राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात देशात 46 हजार 148 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 58 हजार 578 जणांनी कोरोनावर मात केलीय. 979 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 5 लाख 72 हजार 994 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi 29 June 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
पिंपरी चिंचवड -शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे बुधवारी बंद
-पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील.
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकचा मृत्यू झाला आहे
आतापर्यंत 1127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56068 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 386 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत
सोलापूर –सोलपुरात उद्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण नाही
सलग सातव्या दिवशी लसीकरण नाही
लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण ठप्प
शहरातील 34 लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाही
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद
19 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
138 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 477027
एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 467725
एकूण मृत्यू संख्या – 9025
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 286 नव्या कोरोना रुग्णांची वाढ
– दिवसभरात 232 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 14 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 9
-288 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 470809
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2320
– एकूण मृत्यू -8583
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 467106
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5362
पुणे महापालिकेचा लसीकरणाचा नवा रेकॉर्ड
तीन दिवसात एक लाख जणांच्या लसीकरणाचा टप्पा पार
सरकारकडून मुबलक लस उपलब्ध झाल्यानंतर आता पुणे महापालिकेकडून लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग
रोज खासगी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांची मिळून 60 हजार जणांचे रोज लसीकरण करण्याची क्षमता
26 जूनला आतापर्यंतच सर्वाधिक लसीकरण करत एका दिवशी सुमारे 51 हजार जणांना दिली लस
तर 26 तारखेपासून तीन दिवसात एक लाख दोन हजार 603 जणांचं करण्यात आलं लसीकरण
लसींचा पुरवठा जर मुबलक प्रमाणात झाला तर 20 दिवसातच संपूर्ण शहरातील नागरिकांचे लसीकरण होईल पूर्ण
औरंगाबाद : tv9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट
अखेर बजाजनगर आरोग्य केंद्रावर टोकनचे वाटप
पाच तासापासून उन्हात ताटकळलेल्या लोकांना टोकन वाटप
काहींना आज तर काहींना उद्या दिली जाणार लस
बजाजनगर लसीकरण केंद्रावरील लोकांची tv9 ने दाखवली होती व्यथा
– नाशिकच्या एम.जी रोड परिसरातील दुकान अचानक बंद केल्याने व्यापाऱ्यांमध्य रोष
– मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश आहेत मग,मोबाईल शॉप बंद का केले व्यापाऱ्यांचा प्रश्न
– पूर्वसूचना न देताच पोलिसांनी दुकान केली बंद
– प्रशासनाच्या नियमावली बाबत दुकानदारांमध्य संभ्रम
– प्रशासनाच्या नियमांना नाशिककरांकडून केराची टोपली
– मेनरोड परिसरात ग्राहकांची गर्दी
– पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनूसार पास बाबत नागरिकांमध्य संभ्रम
– अनेक नागरिक विनामास्क बाजारात
– पोलीस रस्त्यावर उतरून मास्क लावण्या बाबत करत आहेत जनजागृती
– कोरोनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा,पोलिसांच आवाहन
दिल्ली –
देशात 24 तासात नवे रूग्ण – 37,566
देशात 24 तासात मृत्यू – 907
देशात 24 तासात डीस्चार्ज – 56,994
एकूण रूग्ण – 3,03,16,897
एकूण मृत्यू – 3,97,637
एकूण डीस्चार्ज – 2,93,66,601
एकूण एक्टीव्ह रूग्ण – 5,52,659
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
India reports 37,566 new #COVID19 cases, 56,994 recoveries, and 907 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 3,03,16,897
Total recoveries: 2,93,66,601
Active cases: 5,52,659
Death toll: 3,97,637 pic.twitter.com/BK1Gi9IHSP— ANI (@ANI) June 29, 2021
सोलापूर-
कोरोनाने आणि आई-वडील अशा दोघा पालकांचा मृत्यू झाल्यास महाविद्यालय-विद्यापीठाची शैक्षणिक फी आणि परीक्षा शुल्क माफ होणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा निर्णय
विद्यापीठाने कोरोना महामार्गामुळे मागील वर्षाची 20 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना केली आहे परत
सोलापूर-
सोलापुरात 190 मेट्रिक टन ऑक्सिजनची साठवणूक होणार
कोणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा सतर्क
ऑक्सिजन साठवणुकी करिता प्रशासनाकडून तयारी सुरू
तीन दिवस पुरेल इतका मुबलक ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहील यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
दुसऱ्या लाटेत शहर व ग्रामीण परिसरात रोज 63 मेट्रिक टन ऑक्सिजनची होती आवश्यकता
मात्र सोलापूरला फक्त 40 ते 45 मेट्रिक टन ऑक्सिजनचा होत होता पुरवठा
उस्मानाबाद
कोरोना काळात उस्मानाबाद जिल्ह्यात 179 मेडिकल दुकाने वाढली तर अन्न व औषध विभागाने 30 पेक्षा अधिक दुकाने प्रस्ताव नाकारले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिवभोजन थाळी ठरली आधार , जिल्ह्यातील 14 केंद्रावर 1 लाख 79 हजार 505 जणांनी घेतला लाभ , 14 जुलै पर्यंत मोफत थाळी मिळणार
कोरोना लाट ओसारल्याने जिल्ह्यातील 58 पैकी 30 कोविड केअर सेंटर बंद पडल्याने जवळपास 300 हुन अधिक कंत्राटी कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड
– नागपूर जिल्हयात सलग सातव्या दिवशी कोरोनाचा पॅाझीटीव्हीटी रेट अर्धा टक्का
– कोरोनाचा पॅाझीटीव्हीटी रेट खाली आल्याने मोठा दिलासा
– गेल्या २४ तासांत नागपूर जिल्हयात कोरोनाचा एकही मृत्यू नाही
– गेल्या २४ तासांत ४६९४ जणांच्या तपासणीतून २४ जण पॅाझिटीव्ह
– नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात
नाशिक –
शहरात मध्यरात्रीपासून जमावबंदी, संचारबंदी आणि नाकाबंदी सुरू
निर्बंधांच्या कठोर अमलबजावणीला सुरुवात
शहरात पहाटे 5 ते संध्याकाळी 6 जमावबंदी लागू
या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तिनि एकत्र येण्यास मज्जाव
बाजारात जाणाऱ्यांसाठी पास ची व्यवस्था करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
शहरात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता पोलीस प्रशासनाची तयारी
नाशिक –
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका
राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतला महापालिकेच्या तयारीचा आढावा
मनपा दररोज 240 टन ऑक्सिजन पुरेल एवढा साठा ठेवणार
27 पीएसए प्लांटची जिल्ह्यात निर्मिती झाल्याची माहिती
मनपाने केली 2000 जम्बो सिलेंडर खरेदीची तयारी
शहरातील कोव्हिडं सेंटर करता हे जम्बो सिलेंडर केले जाणार उपलब्ध
पुणे :
– दिवसभरात १५७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २८० रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२.
-२९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७७७४१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२८९.
– एकूण मृत्यू -८५७८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६६८७४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४१७६