Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले असून, राज्यात 1 जूनपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
दोन महिन्यांपूर्वी राव यांना झाली होती पहिल्यांदा कोरोनाची लागण
मागच्या शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर राव यांनी घेतली होती कोरोना लस
-
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या राहणार बंद, वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या राहणार बंद
मंगळवार (18 मे) रात्री 12 पासून 31 मे पर्यंत बाजर समित्या बंद ठेवण्याचे आदेश
अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णांमध्ये भर
-
-
राज्यात आज 26,616 नवे रुग्ण सापडले, मृतांची संख्याही घटली
राज्यात आज 26,616 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 516 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.53 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 26,616 नवीन रुग्ण सापडल्यानंतर राज्यात आज रोजी एकूण 4,45,495 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 54,05,068 झालीय.
-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 547 नवे रुग्ण, 769 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद कोरोना अपडेट
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 547 नवे रुग्ण
07 जणांच मृत्यू तर 769 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुका 153, तुळजापूर 79, उमरगा 32, लोहारा 72, कळंब 46, वाशी 69, भूम 46 व परंडा 59 रुग्ण
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
8 मे – 628 रुग्ण – 11 मृत्यू
9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू 14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5458 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 63 हजार 076 नमुने तपासले. त्यापैकी 49 हजार 503 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण सापडण्याच दर 37.29 टक्के
42 हजार 923 रुग्ण कोरोनामुक्त
1121 रुग्णांचा मृत्यू तर 2.27 टक्के मृत्यूदर
-
गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव, खासगी रूग्णालयात एका रुग्णाची नोंद
गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव
खासगी रूग्णालयात एका रुग्णाची नोंद
म्युकर मायकोसिसचे आणखी 20 संशयित रूग्ण, अनेकांवर नागपुरात उपचार
कोरोनानंतर म्युकरमायकोसिसमुळे खळबळ
-
-
चंद्रपूरमध्ये 24 तासात 564 नव्या रुग्णांची नोंद
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 564 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 23 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 78139
एकूण कोरोनामुक्त : 67675
सक्रिय रुग्ण : 9189
एकूण मृत्यू : 1275
एकूण नमुने तपासणी : 436021
-
वसई विरारमध्ये 24 तासात 200 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
वसई-विरार कोरोना अपडेट
मागच्या 24 तासात 200 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 07 जणांचा मृत्यू
765 जणांनी केली कोरोनावर मात
वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63,008 वर
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 52,795 वर
आतापर्यंत एकूण 1271 जणांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8942 वर
-
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1723 जण कोरोनामुक्त
नाशिक कोरोना अपडेट
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1723
दिवसभरात 1781 कोरोना रुग्णांची नोंद
नाशिक मनपा- 746
नाशिक ग्रामीण- 1022
मालेगाव मनपा- 013
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4130
आज कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -30
नाशिक मनपा- 08 जणांचा मृत्यू
मालेगाव मनपा- 02 न
नाशिक ग्रामीण- 20 जणांचा मृत्यू
-
नागपूर जिल्ह्याला दिलासा 3894 जणांची कोरोनावर मात, 971 नव्या रुग्णांची नोंद
नागपूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा, कोरोना रुग्णसंख्या आली हजारच्या खाली
– जिल्हयात 24 तासांत 3894 जणांनी केली कोरोनावर मात
– 24 तासांत जिल्हयात 971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– 24 तासांत जिल्ह्यात 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू
– जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 26890 वर
– जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 13261 जणांची कोरोना चाचणी
-
सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन सात दिवसांनी वाढवला
सांगली : सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन हा सात दिवसांनी वाढवण्यात आला आहे. 19 मे पासून 26 मेपर्यंत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तसे जाहीर केले आहे
-
गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात आढळले 132 नवे रुग्ण
गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट
आज वाढलेले रुग्ण – 132 आज झालेले मृत्यू – 04 आज बरे झालेले – 364
तालुकानिहाय रुग्णसंख्या
गोंदिया————–37
तिरोडा————–11
गोरेगाव————–07
आमगाव————–25
सालेकसा————-08
देवरी——————14
सडक अर्जुनी ———–09
अर्जुनी मोरगाव——–21
एकूण रुग्ण – 39461
एकूण मृत्यू – 641
एकूण बरे झालेले – 35941
एकूण उपचार घेत असलेले – 2879
-
वाशिममध्ये दिवसभरात आढळले 410 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू
वाशिम कोरोना अपटेड
जिल्ह्यात आज 03 रुग्णांचा मृत्यू
नवे आढळलेले 410 रुग्ण
तर 491 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 17 दिवसांत 78 रुग्णांचा मृत्यू
तर सतरा दिवसांत 8799 कोरोना रुग्ण आढळले
या दरम्यान 8229 जण कोरोनामुक्त झाले
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 36159
सध्या सक्रिय असलेले रुग्ण – 4401
आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 31383
आतापर्यंत एकूण मृत्यू – 374
-
पुण्यात दिवसभरात 684 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, 2790 रुग्णांना डिस्चार्ज
– दिवसभरात 684 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 2790 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 66 रुग्णांचा मृत्यू, 23 रूग्ण पुण्याबाहेरील
– 1402 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 459987
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 18440
– एकूण मृत्यू -7749
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 433798
-
सांगली जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता, भाजीपाला, किराणा दुकान, बेकरी, फळ विक्रेत्यांना घरपोच सेवा देता येणार
सांगली कोरोना अपटेड
सांगली जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता
19 तारखेपासून 26 तारखेपर्यंत काही प्रमाणात शिथिलता
भाजीपाला, किराणा दुकान, बेकरी, फळ विक्रेते यांना घरपोच सेवा देता येणार
सांगली जिल्ह्यात 15 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले
जिल्हाअधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
-
पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे, 2 आठवड्यात 70 रुग्ण दाखल
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे तब्बल 12 रुग्ण दगावले आहेत. दोन आठवड्यात म्युकरमायकोसिसचे तब्बल 70 रुग्ण दाखल झाले आहेत. दररोज किमान 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. खासगी रुग्णालयातही या आजारावर उपचार सुरू आहेत. मात्र महापालिकेकडे नेमके किती रुग्ण खासगी रुग्णालयात आहेत याची माहिती नाहीये. थोडी लक्षण दिसताच उपचार घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.
-
सोलापुरात अंत्ययात्रेला हजर असणाऱ्या लोकांची धरपकड, दोनशेहून अधिक जणांवर गुन्हा
सोलापूर-सदर बझार भागात पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंत्ययात्रेला हजर असणाऱ्या लोकांची धरपकड
काल काँग्रेस कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला झाली होती हजारोंची गर्दी
दोनशेहून अधिक जणांवर झाला आहे गुन्हा दाखल
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या भागातील लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार
तर पाथरूड चौक, ताशकंद चौक प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
पाथरूट चौकाला पोलिसांनी लावले बॅरिकेट्स
-
अपयश झाकून राज्याला केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय- देवेंद्र फडणवीस
अहमदनर : कोपरगाव येथील 40 ऑक्सिजन बेडच्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
संजीवनी उद्योग समूहाने सुरू केलंय कोविड केअर सेंटर
राज्यसरकारला आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्याची सवय लागलीय
कधीतरी आत्मचिंतन करून काय करावं याचा विचार राज्यसरकारने केला पाहिजे आपत्ती कुठल्याही पक्षाची नाही. सगळ्यांनी मिळून काम करायचंय आहे
चांगलं झालं तर आपली पाठ थोपटून घेतात आणि कमतरता दिसली की केंद्राकडे बोट दाखवत आहेत
देवेंद्र पडणवीस यांची सरकारवर टीका
-
पुणे जिल्ह्यात टॉसिलीझूमँब औषधांचा मोठा तुटवडा
पुणे
पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून टॉसिलीझूमँब औषधाचा पुरवठा,
पुरवठा होत नसल्याने औषधाचं प्रमाण घटलं,
400 मि.ग्रँ.व्हायल्स ऐवजी 80मी.ग्रँ. व्हायल्सचा पुरवठा,
980 व्हायल्स अन्न व औषध प्रशासनाला झाल्या प्राप्त,
जिल्ह्यातील 107 रुग्णालयांना होणार पुरवठा,
गरज असलेल्या रुग्णालाच औषध देण्याच्या सूचना …
जिल्ह्यात टॉसिलीझूमँब औषधांचा मोठा तुटवडा .
-
उस्मानाबाद जिल्हा कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गचा आकडा कायम असून जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक
उस्मानाबाद जिल्हा कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह
शनिवारी 35 तर रविवारी 98 कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यात 9 महिला कैदी यांचा समावेश आहे .
या सर्वांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती त्यामुळे एकच खळबळ उघडली आहे.
कारागृहातील 272 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती त्यात 133 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत म्हणजे 49 टक्के कैदी पॉझिटिव्ह आले आहेत.
-
सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं हे राजकारण : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
केंद्राने राज्याला तब्बल 5 हजार व्हेंटिलेटर दिले आहेत, त्यातले काही व्हेंटिलेटर खराब असतील 5 किंवा 10 टक्के व्हेंटिलेटर खराब असतील पण सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं हे राजकारण आहे, जे काही व्हेंटिलेटर खराब आहेत दुरुस्त केले पाहिजेत आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे
-
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली, बाजारपेठ पुन्हा सुरु
– नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून बाजारपेठ चालू ठेवण्याचा निर्णय
आज सकाळी सातपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत बाजारपेठ चालू
अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच खाजगी अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे
-
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 2,81,386 नवे कोरोना रुग्ण, 4,106 जणांचा मृत्यू
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 2,81,386 नवे कोरोना रुग्ण आढळून आले
तर 3,78,741 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले
गेल्या 24 तासांत देशात 4,106 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला
एकूण रुग्ण : 2,49,65,463 एकूण बरे होणाऱ्यांची संख्या : 2,11,74,076 एकूण मृत्यू : 2,74,390 सक्रिय रुग्णसंख्या : 35,16,997
एकूण लसीकरण : 18,29,26,460
India reports 2,81,386 new #COVID19 cases, 3,78,741 discharges and 4,106 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,49,65,463 Total discharges: 2,11,74,076 Death toll: 2,74,390 Active cases: 35,16,997
Total vaccination: 18,29,26,460 pic.twitter.com/RJCDwbzyha
— ANI (@ANI) May 17, 2021
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर, भाजप आमदार अतुल सावे यांनी उभारलेल्या कोविड सेंटरचे करणार उद्घाटन
औरंगाबाद –
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर
भाजप आमदार अतुल सावे यांनी उभारलेल्या कोविड सेंटरचे करणार उद्घाटन
थोड्याच वेळात कोविड सेंटरचे फडणवीस करणार उद्घाटन
आमदार अतुल सावे यांनी उभारलंय 50 बेडचे कोविड सेंटर
आजपासून कोरोना रुग्णांसाठी खुलं होतंय कोविड सेंटर
-
सोलापूर शहरात येणार्या वाहनचालकांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासण्यात येणार
सोलापूर – शहरात येणार्या वाहनचालकांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासण्यात येणार
कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येणार
यापूर्वी शहरात प्रवेश करणाऱ्या परजिल्ह्यातील वाहनचालक आकडे कोरणा चाचणी अहवाल असणे होते सक्तीचे
लांब पल्ल्याच्या वाहनात दोन चालक आणि एक हेल्पर अशा तिघांना आहे परवानगी
पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आदेश
-
लससाठा उपलब्ध न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण बंद
पिंपरी-चिंचवड
– लससाठा उपलब्ध न झाल्याने शहरातील लसीकरण बंद
-पिंपरी-चिंचवड महापालिकेला शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे आज कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व लसीकरण केंद्र बंद
-लसीकरण केंद्र बंद असल्याने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये नागरीकांनी गर्दी न करण्याचे महापालिके कडून आवाहन
-दरम्यान शहरातील 4 लाख 63 हजार 494 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे
-
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर पोलिसांकडून कारवाईचा धडाका
कोल्हापूर :
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर पोलिसांकडून कारवाईचा धडाका
काल दिवसभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां तब्बल 1 हजार 506 जणांवर गुन्हे दाखल
233 वाहन देखील केली जप्त,तर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांवर ही दंडात्मक कारवाई
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 16 ते 23 मे दरम्यान जाहीर करण्यात आलाय कडक लॉकडाऊन
-
पुणे महापालिकेकडे लसीचा साठा संपल्यामुळे आज शहरातील लसीकरण बंद राहणार
पुणे –
– महापालिकेकडे लसीचा साठा संपल्यामुळे आज शहरातील लसीकरण बंद राहणार,
– कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसीचे डोस संपले असून, सरकारकडून नव्याने लस पुरवठा करण्यात आलेला नसल्याने शहरातील सर्व लसीकरण मोहीम बंद असणार आहे,
– गेल्या आठवड्यात महापालिकेला सरकारकडून मिळालेले कोव्हीशील्ड लसीचे २८ हजार डोस शुक्रवारीच संपले आहेत.
– तर ३ हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असल्याने त्याचे शनिवारी आणि रविवारी नियोजन केले आहे.
– लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन जाहीर केले जाईल पालिकेकडून स्पष्ट,
– १६ जानेवारी ते १५ मे पर्यंत शहरात सर्व वयोगटांमध्ये पहिला व दुसरा डोस मिळून ९ लाख ४६ हजार जणांना लस दिली आहे.
-
नाशिक शहरातील 9 केंद्रांवर आज लसीकरण मोहीम
नाशिक –
शहरातील 9 केंद्रांवर आज लसीकरण मोहीम
6 केंद्रांवर 45 वर्षा पुढील लोकांना कोव्हीशिल्ड चा पहिला डोस
केंद्रांवर 45 पुढील लोकांना कॉवक्सिन चा डोस
रजीस्ट्रेशन केलेल्यांना मिळणार लस
या व्यतिरिक्त गर्दी न करण्याचा प्रशासनाचे आवाहन
-
पुणे महापालिका करणार 20 टन ऑक्सिजनची निर्मिती
पुणे –
– पुणे महापालिका करणार 20 टन ऑक्सिजनची निर्मिती,
– पालिकेचे दोन प्रकल्प सुरू झाले असून एकूण १२ प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत,
– त्याद्वारे आॅक्सीजन निर्मितीची क्षमता प्रति मिनिट १०.५८३ लिटर म्हणजे दिवसाला २० टन इतकी होणार आहे,
– पालिकेच्या मध्यम आणि मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसविण्याचे काम सुरू,
– ८ रुग्णालयात १२ प्रकल्प सुरू केले जातील. यासाठीचे आवश्यक सामग्री अमेरिका, फ्रांस आणि नेदरलँड येथून मागविण्यात आली आहे,
– या सर्व प्रकल्पांतून १०५८३ लिटर प्रति मिनीट ऑक्सिजन निर्माण होणार असून ४० टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा करणेसाठी एकूण ७ टँक बसविण्यात आले आहेत.
-
बुलडाणा जिल्ह्यात म्युकरमायकोसिस औषधांचा तुटवडा
बुलडाणा
जिल्ह्यात म्युकरमायकोसिस औषधांचा तुटवडा
जिल्ह्यात 16 संशयित म्युकरमायकोसिसचे रुग्ण,
जिल्ह्यातील एकही मेडिकलवर औषधी उपलब्ध नाही
नागपूर डेपोला मागणी केली असली तरी अद्यापही जिल्ह्यात औषधी उपलब्ध नाही
आजाराने ग्रस्त रुग्णांना नागपूर आणि औरंगाबादला जाऊन घ्यावे लागत आहे उपचार
तर दुसरीकडे रुग्णासंख्या वाढत असल्याचे चित्र
-
कोल्हापूर पोलिसांकडून मिशन संवेदना उपक्रमात अंतर्गत धनगर वाड्यात पोहचवलं जातंय जीवनावश्यक साहित्य
कोल्हापूर
लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील धनगर वाड्याच्या मदतीला कोल्हापूर पोलीस दल धावल
कोल्हापूर पोलिसांकडून मिशन संवेदना उपक्रमात अंतर्गत धनगर वाड्यात पोहचवल जातंय जीवनावश्यक साहित्य
गगनबावडा तालुक्यातील बावेली पैकी धनगरवाडा, जर्गी पैकी धनगरवाडा,शेळोशी पैकी धनगरवाडा इथल्या 100 हुन अधिक कुटुंबांना पोलिसांकडून धान्यवाटप
कामाच्या निमित्ताने आलेल्या परराज्यातील कुटुंबियांनाही किट वाटप
रानमेवा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या धनगर वाड्यातील लोकांवर लॉकडाऊनमूळे मुळे आली होती उपासमारीची वेळ
पोलीस दलाच्या मिशन संविधानामुळे अनेक कुटुंबांना मिळाला आधार
-
नाशिक महापालिकेला आज मिळणार 1000 रेमडिसिव्हर
नाशिक – महापालिकेला आज मिळणार 1000 रेमडिसिव्हर
5 दिवसानंतर रेमडिसिव्हर मिळणार असल्याने दिलासा
जिल्हा रुग्णालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात घेतले होते 250 रेमडिसिव्हर
पुढच्या दोन दिवसात आणखी रेमडिसिव्हर येण्याची शक्यता
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद –
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर
भाजप आमदार अतुल सावे यांच्या कोविड सेंटरचे करणार उद्घाटन
विभागीय आयुक्त कार्यालयात घेणार कोरोना परिस्थितीचा आढावा
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कोविड सेंटरची करणार पाहणी
देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष
-
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढले पाचपट रुग्ण
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढले पाचपट रुग्ण
तर 71 टक्के मृत्यू दुसऱ्या लाटेत
मागील साडेचार महिन्यात 362 जणांचा मृत्यू झालाय आणि 65398 कोरोनाबधित आढळले
शिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 90. 89 टक्क्यांवर
तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घेऊन तयारी करणेची गरज आहे
-
नाशिक बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरण, राजेंद्र ताजनेच्या शोधार्थ पोलोसांचे 2 पथक रवाना
नाशिक –
बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरण
राजेंद्र ताजनेच्या शोधार्थ पोलोसांचे 2 पथक रवाना
राजेंद्र ताजने अद्याप फरार
व्हिडियो च्या माध्यमातून ताजनेन दिली आपल्या गुन्हयची कबुली
पोलिसांनी केला आहे ताजने विरोधात गुन्हा दाखल
-
शेकापचे जेष्ठ नेते प्रा एन.डी.पाटील यांनी वयाच्या 92 व्या वर्षी केली कोरोनावर मात
कोल्हापूर
शेकापचे जेष्ठ नेते प्रा एन.डी.पाटील यांचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा दिसला
वयाच्या 92 व्या वर्षी केली कोरोनावर मात
पाटील यांना काही दिवसांपूर्वी झाला होता कोरोना संसर्ग
10 दिवसाच्या यशस्वी उपचारा नंतर एन.डी.पाटील घरी परतले
-
औरंगाबादेत मुकरमायक्रोसिस आजाराचा कहर, दीड महिन्यात 16 जणांचा बळी
औरंगाबाद –
औरंगाबादेत मुकर मायक्रोसिस आजाराचा कहर
मुकरमायक्रोसिसमुळे औरंगाबादेत दीड महिन्यात 16 जणांचा बळी
तर तब्बल 201 जणांना या आजाराची लागण
आतापर्यंत 113 जणांचे डोळे काढण्यात आल्याची माहिती
राज्यात मुकर मायक्रोसिसचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत
आणि सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण सुद्धा औरंगाबादेतच
मुकर मायक्रोसिसच्या आजारामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ
-
Cyclone Tauktae Live Navi Mumbai | नवी मुंबई, पनवेलमध्ये सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी
नवी मुंबई, पनवेलमध्ये सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे. मात्र वादळाचा कुठलाही परिणाम नवी मुंबईला जाणवला नाही. हलक्या पावसाच्या सरीने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे . तौत्के’ चक्रीवादळ येत्या १२ तासांत अक्राळ-विक्राळ रुप धारण करू शकतं, अशी धोक्याची सूचना हवामान विभागानं दिली होती त्यानंतर प्रशासन सज्ज झालं होतं.
-
नागपुरात कोरोनापश्चात मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’चं सावट
– नागपुरात कोरोनापश्चात मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’चं सावट
– नागपूर मेडीकलमध्ये ३० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
– मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये ब्रेन ट्युमरही असल्याची माहिती
– कोरोना संक्रमण झाल्यानंतर दोन ते सहा आठवड्यानंतर आजार दिसतो
– लक्षणं दिसल्यास डॅाक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला
-
‘नागपूर मिहानमधील भारत बायोटेक अजित पवारांनी पुण्याला पळवीले’, भाजप नेते कृष्णा खोपडे यांचा गंभीर आरोप
– ‘नागपूर मिहानमधील भारत बायोटेक अजित पवारांनी पुण्याला पळवीले’
– भाजप नेते पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचा गंभीर आरोप
– ‘सिरम आणि भारत बायोटेकला मिहानमध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं’
– ‘राजकीय वजन वापरत अजित पवारांनी पुण्याला पळवले’
– पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह कॅाग्रेस नेते गप्प का?
– आ. कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला सवाल
– ‘भारत बायेटोकला पुण्याला पळवल्याने विदर्भावर अन्याय’
-
पालघरमध्ये आज कोरोना लसीकरण केंद्र बंद
पालघर
पालघरमध्ये आज कोरोना लसीकरण केंद्र बंद
पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचा आदेश
चक्रीवादळा मुळे लसीकरण केंद्र राहणार बंद
-
नागपूरला दिलासा, नव्या कोरोना रुग्णांसह मृत्यूसंख्याही घटली
– नागपूरला दिलासा, नव्या कोरोना रुग्णांसह मृत्यूसंख्याही घटली
– नागपूर जिल्हयात गेल्या २४ तासांत ११३३ नव्या रुग्णांची नोंद
– गेल्या २४ तासांत ४५१९ रुग्ण झाले कोरोनामुक्त
– जिल्ह्यात २४ तासांत ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू
– जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २९८४३ वर आलीय
– सक्रिय रुग्ण कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलाय
-
चंद्रपुरात गेल्या 24 तासात 674 नव्या रुग्णांची नोंद
चंद्रपूर : गेल्या 24 तासात 674 नव्या रुग्णांची नोंद
24 तासांत 20 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 77575
एकूण कोरोनामुक्त : 66226
सक्रिय रुग्ण : 10097
एकूण मृत्यू : 1252
एकूण नमुने तपासणी : 434760
-
राज्यात गेल्या 24 तासांत 34 हजार 389 नवे कोरोना रुग्ण, 974 रुग्णांचा मृत्यू
राज्यात गेल्या 24 तासांत 34 हजार 389 नवे कोरोना रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासांत 59 हजार 318 रुग्णांनी केली कोरोनावर मात
राज्यात गेल्या 24 तासांत 974 रुग्णांचा मृत्यू
-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 492 नवे रुग्ण
उस्मानाबाद कोरोना अपडेट
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवे 492 रुग्ण
09 जणांच मृत्यू तर 687 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुका 196, तुळजापूर 70, उमरगा 20, लोहारा 30, कळंब 38, वाशी 51, भूम 32, परंडा 55 रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5687 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद आतापर्यंत 48 हजार 956 रुग्ण सापडले
रुग्ण आढळण्याचा दर 37.90 टक्के
-
महाराष्ट्रात 1 कोटी 99 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण
महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 99 लाख 12 हजार 924 नागरिकांचे लसीकरण पूर्ण
1,92,742 लाभार्थ्यांना देण्यात आली लस
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती
-
उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक, 272 पैकी 133 कैदी कोरोनाबाधित
उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाचा उद्रेक
272 पैकी 133 कैदी कोरोनाबाधित, 49 टक्के कैद्यांना लागण , 9 महिला कैद्यांचा समावेश
आज 492 रुग्ण, 9 मृत्यू तर 687 बरे – 5 हजार 687 सक्रिय रुग्ण
बंदिस्त कारागृहात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली
-
आज वसई विरार महापालिका क्षेत्रातील लसीकरण पूर्णत: बंद
आज वसई विरार महापालिका क्षेत्रातील लसीकरण पूर्णत: बंद
अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने घेतला निर्णय
लसीकरणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे अहवान पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे
Published On - May 17,2021 10:52 PM