Corona Cases and Lockdown News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात तब्बल 31 हजार 855 नवे रुग्ण, धोका वाढला

| Updated on: Mar 25, 2021 | 12:06 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात तब्बल 31 हजार 855 नवे रुग्ण, धोका वाढला

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात कोरोनाबाधितांचा दररोज आकडा वाढत आहे. राज्यात आज सर्वाधिक अशा तब्बल 31 हजार 855 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात दिवसभरात आज 95 रुग्णांचा दुर्देवी झाला. राज्यात आतापर्यंत 53 हजार 684 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 कोरोनाबाधित सक्रीय आहेत. तर दिवसभरात 15 हजार 98 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Mar 2021 03:16 PM (IST)

    पुण्यात होळी आणि धुळवड साजरी करण्यास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    पुणे : पुणे जिल्ह्यात होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी,

    – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश,

    – सोसायट्यांच्या मोकळ्या जागेत, हॉटेल किंवा सार्वजनिक जागेत रंगपंचमी साजरी करता येणार नाही,

    – पुणे शहरासह जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

  • 24 Mar 2021 01:23 PM (IST)

    परभणीत 1 एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी, किराणा सामान, दूध घरपोच पुरवणार

    परभणीत आज सायंकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यात कडक संचारबंदी, 1 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी,

    किराणा, भाजीपाला, दुधविक्री, खत बियाणे दुकाने राहणार बंद,

    किराणा सामान, दूध घरपोच पुरवणार

    शासकीय कार्यालये,रुग्णालये मेडिकल, बँका, स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका,वाचनालये,पाणी पुरवठा करणारी वाहने,स्वस्त धान्य दुकाने,माध्यमांची कार्यालये, प्रतिनिधी, गॅस,पेट्रोल पंप यांना संचारबंदीतून सूट

    जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांचे आदेश आदेश

  • 24 Mar 2021 11:39 AM (IST)

    बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद

    बीड: बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन

    समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर

    जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आदेश

    26 मार्चला रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर

    4 एप्रिल पर्यंत राहणार लॉकडाऊन

    अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा कडकडीत बंद राहणार

  • 24 Mar 2021 10:30 AM (IST)

    पुणे महापालिकेचा मोर्चा आता महाविद्यालयांकडे, 1500 बेडची व्यवस्था करणार

    पुणे –

    खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर महापालिकेचा मोर्चा महाविद्यालयांकडे,

    शहरातील तीन मोठी महाविद्यालय पालिकेनं बेडची व्यवस्था करण्यासाठी घेतली ताब्यात

    महाविद्यालयात करणार पालिका 1500 बेडची व्यवस्था,

    हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि बनकर महाविद्यालयात करणार व्यवस्था,

    तर अग्निशमन दलाच्या जागेत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घेणार ताब्यात !

    गरज पडल्यास आणखी शाळा आणि महाविद्यालयात पालिका करणार बेडची व्यवस्था

    महापालिकचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची माहिती….

  • 24 Mar 2021 10:28 AM (IST)

    नंदूरबार जिल्ह्यात दोन दिवसात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    नंदूरबार :- नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे

    दुसरीकडे चिंतेची बाब म्हणजे दोन दिवसांमध्ये तब्बल 12 कोरोनामुळे मृत्यू झाले आहे.

    त्यामुळे प्रशासनासमोर एक आता नवीन आव्हान समोर येऊन ठेपला आहे

    प्रशासनाकडून योग्य ते उपाय योजना केल्या जात आहे

    मात्र त्याला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत नसल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे

    सर्वाधिक रुग्ण हे शहरांमध्ये आढळत आहे तर मृत्यूचे प्रमाण देखील शहरात आहे

  • 24 Mar 2021 10:27 AM (IST)

    सोलापुरात कोरोना संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात नोटीस

    सोलापूर –

    कोरोना संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नऊ गट शिक्षणाधिकारी पाच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना काढली नोटीस

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढली नोटीस

    4 ते 18 मार्च दरम्यान बाली त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्याचे काम होते शिक्षण विभागाकडे

    शिक्षण विभागातर्फे योग्य पद्धतीने काम न झाल्याने सीइओनी काढली नोटीस

  • 24 Mar 2021 10:26 AM (IST)

    भिवंडी करोना अपडेट

    भिवंडी 24 तासात रुग्ण संख्या 076 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 427

    एकूण रुग्ण 14611 एकूण बरे झालेले रुग्ण 13675 एकूण मृत्यु संख्या 00585 उपचार घेत असलेले रुग्ण 00427

  • 24 Mar 2021 10:26 AM (IST)

    शहापूर करोना अपडेट

    शहापूर मध्ये 2 दिवसात रुग्ण संख्या – 46 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 82

    एकूण रुग्ण – 3702 एकूण बरे झालेले रुग्ण – 3499 एकूण मृत्यु संख्या – 126

  • 24 Mar 2021 09:51 AM (IST)

    पुणे महापालिकेने नवीन 38 हजार अँन्टिजेन टेस्ट किट खरेदी केल्या

    पुणे –
    – महापालिकेनं नवीन 38 हजार अँन्टीजेन टेस्ट किट केल्या खरेदी,
    – गेल्या आठवड्यात महापालिकेकडील संपल्या होत्या टेस्ट किट,
    – ससून रुग्णालयाला दिल्या जाणार 20 हजार टेस्ट किट,
    – ससून रुग्णालयात एकही टेस्ट किट नव्हती शिल्लक,
    – 20 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीनं दिली मान्यता..
    – अँन्टीजेन चाचण्यांना आणखी येणार वेग….
  • 24 Mar 2021 08:39 AM (IST)

    खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर पुणे महापालिकेचा मोर्चा महाविद्यालयांकडे

    पुणे –

    खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर महापालिकेचा मोर्चा महाविद्यालयांकडे,

    शहरातील तीन मोठी महाविद्यालय पालिकेनं बेडची व्यवस्था करण्यासाठी घेतली ताब्यात

    महाविद्यालयात करणार पालिका 1500बेडची व्यवस्था,

    हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि बनकर महाविद्यालयात करणार व्यवस्था,

    तर अग्निशमन दलाच्या जागेत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घेणार ताब्यात !

    गरज पडल्यास आणखी शाळा आणि महाविद्यालयात पालिका करणार बेडची व्यवस्था

    महापालिकचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची माहिती….

  • 24 Mar 2021 08:28 AM (IST)

    औरंगाबादमध्ये खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणीवर बंदी

    औरंगाबाद : कोरोनाच्या नावाने रुग्णाची होणारी लूट थांबवण्यासाठी मनपा प्रशासकांचे नवे आदेश..

    होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणाऱ्यांना कन्सलटिंगचे 10 हजाराच्या ऐवजी फक्त 2 हजार रुपये शुल्क..

    आधी डॉक्टर कन्सलटिंगचे घायचे 10 हजार ही लूट पाहता फक्त 2 हजार रुपये घेण्याचे आदेश..

    खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या चाचणीवर बंदी..

    खाजगी लॅबमध्ये चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णाची लूट झाल्याचे आले समोर ..

    जर डॉक्टरानी रुग्णाच्या घरी भेट दिल्यास 300 रुपये घेण्याची मुभा..

  • 24 Mar 2021 08:27 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटस्पॉटची शंभरी

    पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटस्पॉटने शंभरी गाठली आहे. अवघ्या दहा दिवसात पुणे ग्रामपंचायतीची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, मुळशी या तालुक्‍यांतील हॉटस्पॉट ग्रामपंचायतींची संख्या तब्बल दहाच्या पुढे आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला.

    गेल्या महिन्याभरात ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीतील दहापेक्षा अधिक करोनाबाधित संख्या असलेल्या 46 ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यानंतर चारच दिवसांत या हॉटस्पॉट संख्येमध्ये 21 ने वाढ झाली. मात्र या संख्येने आता तब्बल शंभरीचा आकडा गाठला आहे.

  • 24 Mar 2021 08:26 AM (IST)

    पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात, तूर्तास लॉकडाऊन नको : महापौर

  • 24 Mar 2021 08:26 AM (IST)

    नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, 24 तासात 3,095 नवीन रुग्णांची नोंद

    नागपूर –

    नागपुरात वाढतच आहे कोरोना रुग्णांची संख्या

    काल नागपुरात 3095 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    33 जणांचा कोरोना मुळे मृत्यू ,झाल्याने प्रशासनाची आणखी वाढली चिंता

    तर 2136 जण झाले कोरोना मुक्त

    नागपुरात आता वाढत आहे बेड ची मागणी

    खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड ची मागणी वाढत असल्याने चिंता वाढली

    नवीन सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू .. तर काही ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आले

    एकूण रुग्ण संख्या – 199771

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 163081

    एकूण मृत्यू संख्या – 4697

  • 24 Mar 2021 08:25 AM (IST)

    नागपुरात कोरोनाचा कहर, बेडच्या मागणीत वाढ

    नागपूर –

    नागपुरात वाढतच आहे कोरोना रुग्णांची संख्या

    काल नागपुरात 3095 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    33 जणांचा कोरोना मुळे मृत्यू ,झाल्याने प्रशासनाची आणखी वाढली चिंता

    तर 2136 जण झाले कोरोना मुक्त

    नागपुरात आता वाढत आहे बेड ची मागणी

    खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड ची मागणी वाढत असल्याने चिंता वाढली

    नवीन सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू .. तर काही ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आले

    एकूण रुग्ण संख्या – 199771

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 163081

    एकूण मृत्यू संख्या – 4697

  • 24 Mar 2021 08:25 AM (IST)

    कोव्हिड काळात आय.एम.ए.द्वारे रुग्णांचे समुपदेशन, आजपासून ‘कोव्हिड संवाद’

    नागपूर –

    कोव्हिड काळात आय.एम.ए.द्वारे रुग्णांचे समुपदेशन, आजपासून ‘कोव्हिड संवाद’

    नागरिकांच्या शंकाचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून होणार निरसन

    कोव्हिड्‍-१९च्या संक्रमण काळात प्रशासकीय यंत्रणेला सर्वच यंत्रणांनी मदतीचा हात दिला.

    या काळात नागपूरकरांच्या मनात असलेल्या कोव्हिडविषयीच्या अनेक शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आय.एम.ए. धावून आली.

    नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आय.एम.ए.च्या सहकार्याने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे सतत दोन महिने आयोजन करण्यात आले. यातून नागरिकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली.

    दुपारी ३ वाजता आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी आणि सचिव डॉ. राजेश सावरबांधे हे कोव्हिड संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करणार आहेत.

  • 24 Mar 2021 08:24 AM (IST)

    नागपुरात ‘कोव्हिड संवाद’ चे आयोजन, नागरिकांच्या शंकाचे आणि रुग्णांचे समुपदेशन

    नागपूर : कोव्हिड काळात आय.एम.ए.द्वारे रुग्णांचे समुपदेशन आज पासून ‘कोव्हिड संवाद’

    नागरिकांच्या शंकाचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून होणार निरसन

    कोव्हिड्‍-१९च्या संक्रमण काळात प्रशासकीय यंत्रणेला सर्वच यंत्रणांनी मदतीचा हात दिला.

    या काळात नागपूरकरांच्या मनात असलेल्या कोव्हिडविषयीच्या अनेक शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आय.एम.ए. धावून आली.

    नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आय.एम.ए.च्या सहकार्याने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे सतत दोन महिने आयोजन करण्यात आले. यातून नागरिकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली.

    दुपारी ३ वाजता आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी आणि सचिव डॉ. राजेश सावरबांधे हे कोव्हिड संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करणार आहेत.

  • 24 Mar 2021 07:55 AM (IST)

    कोरोनाच्या नावाने रुग्णाची होणारी लूट थांबवण्यासाठी औरंगाबाद मनपा प्रशासकांचे नवे आदेश

    औरंगाबाद –

    कोरोनाच्या नावाने रुग्णाची होणारी लूट थांबवण्यासाठी मनपा प्रशासकांचे नवे आदेश

    होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणार्यांना कन्सलटिंगचे 10 हजाराच्या ऐवजी फक्त 2 हजार रुपये शुल्क

    आधी डॉक्टर कन्सलटिंगचे घायचे 10 हजार ही लूट पाहता फक्त 2 हजार रुपये घेण्याचे आदेश

    खाजगी लॅब मध्ये कोरोनाच्या चाचणीवर बंदी

    खाजगी लॅब मध्ये चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णाची लूट झाल्याचे आले समोर

    जर डॉक्टरानी रुग्णाच्या घरी भेट दिल्यास 300 रुपये घेण्याची मुभा

  • 24 Mar 2021 07:24 AM (IST)

    औरंगाबादेत कामगारांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये कोरोनाचे उल्लंघन 

    औरंगाबाद जिल्ह्यातील बजाज कंपनी मध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे.

    बस मध्ये मोठ्या संख्येने कामगारांना कोंबून आणलं जात आहे आणि नेलं जात आहे.

    त्यामुळे वाळुज गावातील तरुणांनी बजाज कंपनीच्या गेटवर गाड्यांना अडवून मोठा गोंधळ घातला.

    या गाड्यांमुळे आमच्या गावात कोरोना पसरेल, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा अन्यथा गाडी चालू देणार नाही असा इशारा तरुणांनी दिला आहे.

    यावेळी या तरुणांची आणि कंपनीच्या व्यवस्थापकांची बाचाबाची सुद्धा झाली.

  • 24 Mar 2021 07:07 AM (IST)

    धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

    धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन

  • 24 Mar 2021 07:01 AM (IST)

    नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 1 हजार 330 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 1 हजार 330 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे

    तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

    नांदेडमध्ये आतापर्यंत 34 हजार 337 जण पॉझिटिव्ह आले आहेत

    त्यातील 26 हजार 293 जण पूर्णपणे बरे झाले आहेत

    नांदेड जिल्ह्यात सध्या 7 हजार 144 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

    त्यातील 59 रुग्ण गंभीर आहेत.

  • 24 Mar 2021 07:00 AM (IST)

    नाशकात 24 तासात 2 हजार 644 नवे रुग्ण

    नाशिक जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे

    आज दिवसभरात 2 हजार 644 नवे रुग्ण आढळून आले आहेत

    तर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

    नाशिक महापालिका हद्दीत आज 1 हजार 480, नाशिक ग्रामीणमध्ये 827, मालेगाव महापालिका हद्दीत 259 तर जिल्ह्याबाहेरील 78 रुग्ण आढळून आले आहेत

  • 24 Mar 2021 06:59 AM (IST)

    नागपुरात 24 तासात 3 हजार 95 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    नागपुरात 24 तासात 3 हजार 95 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे

    आज दिवसभरात 2 हजार 136 जण कोरोनामुक्त झाले आहेत

    नागपुरातही आज मृत्यूचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे

    नागपुरात दिवसभरात 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

    नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 99 हजार 771 वर पोहोचली आहे

    त्यापैकी 1 लाख 63 हजार 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत

    तर नागपुरात आतापर्यंत 4 हजार 697 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 24 Mar 2021 06:54 AM (IST)

    पुण्यात 24 तासात 3 हजार 98 नवे रुग्ण आढळले

    पुण्यात 24 तासात 3 हजार 98 नवे रुग्ण आढळले

    तर 1 हजार 698 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला

    पुण्यात आज मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे

    पुण्यात आज दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

    त्यातील 9 मृत हे पुण्याबाहेरील असल्याचं सांगण्यात आलं आहे

    पुण्यात सध्या 24 हजार 440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

    त्यातील 555 जण गंभीर आहेत

  • 24 Mar 2021 06:51 AM (IST)

    मुंबईत 24 तासात 3 हजार 512 नवे कोरोना रुग्ण

    मुंबईत 24 तासात 3 हजार 512 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत

    1 हजार 203 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त

    मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार

    मृतांमध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश

    मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता खालावला

    100 दिवसांच्या पुढे असणारा हा कालावधी आता 90 दिवसांवर आला आहे

  • 24 Mar 2021 06:48 AM (IST)

    राज्यात 24 तासात 28 हजार 699 नवे कोरोना रुग्ण

    राज्यात बुधवारी दिवसभरात 28 हजार 699 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    13 हजार 165 जण कोरोनामुक्त

    बुधवारी दिवसभरात 132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 641 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Published On - Mar 24,2021 3:16 PM

Follow us
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.