महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE
राज्यात दिवसभरात 9 हजार 798 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 14 हजार 347 रुग्णांची कोरोनावर मात, तर 198 जणांचा मृत्यू
मुंबई : राज्यात उद्यापासून (१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार १९ जून पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सातारा :
महाबळेश्वरचे पाचगणी पर्यटकांसाठी शनिवारपासून खुले होणार
मात्र येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन तपासणी बंधनकारक
कोरोना निगेटीव्ह अहवाल असणाऱ्या पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये दिला जाणार प्रवेश
प्रांताधिकारी संगिता राजापुरकर-चौगुले यांची माहिती
महाबळेश्वर येथे प्रशासनाचे अधिकारी आणि विविध संघटनांच्या बैठकीत निर्णय
अकोला :
अकोला जिल्ह्यात पुढच्या आठवड्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता
अकोला जिल्ह्यात कोरोणा रूग्णांच्या संख्येचा आलेख घसरत असल्यामुळे टाळेबंदीत सोमवार पासून शिथिलता देण्यात येणार आहे
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आदेश
पुणे :
पुण्यात रविवारी मॉल, सर्व दूकानं आणि सलून राहणार बंद,
अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व राहणार बंद,
वाढत्या गर्दीमुळं पालिकेनं घेतला निर्णय,
शनिवारी आणि रविवारी राहणार नियम लागू,
महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
अखेर सिंधुदुर्ग जिल्हा पोहोचला तिसऱ्या टप्प्यात. सोमवारपासून नियमांत होणार शिथिलता. मे महिन्यात दुसऱ्या लाटेत जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट पोचला होता 30 वर मात्र गेल्या 8 दिवसात जिल्ह्यात कोरोना बाबत सकारात्मक चित्र. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट आला 7 ते 8 च्या दरम्यान. तरीही तिसऱ्या लाटेची झळ पोचू नये म्हणून जिल्हावासियांनी अजून ही आवश्यकती काळजी घेण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य राजेश टोपे यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या दोघांनीही कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन इतर उपाययोजना पाळण्याचे आवाहन केले. मात्र बैठक आणि त्या ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन याच मंत्र्यांकडून आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते यांच्या कडून होतात दिसले, मग आता नेमकी कारवाई कोणावर करायची आणि कोण करणार ? सामान्यांना लागू असलेले नियम इथेही लागू होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
सातारा :
सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश झाल्याने जिल्हयातील निर्बंध शिथिल
कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी
मेडिकल सेवा सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहणार सुरु
19 जूनपासून नवीन आदेश लागू
साताऱ्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू
सातारा जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
नागपूरकरांना दिलासा, सव्वातीन महिन्यानंतर नागपूरात कोरोनाचा एकही मृत्यू नाही
– गेल्या २४ तासांत नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये शुण्य कोरोना मृत्यू
– जिल्हयात गेल्या २४ तासांत ५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या आलीय ११०० वर
– जिल्ह्यातील रिकव्हरी रेट पोहोचला ९७.८८ टक्क्यांवर
कोरोनाची तीसऱ्या लाटेबाबत 2 मतप्रवाह आहेत. काहीजण सप्टेंबर तर काही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येईल असा मतप्रवाह आहे. कोरोनाची लाट रोखायची असेल तर नियमांचे पालन व मास्क वापरणे गरजेचे आहे, निर्बंध कमी केल्याने गर्दी होत आहे पण लाट रोखणे हे नागरिकांच्या हातात आहे. स्वयंशिष्ट गरजेची आहे. नियम नाही पाळले तर तिसरी लाट जुलै महिन्यातच येईल. औषधें व इतर व्यवस्था केली आहे. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतुदील 5 जुलै अधिवेशनात मान्यता दिली जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
पुणे :
– दिवसभरात २८० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३१८ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२.
– ४०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७५३७७.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २६५८.
– एकूण मृत्यू -८५१६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६४२०३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९५१
पालघर : पालघर जिल्ह्याची कोरोना श्रेणी पुन्हा घसरली असून पालघर जिल्हा कोरोनाच्या श्रेणी पुन्हा एकदा 3 मध्ये आला आहे . त्यामुळे पालघर जिल्ह्यात 21 जून पासून नवीन निर्बंध लागू असणार आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेली दुकान आणि आस्थापना सोमवार ते रविवार सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकान सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजे पर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमगृह, नाट्यगृह यांच्यावर पुन्हा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर रेस्टॉरंट व हॉटेल सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. पार्सल सेवा कायमपणे सुरू राहणार असून लग्नसमारंभासाठी 50 व्यक्ती आणि अंत्यविधीसाठी वीस व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे .
कांदिवली हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये बोगस लसीकरण प्रकार उघडकीस आला होतं. यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत एकूण चार व्यक्तींना अटक केले आहे. तर एका आरोपीला मध्यप्रदेशमधून घेऊन येत आहे. तर यातील दोन व्यक्ती फरार आहेत. या आरोपींनी लसीकरण करण्यासाठी घेऊन आलेली लस देखील कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडून विकत घेतले नव्हती, असे देखील चौकशीत समोर आलं आहे. नागरिकांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी विविध हॉस्पिटलचा आयडी देखील चोरी करण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी 10 वी नापास आहे.
बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचतील
कोव्हीड आणि खरिपाची घेणार बैठक
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
देशात 73 दिवसांनंतर कोरोना व्हायरसच्या सक्रिय रुग्णांमध्ये 8 लाखांची घट झाली आहे. तसेच, दैनिक पॉझिटिव्हीटी रेटही 3.24 टक्क्यांवर आला आहे
भारत में 73 दिनों बाद कोरोना वायरस के सक्रिय मामले 8 लाख से कम हुए। दैनिक पॉजिटिविटी रेट 3.24% है: स्वास्थ्य मंत्रालय #COVID19
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2021
गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 480 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 587 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 88 हजार 977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
India reports 62,480 new #COVID19 cases, 88,977 discharges & 1,587 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,97,62,793
Total discharges: 2,85,80,647
Death toll: 3,83,490
Active cases: 7,98,656 (below 8 lakh after 73 days)Vaccination: 26,89,60,399 pic.twitter.com/hhd9c2krzs
— ANI (@ANI) June 18, 2021
नाशिक – कोरोना मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ
जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना नोटीस
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बजावली नोटीस
2 दिवसात खुलासा करण्याचे आदेश
सरकारी व खाजगी रुग्णालयात समनव्याचा अभाव असल्याचा ठपका
नोडल अधिकारी अनंत पवार अडचणीत
सोलापूर –
तांत्रिक कारणास्तव आरोग्य केंद्राच्या चार इमारती एक प्राथमिक इमारती धूळखात पडून
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोव्हीड केअर उपचार केंद्र सुरू करण्यासाठी अधिकारी खाली झाली जागेची शोधाशोध करणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इमारती
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यात चार आरोग्य उपकेंद्र एक प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून पूर्ण
पण त्यामधील किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे इमारतीचे अद्याप आरोग्य विभागाकडे हस्तांतरण झाले नाही
उस्मानाबाद –
उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे आज घेणार उस्मानाबाद जिल्हा कोरोना आढावा बैठक , उस्मानाबाद जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लागणार का याकडे लक्ष
लोहारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपान अकेले हे अवमानकारक वागणूक देत असल्याने बदली करण्यासाठी 30 गावातील सरपंचाची लेखी तक्रार , ग्रामसेवक संघटनाही अकेले यांच्या विरोधात
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे गेल्या आठवड्यात 104 कोरोना रुग्ण सापडल्याने 27 जून पर्यंत सर्व दुकाने बंद तर प्रतिबंधित क्षेत्र केले सील , प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा 4.75 टक्के तर जिल्ह्यात केवळ 580 ऍक्टिव्ह रुग्ण त्यापैकी 161 रुग्ण ऑक्सिजनवर व 974 पैकी 813 ऑक्सिजन बेड रिकामे
रत्नागिरी –
जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटिव्हीटी रेट आला कमी
जिल्ह्याचा पाॅझिटिव्ही रेट 8.65 टक्के
पुढील काही दिवसात जिल्ह्यातील कोरोना चाचण्या दहा हजार केल्या जाणार
रत्नागिरी जिल्हा राज्यात कोरोना रुग्ण वाढीत होता नंबर दोनवर
पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट आता लहान मूलांनाही देणार लस,
सिरमची नोव्होव्हँक्स या लसीला क्लिनीकल चाचणीला मिळाली परवानगी,
पुढच्या महिन्यात ( जूलैमध्ये ) लहान मुलांवर क्लिनीकल चाचणीला सिरम सुरुवात करण्याची शक्यता अशी माहिती सूत्रांनी दिलीये,
या आधी भारत बायोटेकच्या कोव्हँक्सिन लसीला लहान मुलांवर क्लिनीकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आलीये,
अमेरीकेतील नोव्होव्हँक्स कंपनीच्या मदतीनं ही लस तयार केलीये वेगवेगळ्या व्हेरीयंटवर प्रभावी आहे
जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 40 लाखांच्या पार पोहोचली
#COVID19 related deaths have surpassed 4 million worldwide, according to a Reuters tally
— ANI (@ANI) June 18, 2021
पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांच्यातर्फे पनवेल महापालिकेस ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर
सुर्योदया फाउंडेशनतर्फे पालिकेस ऑक्सिजन मशिन्स सुपूर्द
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अनुराधा पौडवाल यांचे मानले आभार