Maharashtra Coronavirus Live Update : राज्यात कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू, 66358 नवे कोरोनाबाधित

| Updated on: Apr 27, 2021 | 11:06 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus Live Update : राज्यात कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू, 66358 नवे कोरोनाबाधित
Breaking News

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Apr 2021 09:26 PM (IST)

    राज्यात कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू, 66358 नवे कोरोनाबाधित

    राज्यात कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू, 66358 नवे कोरोनाबाधित, तर 67752 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, राज्यात सध्या एकूण 672434 सक्रीय रुग्ण, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के

  • 27 Apr 2021 08:50 PM (IST)

    उस्मानाबादेत कोरोनाचे 728 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

    उस्मानाबाद कोरोना अपडेट :

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 728 रुग्ण आणि 5 मृत्यू तर 635 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 254, तुळजापूर 71,उमरगा 90, लोहारा 66, कळंब 93, वाशी 46, भूम 68 व परंडा 40 रुग्ण

    01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613 15 एप्रिल – 764 16 एप्रिल – 580 17 एप्रिल – 653 18 एप्रिल – 477 19 एप्रिल – 662 20 एप्रिल – 645 21 एप्रिल – 667 22 एप्रिल – 719 23 एप्रिल – 719 24 एप्रिल – 810 25 एप्रिल – 569 26 एप्रिल – 720 27 एप्रिल – 728

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6368 ऍक्टिव्ह रुग्ण

    उस्मानाबाद – 2 लाख 10 हजार 607 नमुने तपासले त्यापैकी 35 हजार 793 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 27.27 टक्के

    28 हजार 552 रुग्ण बरे 81.18 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 874 तर 2.27 टक्के मृत्यू दर

  • 27 Apr 2021 07:31 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 1311 नवे कोरोनाबाधित

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात 5539 नमुने तपासणीतुन 1311 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 17 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 55680

    एकूण कोरोनामुक्त : 39318

    ऍक्टिव्ह रुग्ण : 15534

    एकूण मृत्यू : 828

    एकूण नमूने तपासणी : 364093

  • 27 Apr 2021 07:30 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार नेमका कसा चालतो याची ऑडिओ क्लिप समोर

    पिंपरी चिंचवड :

    -पिंपरी चिंचवड शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार नेमका कसा चालतो याची ऑडिओ क्लिप समोर

    -पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्वतः ग्राहक बनूनही धक्कादायक आणि संतापजनक बाब आणली समोर

    -नेहरूनगर येथील आयुष हॉस्पिटलमधील नर्स ज्योती कोकणे-लगड हा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिच्याशी पोलिसांनी संवाद साधला तेंव्हा तिने अनेक धक्कादायक विधाने

    -40 हजारांना एक रेमडिसिव्हीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या ज्योति सह राहुल बोहाळ, विजय शिरसाठला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ठोकल्या बेड्या

  • 27 Apr 2021 06:16 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र, मुंबईसह राज्यात कमी होत असलेल्या चाचण्या, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी, संसर्ग वाढण्याचा धोका, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अपडेट न होणे, त्यातून नेमकी माहिती कोरोना लढ्यासाठी उपलब्ध न होणे, यावरुन चिंता व्यक्त

  • 27 Apr 2021 06:09 PM (IST)

    सात महिन्यात साडेपाच हजारावर अतिरिक्त खाटांची व्यवस्था केल्याची नागपूर महापालिकेची माहिती

    नागपूर –

    सात महिन्यात साडेपाच हजारावर अतिरिक्त खाटांची व्यवस्था केल्याची नागपूर महापालिकेची माहिती

    आय.सी.यू.चे बेड्‌समध्ये १८१७ ने वाढ

    अजून व्यवस्था वाढविण्यासाठी मनपा प्रयत्न करणार

    मागच्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये आलेल्या लाटमध्ये नागपूर शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती.

    तेव्हा नागपूर शहरात सरकारी आणि विविध खासगी रुग्णालय मिळून केवळ १५१४ खाटांची व्यवस्था होती.

    सप्टेंबरनंतर आता एप्रिल २०२१ मध्ये कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. दरम्यान, मनपा प्रशासनाने उद्‌भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेऊन खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

    सध्या नागपूर शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसंख्या ७१४४ इतकी झाली आहे.

    २८ सप्टेंबर २०२० मध्ये केवळ १५१४ बेड्‌स विविध रुग्णालयात उपलब्ध होते.

    त्यामध्ये ऑक्सीजनची उपलब्धता असलेले ११४४,

    आय.सी.यू.मध्ये ३१६ तर व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले २३६ बेड्‌स उपलब्ध होते.

    आता ६३८७ बेड्‌स इतकी एकूण बेड्‌सची उपलब्धता नागपूर शहरात झाली.

    सध्या नागपूर शहरात ४६५३ बेड्‌स ऑक्सीजनसह असून २११३ बेड्‌स आय.सी.यू.चे आहेत तर ५४२ बेड्‌स व्हेंटिलेटर्सचे आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

  • 27 Apr 2021 06:07 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, 498 नवे रुग्ण

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 4 रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात 498 नवे रुग्ण

    तर 474 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 27 दिवसात एकूण 83 रुग्णांचा झाला मृत्यू तर एकूण आढळले नवे 9983 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 26158

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 3836

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 22051

  • 27 Apr 2021 06:04 PM (IST)

    येवल्यात दिवसभरात 58 नवे कोरोनाबाधित

    येवला :- कोरोनाबाधित 58 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

    आतापर्यंत 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यातील कोरोनबधितांची एकूण संख्या पोहचली 3769 वर

    कोरोनावर 3041 जणांनी मात करत केली घरवापसी

    उर्वरित 584जण कोरोणा उपचार घेत आहे

  • 27 Apr 2021 06:00 PM (IST)

    1 मे चे लसीकरण जर फेल झाले तर त्यासाठी केंद्र सरकार जवाबदार : नाना पटोले

    “1 मे चे लसीकरण जर फेल झाले तर त्यासाठी केंद्र सरकार जवाबदार राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्याला जवाबदार. त्यांनी आपल्या देशाची चिंता न करता दुसऱ्या देशांना लस वाटली. त्यांनी आपल्या देशाच्या लोकसंख्येला बघता लसीची तयारीच केली नाही. रोज महाराष्ट्रात 10 लाख लसीकरण होऊ शकते. ते केंद्र देऊ शकत नाही. केंद्र सरकारने फ्री लस देण्यास तयार होणं हे हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांनी जेव्हा याबाबतची मागणी केली तेव्हा त्यांना ट्रोल करण्यात आले. आता ते खरे निघाले आहेत. आपल्या देशातील लोकांना पाहिले लस देऊन मग दुसऱ्या देशांना देता आली असती. पण आधी बाहेर देशाला दिले. त्यामागे काय उद्देश होता हे माहीत नाही. देशात पाहिले लस दिली असती तर देशात ही परिस्थिती निर्माण झाली नसती. यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

  • 27 Apr 2021 05:55 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात 16 रुग्णांचा मृत्यू, 558 नवे कोरोनाबाधित

    गडचिरोली : आज जिल्हयात 558 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 512 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 19475 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 14758 वर पोहचली. तसेच सध्या 4366 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण 351 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.78 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.42 टक्के तर मृत्यू दर 1.80 टक्के झालं आहे.

  • 27 Apr 2021 05:53 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 555 नवे रुग्ण, 12 जणांचा मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण – 555 आज झालेले मृत्यू – 12 आज बरे झालेले – 885

    तालुका नुसार रुग्ण संख्या

    गोंदिया————–332 तिरोडा————–25 गोरेगाव————–37 आमगाव————– 18 सालेकसा————- 45 देवरी—————— 19 सडक अर्जुनी ———– 27 अर्जुनी मोरगाव——– 41 इतर राज्य————–11

    एकूण रुग्ण – 31436 एकूण मृत्यू – 496 एकूण बरे झालेले – 24721 एकूण उपचार घेत असलेले – 6219

  • 27 Apr 2021 04:22 PM (IST)

    कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी

    कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी

    बृहनमुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचा उपोषण आणि राजीनाम्याचा इशारा

    वैद्यकीय शिक्षकांचे निवृत्तीचे वय 62 वर्षाहुन अधिक वाढविन्यास बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण संघटनेचा तीव्र विरोध

    जर मुंबई महानगरपालिकेने असा प्रस्ताव मंजूर केला तर उपोषण व सामूहिक राजीनाम्याच संघटनेकडून महापौरांना अल्टिमेटम

    मुंबई महानगरपालिकामध्ये (एमसीजीएम ) निवृत्तीचे वय वाढविन्याची गरज नाही

    महापौर किशोरी पेडणेकर आणि मनपा सभागृह नेता विशाखा राऊत ह्यांना संघटने तर्फे तक्रार केली. या

  • 27 Apr 2021 04:19 PM (IST)

    पुण्यात मृतांच्या आकडेवारीची लपवाछपवी? महापालिकेच्या आणि विद्यूत विभागाच्या आकडेवारीत तफावत

    पुणे –

    – पुण्यात मृतांच्या आकडेवारीची लपवाछपवी ?

    – महापालिकेच्या आकडेवारीत आणि विद्यूत विभागाच्या आकडेवारीत तफावत

    – महापालिकेकडे 1 ते 25 तारखेपर्यंत 1 हजार 807 मृतांची नोंद,

    – तर विद्यूत विभागाकडे 1 हजार 941 इतके अंत्यसंस्कारासाठी पास

    – विद्युत विभागानं पास दिल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊच शकत नाही,

    – मग महापालिका आणि विद्युत विभागाच्या आकडेवारीत फरक कसा ?

    – तर ससून रुग्णालय,जम्बो कोव्हीड सेंटर, नायडू हॉस्पिटलमधील आणि बाणेर हॉस्पिटलमधील कोरोना मृतांचे अंत्यसंस्काराचे पास तयार होत नसल्याची धक्कादायक माहिती …

    – पुण्यात आकडे लपवले जातायेत का ?……

  • 27 Apr 2021 03:39 PM (IST)

    560 कर्मचाऱ्यांचे वेतन थकले, आंदोलक महिलांनी रडून व्यथा मांडल्या

    चंद्रपूर:

    चंद्रपूरात अमित देशमुख यांच्या दौऱ्यादरम्यान गोंधळ रूग्णलयातील कंत्राटी कामगाराचं थकीत वेतनासाठी आंदोलन महिला आंदोलकाना पोलिसांनी घेतलं ताब्यात मागच्या 77 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन वैद्य. महा. कंत्राटी कर्मचारी मुलाबाळासोबत करत आहेत डेरा आंदोलन

    वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या शासकीय पत्रपरिषदेत आंदोलक डेरा महिलांचा आक्रोश, पत्रपरिषद संपल्यावर नियोजन भवनात आधीच बसलेल्या 2 आंदोलक महिलांनी ओरडून मांडली व्यथा, गेले 77 दिवस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्य. महा. कंत्राटी कर्मचारी मुलाबाळासोबत करत आहेत डेरा आंदोलन, पहिल्या लाटेपासून 560 कर्मचाऱ्यांचे वेतन आहे थकीत, आंदोलक महिलांनी रडून व्यथा मांडल्यावर देखील मंत्री देशमुख, वडेट्टीवार यांनी पाठ फिरवत सभागृहातुन काढता पाय घेतला, मंत्री देशमुख यांनी या आंदोलनावर भाष्य करताना कोविड काळात हे आंदोलन कसे करू शकता? असा उलटा विचारला होता सवाल

  • 27 Apr 2021 03:24 PM (IST)

    राज्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत

    राज्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढणार आहे. राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले आहेत. मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी घटली आहे. मात्र, राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याबाबतचा निर्णय होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

  • 27 Apr 2021 02:59 PM (IST)

    पुणे महापालिका करणार लसींची थेट खरेदी

    – पुणे महापालिका करणार लसींची थेट खरेदी,

    – सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांकडे केली 10 लाख लस देण्याची मागणी,

    – महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुनावालांच्या भेटीसाठी मागितली वेळ,

    – पुनावाला पुण्याला थेट लसीची विक्री करणार का ?

    – पुण्यात लसीचं उत्पादन होत असल्यानं महापालिकेला आशा

    – महापालिकेनं थेट लस खरेदी करण्याचा घेतला निर्णय

  • 27 Apr 2021 02:14 PM (IST)

    रुग्णवाहिका, शववाहिका आणि अंत्यविधीच्या नावाखाली लूट केली तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे करणार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा इशारा

    पिंपरी चिंचवड

    -कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका, शववाहिका आणि अंत्यविधीच्या नावाखाली लूट केली तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला इशारा

    -रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे 25 किलोमीटर साठी 500 रुपये ते 1000 रुपये इतकेच बिल अदा करावे.

    -यापेक्षा एक रुपयाची ही जास्तीची मागणी केली तर थेट त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी 9529691966. या क्रमांकावर संपर्क साधावा असं जाहीर केलंय.

  • 27 Apr 2021 12:56 PM (IST)

    जर लस मिळणारच नसेल तर देशातील सर्व राज्यात लसीकरण 1 मेपासून कसे सुरु होणार – राजेश टोपे

    रेमडेसिवीरचा वापर गरज असताना करणे गरजेचे आहे

    व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात आम्ही सिरम आणि भारत बायोटेकला १२ कोटी लसींच्या मागणीचे पत्र लिहीले आहे

    आम्हाला त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय आला नाही

    १ मे ला व्हॅक्सिन उपलब्ध नसेल तर लसीकरण कसे करणार

    व्हॅक्सिन इंपोर्ट करण्याबाबत देखील विचार सुरु आहे

    45 च्या पुढचे व्हॅक्सिनेशन हे पाहिजे त्या गतीने सुरु नाही

    लसीकरण हे कोविन अॅपच्या माध्यमातून केले जाईल, टाईम स्लॉटच्या माध्यमातून जावे लागेल.

    अजून व्हॅक्सिन उपलब्ध नाही, त्यामुळे सर्वच राज्यात १ तारखेला व्हॅक्सिनेशन सुरु होईलच असे नाही

    मोफत लसीकरणाबाबतचा अहवाल आरोग्य विभागाने कॅबीनेटला पाठवला आहे.

    कॅबीनेटचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, मात्र मुख्यमंत्री किंवा कॅबीनेटचा निर्णय होण्याआधीच कुणीही जाहीर करणे योग्य नाही

    १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा आपचा प्रयत्न आहे मात्र जर लस मिळतच नसेल तर कसे करणार

    जर लस मिळणारच नसेल तर देशातील सर्व राज्यात लसीकरण १ मे पासून कसे सुरु होणार

  • 27 Apr 2021 12:55 PM (IST)

    सर्व राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक 5,34,372 जणांना लसीकरण – राजेश टोपे

    राजेश टोपे –

    6 लाख 74 हजार केसेस अ‍ॅक्टिव्ह आहेत

    सर्व राज्याच्या तुलनेत सर्वाधिक 534372 जणांना लसीकरण झाले

    महाराष्ट्रात आजपर्यंत दीड कोटी लोकांना लसीकरण झाले आहे

    2 टक्के पेक्षा कमी लस वाया गेल्या

    पंधरा सिनीअर आयएएस अधिकारी ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीर बाबतच्या नियोजनासाठी देण्यात आले आहे

    ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर होणे गरजेचे आहे.. त्यासाठी आपण एसओपी ठरवली आहे

    प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नर्स नियुक्त करण्यात येईल

    प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्टँडबाय ऑक्सिजन ठेवण्यात येईल

    हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडीट करण्यात येईल, गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करु

    पहिले १०० बेडचे हॉस्पिटल जे ऑक्सिजन प्लांटच्या जवळ असतील ते पेणमध्ये उभारण्यात येईल

    ग्लोबल टेंडरच्यामाध्यमातून दहा लाख रेमिडीसिव्हरच्या व्हाईल्स मागवण्यात येईल

  • 27 Apr 2021 12:28 PM (IST)

    बीड : कोरोना मृतांची अहवेलना प्रकरण, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

    बीड : कोरोना मृतांची अहवेलना प्रकरण

    जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले चौकशीचे आदेश

    अहवाल सादर करण्याचे अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

    एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले होते

    प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर प्रशासन सतर्क

  • 27 Apr 2021 12:06 PM (IST)

    रत्नागिरीत शिवसेना पक्षाकडून लसीकरण मोहिम राबवली गेली

    रत्नागिरी –

    लसीकरण मोहिम राबवली गेली शिवसेना पक्षाकडून

    शहरातील केतन मंगल कार्यालयातील धक्कादायक प्रकार

    तब्बल २०० जणांचं झालं लसीकरण, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी होते उपस्थित

    भाजपाकडून शिवसेनेच्या लसीकरणाचे फोटो केले व्हायरल

    पक्षाकडून लसीकरण मोहिम कशी रत्नागिरीतील भाजप आक्रमक

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिस

    कारवाई आणि चौकशीसाठी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्याकडे भाजपचा पत्रव्यवहार

  • 27 Apr 2021 11:48 AM (IST)

    औरंगाबाद पोलिसांकडून रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट उध्वस्त

    औरंगाबाद –

    रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट उध्वस्त

    औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने काळाबाजार करणारं रॅकेट केलं उध्वस्त

    पाच इंजेक्शनसह सात आरोपींना केली अटक

    जालन्याच्या कोविड सेंटर मधून केली जात होती इनजेक्शनची चोरी

    पाच ते सात व्यक्तींच्या मदतीने औरंगाबादेत केली जायची विक्री

    पोलिसांनी सापळा रचून केला रॅकेटचा पर्दाफाश

    20 हजार रुपयात केली जायची एका इंजेक्शनची चोरी

  • 27 Apr 2021 11:42 AM (IST)

    वसई-विरार परिसरात लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा

    वसई –

    वसई-विरार परिसरात लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा

    वसई पश्चिमेच्या बंगाली परिसरात लोकसेवा मंडळ आणि जनसेवा हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने लसीकरण केंद्र सुरु केले आहे

    इथे 27,28,29 एप्रिल रोजी हे लसीकरण होणार आहे.

    या केंद्रावर लसीकरण होणार असल्याची माहिती काल संध्याकाळपासून सोशल मीडिया वर वायरल झाल्याने आज पहाटे 4 वाजल्यापासूनच भल्या मोठ्या रांगा नागरिकांनी लावल्या

    250 रुपये घेऊन लस मिळणारआहे

    पण 100 ते 150 लोकांनाच ही लस मिळणार आहे

    त्यासाठी 500 पेक्षा जास्त लोकांची याठिकाणी रांगा लागल्या आहेत

  • 27 Apr 2021 11:41 AM (IST)

    कडक लॉकडाऊनमुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची फेरी 14 दिवस रद्द

    अमरावती :

    कोरोनाचा कहर आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती – मुंबई एक्स्प्रेसची फेरी 27 एप्रिल ते 10 मे अशी 14 दिवस रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे मुंबईहून अत्यावश्यक कामासाठी ये – जा करण्यासाठी आता अमरावतीकरांना पर्यायी रेल्वे गाडीने प्रवास करावा लागणार आहे

  • 27 Apr 2021 11:40 AM (IST)

    संख्या वाढली तर व्यवस्था पूर्ण कोलमडून जाईल, म्हणून संख्या आटोक्यात ठेवली पाहिजे – जयंत पाटील

    जयंत पाटील –

    आज घराघरात सगळ्यात मोठे संकट कोविडच आहे, ऑक्सिजन, रेम्डीसिव्हर मिळत नाही, तर झपाट्याने पेशंट वाढत आहे

    जगात इतर देशात दुसरी लाट येऊन गेली, त्याअनुषंगाने आपण तयारी करायला हवी होती

    संख्या वाढली तर व्यवस्था पूर्ण कोलमडून जाईल, म्हणून संख्या आटोक्यात ठेवली पाहिजे

    लक्षणे नसलेले बाहेर फिरतात अन इतरांना कोविडचा प्रसाद देतात

    हॉस्पिटलच्या बाहेरही हॉस्पिटलच्या सेवा उभारायची आवश्यकता आहे

    जिथं जिथं सेवाभावी संस्था या कामासाठी पुढे येतील त्याला परवानगी द्यायला हवी

    सर्वाधिक कोविड टेस्ट करणारे महाराष्ट्र राज्य आहे

    गाजावाजा करत कोविड सेंटरचे उदघाटन करण्याची परिस्थिती नाही

    रेमडेसीव्हीर सरकारी पातळीवर देण्याचे प्रयत्न सुरु आहेत

    काही राजकीय व्यक्ती रेमडेसीव्हीर देऊन जाहिरात करतायेत

    कोर्टाने त्यावर ताशेरे ओढलेत, ही जाहिरात करण्याची राजकारण करण्याची वेळ नाही तर सेवाभावीपणे काम करण्याची वेळ आहे

  • 27 Apr 2021 10:56 AM (IST)

    नागपुरात भाजी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    – नागपूरच्या भाजी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी

    – गोकूळपेठ भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    – भाजी खरेदीसाठी शेकडो लोक एकत्र

    – भाजी मार्केटमधील गर्दीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका

    – नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर

  • 27 Apr 2021 10:53 AM (IST)

    1 मे पासून 18 वर्षांवरील लोकांना सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या मोहिमेवर मोठा प्रश्नचिन्ह

    – 1 मे पासून 18 वर्षांवरील लोकांना सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या मोहिमेवर मोठा प्रश्नचिन्ह

    – राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लसीच उपलब्ध झाल्या नसल्याची सूत्रांची माहिती

    – देशात उपलब्ध असलेल्या तिन्ही लसी मे महिन्यात राज्याला मिळू शकणार नाहीत अशी खात्रीदायक सूत्रांची माहिती

  • 27 Apr 2021 10:51 AM (IST)

    सोलापुरात कोरोना लस उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचा संताप

    सोलापूर –

    लस उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचा संताप

    पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर नागरिकांची बाचाबाची

    लस साठा शिल्लक नसल्याची पूर्व कल्पना दिली नसल्याची नागरिकांचा आरोप

    जलसाठा उपलब्ध नसल्यामुळे उद्या लसीकरण होणार नाही याची पूर्वकल्पना दिल्याची पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

  • 27 Apr 2021 09:57 AM (IST)

    मुंबईत हॉटेलच्या स्वयंपाकघरात रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार, पाच आरोपींना अटक

    मुंबईत रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार

    हॉटेलच्या स्वयंपाकघरात काळाबाजार सुरू होता

    गुन्हे शाखेच्या पथकाने टाकला छापा

    34 रेमडेसीव्हीर इंजेक्शन ताब्यात घेतले

    सदर प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली

    मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने गोरेगावच्या पश्चिमेस मोतीलाल नगरातील लिंक रोडजवळील हॉटेलच्या किचनवर छापा टाकला

    34 रेमेडिसावीर इंजेक्शन केले जप्त

    या छाप्यात गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली

    20,000 ते 25,000 रुपयांना विकले जात होते इंजेक्शन

  • 27 Apr 2021 09:47 AM (IST)

    गडचिरोली सामान्य रुग्णालयातूनल परिचारिकेने चोरले 12 रेमडेसीव्हीर इंजेक्शन

    गडचिरोली सामान्य रुग्णालयातून शासकीय नोकरीत असलेली परिचारिकेने चोरले 12 रेमडेसीव्हीर इंजेक्शन

    गडचिरोलीतील परिचारिका पल्लवी मेश्राम ही ने इंजेक्शन चोरी करून जवायला नागपूर काळा बाजारात विकले,

    नागपुरात रेमीडेसीविर इंजेक्शनचा काळाबाजाराचा व्यवसाय करणारी एक टोळीला बेलतरोडी नागपूर पोलिसांनी अटक केली,

    ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या मनोज कांबळे सह नागपुरातील चार आरोपी आणि गडचिरोलीतील एक परिचारिकांना नागपूर बेलतरोडी पोलिसांनी अटक केली ,

    सध्या सर्व आरोपी पीसीआर मध्ये असून पुढील तपास बेलतरोडी पोलिस करीत आहेत,

  • 27 Apr 2021 09:42 AM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ अॅक्शन मोडवर

    औरंगाबाद –

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ अॅक्शन मोडवर

    सुमोटो याचिकेवरील सुनावणीत प्रशासनाला दिल्या कडक सूचना

    कोरोना काळात घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांसाठी आधार कार्ड सक्तीचे

    विनाकारण फिरणाऱ्यांची थेट अँटिजेंन टेस्ट करा

    कोरोना काळात पोलिसांवर दबाव आणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा

    पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा

  • 27 Apr 2021 09:34 AM (IST)

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह, उपचारासाठी तिहारमधून एम्स रुग्णालयात दाखल

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह

    तिहार तुरुंगात होता राजन

    उपचारासाठी त्याला एम्स रुग्णालयात केला गेला आहे भर्ती

  • 27 Apr 2021 09:00 AM (IST)

    नवी मुंबईत कोरोना नियमांचे उल्लंघन करुन मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 25 जणांवर गुन्हा

    नवी मुंबई

    – कोरोना नियमांचे उल्लंघन करुन मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 25 जणांवर गुन्हा दाखल

    – यापुढे मॉर्निंग-इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांची जागीच होणार अँटिजेन टेस्टींग

    – कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने 1 मे रोजी सकाळी वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध प्रतिबंध असून नागरिक घराबाहेर

    – नवी मुंबई महापालिक व पोलीसची संयुक्त कारवाई

    – संचारबंदी लागू असूनही काही नागरिक मॉर्निग वॉक अथवा इव्हिनींग वॉकसाठी घराबाहेर पडत आहे.

    – मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या 25 जणांना चांगलेच महागात पडले

  • 27 Apr 2021 08:57 AM (IST)

    अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये बाजार उघडताच गर्दीचा उच्चांक

    अमरावती :

    अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये बाजार उघडताच गर्दीचा उच्चांक

    शहरातील मुख्य मार्ग अमरावती बरहानपूर

    हनुमान चौक ते दयाराम चौकपर्यंत लोकांची तुफान गर्दी

    त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहने ठेवण्यात आल्यामुळे रस्ता जाम झाला

    ही गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढविणारी ठरली आहे

  • 27 Apr 2021 08:20 AM (IST)

    सामाजिक कार्यकर्ते रोशन घाटे यांचे कोरोनामुळे निधन

    नाशिक

    – सामाजिक कार्यकर्ते रोशन घाटे यांचे कोरोनामुळे निधन

    – मानवता केअर हॉस्पिटल मुंबई नाका येथे उपचारा दरम्यान मृत्यू

    – मित्र आणि नातेवाईक यांच्या कडून हॉस्पिटल ची तोडफोड.

  • 27 Apr 2021 08:19 AM (IST)

    औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली

    काल दिवसभरात फक्त 1039 रुग्णांची वाढ

    तर औरंगाबाद शहरात फक्त 497 रुग्णांची वाढ

    रुग्णवाढ थेट पाचशे रुग्णांनी कमी झाल्यामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा

    औरंगाबाद शहरात सध्या 12975 रुग्णांवर उपचार सुरू

    तर कोरोना रुग्णांच्या मृत्यू मध्येही झाली मोठी घट

    काल दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू

    रुग्ण मृत्यूचा आकडा 42 वरून थेट पोचला 28 वर

  • 27 Apr 2021 08:18 AM (IST)

    अहमदनगरात बिल दाखवल्याशिवाय रुग्णांना रेमडेसीव्हीर देणार नाही

    अहमदनगर –

    बिल दाखवल्याशिवाय रुग्णांना रेमडेसीव्हीर देणार नाही

    काळाबाजार रोखण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेचा निर्णय

    रेमडेसीव्री , टोसिलिझुमॉंबसारखी महागडी इंजेक्शन कोठून आणली त्याचे बिल दाखवल्या शिवाय उपचार घेत असलेल्या रुग्णांना डोस दिला जाणार नाही

    इंडियन मेडिकल असोसिएशनचा निर्णय, काळाबाजार रोखण्यासाठी उचलले पाऊल

  • 27 Apr 2021 08:16 AM (IST)

    नागपूरसाठी 20 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन आणखी एक टँकर पोहोचला

    नागपूर –

    नागपूरसाठी 20 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन आणखी एक टँकर पोहोचला

    हे टँकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रिकामा करण्यात आला.

    विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने तिसरे ऑक्सीजन टँकर नागपूरला प्राप्त झाले आहे.

    महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष बसंतलाल शॉ, सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

  • 27 Apr 2021 08:16 AM (IST)

    प्रसिध्द उद्योजक विवेक डालमीया यांचे कोरोनाने निधन

    अकोला : प्रसिध्द उद्योजक 42 वर्षीय विवेक डालमीया यांचे रात्री 10 वाजताच्या सुमारास एका खाजगी हॉस्पीटलमध्ये कोरोनाने निधन झाले.कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक डालमीया यांचे ते सुपुत्र तर उद्योजक अशोक गुप्ता यांचे ते जावाई होते

  • 27 Apr 2021 08:08 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात रेमडेसीव्हीरच्या पुरवठ्यात वाढ

    – नागपूर जिल्ह्यात रेमडेसीव्हीरच्या पुरवठ्यात वाढ

    – सोमवारी नागपूर जिल्ह्याला मिळाले ६५९७ रेमडेसवीर इंजेक्शन

    – रेमडेसवीर तुटवड्याच्या काळातील काल सर्वाधिक पुरवठा

    – जिल्हा प्रशासनामार्फत ६५९५ रेमडेसवीरचे रुग्णालयांना वाटप

    – नागपूर जिल्ह्याला रोज सात हजारपेक्षा जास्त रेमडेसवीरची गरज

    – घरी उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईकांची रेमडेसवीरसाठी भटकंती सुरुच

  • 27 Apr 2021 08:07 AM (IST)

    पुण्यात 25 आणि 26 एप्रिल या दोन दिवसांत 6 हजार 101 रेमडेसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध

    पुणे

    जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी 25 आणि 26 एप्रिल या दोन दिवसांत 6 हजार 101 रेमडेसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध

    तसेच, आज सुमारे आठ हजार रेमडीसिव्हीर उपलब्ध होणार

    जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली माहिती

  • 27 Apr 2021 08:06 AM (IST)

    पोलीस बंदोबस्तात आला सोलापूरसाठी प्राणवायू

    सोलापूर-

    पोलीस बंदोबस्तात आला सोलापूर साठी प्राणवायू

    बल्लारीहुन 12 टन तर पुण्याहून आला दहा टन ऑक्सिजन

    दोन दिवसाची सोलापूरची चिंता मिटली

    सोलापूर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 14 हजारांवर

    यापैकी 30 टक्के हून अधिक रुग्णांना भासत आहे ऑक्सिजनची गरज

    शहर व ग्रामीण भागासाठी प्रतिदिन आठ ते दहा टन ऑक्सिजनची गरज

    ऑक्‍सिजनचा साठा संपायच्या आत ऑक्सिजनचा झाला पुरवठा

    बल्लारीहुन सोलापुरात टँकर येण्यासाठी लागले 16 ते 18 तास

  • 27 Apr 2021 08:04 AM (IST)

    पुण्यात कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी महापालिकेचं ‘कोविड शववाहिनी ॲप’

    पुणे –

    कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी लवकर ॲम्ब्युलन्स मिळावी यासाठी महापालिकेने तयार केलं ‘कोविड शववाहिनी ॲप’

    त्यावर रुग्णवाहिका मिळणार आहेच, पण त्याचबरोबर कोणत्या स्मशानभूमीत लगेच अंत्यसंस्कार होतील याची माहिती नातेवाईक, रुग्णालय व शववाहिकेच्या चालकाला मिळणार

    मृतांची संख्या वाढत असताना हेल्पलाइन उपयोगी ठरत नसल्याने नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तयार केलं ॲप

  • 27 Apr 2021 08:03 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना लॉगईन करण्यामध्ये अडचणी

    पुणे

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना लॉगईन करण्यामध्ये अडचणी

    त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरहजेरी दाखविण्यात आले

    १३ हजार पैकी तब्बल ९ हजार तक्रारी लॉगइन संदर्भातील

    यावर विद्यापीठाचे वस्तुस्थिती तपासून यावर योग्य पद्धतीने निर्णय घेण्याचे आश्वासन

  • 27 Apr 2021 07:26 AM (IST)

    नागपुरात कोरोनाबाधीतांचा मृतदेह घाटावर नेण्यासाठीही लाच

    – नागपुरात कोरोनाबाधीतांचा मृतदेह घाटावर नेण्यासाठीही लाच

    – मृतक कोरोनाबाधीताच्या नातेवाईकांकडून मागीतले जाते पैसे

    – नागपूर महानगरपालिकेतील काही भ्रष्ट कर्मचारी पैसे मागत असल्याचा प्रकार

    – नागपुरातील सोमवारी क्वॅार्टर परिसरातील व्यक्तीला मागीतले पैसे

    – अंत्यसंस्कारासाठी दीड हजार रुपये मागीतल्याचा धक्कादायक प्रकार

  • 27 Apr 2021 07:21 AM (IST)

    नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा हाहाःकार, दोन दिवसांत वाढले 5 हजारापेक्षा जास्त रुग्ण

    – नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा हाहाःकार

    – दोन दिवसांत वाढले ५ हजार पेक्षा जास्त रुग्ण, ५५ मृत्यू

    – ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुधारा, भाजप आ. टेकचंद सावरकरांची मागणी

    – आ. टेकचंद सावरकर यांनी केली आरोग्य केंद्रांची पाहणी

    – आ. टेकचंद सावरकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा

    – आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामठी मतदार संघातील आरोग्य केंद्रात सुरु

  • 27 Apr 2021 07:04 AM (IST)

    नागपुरात लसीकरण केंद्रावरच कोरोना संशयीतांच्या चाचण्या

    – नागपुरात लसीकरण केंद्रावरच कोरोना संशयीतांच्या चाचण्या

    – हनुमान नगर झोनमधील दुर्गानगर शाळेतला धक्कादायक प्रकार

    – एकाच ठिकाणी लसीकरण आणि चाचणीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका

    – नागपूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा उजेडात

    – एकाच केंद्रात लसीकरण, संतप्त नागरीकांचा व्हीडीओ व्हायरल

  • 27 Apr 2021 07:01 AM (IST)

    लग्न आणि वरातीत गर्दी जमवण आलं अंगलट, कोल्हापुरात पाच जणांवर गुन्हा

    कोल्हापूर

    लग्न आणि वरातीत गर्दी जमवण आलं अंगलट

    कोल्हापूर जिल्ह्यातील शेळप गावात लग्न सोहळ्यात कोरोना नियमांच उल्लंघन केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

    आजरा पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल

    25 लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी असताना जमवले दीडशेहून अधिक लोक

    बॅन्जोच्या तालावर वरातही काढली

  • 27 Apr 2021 06:59 AM (IST)

    गेल्या 24 तासांत मुंबईत 3792 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासांत मुंबईत 3792 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    विशेष म्हणजे मुंबईत गेल्या 24 तासांत 41 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्यात

    गेल्या 24 तासात बाधित रुग्णांची संख्या 3876

    24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9150

    बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट

    मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,46,861

    कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण पाहिलं तर मुंबईत हे प्रमाण 87 टक्के

  • 27 Apr 2021 06:53 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 2538 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    पुण्यात गेल्या 24 तासांत 2538 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    तर 4351 रुग्णांनी कोरोनावर मात

    पुणे शहरात दिवसभरात 70 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

    यामध्ये पुण्याबाहेरील 16 रुग्णांचा समावेश

    पुण्यात सध्या 1371 रुग्णांची प्रकृती ही गंभीर

Published On - Apr 27,2021 9:36 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.