Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 29 हजार 911 नवे रुग्ण, तर 734 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
राज्यात दिवसभरात 29 हजार 911 नवे रुग्ण, तर 734 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात 29 हजार 911 नवे रुग्ण गेल्या 24 तासात 47 हजार 371 रुग्ण गेल्या 24 तासात 734 जणांचा झाला मृत्यू
-
सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1304 नवे कोरोनाबाधित, 34 रुग्णांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट :
जिल्ह्यात आज दिवसभरात 1304 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 34 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3080 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 13853 वर
तर उपचार घेणारे 1291 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 88578 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 105511 वर
-
-
पुण्यात दिवसभरात 931 नागरिकांना कोरोनाची लागण, 66 जणांचा मृत्यू
पुणे : – दिवसभरात ९३१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १०७६ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील. – १३२८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६३१०३. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५०४३. – एकूण मृत्यू -७८८७. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४०१७३. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२२६.
-
WHO ने रेमडेसिवीर संदर्भात घेतलेला निर्णय आम्ही राज्याच्या टास्क फोर्सकडे पाठवू : राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे : WHO ने रेमडेसिवीर संदर्भात घेतलेला निर्णय आम्ही राज्याच्या टास्क फोर्सकडे पाठवू राज्याची टास्क फोर्स कोरोना उपचाराचं ट्रिटमेंट प्रोटोकाँल बनवत असतं केंद्रीय टास्क फोर्स आणि राज्य टास्क फोर्स याच्यावर विचार करेल केंद्र जितक्या लस देत आहेत तितक्या आम्ही वापरत आहोत आपली लस देण्याची क्षमता आधिक, परंतु लसीचा पुरवठा कमी
-
नागपूरला मोठा दिलासा, मृत्यूचं प्रमाण कमी, बधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
नागपूर :
आज नागपूरला मोठा दिलासा, कोरोना मृत्यूचं प्रमाण झालं कमी, तर बधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त
नागपूर जिल्ह्यात आज 3405 जणांनी केली कोरोनावर मात
1151 नवीन रुग्णांची नोंद
तर 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्ण संख्या – 467931
एकूण बरं होणाऱ्यांची सांख्य – 440000
एकूण मृत्यू संख्या – 8685
-
-
पुण्यातील डहाणूकर कॉलनीत असलेल्या कमिन्स कंपनीत कोरोनाचा शिरकाव, 50 कर्मचाऱ्यांना लागण
पुणे :
पुण्यातील डहाणूकर कॉलनीत असलेल्या कमिन्स कंपनीत कोरोनाचा शिरकाव,
कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण,
तीन दिवस कंपनी बंद ठेवण्याचे महापालिकेनं दिले आदेश,
कमिन्स कंपनीला कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलंय,
कंपनीतील सगळ्या कर्मचाऱ्यांची चाचणी करून 22 तारखेपर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे दिले आदेश,
दोन महिन्यांच्या कालावधीत 240 जणांना लागण झाली होती यात 3 जणांचा मृत्यू झाला होता,
कंपनीतील कर्मचाऱ्यांचं लसीकरण लवकरात लवकर करून घेण्याचे पालिकेचे आदेश …..
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आदेश…
-
वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 406 नवे रुग्ण, सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
वाशिम कोरोना अपडेट :
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
जिल्ह्यात आज 07 रुग्णांचा मृत्यू
नवे 406 रुग्ण आढळले
तर 467 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 6 दिवसात 28 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 2592 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 2992 कोरोनामुक्त झाले
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 37277
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4101
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 32791
आतापर्यंत एकूण मृत्यू – 384
-
ओरिसातून आलेले ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात दाखल
सोलापूर :
ओरिसातून आलेले ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरातील बाळे येथे दाखल
सोलापूरला 21 मेट्रिकटन ऑक्सिजन प्राप्त
ओरिसा राज्यातून अंगुल जिल्ह्याकडून ऑक्सिजन एक्सप्रेस बाळे येथे दाखल
7 पैकी दोन टँकर सोलापूरला तर उर्वरित टँकर बीड, उस्मानाबाद, बीड, लातूरसाठी रवाना
-
कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरलं जाणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरलं जाणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती, कितीही रुग्ण गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यानंतर काहीच परिणाम होत नसल्याचं समोर आलंय, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय
-
जालना जिल्ह्यात म्युकर मायकोसिसमुळे दोघांचा मृत्यू
जालना जिल्ह्यात कोरोना सोबत आता म्युकर मायकोसिसने पण शिरकाव केला आहे. जास्त काळ व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना म्युकर मायकोसिसची लागण होतेय. जालण्यामध्ये सध्या म्युकर मायकोसिसचे तब्बल 33 रुग्ण आढळून आले आहेत तर 12 जण या म्युकर मायकोसिस आजारातून मुक्त झाले आहेत. या म्युकर मायकोसिसमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली आहे. म्युकर मकोसिस रुग्णांना सध्या इन्फोटेरिसीन बी इंजेक्शन आणि फंक्शनल सायनस इड्सकोपी ट्रीटमेंट दिली जात आहे.
-
देशातील फक्त 14 टक्के नागरिक व्यवस्थित मास्क वापरतात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं मोठं वक्तव्य
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं मोठ वक्तव्य भारतातील लोक अजूनही मास्क बाबत गंभीर नाही 50 टक्के देशातील लोक मास्क घालत नाही 50 टक्के लोक मास्क वापरत आहे त्यापैकी 64 टक्के नाकाला कव्हर करत नाही 20 टक्के लोक हनुवट्टीवर मास्क लावतात 2 टक्के लोक गळ्यावर मास्क घालतात देशातील 14 टक्के व्यवस्थित मास्क वापरतात एका कोरोना स्टडीचा दाखला देत दिली माहिती
-
मध्य रेल्वेच्या पुन्हा सूचना, महाराष्ट्रात येणार्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य
मध्य रेल्वेच्या पुन्हा सूचना महाराष्ट्रात येणार्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य दि. १८ एप्रिल २०२१ आणि १ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ‘संवेदनशील उत्पत्ती’ च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेली सर्व निर्बंधे
-
कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जावं, सोनिया गांधी यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचं पतंप्रधान नरेंद्र मोदीना पत्र कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जावं देशभरातील नवोदय विद्यालयातील 661 शाळांमध्ये अशा मुलांना शिक्षण द्यावं
-
प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे कोरोनाने निधन
आंतरराष्ट्रीय नेमबाजीत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या नेमबाज तसेच प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे आज कोरोनामुळे दु:खद निधन झाले. उपचार सुरु असतांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर काही काळातच मोनाली यांची देखील प्राणज्योत मालवली. ही अतिशय दु:खद बातमी आहे. मोनाली गोऱ्हे यांनी भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक, श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा तज्ञ कै.भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. क्रीडा प्रशिक्षक मोनाली यांच्या निधनामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.. -
म्युकरमायकोसिस आजाराचा साथीचा आजार कायद्यार्गंत समावेश करा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना लिहिलं पत्र
म्युकरमायकोसिस आजाराचा साथीचा आजार कायद्यार्गंत समावेश करा
सर्व सरकारी आणि खासगी रूग्णालयात निदानाच्या सूचना द्याव्यात
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना लिहिलं पत्र
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह 17 जिल्हाधिकारी देखील सहभागी झाले होते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा आढावा घेतला. प्रधान सचिव राजेश भूषण आणि पंतप्रधान मोदी यांनी टेस्टिंग वाढवण्यच्या सूचना दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यानिमित्ताने मोदींनी भोसले यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, या बैठकीत राजेश टोपे यांनी म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनबाबतची मागणी संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.
-
नागपुरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ, आतापर्यंत 53 रुग्णांची नोंद
नागपूर –
नागपुरात वाढत आहे म्युकर मायकोसिसचे रुग्ण
मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 53 रुग्णांची नोंद
18 रुग्णांवर नागपुरात झाल्या यशस्वी शस्त्रक्रिया
अजून मृत्यू ची नोंद नाही
अनेक रुग्णांचे दात आणि जबडे काढावे लागले
-
सोलापूरच्या वळसंग येथे विनाकारण फिरणाऱ्यांची कोव्हिड टेस्ट
सोलापूर –
वळसंग येथे विनाकारण फिरणाऱ्यांची कोव्हिड टेस्ट
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस प्रशासनाकडून विनाकारण फिरणाऱ्या गावकऱ्यांची कोविड टेस्ट
ग्रामीण भागात वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आरोग्य विभागाचे प्रयत्न
-
सलग तिसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्ण वाढते, बळींचा आकडा 650 ने घटला
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 76 हजार 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 874 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 69 हजार 77 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,76,070
देशात 24 तासात डिस्चार्ज –3,69,077
देशात 24 तासात मृत्यू – 3,874
एकूण रूग्ण – 2,57,72,400
एकूण डिस्चार्ज – 2,23,55,440
एकूण मृत्यू – 2,87,122
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 31,29,878
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 18,70,09,792
India reports 2,76,070 new #COVID19 cases, 3,69,077 discharges & 3,874 deaths in last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 2,57,72,400 Total discharges: 2,23,55,440 Death toll: 2,87,122 Active cases: 31,29,878
Total vaccination: 18,70,09,792 pic.twitter.com/ZyTh8pZano
— ANI (@ANI) May 20, 2021
-
पुण्यातील जम्बो रुग्णालय 25 जूलैपर्यंत सुस्थितीत वापरता येणार
पुणे –
जम्बो रुग्णालय 25 जूलैपर्यंत सुस्थितीत वापरता येणार,
आय आयटी दिल्लीने केलेल्या ऑडिट अहवालानं महापालिकेला दिलासा,
या आधीच्या ऑडीटमध्ये जम्बो 31 मे पर्यंतच वापरता येणार असा दिला होता अहवाल,
पावसाळ्याच्या तोंडावर जम्बो करून घेतलं स्ट्रक्चरल ऑडीट,
ऑगस्ट 2020 मध्ये सीओईपीच्या मैदानावर तातडीनं हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली होती…
काही दुरुस्त्याही आय आय टी दिल्लीनं सूचवल्या आहेत…
8 दिवस पथकानं पुण्यात येऊन स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल महापालिकेला सादर केलाय
-
वाशिम जिल्ह्यात आजपासून 27 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला
वाशिम :
वाशिम जिल्ह्यात आजपासून 27 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला
कोणत्या व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय बंदी
जिल्ह्यात केवळ सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंतच सर्व किराणा दुकाने,भाजीपाला,डेअरी ही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, त्यांनंतर कडक संचारबंदी
शिवथाळी, हॉटेल, रेस्टॉरंट 11 ते 7 पर्यंत घरपोच सुविधा
कृषी सेवा केंद्र सकाळी 7 ते 11 सुरू राहतील
शेतकऱ्यांना खरीप हंगाम संबंधित दुकाने हे सकाळी 7 ते 11 पर्यन्त सुरू
बँका सकाळी 10 ते 3 पर्यंत सुरू राहतील
लग्न सोहळ्याकरिता 15 लोकांच्या उपस्थितिला परवानगी
वाशिम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या आदेशांची आजपासून होणार अंमलबाजवणी
-
रायगड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव, आतापर्यंत आढळले 3 रुग्ण
रायगड –
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव
जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 3 रुग्ण
पनवेल शहर , पनवेल ग्रामीण आणि खोपोली येथील प्रत्येकी 1 रुग्ण
तिघांवरही पनवेल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
त्यांच्यासाठी आवश्यक औषधे शासनाकडून उपलब्ध
-
सोलापूर शहरातील सर्वच लसीकरण केंद्रावर आज 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस देण्यात येणार
सोलापूर –
शहरातील सर्वच लसीकरण केंद्रावर आज 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस देण्यात येणार
नोंदणी केलेल्या नागरिकांना आज लस देण्यात येणार
आज प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस येणार
-
‘टीव्ही 9 मराठी’चा इम्पॅक्ट, नागपूरातील ‘विम्स’ रुग्णालयावर कारवाई
– ‘टीव्ही 9 मराठी’चा इम्पॅक्ट, नागपूरातील ‘विम्स’ रुग्णालयावर कारवाई
– नागपूर महानगरपालिकेकडून रुग्णाचे २ लाख ६४ हजार परत करण्याचे आदेश
– विम्स हॅास्पीटल विरोधात मनपाची सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
– ‘टीव्ही ९ मराठी’ ने विम्स हॅास्पीटलकडून रुग्णांच्या होणाऱ्या लुटीची बातमी दाखवली होती
– नागपूरात अनेक खाजगी हॅास्पीटलकडून कोरोना रुग्णांची लूट अद्यापंही सुरुच
-
कोरोनाबाधित मृतकांचे मोबाईल आणि रोख चोरी करणाऱ्या टोळीकडून आणखी सात गुन्हे उघड
नागपूर –
कोरोनाबाधित मृतकांचे मोबाईल आणि रोख चोरी करणाऱ्या टोळीकडून आणखी सात गुन्हे उघड
तहसील पोलिसांनी आवळल्या होत्या मुसक्या
तपासात आणखी सात बाबी समोर आल्याने प्रकरणातील गांभीर्य वाढलं
आरोपी ना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी
-
केंद्राच्या खराब व्हेंटिलेटर प्रकरणात आता हायकोर्टाची उडी
औरंगाबाद –
केंद्राच्या खराब व्हेंटिलेटर प्रकरणात आता हायकोर्टाची उडी
खराब व्हेंटिलेटरची माहिती देण्याचे हायकोटचे आदेश
औरंगाबादला मिळालेल्या खराब व्हेंटिलेटरवरून सुरु आहे देशभर राडा
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला केला होता तब्बल 150 खराब व्हेंटिलेटरचा पुरवठा
केंद्राकडून व्हेंटिलेटर चांगले असल्याचा दिला होता निर्वाळा तर राज्याने खराब व्हेंटिलेटरचा पाठवला होता रिपोर्ट
आता औरंगाबाद खंडपीठाणेही मागवली खराब व्हेंटिलेटरची माहिती
-
नागपुरातील मेडिट्रिना हॅास्पीटलमध्ये होणार नाकाद्वारे देणाऱ्या लसीची ट्रायल
– नागपुरातील मेडिट्रिना हॅास्पीटलमध्ये होणार नाकाद्वारे देणाऱ्या लसीची ट्रायल
– बालकांच्या क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी
– तीन गटात होणार १७ वर्षाखालील मुलांची चाचणी
– चाचणीसाठी प्रत्येक गटात २५ मुलांचा समावेश
– स्वयंसेवकांची नोंदणी करुन, आरोग्य तपासणीनंतरंच देणार लस
-
नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये बधितांची संख्या वाढतेय
नागपूर –
नागपुरात कोरोनाची लाट ओसरायला सुरवात झाली असली तरी शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये बधितांची संख्या वाढतेय
गेल्या 24 तासात 1 हजार 377 नवीन रुग्णांची नोंद त्यात
ग्रामीण भागात 774 रुग्णांनाची नोंद तर शहरात 591
यामुळे ग्रामीण भागात आता लक्ष देऊन नियोजनाची आवश्यकता
-
म्युकरमायकोसिसचे औषध अल्प दरात रुग्णांना द्या, नागपूर खंडपीठाचे सरकारला निर्देश
– म्युकरमायकोसिसचे औषध अल्प दरात रुग्णांना द्या
– मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सरकारला निर्देश
– औषध वापराबाबत एसओपी तयार करण्याचेही सरकारचे आदेश
– म्युकरमायकोसीसबाबत विदर्भात तात्काळ जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे निर्देश
-
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची किंचित वाढ
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची किंचित वाढ
177 वर आलेला कोरोना रुग्णांचा आकडा पोचला 214 वर
तर शहर जिल्ह्यातकाल आढळले 578 रुग्ण
औरंगाबादेत सध्या 6343 रुग्णांवर उपचार सुरू
तर काल दिवसभरात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू
-
वाशिम जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 10 रुग्ण आढळले
वाशिम –
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 10 रुग्ण आढळले,
यातील 8 रुग्ण खाजगी तर 2 रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आले होते
यातील 07 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला
एका रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड याची माहिती
-
पुण्यात दिवसभरात 1164 नवे कोरोनाबाधित, 48 रुग्णांचा मृत्यू
पुणे कोरोना अपडेट :
– दिवसभरात 1164 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 2407 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 48 रुग्णांचा मृत्यू, त्यामधील 24 रूग्ण पुण्याबाहेरील.
– 1348 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 462172
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 15232
– एकूण मृत्यू – 7843
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 439097
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 10806
-
राज्यात दिवसभरात 34 हजार 31 नवे कोरोनाबाधित, 51 हजार 457 रुग्ण बरे, 594 जणांचा मृत्यू
राज्यात आज 34 हजार 31 नवे रुग्ण
राज्यात आज 51 हजार 457 रुग्णांनी केली कोरोनावर मात
राज्यात आज 594 रुग्णांचा मृत्यू
-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे पालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पुणे –
– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पालिकेच्या दहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू,
– यातील नऊ जणांनी लसच घेतली नसल्याचे समोर,
– लस घेण्यात केलेली टाळाटाळ जिवावर बेतल्याचे बोलले जात आहे.
– त्यामुळे आता प्रशासनाने पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची धावपळ सुरू केली आहे,
– शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली,
– मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शहरात अडीच लाखांवर नागरिक बाधित झाले,
– यामध्ये पालिकेच्या १२७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
– मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
– पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एकाच आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने मृत्यूंची चौकशी करण्यात आली.
-
पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये येत्या आठवड्याभरात लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड सुरु केला जाणा
पुणे –
– जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये येत्या आठवड्याभरात लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड सुरु केला जाणार,
– कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याने त्या अनुषंगाने पालिकेकडून खबरदारी घेण्यात येतेय,
– जम्बो कोविड सेंटरमध्ये येत्या आठवड्याभरात लहान मुलांसाठी ‘पेडियाट्रिक वॉर्ड सुरू होणार,
– यामध्ये वीस बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार केला जाणार असून वय वर्षे १ ते १४ पर्यंतच्या मुलांवर उपचार केले जाणार आहेत,
– शिवाय आयसीयू बेड्स ५ बेड, व्हेंटिलेटर बेड्स आणि १० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करणार.
– पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांची माहिती.
-
1 जूनपासून पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होण्याची शक्यता
पुणे –
– 1 जूनपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होण्याची शक्यता
– लसींचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यास खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण पुन्हा सुरू करणे शक्य होणार आहे.
– यासंदर्भात खाजगी रुग्णालयांनी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे,
– रुग्णालयांना कंपन्यांकडून थेट पुरवठा होणार की सरकारमार्फत होणार, लसींची किंमत याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.
– सर्व सुरळीत झाल्यास १ जूनपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे,
– भारत बायोटेक कंपनीने खासगी कंपन्यांना थेट पुरवठा करण्याबाबत सकारात्मकता दर्शविलीय,
– त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांवरील ताणही कमी होऊ शकेल.
-
आता घरीच चाचणी करा, आयसीएमआरची कोरोना RAT चाचणीला परवानगी
आयसीएमआरचं घरीच कोरोना RAT चाचणीला परवानगी, कोरोनाची लक्षण आणि कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेली लोकं ही चाचणी घरीच करू शकतात, Mylab discovery pvt Ltd Pune ला कीट पुरवण्यास परवानगी, कंपनीचा मोबाईल डाऊनलोड करून त्यानुसार घरीच किटच्या माध्यामातून आता टेस्ट करू शकणार, नाकातून स्वँबचा नमुना तुम्ही घेवूनही टेस्ट करू शकता, घरच्या घरी अँटीजन टेस्ट कशी करायची यासाठी कंपनीकडून देण्यात आलेली मार्गदर्शक व्हिडीओ
Published On - May 20,2021 10:08 PM