणांनी केली कोरोनावर मात

    फक्त 276 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62,266 वर

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 50916 वर

    आतापर्यंत एकूण 1244 जणांचा मृत्यू

    कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10106 वर

  • 14 May 2021 10:31 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1292 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1292 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 43 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील मृतांचा आकडा 2830 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 17006 वर

    तर उपचार घेणारे 1577 जण आज कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 77869 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 97705 वर

  • 14 May 2021 09:39 PM (IST)

    गोंदियात लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने 6 हजार डोस गेले वाया

    गोंदियात लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने 6 हजार डोस गेले वाया

    नोंदणी करुन नागरिकांची लसीकरणाकडे पाठ

    एकीकडे राज्यात लसीचा तुटवडा असताना गोंदियात लस वाया जात असल्याचे बिकट चित्र

    ग्रामीण भागात सर्वाधिक प्रकार

  • 14 May 2021 09:38 PM (IST)

    वसई-विरारकरांसाठी दिलासादायक बातमी, दिवसभरात 617 जणांची कोरोनावर मात

    वसई-विरारकरांसाठी दिलासादायक बातमी

    मागच्या 24 तासात 617 जणांनी केली कोरोनावर मात तर फक्त 276 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह,आज दिवस भरात 11 जणांचा मृत्यू

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या : 62,266

    कोरोनामुक्त झालेली रुग्ण संख्या : 50916

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या : 1244

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या : 10106

  • 14 May 2021 09:37 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1887 नवे रुग्ण

    नाशिक कोरोना अपडेट –

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 2057

    आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 1887

    नाशिक मनपा- 965 नाशिक ग्रामीण- 915 मालेगाव मनपा- 007 जिल्हा बाह्य- 00

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4040

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -36 नाशिक मनपा- 13 मालेगाव मनपा- 03 नाशिक ग्रामीण- 20 जिल्हा बाह्य- 00

  • 14 May 2021 09:10 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 458 नवे रुग्ण 

    उस्मानाबाद  कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे  458 नवे रुग्ण

    दिवसभरात 15 जणांचा मृत्यू तर 883 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 153, तुळजापूर 36, उमरगा 27, लोहारा 32, कळंब 53, वाशी 67, भूम 31 व परंडा 60 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6107 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद – 2 लाख 55 हजार 595 नमुने तपासले त्यापैकी 47 हजार 857 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याचा दर 36.98 टक्के

    आतापर्यंत 40 हजार 657 रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचा दर 85.22 टक्के

    1093 जणांचा आतापर्यंत मृत्यू

    तर 2.28 टक्के मृत्यूदर

  • 14 May 2021 09:03 PM (IST)

    वर्ध्यात अ‌ॅम्फोटेरेसीन-बी हे इंजेक्शन बनवण्यास मंजुरी

    वर्धा : वर्ध्यात आता रेमडेसीव्हीरनंतर अ‌ॅम्फेटेरीन-बी हे इंजेक्शन बनवण्यास मंजुरी मिळाली आहे

    महाराष्ट्र सरकारच्यावतीने यास परवानगी मिळाली असल्याचे जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांची माहिती

    येत्या 15 दिवसात या इंजेक्शन बनवण्याची प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती

    ब्लॅक फंगस इन्फेक्शनवर याचा वापर होतो

    लवकरच उत्पादनाला सुरुवात होणार असून केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजकेशन उपलब्ध होणार आहे

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपनीला या उत्पादन निर्मितीबाबत विचारणा केली होती

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आणखी एका औषधीची निर्मिती येथे होणार आहे

    दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती डॉक्टर क्षीरसागर यांनी दिली

  • 14 May 2021 08:33 PM (IST)

    कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील संचारबंदी, अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल

    वाशिम : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने वाशिम जिल्ह्यातील संचारबंदी, अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल

    15 मे ते 20 मे पर्यंत नियमांत बदल

    अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय  बाहेर पडण्यास बंदी

    जिल्ह्यात केवळ सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंतच सर्व किराणा दुकाने, भाजीपाला, डेअरी सुरू ठेवण्यास परवानगी

    शिवभोजन थाळी, हॉटेल, रेस्टॉरंटमधून 11 ते 7 पर्यंत घरपोच सुविधा

    वाशिम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या आदेशांची 15 मे पासून होणार अंमलबाजवणी

  • 14 May 2021 08:31 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 39,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 695 जणांचा मृ्त्यू

    राज्यात दिवसभरात एकूण 53 हजार 249 रुग्ण कोरोनामुक्त

    राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.68 वर

    दिवसभरात 39,923 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    आज दिवसभरात 695 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्क्यांवर

  • 14 May 2021 07:07 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 139 नवे रुग्ण, दोन जणांचा मृत्यू तर 513 बरे

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण – 139 आज झालेले मृत्यू – 02 आज बरे झालेले – 513

    तालुका नुसार रुग्ण संख्या

    गोंदिया————–43 तिरोडा————–09 गोरेगाव————–14 आमगाव————–09 सालेकसा————-26 देवरी——————19 सडक अर्जुनी ———–02 अर्जुनी मोरगाव——–12 इतर राज्य————–05

    एकूण रुग्ण – 39083 एकूण मृत्यू – 624 एकूण बरे झालेले – 34758 एकूण उपचार घेत असलेले – 3701

  • 14 May 2021 07:03 PM (IST)

    मुंबईत दिवसभरात 1657 नवे कोरोनाबाधित, 62 जणांचा मृत्यू

    मुंबई : २४ तासात बाधीत रुग्ण १६५७ एकूण बाधीत रुग्ण : ६८५७०५ २४ तासात बरे झालेले रुग्ण : २५७२ एकूण बरे झालेले रुग्ण : ६३१९८२ २४ तासात मृत रुग्णांची संख्या : ६२ एकूण मृत्यू : १४१३८ मुंबईतील दुप्पटीचा दर : १९९ दिवस

  • 14 May 2021 06:58 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 1836 नवे कोरोनाबाधित, 72 रुग्णांचा मृत्यू

    पुणे : – दिवसभरात १८३६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३३१८ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७२ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील. – १३८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५६२९३. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३६९२ – एकूण मृत्यू -७६११. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४२४९९०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३९०८.

  • 14 May 2021 06:39 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दिवसभरात 656 नवे कोरोनाबाधित

    वाशिम :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 02 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात 656 नवे रुग्ण

    तर 442 जणांना डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 14 दिवसात 60 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 7325 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 6645 कोरोनामुक्त झालेत

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 34685

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4529

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 29799

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 356

  • 14 May 2021 05:59 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 687 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात, 687 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 19 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 75885

    एकूण कोरोनामुक्त : 63818

    सक्रिय रुग्ण : 10856

    एकूण मृत्यू : 1211

    एकूण नमूने तपासणी : 429160

  • 14 May 2021 05:46 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 4965 रुग्णांची कोरोनावर मात, 1996 नवे कोरोनाबाधित, तर 70 जणांचा मृत्यू

    नागपूर :

    नागपुरात आज 4965 जणांनी केली कोरोनावर मात

    1996 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 70 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने वाढली चिंता

    एकूण रुग्ण संख्या – 4,60,600

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 413072

    एकूण मृत्यू संख्या – 8472

  • 14 May 2021 04:45 PM (IST)

    सोलापुरात किराणा दुकान, भाजी मंडई, कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार

    सोलापूर :

    उद्यापासून किराणा दुकान, भाजी मंडई, कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार

    सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान जीवनावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार

    15 तारखेच्या सकाळपर्यंत शहर आणि जिल्ह्यात होता लॉकडाऊन

    सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान शिथिलता, मात्र गर्दी झाल्यास दुकानदारावर कारवाई होणार

    11 नंतर  विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

  • 14 May 2021 04:42 PM (IST)

    वसईत भाजी मार्केटमध्ये पोलिसांची दादागिरी, हात-पायाने भाजी रस्त्यावर फेकल्या

    वसई : लॉकडाऊनच्या नावाखाली वसईत पोलिसांची दादागिरी पाहायला मिळत आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत भाजीमार्केट चालू ठेवण्यास परवानगी आहे. पण वसई पारनाका आझाद नगर भाजीमार्केटमध्ये आज सकाळी 8 वाजताच पोलिसांनी मार्केट बंद करण्याच्या नावाखाली अक्षरक्ष: धुडगूस घातला आहे. वसई पोलीस ठाण्यातील 3 पोलिसांनी सकाळी 8 वाजताच जाऊन भाजीविक्रेत्यांच्या भाजी हात-पायाने फेकून रस्त्यावर टाकल्या आहेत . पोलिसांचे हे सर्व कृत्य मार्केटमधील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हे मागच्या तीन दिवसापासून सुरु असल्याचे भाजी विक्रेत्यांची तक्रार आहे . लॉकडाऊनॉमध्ये छोटे, मोठे व्यापारी अगोदरच हैराण असताना पोलिसांच्या या कृत्याने तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे

  • 14 May 2021 03:54 PM (IST)

    मिरजेत रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

    सांगली : आरोग्यपंढरी मिरजेत रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने रेल्वे प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू. रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी गेल्याच आरोप.

  • 14 May 2021 03:52 PM (IST)

    नितीन राऊत यांच्याकडून नागपूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचं कौतुक

    नागपूर :

    नितीन राऊत –

    बेडची निर्मिती करण्यात असो किंवा ऑक्सिजन नागपूरचा क्रमांक अवल राहिला आहे

    मी जिल्हा प्रशासन नगर प्रशासन यांना धन्यवाद देतो. त्यांनी चांगलं काम केलं

    परंतु याने सुखावून जाण्यात अर्थ नाही.

    कारण कोरोना अजून संपलेला नाही.

    संख्या अजून वाढतच आहे ती कमी झालेली नाही.

    त्यामुळे आणखी कडक निर्बंध करून मृत्यूचं प्रमाण कमी करायचं आहे

    तिसरी लाट येणार आहे त्यासाठी आपण तयार राहावं, नियमांचं पालन करावं.

  • 14 May 2021 03:26 PM (IST)

    लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, थेट बारवर बुलडोझर फिरवला

    मीरा भाईंदर :- कडक लॉकडाऊन मध्ये चोरीछुपे लेडीज बार सुरु ठेवणाऱ्या बारवर पोलीस आणि पालिकेनं चक्क बुलडोझर फिरवला आहे. सध्या राज्यभर कडक लॉकडाउन सुरु आहे. असं असताना काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानसी बार हा राञी चोरी छुपे बार सुरु ठेवत होता. या बारमध्ये मुली लपवण्यासाठी तयखाना ही तयार करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात काशिमीरा पोलिसांनी रात्री तीनच्या सुमारास मानसी लेडीज बार मध्ये धाड टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत 7 मुलींसह 2 तृतीयपंथीयांचे सुटका करण्यात आली. तर ग्राहक आणि स्टाफसहित 19 आरोपींना अटक ही करण्यात आलं होतं. मानसी बार अनधिकृत असल्यानं, पोलिसांकडून पालिकेला मानसी बारवर तोडक कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते. त्यावर आज मिरा भाईंदर पालिकेनं अनधिकृत पथकासह मानसी लेडीज बार भुईसपाट करुन टाकलं.

  • 14 May 2021 02:50 PM (IST)

    वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॅाक काल बाहेर आलाय – गडकरी

    नितीन गडकरी –

    – वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पहिला स्टॅाक काल बाहेर आलाय

    – रेमडेसवीर च्या १७ हजार इंजेक्शनचा पहिला स्टॅाक काल बाहेर आलाय

    – आज २५ हजार इंजेक्शनचा दुसरा स्टॅाक येणार

    – हे इंजेक्शन राज्यात वापरला जाईल, ज्या ज्या जिल्हयात रेमडेसवीर ची गरज आहे तिथे हे इंजेक्शन पाठवले जाईल

    – त्यानंतर देशभरात हे इंजेक्शन पाठवले जाणार

    – कोरोना बरा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये काळी बुरशी या आजाराची समस्या उद्भवली

    – काळी बुरशी आजाराच्या इंजेक्शनचाही तुटवडा आहे

  • 14 May 2021 02:48 PM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दंदे फाऊंडेशनच्या नव्या हॅास्पिटलचं उद्घाटन

    नितीन गडकरी –

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दंदे फाऊंडेशनच्या नव्या हॅास्पिटलचं उद्घाटन

    – सामाजिक जाणीव ठेवून काम करणाऱ्या डॅाक्टरांमागे मी उभा राहतो

    – कोरोनाच्या काळात राजकारण करु नका, हे मी कुणा व्यक्तीला म्हटलं नव्हतं. पण तसंच रंगवल

    – कोरोनानंतर फंगस – काळ्या बुरशीची सर्वात मोठी समस्या, यात काल चार पाच लोकांचे डोळे गेले

    – सहकार क्षेत्रात शहाण्या माणसाने जावू नये

    – मला ॲंटीबॅाडी खुप अशा ओव्हर कॅान्फीडंन्समध्ये राहू नका

  • 14 May 2021 01:13 PM (IST)

    तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरु केलीये – अजित पवार

    अजित पवार –

    तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरू केलीये

    काही हॉस्पिटल इलेक्ट्रॉनिक ऑडिट करायला परवानगी देत नाही, अशा हॉस्पिटलवर पोलीस कारवाई करणार

    माणसाचा जीव महत्वाचा आहे, या काळात मी कोणतेही राजकारण केलं नाही, ही टोलवाटोलवी करायची वेळ नाही

  • 14 May 2021 01:04 PM (IST)

    १० कोटींपर्यंत लस उत्पादनाचं नियोजन आहे – अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार –

    देशात सर्व नागरिकांना लसीची गरज

    लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आलाय

    लस उत्पादन क्षमता मर्यादित आहे

    १० कोटींपर्यंत लस उत्पादनाचं नियोजन आहे

    गडकरींचा फोन आला होता, विदर्भात रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत आहे

    राज्याला काही लागत असेल तर आमच्याकडे आहे

  • 14 May 2021 12:54 PM (IST)

    पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार –

    पुण्यात जिल्हा आणि शहराची कोरोना आढावा बैठक संपली

    पुण्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला

    तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातीये

    पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नियोजन सुरु

    ऑक्सिजनच्याबाबतीत राज्याची १२०० मेट्रिक टनची तयारी आहे, परंतू १८०० ने वाढवायची आहे

    लसीकरणाचंही नियोजन सुरु, ऑक्सिजनच उत्पादन वाढवत आहोत

    प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहोत

    पण मशनिरी आहे, एखादा प्लॅन्ट कधी तरी बंद पडतो

    तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका, त्यासाठी नियोजन सुरु

    महानगरपालिकेचा ग्लोबल टेंडर काढायला राज्य सरकार परवानगी देत नाही

    मुबंई महापालिकेन त्यांच्या स्तरावर ते टेंडर काढलं आहे, पुणे महापालिकेने त्यांच्या स्तरावर टेंडर काढायला हरकत नाही, मनपांना निवेदनासाठी परवानगी लागत नाही

    लस खरेदीसाठी आता लवकरच निविदा

    भारत बायोटेकने जिल्ह्यात 28 एकर जमीन मागितली ती देण्याच्या हालचाली सुरु केल्या, तीन महिने तो प्रकल्प सुरू व्हायला लागतील

    तिथे तयार होणारी लस निम्मी केंद्राला द्यावी लागेल, पण राहिलेली लस महाराष्ट्राला मिळाली पाहिजे

    लहान मुलांना पण लस द्यावी, असे प्रस्ताव पुढे आलेत

  • 14 May 2021 12:49 PM (IST)

    मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायत संचालित राज्यातील पाहिले ऑक्सिजन बेड सुविधा असलेले कोव्हिड सेंटर सुरु

    सांगली –

    मिरज तालुक्यातील सलगरे ग्रामपंचायत संचालित राज्यातील पाहिले ऑक्सिजन बेड सुविधा असलेले कोव्हिड सेंटर सुरु

    कर्नाटकसह मिरज पूर्व भागातील कोव्हिड रुग्णांना संजीवनी

    शासनाने आणि दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची गरज

    सरपंच तानाजी पाटील आणि उपसरपंच सुरेश कोळेकर याच्या मदतीचे सर्वांना आवाहन

  • 14 May 2021 12:05 PM (IST)

    नाशकात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, चौघांना अटक

    नाशिक –

    रेमडेसिव्हीरचा काळाबाजार

    के. के. वाघ कॉलेजजवळ रेमडेसिव्हीरची जादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना आडगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

    चार आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश

    तिन्ही महिला मुंबई नाका इथल्या फॉरचुन हॉस्पिटलमध्ये मध्ये नर्सेस म्हणून कार्यरत

    चौथा आरोपी ऍपेक्स हॉस्पिटल इथं मेडिकल बॉय

    27 हजाराला विकत होते 1 इंजेक्शन

    2 इंजेक्शन ताब्यात

    FDI नं लावला होता सापळा

    बनावट ग्राहक पाठवून,खरेदी करतांना पकडले रंगेहाथ

  • 14 May 2021 11:55 AM (IST)

    कणकवली बाजारपेठेत उसळली मोठी गर्दी

    सिंधुदुर्ग –

    कणकवली बाजारपेठेत उसळली मोठी गर्दी

    तब्बल 13 दिवसानंतर उघडलेल्या बाजारपेठेत लोकांची खरेदीसाठी गर्दी

    कणकवली शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असताना कणकवलीकरांनी गर्दी करुन सोशल डिस्टनसिंगचे वाजवले तीन तेरा

    कणकवली शहरात 1 मे पासून 10 पर्यंत होता जनता कर्फ्यु

    9 तारखेला जिल्हा प्रशासनाने पुकारला होता 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन

    मात्र कणकवलीत आधीच जनता कर्फ्यु असल्यामुळे प्रशासनाने 14 पासून कणकवलीकरांना 7 ते 11 साठी दिली होती मुभा

    मुभेच्या आज पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड गर्दी

  • 14 May 2021 11:54 AM (IST)

    कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज

    कोपरगावमध्ये कोरोना रुग्णांची ईद, कोरोना सेंटरमध्येच नमाज

    पाॅझिटिव्ह रुग्णांची नमाज, ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांनी केली नमाज

    कोपरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये नमाज

    कोरोना सेंटरमध्येच नमाज अदा करुन रुग्णांची ईद

    आज ईदच्या दिवशी घरीच अनेकांनी केली नमाज अदा

    ईदच्या सणावर कोरोनाचे सावट

  • 14 May 2021 10:58 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीला सुरुवात

    पुणे

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीला सुरुवात

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित

    बैठक संपल्यावर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधणार

  • 14 May 2021 09:50 AM (IST)

    सोलापुरात 15 मे पर्यंत लॉकडाऊन, अक्षय तृतीयाच्या सणावर सावट

    सोलापूर- अक्षय तृतीयाच्या सणावर कोरोनाचे सावट

    लॉकडाऊन असल्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट

    15 तारखेपर्यंत शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन

  • 14 May 2021 09:48 AM (IST)

    सोलापुरात रमजान ईदवर कोरोनाचे सावट, विशेष नमाज घरातच अदा करण्याची सूचना

    सोलापूर- रमजान ईद वर कोरोनाचे सावट

    बांधव घरा घरातच करणार ईद साजरा

    रमजानचा विशेष नमाज घरातच अदा करणार

    सोलापुरात 15 तारखेपर्यंत आहे लॉकडाऊन

  • 14 May 2021 09:47 AM (IST)

    पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचे चोचले, व्यसनाचे साहित्य पुरविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

    पुणे :

    जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे जम्बो चोचले

    नातेवाईकांकडूनच रुग्णांना व्यसनाचे साहित्य पुरविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

    नातेवाईकांना घरचा डबा देण्याच्या नावाखाली सुरू असलेले हे प्रकार कडक तपासणीमुळे झाले उघड

    आयसीयू’मधील रुग्णाने येथील सफाई कर्मचाऱ्याला हाताशी धरून चक्‍कमद्य मिळवल्याचे आलं समोर

    यानंतर या कर्मचाऱ्यास करण्यात आलं निलंबित

    तर एका रुग्णासाठी चाकू, तर आणखी एकासाठी सुपारी कातरण्याचा अडकित्ता लपवून पाठवण्याची बाब तपासणीत वेळीच आली समोर

  • 14 May 2021 09:46 AM (IST)

    पुण्यात रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह सापडला

    पुणे

    रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह सापडला

    हडपसर येथील मुठा कालव्यात आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह

    भवानी पेठेतील होप हॉस्पिटल येथे कोरोनावर उपचार सुरू असतानाच बायमाबी कमरुद्दीन तांबोळी ही महिला झाली होती बेपत्ता

    त्यानंतर, समर्थ पोलीस ठाण्यात या महिलेच्या बेपत्ता झाल्याची तक्रार होती दाखल

    दरम्यान, काल अचानक त्या महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ

  • 14 May 2021 09:45 AM (IST)

    औरंगाबादकरांना आणखी मोठा दिलासा, गेल्या 24 तासात फक्त 631 रुग्णांची नोंद

    औरंगाबाद :-

    औरंगाबादकरांना आणखी मोठा दिलासा

    औरंगाबादेत काल दिवसभरात फक्त 631 रुग्ण आढळले

    तर औरंगाबाद शहरात आढळले फक्त 216 रुग्ण

    तर ग्रामीण भागात आढळले 415 रुग्ण

    मृतांचा आकडा मात्र मोठा

    काल दिवसभरात 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  • 14 May 2021 08:10 AM (IST)

    नाशकात लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन, अनेक ठिकाणी पोलिसांचा दंडुक्याचा प्रसाद

    नाशिक –

    लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन

    अनेक ठिकाणी पोलिसांचा दंडुक्याचा प्रसाद

    तर अनेक ठिकाणी दंड वसूल

    168 जणांकडून 14 लाखांचा दंड वसूल

    दंडामुळे विना कारण फिरणाऱयांची संख्या रोडावली

  • 14 May 2021 08:09 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात पुन्हा रेमडेसीव्हीरचा तुटवडा

    नाशिक –

    महापालिकेच्या रुग्णालयात पुन्हा रेमडेसीव्हीरचा तुटवडा

    पैसे भरुन देखील इंजेक्शन मिळेना

    गंभीर रुग्णाणची मृत्यूशी झुंज

    इंजेक्शनबाबत रोज पाठपुरावा सुरु

    मात्र कंपनीकडून उडवा उडवीचे उत्तर

    महापालिका 5 हजार इंजेक्शन घेणार जिल्हा रुग्णालयाकडून

  • 14 May 2021 08:08 AM (IST)

    वसई-विरार महापालिका हद्दीत 6 केंद्रावर आज लसीकरण राहणार सुरु

    वसई-विरार महापालिका हद्दीत 6 केंद्रावर आज लसीकरण राहणार सुरू

    45 व 45 वर्षावरील दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनाच आज देणार दुसरा डोस

    देण्यात येणारे लसिकरन ऑनलाइन नोंदणी केलेले 20 टक्के, व ऑनसाईड 80 टक्के असे राहणार आहे..

  • 14 May 2021 07:18 AM (IST)

    चिखलीतील खाजगी कोव्हिड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले सामूहिक राजीनामे, राजकीय हस्तक्षेप वाढल्याने आले तणावात

    बुलडाणा –

    चिखलीतील खाजगी कोव्हिड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले सामूहिक राजीनामे

    राजकीय हस्तक्षेप वाढल्याने आले तणावात

    डॉक्टरांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप

    जवळपास 10 खाजगी कोव्हिडं रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पालकमंत्र्याकडे दिले राजीनामे

    आता पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिकेकडे लक्ष

  • 14 May 2021 07:15 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात दोन महिन्यानंतर कोरोना पॅाझिटिव्ह टक्केवारीत घट

    – नागपूर जिल्ह्यात दोन महिन्यानंतर कोरोना पॅाझिटिव्ह टक्केवारीत घट

    – सात ते 12 मे दरम्यान कोरोना पॅाझीटीव्हचा दर 12 टक्के

    – एप्रिल महिन्याच्या शेवटच्या पंधरवाड्यात पॅाझिटिव्हचा दर होता 31 टक्के

    – कोरोना पॅाझिटिव्ह टक्केवारीत घट झाल्याने नागपुरकरांना दिला

    – जिल्हयात गेल्या 24 तासांत 2224 नवे रुग्ण, 5884 रुग्ण झाले कोरोनामुक्त

    – कोरोनामुक्तांचं प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्या आलीय 39 हजारांवर

  • 14 May 2021 06:49 AM (IST)

    कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तू भोये यांचे कोरोनाने निधन

    कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तू भोये यांचे कोरोनाने झाले निधन

    पोलीस निरीक्षक दत्तू भोये यांच्यावर नाशिक येथील एका रुग्णालयात एक महिन्यापासून उपचार सुरू होते

    गुरुवारी सायंकाळी 5 : 30 वाजता उपचारा सरम्यान झाला त्यांचा मृत्यू

  • 14 May 2021 06:48 AM (IST)

    वसई-विरार कोरोना अपडेट

    वसई :

    गेल्या 24 तासांत 563 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    गेल्या 24 तासांत 09 जणांचा मृत्यू तर 654 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 61,990

    कोरोना मुक्त झालेली रुग्ण संख्या 50299

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या 1233

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 10458

  • 14 May 2021 06:47 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42 हजार 582 नवे रुग्ण, 850 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात एकूण 46 लाख 54 हजार 731 रुग्ण कोरोनामुक्त

    सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर

    गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42 हजार 582 नवे रुग्ण

    राज्यात गेल्या 24 तासांत 850 रुग्णांचा मृत्यू

    राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्क्यांवर

Published On - May 14,2021 10:35 PM

Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.