Corona Cases and Lockdown News LIVE : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, 419 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Apr 17, 2021 | 11:26 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, 419 रुग्णांचा मृत्यू
corona virus news

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Apr 2021 11:02 PM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात तब्बल 11 रुग्णांचा मृत्यू, 472 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

    मीरा भाईंदर:

    मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांचे मृत्यू संख्येतही झपाट्याने वाढ, आज 11 रुग्णांचा मृत्यू तर 472 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता पर्यंत 37 हजार 514 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 32 हजार 631 रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 3 हजार 978 रुग्णावर उपचार सुरु आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता पर्यंत 905 रुग्णांणचा मृत्यू झाला आहे..

  • 17 Apr 2021 10:24 PM (IST)

    नवी मुंबईत पाच नवे कोरोना रुग्णालये

    नवी मुंबई शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत आहे. अनेक कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर मिळेनासे झालेत. हे पाहता आता नवी मुंबई महापालिकेने 250 व्हेंटिलेटर बेड नव्याने उभारण्यास सुरुवात केलीय. यातील काही बेड आज उपलब्धही झालीत. कामोठे एमजीएम रुग्णालयात 100, सिडको एक्सिबिशन सेंटर मध्ये 75 आणि नव्याने मंजुरी दिलेल्या पाच कोविड रुग्णालयात 75 व्हेंटिलेटर बेड उभारले जाताहेत. यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

  • 17 Apr 2021 09:59 PM (IST)

    महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, 419 रुग्णांचा मृत्यू

    महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, 419 रुग्णांचा मृत्यू, राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेची बाब

  • 17 Apr 2021 09:55 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात दिवसभरात 1275 नवे रुग्ण

    रायगड करोना अपडेट :

    आजचे नविन रुग्ण – 1275 (पनवेल मनपा 583, उर्वरीत जिल्हा 692)

    पनवेल ग्रामीण 154 अलिबाग 156 खालापुर 77 पेण 56 कर्जत 66 रोहा 44 माणगाव 41 उरण 31 सुधागड 26 महाड 12 श्रीवर्धन 11 पोलादपुर 6 म्हसळा 5 तळा 5 मुरुड 2.

    आज बरे झालेले रुग्ण –  1073. आज मृत्यू पावलेले रुग्ण – 19.

    आत्तापर्यंत सापडलेले एकूण रुग्ण – 88969.

    आज रोजी एकूण सक्रीय रुग्ण – 9699 आतापर्यंत बरे झालेले – 77364. आतापर्यंत मृत्यू – 1906

  • 17 Apr 2021 09:49 PM (IST)

    पुणे जिल्ह्यानं ओलांडला 1 लाख सक्रीय रुग्णसंख्येचा टप्पा

    पुणे : 

    पुणे जिल्ह्यानं ओलांडला 1 लाख सक्रीय रुग्णसंख्येचा टप्पा,

    दिवसभरात तब्बल 12 हजार 836 रुग्णांची वाढ,

    दिवसभरात 100 जणांचा कोरोनानं घेतला बळी

  • 17 Apr 2021 09:38 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 962 नवे कोरोनाबाधित, तर 14 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

    सांगली कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात आज दिवसभरात 962 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 14 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1918 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 6610 वर

    तर उपचार घेणारे 363 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 51737 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 60265 वर

  • 17 Apr 2021 09:37 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 653 नवे रुग्ण

    उस्मानाबाद कोरोना अपडेट :

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 653 रुग्ण, 20 मृत्यू तर 572 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 345, तुळजापूर 64,उमरगा 58, लोहारा 45, कळंब 57, वाशी 29, भूम 21 व परंडा 34 रुग्ण

    24 मार्च – 176 25 मार्च – 174 26 मार्च – 155 27 मार्च – 224 28 मार्च – 184 29 मार्च – 239 30 मार्च – 242 31 मार्च – 253 01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613 15 एप्रिल – 764 16 एप्रिल – 580 17 एप्रिल – 653

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5775 अॅक्टिव्ह रुग्ण

    उस्मानाबाद – 1 लाख 86 हजार 698 नमुने तपासले त्यापैकी 29 हजार 077 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 22.15 टक्के

    22 हजार 607 रुग्ण बरे 79.12 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 711 तर 2.37 टक्के मृत्यू दर

  • 17 Apr 2021 08:44 PM (IST)

    पुढच्या एका आठवड्यात वर्ध्यात रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू होणार

    नागपूर आणि विदर्भात असलेली रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वर्ध्याच्या ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला 30 हजार वायल प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळवून दिली आहे.

    रेमडेसिवीर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी ‘लोन लायलंस’द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवड्यात वर्ध्यात रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू होईल आणि पंधरा दिवसांत ३० हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांत उपलब्ध होतील.

    यासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानग्या नितीनजी गडकरी यांनी मिळवून दिल्या आहेत.

  • 17 Apr 2021 08:43 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात तब्बल 6006 नवे रुग्ण, तर 75 रुग्णांचा मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट – दिवसभरात ६००६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ५६०९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७५ रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील. – १२३६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३६०८०३. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४९६७. – एकूण मृत्यू -६०५६. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २९९७८०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २४५०६

  • 17 Apr 2021 08:42 PM (IST)

    नागपुरात नाकाबंदी दरम्यान अँटीजेन टेस्ट, 18 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

    नागपुरातील ५ नाकेबंदी पॉईंटवर चेकिंग दरम्यान २५५ वाहन चालकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली

    यापैकी १८ वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे

    सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे

    आज पासून पोलिसांनी बिना कामाने बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांची अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम सुरू केली

    18 जणांना सरळ विलगिकरन कक्षात पाठविल्याने बिना कामाने बाहेर पडताना आता नागपूर कर विचार करतील

  • 17 Apr 2021 08:41 PM (IST)

    गोंदियात दिवसभरात तब्बल 885 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण – 885

    आज झालेले मृत्यू – 22 आज बरे झालेले – 571

    तालुका नुसार रुग्ण संख्या

    गोंदिया—————484 तिरोडा—————130 गोरेगाव—————119 आमगाव————–12 सालेकसा————-13 देवरी——————16 सडक अर्जुनी ———–16 अर्जुनी मोरगाव——–91 इतर राज्य————–04

    एकूण रुग्ण – 24881 एकूण मृत्यू – 332 एकूण बरे झालेले – 18060 एकूण उपचार घेत असलेले – 6489

  • 17 Apr 2021 07:09 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 1593 नवे रुग्ण

    चंद्रपूर : गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहा:कार 4578 नमुने तपासणीतून 1593 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 23 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 40647

    एकूण कोरोनामुक्त : 30103

    अॅक्टिव्ह रुग्ण : 9969

    एकूण मृत्यू : 575

    एकूण नमूने तपासणी : 324945

  • 17 Apr 2021 07:02 PM (IST)

    रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत विक्री करणाऱ्या दोघा भावांना अटक

    पुणे :

    रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत विक्री करणाऱ्या दोघा भावांना अटक

    25 हजाराला एक या दराने करत होते इंजेक्शनची विक्री

    गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने केली सापळा रचून अटक

    प्रदीप देवदत्त लाटे आणि संदीप देवदत्त लाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघा भावांची नाव

    पुणे शहर पोलिसांकडून रेम्डीसिव्हरचा काळाबाजार केल्या प्रकरणी आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल तर नऊ जणांना अटक

  • 17 Apr 2021 06:58 PM (IST)

    नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, 139 मेट्रिक टनची मागणी, हातात फक्त 87 टन, छगन भुजबळ यांची माहिती

    छगन भुजबळ यांचे पत्रकार परिषदेतील मुद्दे : – नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा – 139 मेट्रिक टन मागणी आहे – मात्र हातात फक्त 87 टन – जीवनावश्यक नावाखाली नागरीक गैरफायदा घेताय – परिस्थिती विदारक

    – मोकाट फिरणारे सुपर स्प्रेडर ठरताय – कोणतीही लक्षणं असली तर ताबडतोब ऍडमिट व्हा – कुंभमेळा वरून आलेल्यांनी त्वरीत टेस्ट करून घ्यावी – 2 हजार बेड्स क्षमता वाढवली – ऑक्सिजन मागणी 65 वरून 139 मेट्रीक टन वर गेली – फार अडचण आहे,काय करायचं ते सांगा

    – प्रत्येक कोरोना रुग्णाला रेमडिसिव्हीरची गरज नाही – मी स्वतः रेमडिसिव्हीर घेतलं नाही – रेमडिसिव्हीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही – या इंजेक्शनचे दुष्परिणामही आहे – टोटल लॉकडाऊन करा ही व्यापाऱ्यांनी मागणी केली – अधिकारी आणी लोकप्रतिनिधी यांची मागणी आहे लोकडाऊन करा – नाशिकला लॉकडाऊन करा ही माझी मुख्यमंत्र्यांना मागणी – भेटून चर्चा करणार

  • 17 Apr 2021 06:56 PM (IST)

    वसई विरारमध्ये कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू, 396 नवे रुग्ण

    वसई विरारमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे

    मागच्या 24 तासात 814 रुगण कोरोना पॉझिटिव्ह, दिवसभरात 8 जणांचा मृत्यू, तर 396 जणांची कोरोनावर मात

    वसई विरार महापालिकेत आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या –  43 हजार 218

    आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्ण संख्या – 960

    कोरोनावर मात केलेल्या रुगणाची संख्या –  34 हजार 438

    कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुगणाची संख्या – 7 हजार 820

  • 17 Apr 2021 06:02 PM (IST)

    रेमडेसिवीरबाबत मोठी बातमी, इंजेक्शन झाले स्वस्त

    रेमडेसिवीरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मध्यस्थी केल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर कमी करण्यात आले आहेत. फार्मा कंपन्यांनी इंजेक्शनचे दर कमी करण्यास सहमती दिली आहे.

  • 17 Apr 2021 05:55 PM (IST)

    यवतमाळमध्ये दिवसभरात 26 रुग्णांचा मृत्यू, तर 1048 नवे रुग्ण

    यवतमाळ कोरोना अपडेट :

    -यवतमाळमध्ये आज पुन्हा रुग्ण संख्या वाढतीच, आज 1048 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू सक्रिय रुग्णसंख्या – 5369 एकूण रुग्ण संख्या – 39572 एकूण मृत्यू – 869 जिल्याचा पॉझिटिव्ह रेट – 11. 71 मृत्यू रेट – 2.20

  • 17 Apr 2021 05:49 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात 620 नवे कोरोनाबाधित

    वाशिम कारोना रिपोर्ट :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्यात आज 8 रुग्णाचा मृत्यू, तर आज एकाच दिवशी आढळले नवे 620 रुग्ण

    दिवसभरात 213 जणांना डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 17 दिवसात एकूण 41 रुग्णांचा झाला मृत्यू, तर मागील 17 दिवसात आढळले एकूण 5719 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 21794

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 3772

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 17792

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 229

  • 17 Apr 2021 05:31 PM (IST)

    मुंबईत 3 लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण होणार, किशोरी पेडणेकर यांची मोठी घेषणा

    किशोरी पेडणेकर यांची मोठी घेषणा – मनपाच्या कुर्ला भाभा, भगवती हाॅस्पिटल, गोवंडी शताब्दी इथे 3 लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम आज रात्री 9 पर्यंत पुर्ण करणार – गोवंडी शताब्दी इथे 103 ऑक्सिजन बेड्स तयार करणार. उद्यापासून ते नागरीकांच्या सेवेत असतील. – सायनच्या सोमय्या ग्राऊंड इथेही जंबो कोविड रुग्णालयात तीन दिवसांत सुरू करण्याचा निर्णय. ऑक्सिजन बेड्स तिथेही असतील – स्टाफ कमी पडला तर तातडीने मेडीकल स्टाफची नेमणूक करा असे रुग्णालय प्रशासनाला आदेश

  • 17 Apr 2021 05:02 PM (IST)

    जळगावात 20 टन ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यातील भयानक वास्तव

    जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिवसाला 8 मेट्रीक टन लिक्वेिड ऑक्सिजनची गरज पडत आहे. पूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास ५० टन ऑक्सिजनची गरज असताना पुरवठा मात्र ३० टन होत आहे . दुसऱ्या दिवशी सिलिंडर आले नाही तर मोठी गंभीर परिस्थिती निमार्ण होण्याची शक्यता असते. अशा आणिबाणीच्या स्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांना थेट जळगावात पाठविण्यात येत आहे. जामनेर येथील 12 रुग्णांना ऑक्सिजन अभावी जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात पाठविण्यात आले यात एक महिलेचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या महिनाभरापासून रेमडेसिविर इंजेक्शनचा ‘ मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे . आता तर शासकीय यंत्रणेतही हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र आहे . रोजची मागणी ५ हजार इंजेक्शनची असून ५०० इंजेक्शनपर्यंत कधी – कधी प्राप्त होत आहे . त्यामुळे इंजेक्शनसाठीची धावपळ थांबलेली नाही. शासकीय कोविड रुग्णालयात रेमदेसिव्हर चा साठा उपलब्ध आहे मात्र खाजगी मध्ये फक्त 255 रेमदेसिव्हर उपलब्ध आहेत.

  • 17 Apr 2021 04:25 PM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद करा, सर्व व्यापाऱ्यांची मागणी

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजार समिती बंद करण्यात यावी. यासाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी, अडते यांनी बाजार समिती प्रशासनाला पत्र देऊन बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद करावी ही मागणी केली आहे. दरम्यान जिल्ह्यात वाढणारी बाधितांची संख्या बघता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 19 ते 24 एप्रिल दरम्यान बाजार समिती बंद करावी अशी मागणी यामधून करण्यात आली आहे.

  • 17 Apr 2021 04:19 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दहा हजार लस दाखल होणार

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात उद्या दहा हजार लस होणार दाखल. यात कोविशिल्डचे 5000 आणि कोवॅक्सिनचे 5000 लस डोस असणार आहेत. जिल्ह्यात मागील दहा दिवसांत दोन वेळा लसीकरण झालं बंद. आता उद्यापासून पुन्हा होणार लसीकरणला सुरुवात होणार

  • 17 Apr 2021 04:18 PM (IST)

    खोपोलीमध्ये जनता कर्फ्युला लोकांचा शंभर टक्के प्रतिसाद

    रायगड :

    खोपोलीमध्ये जनता कर्फ्युला लोकांचा शंभर टक्के प्रतिसाद.

    राज्यात कोरोना वाढल्यामुळे 15 एप्रिल ते 30 एप्रिल मध्ये मिनी लोकडाऊन लावला असताना खोपोलिमध्ये सुद्धा करोना चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांनी काल जनता कर्फु चा निर्णय घेतला.

    17 एप्रिल ते 19 एप्रिल प्रयत्न जनता कर्फु लावला असून आज त्या जनता कर्फु ला खोपोली मधील जनतेने उत्फुर्त प्रतिसाद दिला.

    सर्व बाजारपेठा व भाजी मार्केट, रिक्षा बदं ठेवल्याने खोपोलीतील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे तसेच अनेक ठिकाणी चौका चौकात कडक पोलीस बंदोबस्त पहायला मिळत आहे.

  • 17 Apr 2021 04:16 PM (IST)

    अकोल्यात सकाळच्या सत्रात 319 नवे कोरोना पॉझिटिव्ह

    अकोला कोरोना अपडेट :

    आज सकाळच्या अहवालात 319 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत

    1594 अहवाल पैकी 1275 अहवाल निगेटिव्ह आले आहेत

    ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 33148 झाला आहे

    आज सकाळी 10 जणांचा मृत्यू झाला आहे

    *कोरोनामुळे आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू

    *तर 28019 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    *उपचार घेत असलेले रुग्ण 4574 आहेत

    *शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती

  • 17 Apr 2021 04:12 PM (IST)

    मंत्री नवाब मलिक यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

    नवाब मलिक नेमकं काय म्हणाले? -16 कंपन्या आहेत – त्यांच्याकडे साठा हा महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी आहे -महाराष्ट्रात जो साठा आहे तो जप्त करण्याचे आदेश दिले आहेत -या कंपन्या खाजगीत संगत आहेत की जर तुम्ही हा साठा महाराष्ट्राला दिला तर तुमचं लायसन्स रद्द करू असं केंद्र सरकारचा दबाव आणत आहे

    -ब्रूक फर्मा नावाची औषध कंपनी आहे -त्यांच्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंत्री शिंगणे यांच्याकडे गेले होते -50 हजार इंजेक्शन देणार अस कंपनी म्हटली होती -काही वेळात मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली – आता ही कंपनी म्हणत आहे की आमच्याकडे नाही म्हणून -काय झालं याचं दरेकर यांनी सांगावं – नाही तर राजीनामा देऊन राजकीय संन्यास घ्यावा

    -अतुल भातकळकर यांनी आरोप केले आहेत -मी नाव घ्यायला सुरुवात करू का – विवेक मोहित्रा कोण होता – राहुल महाजन काय होत -मी नाव घेतले तर उघडी होतील सर्व

  • 17 Apr 2021 03:11 PM (IST)

    पंढरपूर शहरात दोन विरोधाभास, हे चित्र महाराष्ट्राला बघावेच लागेल

    पंढरपूर –

    पंढरपूर शहरात दोन विरोधाभास, हे चित्र महाराष्ट्राला बघावेच लागेल

    एकीकडे मतदान केंद्रावर मतदानासाठी अत्यल्प गर्दी

    तर दुसरीकडे हॉस्पिटलसमोर कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी

    प्रत्येक मतदान केंद्रावर बोटावर मोजण्या इतकेच मतदारांची संख्या

    तर दुसरीकडे शहरातील विविध हॉस्पिटल समोर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी

    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होत आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक

  • 17 Apr 2021 03:05 PM (IST)

    आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला 1 कोटी रुपये दिले

    चंद्रपूर : कोविड रुग्णालयासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला 1 कोटी रुपये दिले. कालच वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदारांना स्थानिक विकास निधीतले 1 कोटी रुपये कोरोना वर खर्च करण्याची मुभा दिली होती, त्यानुसार 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना भेटून दिले 1 कोटींचा निधी वळता करण्याचे पत्र, विशेष म्हणजे चंद्रपूर मनपा ही भाजपच्या ताब्यात आहे आणि जोरगेवार हे भाजपविरोधात निवडणूक लढवून आमदार झाले आहे, मात्र कोरोना विरोधात राजकारण बाजूला ठेवत किशोर जोरगेवार यांनी राजकारणाचा घालून दिला आदर्श परिपाठ

  • 17 Apr 2021 03:04 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय आणीबाणी तरीही सरकार गप्प

    उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय आणीबाणी तरीही सरकार गप्प

    आमदार लोकप्रतिनिधी गप्प

    रेमडीसिवीर इंजेक्शन संपले तर लस संपलीने लसीकरण बंद तर केवळ १७ बेड शिल्लक

    कोरोना पाठोपाठ सारीचे नवे संकट ? दुहेरी संकटात जनता

    काल कोरोनाने 23 तर सारीने 9 जणांचा बळी , सारीच्या उपाययोजना नाहीत

    उस्मानाबाद जिल्ह्यात एकही रेमडीसीवीर इंजेक्शन नाही तर कोवक्सिन व कॉविशीलड लस संपली

    नियोजन शून्य कारभार, दोषींवर सरकार कारवाई करणार का

  • 17 Apr 2021 02:48 PM (IST)

    संचारबंदी सुरु असताना हळदी सभारंभात नाचविले बैल, मोठ्या संख्येत लोकांची उपस्थिती

    कल्याण : राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही असा सवाल काही घटनांमुळे उपस्थित होत आहे. कुठे आठवडा बाजार, कुठे बारमध्ये बसून मद्यपान केले जात आहे. आणि आत्ता तर मोठय़ा जल्लोषात हळदी सभारंभ आयोजित करण्यात आला. या हळदी सभारंभात बैल नाचविले गेले. त्यावर पैशाची उधळपट्टी करण्यात आली. या हळदी सभारंभात शेकडो लोक उपस्थित होते. कल्याण पूर्व भागातील चिंचापाडा  गावात हा कार्यक्रम होता. या गावातील रहिवासी प्रकाश म्हात्रे यांच्या मुलगा वैभव याचा हळदी कार्यक्रम होता. प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र नागरीकांना कोरोना आणि कायदयाची भिती राहिली नाही. या लोकांचे करायचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • 17 Apr 2021 02:47 PM (IST)

    पुण्यात कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक कुटुंब संपवलं

    पुणे :

    कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक कुटुंब संपवल

    पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या १५ दिवसांत कोरोनाने मृत्यू

    आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा मृत्यू

    पुजेच्या निमित्ताने एकत्र आलं होतं सर्व कुटुंब, पुजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग

  • 17 Apr 2021 01:54 PM (IST)

    मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये तुफान गर्दी

    नवी मुंबई –

    – मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये तुफान गर्दी

    – सामाजिक अंतराचा फज्जा तर नियमांची ऐशीतैशी

    – संचार बंदीच्या तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी

    – राज्य सरकारने कडक नियम जाहीर करून सुद्धा सरसकट नियमांचे उल्लंघन

    – मार्केट लवकरच कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची चिन्हे

  • 17 Apr 2021 12:26 PM (IST)

    अनावश्यक फिरणाऱ्यांची रत्नागिरीत थेट अॅन्टिजजेन टेस्ट

    रत्नागिरी –

    अनावश्यक फिरणाऱ्यांना चोप बसवण्यासाठी आरोग्य यंत्रणाची नामी शक्कल

    अनावश्यक फिरणाऱ्यांची रत्नागिरीत थेट अॅन्टिजजेन टेस्ट

    रत्नागिरीतल्या मारूती मंदिर परिसरात पोलिसांच्या माध्ममातून आरोग्य विभागाची धडक कारवाई

    अनावश्यक फिरणारा आढळल्यास त्यांची त्वरीत अँन्टीजेन टेस्ट

    टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आढळल्यास त्याची थेट रवानगी कोरोना रुग्णालयात

  • 17 Apr 2021 12:05 PM (IST)

    महिलेचा कोरोना चाचनी अहवाल पॉझिटिव्ह, उपचारासाठी नातेवाईकांची मांत्रिकाकडे धाव, अमरावतीतील प्रकार

    अमरावतीच्या मेळघाटातील धक्कादायक प्रकार

    सेमाडोह येथील महिलेचा कोरोना चाचनी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी नातेवाईकांनी घेतली मांत्रिकाकडे धाव

    45 वर्षीय महिलेचा भवई येथील मांत्रिकाकडे उपचारदर्म्यान मृत्यू

    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांची माहिती

    स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर मेळघाटात अंधश्रद्धा कायम

  • 17 Apr 2021 12:02 PM (IST)

    मुलूंड टी वॉर्डमध्ये मुंबईतले सगळ्यात जास्त मायक्रो कंटेंनमेंट झोन

    मुंबई –

    – मुलूंड टी वॉर्डमध्ये मुंबईतले सगळ्यात जास्त मायक्रो कंटेंनमेंट झोन… हजारो मजले सील करण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे…

    – एकाच इमारतीत पाच पेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने इमारत सील…

    – टि वार्डमध्ये अशा शेकडो इमारती…

    – इमारतीबाहेर पोलिस तैनात करण्याचे निर्देश

    – बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश बंदी

    – वर्तमान पत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे

    – जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्वीकारावे

    – सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे

    – कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार..

  • 17 Apr 2021 11:48 AM (IST)

    पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 11 पर्यंत 19.33 टक्के मतदान

    पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

    सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात

    सकाळी 11 पर्यंत 19.33 टक्के मतदान

    एकूण मतदान-३४०८८९ झालेले मतदान-६५१९८ एकूण टक्केवारी-१९.३३%

  • 17 Apr 2021 11:47 AM (IST)

    गोकुळच्या ठराव धारकाचा कोरोनामूळे मृत्यू

    कोल्हापूर :

    गोकुळच्या ठराव धारकाचा कोरोनामूळे मृत्यू

    मागील आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर आठ ठरावधारक आले होते पॉझीटीव्ह

    त्यातील 54 वर्षीय सुभाष सदाशिव पाटील यांच निधन

    कोल्हापूरमधील खासगी हॊस्पिटलमध्ये झाला मृत्यू

    सुभाष पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील कै. सदाशिव पाटील दूध संस्थेचे ठरावधारक

    गोकुळसाठी 2 मेला होणार आहे मतदान

    थरारक आणि उमेदवारी अर्ज भरलेले काही इच्छुक उमेदवार हे आलेत कोरोना पॉझिटिव्ह

    ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण

  • 17 Apr 2021 11:28 AM (IST)

    रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना नाशिकमध्ये मृत व्यक्तीच्या नावाने रेमडेसीव्हीर दिल्याचा आरोप

    नाशिक –

    रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना नाशिकमध्ये मृत व्यक्तीच्या नावाने रेमडेसीव्हीर दिल्याचा आरोप

    प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गरजू रुग्णांना रेमडेसीवर मिळत नसल्याचा शिवसेनेचा आरोप

    सातपुर भागातील एका व्यक्तीचा मृत्यू झलयानंतर त्याच्या नावाने वितरित करण्यात आले रेमडेसीवर

    दोषींवर कारवाई करण्याची शिवसेनेच्या वतीने मागणी

  • 17 Apr 2021 11:02 AM (IST)

    कणकवली शहरात फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट

    सिंधुदुर्ग –

    कणकवली शहरात फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट, कणकवली बाजारपेठ बंद असून विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यातच रॅपिड टेस्ट केली जात आहे, पोलीस, नगरपंचायत आणि आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई, 10 जणांच्या टेस्टमध्ये दोघेजण कोविड पॉझिटिव्ह सापडले

  • 17 Apr 2021 10:58 AM (IST)

    रेमडेसिव्हर आणि ऑक्सिजन वाटप संदर्भात विदर्भावर अन्याय होत आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

    नागपूर –

    रेमडेसिव्हर आणि ऑक्सिजन वाटप संदर्भात विदर्भावर अन्याय होत आहे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

    वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन घेत आहे

    ठाणे जिल्ह्यात रुग्णा मागे 2 इंजेक्शन मिळत आहे तर नागपुरात मात्र 2 रुग्णा मागे एक एवढा साठा दिला जात आहे

    ऑक्सिजन संदर्भात सुद्धा तीच परिस्थिती आहे

    नागपुरातील मंत्री आपल्या जिल्ह्याला रेमडेसिव्हर मिळवून देण्या साठी पडत आहे कमी

    अनेक जिल्ह्यातील मोठे नेते आपलं वजन वापरून आपल्या जिल्ह्याला इंजेक्शन मिळवून घेत आहे

    गोंदिया मध्ये ऑक्सिजन मुळे रुग्णांचा जीव गेला या कडे लक्ष देण्याची गरज आहे

    विदर्भात मोठ्या प्रमाणात रुग्ण असताना विदर्भातील नेते आपलं वजन का वापरात नाही

    विदर्भातील नेत्यांनी आपलं वजन वापरून हा अन्याय दूर करावा

  • 17 Apr 2021 09:54 AM (IST)

    नागपूरच्या रस्त्यावर आज सकाळच्या वेळी रोजच्या तुलनेत कमी गर्दी पाहायला मिळत आहे

    नागपूर –

    नागपूरच्या रस्त्यावर आज सकाळच्या वेळी रोजच्या तुलनेत कमी गर्दी पाहायला मिळत आहे

    अत्यावश्यक सेवेतील नागरिक बाहेर पडत आहे

    रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त

    बाहेर पडणाऱ्यांची चेकिंग सुरू

    सकाळ च्या वेळी लॉक डाऊन ला काहीसा प्रतिसाद मिळत असला तरी विकेंड मुळे दुपारी नागरिक बाहेर पडतील का याकडे लक्ष

    पोलिसांनी नियम कडक केल्याने होत आहे काहीसा फायदा

    ठिकठिकाणी पोलिसांची चेकिंग सुरू

  • 17 Apr 2021 09:50 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासात 234692 नवीन कोरोना रुग्ण

    देशात गेल्या 24 तासात 234692 नविन कोरोना रुग्ण

    123354 जणांना डिस्चार्ज

    1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण कोरोना बाधीत 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 वर

    आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जणांना देण्यात आला डिसचार्ज

    देशात 16 लाख 79 हजार 740 जणांवर उपचार सुरु

    आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत देशात 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 लसीकरण

  • 17 Apr 2021 09:42 AM (IST)

    संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी ही नालासोपारा रेल्वे स्थानकात गर्दीच चित्र कायम

    नालासोपारा :

    संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी ही नालासोपारा रेल्वे स्थानकात गर्दीच चित्र कायम

    शनिवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे कामावर जाणारे प्रवासी कामाला जात आहेत

    कामावर जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीची धडपड तीच आहे

    तीच गर्दी लोकल आणि प्लॅटफॉर्म वर दिसत आहे

    राज्यसरकार ने संचारबंदी सुरू केली

    अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रेल्वेतून प्रवास करणार असा निर्णय आहे

    पण त्या निर्णयाचा राज्यसरकार आणि रेल्वे प्रशासनात अभाव दिसून येत असल्याचेच चित्र मागच्या तीन दिवसात दिसून येत आहे

    त्यामुळे कोरोनाची अशा गर्दीतून कोरोनाची साखळी तुटेल का असाच प्रश्न आहे

  • 17 Apr 2021 09:21 AM (IST)

    रत्नागिरीत अन्न औषध प्रशासनाची धडक मोहिम, नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दुकानांवर कारवाई

    रत्नागिरी- नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दुकानांवर कारवाई रत्नागिरीत अन्न औषध प्रशासनाची धडक मोहिम हिरापन्ना मिठाई दुकानदाराला ११ हजारांचा दंड तर एका हाॅटेलवर सुद्धा दंडाची कारवाई त्याशिवाय शहरातील सात मिठाई दुकानांनी नियमांचे उल्लंघन केल्याने बंद ठेवण्याचे आदेश अन्नपदार्थ पुरवणाऱ्या करणाऱ्या व्यवसायिकांना होम डिलिव्हरीचा पर्याय

  • 17 Apr 2021 09:20 AM (IST)

    मध्यप्रदेशसह इतर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे अनिवार्य

    अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला

    आता मध्यप्रदेशसह इतर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी आता कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे अनिवार्य

    आता अमरावती जिल्ह्यातील सीमेवर तसे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे

  • 17 Apr 2021 08:55 AM (IST)

    विकेंड लॉकडाऊनच्या नियमांची पुणेकरांकडून पायमल्ली, मॉर्निंग वॉकसाठी अनेक पुणेकर रस्तावर

    पुणे

    विकेंड लॉकडाऊनच्या नियमांची पुणेकरांकडून पायमल्ली

    मॉर्निंग वॉकसाठी अनेक पुणेकर रस्तावर

    तर एफसी रस्त्यावर हॉटेल रुपालीबाहेर पुणेकर झाले जमा

  • 17 Apr 2021 08:54 AM (IST)

    संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी विरार रेल्वे स्थानकात काही प्रमाणात गर्दी ओसारल्याचे चित्र

    विरार –

    संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी विरार रेल्वे स्थानकात काही प्रमाणात गर्दी ओसारल्याचे चित्र आहे

    शनिवारच्या दिवस नेहमीप्रमाणे कामावर जाणारे प्रवासी कामाला जात आहेत..

    पश्चिम रेल्वेचे शेवटचे स्थानक विरार आहे. याठिकाणावून हजारो प्रवासी मुंबईच्या दिशेने जातात.. मात्र ती गर्दी आज प्लॅटफॉर्म वर मात्र दिसली नाही

  • 17 Apr 2021 08:50 AM (IST)

    नागपूर कोव्हिड रुग्णालयांना मिळणार सुरळीत ऑक्सिजन पुरवठा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

    नागपूर –

    कोव्हिड रुग्णालयांना मिळणार सुरळीत ऑक्सिजन पुरवठा

    जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची माहिती

    ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन जाहीर

    रुग्णालय प्रतिनिधी, ऑक्सिजन पुरवठादार यांची संयुक्त बैठक

    हॉस्पिटलनिहाय ऑक्सिजन वाटप होणार

    तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

    जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

  • 17 Apr 2021 08:12 AM (IST)

    नाशकात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनाची कारवाई

    नाशिक –

    विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनाची कारवाई

    रस्त्यावर विना कारण फिरणाऱयांची केली कोव्हिडं टेस्ट

    14 इसमांची टेस्ट केल्यानंतर 1 जण सापडला पॉझिटिव्ह

    शहरातील अशा सुपर स्प्रेडर्स वर पोलिसांची कारवाई सुरूच

    नागरिकांनी सहकार्य करण्याचं पोलिसांच आवाहन

  • 17 Apr 2021 08:12 AM (IST)

    पुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाची कठोर पावले

    पुणे :

    मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाची कठोर पावले

    सोमवारपासून बाजारातील डमी, किरकोळ लिंबू विक्रेते आणि रिक्षाला प्रवेश बंद

    तसेच अडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास

    प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि पास दाखविल्याशिवाय बाजारात प्रवेश नाही

    बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांची माहिती

  • 17 Apr 2021 07:10 AM (IST)

    नागपूर पोलिसांची 4 हजार 261 जणांवर कारवाई

    नागपूरृ –

    अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी आता कारवाईचा चांगलाच बडगा उगारला

    काल दिवसभरात जोरदार कारवाई करत 4 हजार 261 जणांवर कारवाई केली

    तर 2244 वाहन ताब्यात घेण्यात आली

    मास्क न वापरणाऱ्या 735 तर सोशल डिस्टनसिंग च पालन न करणाऱ्या 1282 जणांवर कारवाई

    आता पोलीस आणि महापालिका सयुक्त पणे ड्राइव्ह राबविण्याच्या तयारीत

    बिना कामाने फिरणाऱ्याची करणार ची जागीच अँटीजन टेस्ट करण्याची तयारी

    लॉक डाऊन च्या काळात नियम कडक असताना ही घराबाहेर पडणार्यावर होणार आता जोरदार कारवाई

  • 17 Apr 2021 07:02 AM (IST)

    सोलापुरात आता दुपारी एक वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व स्थापन होणार बंद

    सोलापूर –

    सोलापुरात आता दुपारी एक वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व स्थापन होणार बंद

    महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने ,भाजीपाला ,फळांची दुकाने ,डेअरी बेकरीसह सर्व आस्थापना राहणार बंद

    पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आदेश

    शहरातील दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट अथवा टी पी सी आर करणे बंधनकारक

    दूध संकलनासाठी डेअरी सायंकाळी सहा ते सात या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा

  • 17 Apr 2021 07:02 AM (IST)

    सोलापुरात रेल्वेकडून बोगीत आयसोलेशन वाढीच्या निर्मितीसाठी 57 कोच दाखल

    सोलापुर –

    सोलापुरात आले रेल्वेचे 57 कोच

    सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ

    पुन्हा एकदा रेल्वेकडून बोगीत आयसोलेशन वाढीच्या निर्मितीसाठी 57 कोच दाखल

    513 रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

    एका कोचमध्ये नऊ रुग्णावर होणार उपचार

  • 17 Apr 2021 07:00 AM (IST)

    लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवेच्या दुकानात होत असलेली गर्दी बघता ऑड-इव्हनचा निर्णय

    नागपूर –

    लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवेच्या दुकानात होत असलेली गर्दी बघता ऑड-इव्हनचा निर्णय

    आता अत्यावश्यक सेवेतील दुकान ऑड इव्हन पद्धतीने राहणार सुरू

    पाच झोन करिता घेण्यात आला निर्णय

    धरमपेठ , धंतोली , आसिनगर , सतरंजी पुरा ,आणि मंगळवारी झोन साठी घेण्यात आला निर्णय

    महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी आणि काढले आदेश

    गर्दी टाळणे साठी घेण्यात आला निर्णय

  • 17 Apr 2021 06:58 AM (IST)

    कोरोनाची लक्षणे आढळून आलेले मतदारही करु शकतात मतदान

    सोलापूर –

    कोरोनाची लक्षणे आढळून आलेले मतदारही करु शकतात मतदान

    कोरोना नियमाचे पालन करून शेवटच्या एक तासांमध्ये मतदान करण्याची परवानगी

    कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी मतदान केंद्राबाहेर प्राथमिक स्वरूपाचे साहित्य ठेवण्यात येणार

  • 17 Apr 2021 06:50 AM (IST)

    पंढरपूर, मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

    सोलापूर –

    पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

    राष्ट्रवादी काँग्रेस भाजप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारासह 19 निवडणूक रिंगणात

    3 लाख 40 हजार मतदार बजावणार आपल्या मतदानाचा हक्क

    सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणार मतदान

    524 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज

    4170 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात

  • 17 Apr 2021 06:48 AM (IST)

    राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह

    राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह

    राज्यात आज 398 कोरोना बाधितांचा मृत्यू

    राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय

    राज्यात आज 45,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

    सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये

Published On - Apr 17,2021 11:02 PM

Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.