Maharashtra Coronavirus LIVE Update : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रावर मिळणार लस

| Updated on: May 24, 2021 | 11:33 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रावर मिळणार लस
corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली हेती. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 May 2021 10:47 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1229 नवे रुग्ण

    सांगली कोरोना / म्युकर अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1229 कोरोना रुग्ण

    म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 108, आज आज आढळलेले 03 रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 26 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3198 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 13270 वर

    तर उपचार घेणारे 1313 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 94185 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 110653 वर

  • 24 May 2021 10:46 PM (IST)

    मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रावर मिळणार लस

    मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रावर मिळणार लस सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट लसीकरण प्रसुती झाल्याचा दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती समवेत बाळगणे आवश्यक गरोदर स्त्रियांना स्त्री रोग तज्ञ प्रमाणपत्र आणि स्वताचं संमतीपत्र देवून लस घेता येणार

  • 24 May 2021 09:23 PM (IST)

    महाराष्ट्राला दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात 22 हजार 122 नवे रुग्ण

    राज्यात आज 22 हजार 122 नवे रुग्ण 42 हजार 320 रुग्णांनी केली कोरोनावर मात 361 रुग्णांचा मृत्यू

  • 24 May 2021 08:34 PM (IST)

    नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात फक्त 94 नवे कोरोनाबाधित

    नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट

    आज फक्त 94 रुग्ण पॉझिटिव्ह

    आज 5 जणांचा मृत्यू झाला असला तरी करोना मृत्यूदर नियंत्रणात

    दुसऱ्या लाटेत 1.4 टक्के रुग्णांचा मृत्यू

    जानेवारी 2021 ते मे 2021 या 5 महिन्याच्या काळात 45,766 जणांना कोरोना

    त्यापैकी 493 जणांचा मृत्य

    पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांत 2.4% होता मृत्यूदर

    आता नवी मुंबईत दिवसाला कोरोणा रुग्णसंख्या 100 च्या आत

    तर शहरात अत्यवस्थ रुग्णांची संख्या 550 वरून 70 वर

  • 24 May 2021 08:31 PM (IST)

    अहमदनग मध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढला, 166 मुलांना बाधा

    अहमदनगर :

    अहमदनग मध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढला

    1 ते 14 वयोगटातील 166 मुलांना कोरोनाची लागण

    गेल्या 10 दिवसातील आकडेवारी घेण्यासाठी टास्क फोर्सचे आयोजन

  • 24 May 2021 08:16 PM (IST)

    पुणे शहरातून कोरोना हद्दपार होण्यास सुरुवात, दिवसभरात 494 नव्या कोरोनाबधित रुग्णांची नोंद

    पुणे :

    पुणे शहरातून कोरोना हद्दपार होण्यास सुरुवात

    आज दिवसभरात सर्वात कमी रुग्ण

    दिवसभरात 494 कोरोनाबधित रुग्णांची नोंद

    तर दिवसभरात 1410 कोरोनामुक्त

    आजच्या एकूण चाचण्या 7582

    तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 9 हजारांच्या घरात

  • 24 May 2021 08:05 PM (IST)

    मुंबईत दिवसभरात 1057 नवे कोरोनाबाधित, 48 जणांचा मृत्यू

    आज मुंबईत 1 हजार 57 जणांना कोरोनाची लागण आज मुंबईत 1 हजार 312 जण कोरोनामुक्त आज मुंबईत 48 जणांचा कोरोनाने मृत्य़ू

  • 24 May 2021 07:12 PM (IST)

    मुंबई महापालिकेनं थेट रशियन सरकारलाच लस देण्याची विनंती

    मुंबई महापालिकेनं थेट रशियन सरकारलाच लस देण्याची विनंती केलीय

    रशीयन सरकारच्या आरडिआयएफ या बाहेर देशामध्ये लस विक्री करणा-या संस्थेस लिहीले पत्र

    ग्लोबल टेंडर भरण्यासाठी उद्या अंतीम मुदत

    अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं एका आठवड्यानं वाढवली होती मुदत

    सध्या ग्लोबल टेंडरसाठी ४ वितरक कंपन्यांनी निवीदा भरण्यात सहभाग घेतलाय…

    आतापर्यंत ग्लोबल टेंडरला भरण्याबाबत प्रतिसाद मिळालाय तो थेट उत्पादक कंपन्यांकडून मिळालेला नाही… त्याऐवजी , लसीचं वितरण करणा-या कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालाय

    मात्र, वितरक कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात लस देऊ शकतील का? असा प्रश्न आहे…

    त्यामुळे, आता महापालिकेनं थेट रशियन सरकारलाच लस देण्याची विनंती केलीय…

    मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी रशीयन सरकारच्या आरडिआयएफ या बाहेर देशामध्ये लस विक्री करणा-या संस्थेस लिहीले पत्र

    १ कोटी स्पुटनिक लसीचे डोस देण्याबाबत केली मागणी

    तसंच या लसीच्या डोसांची किंमत कळवून थेट पुरवठा करण्याबाबत विनंती केलीय…

    यासंदर्भात मुंबईतील रशीयाचे राजदुत यांकडेही पाठपुरावा करण्यात आलाय…

  • 24 May 2021 07:09 PM (IST)

    विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात डोंबिवलीत मोठी कारवाई

    डोंबिवली :

    विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात डोंबिवलीत मोठी कारवाई

    डोंबिवलीतील कुंभारखान पाडा गणोश घाटावर फिरणाऱ्या 50 पैकी एक जण पॉझिटिव्ह

    आज डोंबिवली मोठा गाव गणोश घाटावर पोलिस आणि केडीएमसी संयुक्त कारवाई

    ६० जणांना घेतले ताब्यात अॅण्टीजेन टेस्टसाठी रवानगी

    वारंवार आवाहन करुन देखील नागरीक जुमानत नसल्याने कारवाई

  • 24 May 2021 07:05 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 241 नवे कोरोनाबाधित, 578 जणांना डिस्चार्ज

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात दिवसभरात 241 नवे कोरोनाबाधित, 5 रुग्णांचा मृत्यू, 578 जणांना डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 10 दिवसात 69 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 3797 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 5242 कोरोनामुक्त झालेत

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 38482

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 3015

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 35041

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 425

  • 24 May 2021 07:01 PM (IST)

    नागपूरला मोठा दिलासा, नवी रुग्णसंख्या 500 च्या खाली

    नागपूर :

    नागपूरला आज मोठा दिलासा, रुग्णसंख्या 500 च्या खाली

    नागपुरात आज 482 नवीन रुग्णांची नोंद

    2003 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    तर 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    आज 13129 कोरोना टेस्ट

    एकूण रुग्णसंख्या – 471541

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 450360

    एकूण मृत्यू संख्या – 8797

  • 24 May 2021 06:14 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 323 नवे कोरोनाबाधित, 21 रुग्णांचा मृत्यू

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात 323 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 21 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 81278

    एकूण कोरोनामुक्त : 74523

    सक्रिय रुग्ण : 5366

    एकूण मृत्यू : 1389

    एकूण नमूने तपासणी : 456694

  • 24 May 2021 06:07 PM (IST)

    जालना शहरात रुग्णांकडून जास्त बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, 12 रुग्णालयांना 17 लाखांचा दंड

    जालन्यात रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांचा दणका शहरातील बारा रुग्णालयांना 17 लाख रुपयांचा दंड दंड वसूल करून सर्व रुग्णांना करणार परत

  • 24 May 2021 06:04 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, कोरोना रुग्णांमध्ये मोठी घसरण

    गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात 265 कोरोनामुक्त, 7 मृत्यूसह 53 नवीन कोरोना बाधित

    आज जिल्हयात 53 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28763 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26452 वर पोहचली. तसेच सध्या 1614 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 697 जणांचा मृत्यू नोंद आहे.

  • 24 May 2021 06:02 PM (IST)

    अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात शासनाने घातलेली बंदी झुगारून बैलगाड्यांच्या शर्यती

    अंबरनाथ :

    अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात बैलगाड्यांच्या शर्यती

    शासनाने घातलेली बंदी झुगारून बैलगाड्यांच्या शर्यती

    पोलीस मात्र अजूनही शर्यतींबाबत अनभिज्ञ

    शर्यतींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    काल (रविवारी) उसाटणे गावाजवळील माळरानावर शर्यती झाल्याची माहिती

  • 24 May 2021 05:45 PM (IST)

    फक्त केंद्र सरकारला लसींचा पुरवठा करणार, फायझर कंपनीकडून खुलासा

    फायझर कंपनीकडून खुलासा फायझर फक्त केंद्र सरकारला लसीचा पुरवठा कऱणार केद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालय निर्देशानुसार लस भारतात वितरीत होईल लवकरचं फायझर भारताला लस देणार त्यासंदर्भात केंद्र सरकारशी बोलणं सुरू

  • 24 May 2021 05:25 PM (IST)

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रक्तसाठा तिप्पट वाढला

    पुणे –

    – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रक्तसाठा सुमारे तिप्पट वाढला

    – शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित रक्तदान शिबिरास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद,

    – गेल्या दीड महिन्यात सुमारे 10 हजार 528 रक्तपिशव्यांचे संकलन,

    – लसीकरण 1 एप्रिल ते 15 मे या दरम्यान विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळे, शिक्षण संस्था यांच्यातर्फे रक्तदान ११० शिबिरांचे आयोजन,

    – पुणे शहरातून राज्याच्या विविध जिल्ह्यांत भंडारा, जालना, मुंबई व इतर ठिकाणी रक्तपुरवठा.

  • 24 May 2021 05:06 PM (IST)

    म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा आजार नाही : डॉ. गुलेरिया

    म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग आहे आणि तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा आजार नाही. याची लागण झालेले 90-95% रुग्ण एकतर मधुमेही असल्याचे आणि/किंवा स्टेरॉईड घेणारे आढळले आहेत. घरी उपचार घेणारे अनेक रुग्ण जे ऑक्सिजन उपचार घेत नव्हते त्यांना सुद्धा Mucormycosis चा संसर्ग झाल्याचे आढळले आहे, ‘त्यामुळे ऑक्सिजनचे उपचार आणि या आजाराचा संसर्ग यामध्ये स्पष्ट संबंध सांगता येणार नाही – डॉ. गुलेरिया, एम्सचे संचालक

  • 24 May 2021 04:58 PM (IST)

    तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेचा कोविड सेंटर अॅक्शन प्लान, सहा ते सात हजार बेड वाढवणार

    सुरेश काकाणी, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त :

    तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेचा कोविड सेंटर अॅक्शन प्लान

    तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी मुंबईला येत्या काही दिवसांत ६ ते ७ हजार वाढीव बेड मिळणार

    मालाड, सौमैय्या ग्राऊंड आणि कांजुरमार्ग येथे प्रत्येकी २००० बेड क्षमतेचे नवे जम्बो कोविड सेंटर उभे राहतायेत

    प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये किमान १०० खाटांचा पेडियाट्रीक वॉर्ड असेल

    दिव्यांगासाठीही विशेष वॉर्ड असेल

    मुंबईत उद्यापासून गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच लसीकरण केलं जाईल

  • 24 May 2021 04:21 PM (IST)

    कोरोनाची लस समजून पोलिओचे 25 डोस चोरुन नेले

    अंबरनाथ :

    कोव्हीड व्हॅक्सीन समजून पोलिओचे डोस नेले चोरून

    अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातल्या मांगरूळ आरोग्य केंद्रातील प्रकार

    आरोग्य केंद्राची खिडकी तोडून प्रवेश करत केली चोरी

    चोरट्यांनी २५ पोलिओच्या लसी नेल्या चोरून

    उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

  • 24 May 2021 04:18 PM (IST)

    ब्लॅक फंगस आजारावर राज्यातील 130 रुग्णालयात मोफत उपचार मिळणार

    औरंगाबाद :

    ब्लॅक फंगस आजारावर मिळणार मोफत उपचार

    राज्यातील 130 रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

    महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मिळणार मोफत उपचार

    राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्पष्टीकरण

    औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे कोरोना साथरोगावर सुमोटो याचिका

    ब्लॅक फंगस आजाराच्या उपचाराबाबत खंडपीठाने राज्य सरकारकडे केली होती विचारणा

    ब्लॅक फंगस वर मोफत उपचार करणार असल्याचं राज्य सरकारने केलं स्पष्टीकरण

  • 24 May 2021 03:29 PM (IST)

    सांगलीत ग्रामीण भागात कोविड हॉस्पिटल वाढवण्यास सुरुवात

    सांगली  : ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण भागात कोविड हॉस्पिटल वाढवण्यास सुरुवात, सामाजिक भान जपत शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा कमी दराने रुग्णांवर उपचार.

  • 24 May 2021 01:54 PM (IST)

    कोरोना नियमांचे उल्लंघन, दौंडमधील चार दुकाने सील

    दौंड :

    कोरोना नियमांचे उल्लंघन, दौंडमधील चार दुकाने सील..

    – दौंड नगरपरिषद व पोलिस प्रशासनाची कारवाई..

    – लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यानं तहसीलदारांच्या आदेशावरुन कारवाई..

    – आहुजा मोबाईल शॉपी, सपना ड्रेसेस, ओम बॅंगल्स ॲंड गिफ्ट, मकसाने सुपर मार्केट या दुकानांवर कारवाई..

  • 24 May 2021 01:40 PM (IST)

    बारामतीत म्युकरमायकोसिसची धास्ती वाढली, दहा दिवसांत 19 जणांवर शस्त्रक्रिया

    बारामती : बारामतीत म्युकरमायकोसिसची धास्ती वाढली..

    – बारामतीत आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या १९ शस्त्रक्रिया..

    – गेल्या दहा दिवसात १९ जणांवर शस्त्रक्रिया..

    – म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्यानं प्रशासन झाले अलर्ट..

    – लक्षणं आढळल्यास त्वरीत उपचार घेण्याचं आवाहन..

  • 24 May 2021 01:38 PM (IST)

    महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 07 लाख 94 हजार 437 नागरिकांचे लसीकरण – राजेश टोपे

    महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 07 लाख 94 हजार 437 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 23 मे 2021 रोजी 40,781 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली

  • 24 May 2021 12:43 PM (IST)

    गोरेगाव कोविड सेंटरचे दोन वेळा उद्घाटन केलं, मात्र ते अजून सुरू झालेलं नाही – संदीप देशपांडे

    गोरेगाव कोविड सेंटरचे दोन वेळा उद्घाटन केलं, मात्र ते अजून सुरू झालेलं नाही, उद्घाटन करण्याची घाई दिसते.

    मुंबईत अनेक डाँक्टर बाहेरच्या राज्यातून आणलेत. जो माणूस बीकेसी कोविड सेंटरला डाँक्टर पुरवू शकला नाही. मग त्यालाच का कंञाट दिलं. कुठे आर्थिक हितसंबध आहेत का?

    आठवडाभर हात जोडून विनंती करतोय. जोडलेले हात सोडायला लावू नका…संदीप देशपांडेंचा सरकारला व पालिका प्रशासनाला इशारा….

  • 24 May 2021 11:58 AM (IST)

    पुण्यात आता ऑक्सिजनची मागणी निम्म्यावर आली

    पुणे –

    – पुण्यात आता ऑक्सिजनची मागणी निम्म्यावर आली आहे,

    – पुरवठा वाढल्याने आणि रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्याचा हा परिणाम आहे,

    – एप्रिल महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता परंतु मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटत गेल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली,

    – ऑक्सिजनचा पुरवठा वाढला आणि मागणी ५० टक्क्यांवर आली आहे.

    – पूर्वी २५० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनची मागणी होती. ती आता निम्म्यावर आली आहे,

    – पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांची माहिती.

  • 24 May 2021 11:55 AM (IST)

    भिवंडी शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या अधिक

    भिवंडी –

    भिवंडी शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या अधिक

    22 मे पर्यंत महिन्या भरात ग्रामीण मध्ये तब्बल 70 रुग्णांचा मृत्यु

    मे महिन्यात ग्रामीण भागात 130 लग्नांना तहसीलदार कार्यालयाची परवानगी .

    शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या कोव्हिडं सेंटर ला जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी .आज होणार उदघाटन.

    भिवंडी शहरात रुग्ण संख्या आटोक्यात ,पण लसीकरण संथ गतीने

    फक्त दुसरा डोस असणाऱ्यांना दिली जाते लस

  • 24 May 2021 10:56 AM (IST)

    कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्यानं सासवडमधील तीन हॉटेल सील

    पुरंदर :

    – कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्यानं सासवडमधील तीन हॉटेल सील..

    – गर्दी जमवण्यासह कोव्हिडच्या नियमांचं केलं उल्लंघन…

    – सासवडमध्ये पोलिसांनी केली कारवाई..

    – अस्मिता वडेवाले, हॉटेल मोहिनी आणि हॉटेल सेजल केलं सील..

    – यापूर्वी तीन मंगल कार्यालये, दोन हॉटेल आणि एका लॅबवर सासवड पोलिसांनी केली होती कारवाई..

  • 24 May 2021 10:54 AM (IST)

    लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जप्त केलेली वाहने परत घेण्यासाठी कोल्हापूरकरांची शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बाहेर भली मोठी रांग

    कोल्हापूर

    लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जप्त केलेली वाहने परत घेण्यासाठी कोल्हापूरकरांची शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बाहेर भली मोठी रांग

    लॉकडाऊन काळात शहर परिसरात कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली हजारो वाहने

    विनाकारण बाहेर करणाऱ्यांवर पोलिसांनी केली होती दंडात्मक आणि वाहन जप्तीची कारवाई

    लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाहन परत घ्यायला सुरुवात

    कागदपत्र तपासून केली जातात वाहन परत

  • 24 May 2021 10:23 AM (IST)

    पालकांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन बालकांचे नियमित लसीकरण करावं

    पुणे –

    – कोरोनाच्या संभाव्य धोक्यामुळे बालकांचे नियमित लसीकरण केलं नसल्यास पालकांनी सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन बालकांचे नियमित लसीकरण करावं,

    – पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने सूचना,

    – तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना सर्वाधिक बसण्याची शक्यता बालरोग तज्ज्ञांनी वर्तवली आहे,

    – त्यानंतर आता पुण्यात तिसरी लाट थोपवण्याची तयारी चालू झाली आहे. या संदर्भात बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने महत्वाची सुचना दिली आहे,

    – पुण्यात 18 ते 45 वयोगटाच्या वक्तींची लसीकरण मोहिम पुढे ढकलण्यात आली होती,

    – त्यानंतर आता लसीकरण मोहिमेला वेग येणार असून 1 जून पासुन लसीकरण नियमितपणे सर्वांना चालू होणार आहे.

  • 24 May 2021 09:56 AM (IST)

    पुण्यात खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण केंद्रावर लांबच्या लांब रांग

    पुणे

    पुण्यात खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण केंद्रावर लांबच्या लांब रांग

    दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची रांग

  • 24 May 2021 09:54 AM (IST)

    सांगली जिल्ह्यातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकाची माहिती तातडीने द्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला सूचना

    सांगली –

    जिल्ह्यातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकाची माहिती तातडीने द्या,

    जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रशासनाला सूचना

    संगोपन कोणी करायचे याची माहिती पालकांनी त्वरित देयावी

    तसेच पालकांना उपचारासाठी दाखल करताना बालकाची जवाबदारी कोना कड़े देयावी

    ही माहिती पालकांकडून विहित नमुन्यात भरून घ्या

  • 24 May 2021 09:41 AM (IST)

    ग्रामीण रुग्णांसाठी नागपुरात जम्बो कोव्हिड केअर सेंटर उभारावे, जिल्हा परिषद सदस्याची मागणी

    नागपूर –

    ग्रामीण रुग्णांसाठी शहरात जम्बो कोव्हिड केअर सेंटर उभारावे

    जिल्हा परिषद सदस्याची मागणी

    यासाठी सरपंच भवन चा वापर करावा

    जिल्हा परिषद च्या सर्व साधारण सभेत करण्यात आली मागणी

    दुसऱ्या लाटेत कोरोना मुळे हाहाकार माजला होता

    तो अनुभव लक्षात घेता तिसऱ्या लाटेच्या तयारी साठी सदश करत आहे ही मागणी

  • 24 May 2021 09:39 AM (IST)

    नाशकात आजपासून लॉकडाऊनमध्ये अंशतः शिथिलता

    नाशिक – आजपासून लॉकडाऊनमध्ये अंशतः शिथिलता

    नियमांचं पालन करत बाजार समित्या होणार सुरू

    पास धारक शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांनाच फक्त प्रवेश

    सॅनिटायझर, मास्क आणि तापमान नोंदी शिवाय कोणालाच प्रवेश नाही

  • 24 May 2021 09:38 AM (IST)

    औरंगाबादेत निर्बंधांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सत्र कायम

    औरंगाबाद –

    निर्बंधांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सत्र कायम

    औरंगाबादेत 162 जणांवर थेट गुन्हे दाखल ..

    70 दुकानांना ठोठवला 1 लाख 70 हजारांचा दंड..

    ठराविक वेळेनंतरही व्यापाऱ्यांनी दुकाने खुली ठेवल्याने मनपा आणि पोलीस पथकामार्फत कारवाई..

    औरंगाबादेत मागील दरवाज्याने दुकाने खुली असल्याने धडक कारवाई

  • 24 May 2021 09:36 AM (IST)

    अहमदनगरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट

    अहमदनगर

    विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट

    6 दिवसांत 7 हजार 855 नागरिकांची टेस्ट

    यामध्ये 232 जण निघाले

    तर टेस्ट च्या भीतीने रस्त्यावरील गर्दी कमी

  • 24 May 2021 09:36 AM (IST)

    नवी मुंबईत करोना मृत्यू दर नियंत्रणात

    नवी मुंबईत करोना मृत्यू दर नियंत्रणात

    दुसऱ्या लाटेत 1.4% रुग्णांचा मृत्यू

    जानेवारी 2021 ते मे 2021 या 5 महिन्याच्या काळात 45,766 जणांना कोरोना

    त्यापैकी 493 जणांचा मृत्य

    पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांत 2.4% होता मृत्यूदर

    आता नवी मुंबईत दिवसाला 100 ते 200 च्या घरात

    तर शहरात अत्यवस्थ रुग्णांची संख्या 550 वरून 70 वर

  • 24 May 2021 09:32 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोना रुग्ण

    देशात गेल्या 24 तासात 2 लाख 22 हजार 315 नवीन रुग्ण

    गेल्या 24 तासात 4 हजार 454 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत देशात 3 लाख 3 हजार 720 जणांचा मृत्यू

    कोरोनाने 3 लाखांचा केला आकडा पार

    गेल्या 24 तासात 3 लाख 2 हजार 544 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    गेल्या 24 तासात 9 लाख 42 हजार 722 जणांना देण्यात आली लस

    आतापर्यंत देशात 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 जणांना देण्यात आली लस

  • 24 May 2021 09:21 AM (IST)

    पंतप्रधान सहायता निधीतील मराठवाड्यात 500 व्हेंटिलेटर नादुरुस्त

    औरंगाबाद –

    पंतप्रधान सहायता निधीतील मराठवाड्यात 500 व्हेंटिलेटर नादुरुस्त

    पंतप्रधान मदत निधीतून मिळालेल्या नादुरुस्त व्हेंटिलेटरची अद्यापही चौकशी नाही

    गंभीर बाब असताना उलटले दोन आठवडे मात्र कुठल्याही प्रकारचे ऑडिट आणि चौकशी नाही

    व्हेंटिलेटर दुरुस्तीच्या नावाने पडून, रुग्णांचे जीव मात्र मुठीत

    व्हेंटिलेटर लवकर बदलून देऊन रुग्णांचे जीव वाचवावेत अशी सर्वस्तरातून मागणी.

  • 24 May 2021 08:59 AM (IST)

    लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोल्हापूरकरांची खरेदीसाठी पुन्हा एकदा गर्दी

    कोल्हापूर

    लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोल्हापूरकरांची खरेदीसाठी पुन्हा एकदा गर्दी

    किराणा आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

    शहरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील चित्र

    गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न

    बाजारपेठेत ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

    मोठ्या वाहनांना बाजारपेठेत प्रवेश नाही

  • 24 May 2021 08:29 AM (IST)

    सोलापूर शहरातील सर्व लसीकरण राहणार आज बंद

    सोलापूर – शहरातील सर्व लसीकरण राहणार आज बंद

    राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे लसीकरण बंद

    गुरुवारी आलेल्या लसी शुक्रवार आणि शनिवारी या दोनच दिवसात संपल्या

  • 24 May 2021 07:40 AM (IST)

    धुळे जिल्हयातील रुग्ण संख्या कमी होत असल्याने दिलासा

    धुळे जिल्हयातील रुग्ण संख्या कमी होत असल्याने दिलासा

    प्रशासनाने आधी 7 ते 11 ची व्यवहाराची वेळेत केला बदल

    आता जिल्ह्यात सकाळी 9 ते 1 पर्यन्त दुकाने राहणार सुरु

    जिल्हा बाहेरील लोकांना सीमे वर e pass मात्र आवशकता

  • 24 May 2021 07:30 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1126 कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना –

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत दिवसभरात 1126 कोरोना रुग्ण

    म्युकरमायकोसिस – एकूण 105 रुग्ण, गेल्या 24 तासांत आढळलेले 33 रुग्ण

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 24 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3172 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 13380 वर

    तर उपचार घेणारे 1589 जण गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त

    गेल्या 24 तासांत अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 92872 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 109424 वर

  • 24 May 2021 07:26 AM (IST)

    म्युकरमायकोसिसचा संसर्ग टाळण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

    पुणे

    म्युकरमायकोसिसचा संसर्ग टाळण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर,

    जिल्ह्यात तीन दिवस जिल्हा प्रशासन राबवणार सर्वेक्षण मोहीम,

    म्युकर मायकोसिसची लक्षणं असलेल्या खाजगी रुग्णालयात तपासणी केलेल्या रुग्णांची माहिती करणार संकलित,

    ग्रामीण भागातही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींना सूचना,

    28 तारखेपर्यंत अहवाल सादर करून उपाययोजना करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना,

    ग्रामीण भागात होणार डोअर टू डोअर सर्वेक्षण,

    ज्या तालुक्यात म्युकर मायकोसिसची संख्या जास्त तिथं अतिरिक्त डॉक्टर, कर्मचारी उपलब्ध करण्याच्या सूचना …

    जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी काढले आदेश

  • 24 May 2021 07:25 AM (IST)

    नागपूर शहराला दिलासा, ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या कमी होईना

    – नागपूर शहराला दिलासा, ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या कमी होईना

    – २४ तासांत शहरात ३०० तर ग्रामीणमध्ये ७३२ नव्या रुग्णांची नोंद

    – नागपूर ग्रामीणमध्ये चार दिवसांपासून रुग्णवाढ कायम

    – नागपूर जिल्ह्यात २४ तासांत १०४३ नवे रुग्ण, तर २४ मृत्यू

    – एप्रिल महिन्यात ७७ हजारांवर असलेली सक्रिय रुग्णसंख्या आली १४ हजारांवर

  • 24 May 2021 07:24 AM (IST)

    नागपुरात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनच्या वाटपात घोळ

    – नागपुरात म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनच्या वाटपात घोळ!

    – मेडीकलला कमी तर खाजगी हॅास्पीटलला जास्त इंजेक्शन दिल्याचा आरोप

    – आरोग्य विभागाच्या निर्देशांना त्यांच्याच अधिकाऱ्याकडून बगल

    – मेडीकलला ९० पैकी १६ रुग्णांनाच दिले इंजेक्शन

  • 24 May 2021 07:24 AM (IST)

    पुण्यात बाधितांची संख्या घटल्यानं शहरातले निम्मे बेड शिल्लक

    पुणे –

    पुण्यात बाधितांची संख्या घटल्यानं शहरातले निम्मे बेड शिल्लक,

    शहरात 33 हजार 670 पैकी 17 हजार 781 बेड शिल्लक आहेत

    7 हजार 178 ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत,

    तर आयसीयूमधील 137 बेड शिल्लक आहेत,

    मार्च एप्रिल महिन्यात कोणी बेड देतं का ? बेड अशी अवस्था होती मात्र आता पुण्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम ,

    शहरात रुग्णसंख्या कमी झाल्यानं आरोग्य व्यवस्थेवरचा कमालीचा ताण कमी

  • 24 May 2021 07:21 AM (IST)

    राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट, पण मृत्यूदर वाढला

    राज्यात रुग्णांत घट झाली पण मृत्यूदरात वाढ झाली आहे

    राज्यातील मृत्यूदर 1.50 वरुन 1.56 टक्कांवर गेला आहे

    राज्यात सर्वात जास्त मृत्यूदर कोल्हापूर जिल्ह्यात

    गेल्या आठवड्याच्या तुलनेत 53 टक्कांनी मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे

    एका आठवड्यात कोल्हापूर ग्रामिणमध्ये 844 जणांचा मृत्यू झाला आहे

    त्याचाखालोखाल बीड जिल्हात 24 टक्के मृत्यू दर

    सोलापूर जिल्ह्यात 20 टक्के मृत्यू दर

    सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 16 टक्के मृत्यू दर

    औरंगाबाद जिल्ह्यात 15 टक्के मृत्यू दर

  • 24 May 2021 07:01 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत 26 हजार 672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू

    राज्यात आज 26 हजार 672 नवे रुग्ण 29 हजार 177 रुग्ण बरे 594 जणांचा मृत्यू

  • 24 May 2021 06:56 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2180 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू

    सोलापूर :

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांत एकूण 2180  रुग्ण बरे

    तर 1536 कोरोनाचे नवीन रुग्ण

    कोरोनामुळे आज जिल्ह्यात 35 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यातील  एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15307

    एकूण कोरोना बाधितांपैकी ग्रामीण भागातील 1503 पॉझिटिव्ह तर शहरातील 33 जणांचा समावेश

  • 24 May 2021 06:38 AM (IST)

    नागपुरात गेल्या 24 तासांत 2326 जणांची कोरोनावर मात, 1042 नवे कोरोनाबाधित

    नागपूर :

    नागपुरात गेल्या 24 तासांत 2326 जणांनी केली कोरोनावर मात

    1042 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या – 471059

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 448357

    एकूण मृत्यू – 8768

  • 24 May 2021 06:37 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 709 नवे कोरोनाबाधित, 60 रुग्णांचा मृत्यू, तर 2324 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे –

    – दिवसभरात ७०९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

    – दिवसभरात २३२४ रुग्णांना डिस्चार्ज.

    – पुण्यात करोनाबाधीत ६० रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील.

    – १२९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६५६२५.

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०६७६.

    – एकूण मृत्यू -८००७.

    – आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४६९४२.

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९०६६.

Published On - May 24,2021 10:47 PM

Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.