Corona Cases and Lockdown News LIVE : सांगलीत दिवसभरात 231 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
सांगलीत दिवसभरात 231 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट
जिल्ह्यात आज दिवसभरात 231 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात कोरोनामुळे आज 4 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1800 वर
सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2044 वर
आज दिवसभरात 139 जण कोरोनामुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 47806 वर
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 51650 वर
-
चंद्रपुरात 24 तासांत 280 नव्या रुग्णांची नोंद, आतापर्यंत 426 जणांचा मृत्यू
चंद्रपूर: गेल्या 24 तासांत 2095 नमुने तपासणीतून 280 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 1 रुग्णाचा मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 27757
एकूण कोरोनामुक्त : 25270
सक्रिय रुग्ण : 2061
एकूण मृत्यू : 426
एकूण नमूने तपासणी : 273750
-
-
नाशिकमध्ये 3308 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद
नाशिकमध्ये दिवसभरात 2705 जण कोरोनामुक्त
आज दिवसभरात 3308 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद
नाशिक मनपा भागात- 1719 रुग्ण
नाशिक ग्रामीण भागात- 1404 रुग्ण
मालेगाव मनपा भागात- 0116 रुग्ण
जिल्हा बाह्य रुग्ण- 0069 रुग्ण
नाशिकमध्ये दिवसभरात 18 बाधितांचा मृत्यू
-
नांदेडमध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू, नव्या 1079 कोरोनाग्रस्तांची नोंद
नांदेड – कोरोना अपडेट
म
गेल्या 7 दिवसांत 120 रुग्णांच मृत्यू
आतापर्यंत एकूण 794 कोरोनाबाधितांचा मृत्यू
नांदेडमध्ये चोवीस तासांत 1079 नवे कोरोना रुग्ण
सध्या 10157 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु
यापैकी 172 रुग्णांची प्रकृती गंभीर
25 तारखेपासून लॉकडाऊन सुरु होणार तरीही रुग्नसंख्या आणि मृतांमध्ये वाढ
-
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात 233 नवे कोरोना रुग्ण, आतापर्यंत 825 जणांचा मृत्यू
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज एकूण 233 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बांधितांचा आकडा पोहोचला 30 हजार 634 वर
आतापर्यंत 27 हजार 611 रुग्ण कोरोनामुक्त
मीरा भाईंदर मनपा क्षेत्रामध्ये 2198 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंमत 825 बाधितांचा मृत्यू
-
-
नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे 58 जणांचा मृत्यू, 2885 नव्या रुग्णांची नोंद
नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे 58 जणांचा मृत्यू
दिवसभरात 2885 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
आज दिवसभरात 1705 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या पोहोचली 226038 वर
आतापर्यंत एकूण 181609 जण कोरोनामुक्त
नागपुरात कोरोनामुळे आतापर्यंत 5098 जणांचा मृत्यू
-
येवल्यात आणखी 51 जणांना कोरोनाची लागण, सध्या 401 बाधितांवर उपचार सुरु
येवला : आणखी 51 जणांना कोरोनाची लागण
आतापर्यंत 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 2070 वर
आतापर्यंत 1603 जण कोरोनामुक्त
सध्या 401 बाधितांवर उपचार सुरु
-
नाशिकमध्ये कोरोनाग्रस्तांचा ऑक्सिजन सिलिंडरसह ठिय्या
दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा नाशिक मनपा समोर ठिय्या
एका रुग्णाचा ऑक्सिजन सिलेंडरसह ठिय्या
अनेक रुग्णालय फिरूनही बेड मिळत नसल्याने केलं ठिय्या आंदोलन
एका पेशंटला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने केलं आंदोलन
मनपाकडून कोरोना संदर्भात होत असलेल्या तोकड्या उपायोजना चव्हाट्यावर
दोनही पेशंटला रुग्णवाहिकेतून बिटको रुग्णालयात हलवले
शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगूजर यांची मनपा कारभारावर टीका
-
लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, वेगवेगळी चर्चा सुरू : राजेश टोपे
राजेश टोपे यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती
- बेड उपलब्ध नाहीत अशी कुठेही स्थिती नाही
- काही विशिष्ट हॉस्पिटलमध्ये, जिथे लोकांची मागणी असते तिथे आयसीयू बेडची कमतरता जाणवते
- त्यामुळे तशी बेडची कमतरता नाही
- लॉकडाऊनच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही
- वेगवेगळी चर्चा सुरू असते
- निर्बंध कडक करण्याची पावलं राज्य सरकार उचलणार आहे, त्यादृष्टीने लोकांनी तयारी ठेवावी
- गर्दी होते अशा ठिकाणी निर्बंध लावावे लागतील
- अशा पद्धतीने गर्दी करणे हे सध्याच्या परिस्थितीला परवडणारे नाही
- जलिल यांनीही काळजी घ्यायला हवी
- अत्यंत जबाबदार नागरीक म्हणून ते खबरदारी कळतील
- मास्क न घालणारी एक व्यक्ती ४०० लोकांना संक्रमित करते?
- मास्क वापरणाऱ्या लोकांना कोरोना होण्याचं कारण नाही
- आपल्या तोंडातून उडण्या-या शिंतोडे
- असं नाही की एका व्यक्तीमुळे ४०० लोकांना कोरोना होतो, पण काही तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवले असेल
- संख्येवर न जाता लोकांनी मास्क वापरला पाहिजे
-
बुलडाण्यात आज 630 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
बुलडाणा –
आज 630 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
तर आजपर्यंत 260 जणांचा कोरोनाने मृत्यू
गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू
जिल्ह्याचा मृत्यू दर 0.68 % वर
पॉझिटिव्हिटी दर 13.82 वर
आजपर्यंत जिल्ह्यात 37,744 कोरोना रुग्ण आढळले
तर आजरोजी जिल्ह्यात 5,494 रुग्ण उपचार घेत आहेत
-
औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार : चंद्रकांत खैरे
औरंगाबाद –
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर चंद्रकांत खैरे यांची आगपाखड
औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार
इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा
गुन्हा दाखल करून इम्तियाज जलील यांना तात्काळ अटक करा
खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी
जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून काल इम्तियाज जलील यांनी साजरा केला जल्लोष
इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई नाही केल्यास कलेक्टरची मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
संतप्त चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया
-
पवन नगरच्या भाजीबाजारात नियमांचा फज्जा, भाजीबाजारात जाण्यासाठी 5 रुपये शुल्क भरुन पावती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
नाशिक –
– पवन नगरच्या भाजीबाजारात नियमांचा फज्जा, काल संध्याकाळचा प्रकार
– भाजीबाजारात जाण्यासाठी 5 रुपये शुल्क भरुन पावती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
– पावती घेण्यासाठी नागरिकांची भली मोठी रांग, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा
– गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या प्रवेश शुल्क आकारणीचा उलट परिणाम
– पावती घेण्यासाठी नागरिकांना गर्दी केल्यानं नियमांची पायमल्ली
-
रत्नागिरीत कोरोना लसीकरणाची केंद्र वाढवली जाणार
रत्नागिरी- कोरोना लसीकरणासाठी केंद्र वाढवली जाणार
जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात देखिल होणार लसीकरण
89 आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु केलं जाणार
पुढील चार दिवस पुरेल एवढीच जिल्ह्यात लस
-
पालघरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश
पालघर :
पालघर जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ
तलासरी तालुक्यात नगरपंचायत क्षेत्रात 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
नगरपंचायत प्रशासनाकडून 31 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश
अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद
रिक्षा वाहतूक सुरळीत सुरू राहणार
-
कल्याण डोंबिवलीतील 26 खाजगी रुग्णालयात आडिटर्सची नियुक्ती
कल्याण-डोंबिवली : केडीमसी हद्दीत कोरोना रुग्णांना संख्या वाढत आहेत. महापालिका हद्दीतील २६ कोविड रुग्णालयांतील बिल तपासमी आणि बेडची उपलब्धता तसेच सरकारी दरानुसार बीलाची आकारणी केली जाते की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा ऑडीटर्सच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाल्यावर महापालिकेकडे अपुरी आरोग्य यंत्रणा असल्याने महापालिकेने २६ खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णावर उपचार करण्याची परवानगी दिली होती. या खाजगी रुग्णालयांच्या बिलाबाबत आणि अन्य प्रकरणी अनेक तक्रारी महापालिका प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने आडीटर्स नेमले होत.
त्यांच्या करवी शहानिशा करुन ७५ लाखा पेक्षा जास्त आकारण्यात आलेल्या बिलाची रक्कम रुग्णालयांकडून वसूल करुन रुग्णांना परत केली होती. कोरोना रुग्णांचा प्रादूर्भाव कमी झाल्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये आडीटर्सच्या नियुक्ता प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. आत्ता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे पाहता महापालिकेने जास्ती जास्त बेड उपलब्ध करण्याची तयारी सुरु केली. पुन्हा २६ खाजगी रुग्णालयात कोविडवर उपचार केले जाणार आहे. या २६ रुग्णालयात पुन्हा ऑडीटर्स नियुक्त केले असल्याचे महापालिका प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.
-
नाशिकच्या भाजीबाजारात नियमांचा फज्जा, पावती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
नाशिक – पवन नगरच्या भाजीबाजारात नियमांचा फज्जा, काल संध्याकाळचा प्रकार भाजीबाजारात जाण्यासाठी 5 रुपये शुल्क भरून पावती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पावती घेण्यासाठी नागरिकांची भली मोठी रांग, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या प्रवेश शुल्क आकारणीचा उलट परिणाम पावती घेण्यासाठी नागरिकांना गर्दी केल्यानं नियमांची पायमल्ली
-
नागपुरातील हॉटस्पॉट परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करुन करणार सील
नागपूर –
नागपुरातील हॉटस्पॉट परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून करणार सील,
कॉटेक्ट ट्रेसिंग आणि कोरोना रुग्णांचा मुक्त संचार सुरूच असल्यानं महापालिकेचा निर्णय,
जिल्ह्यात रुग्ण आणि मृत्यु संख्या दुपटीने वाढल्याने महापालिका ऍक्शन मोड मध्ये,
नागपुरातील कोरोना संक्रमण वाढतेय झपाट्यानं
-
संकष्टी चतुर्थीच्या पाश्वभूमीवर रत्नागिरीतील गणपती पुळेतील मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं
रत्नागिरी –
संकष्टी चतुर्थीच्या पाश्वभूमीवर रत्नागिरीतील गणपती पुळेतील मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं
कोरोनाच्या पाश्वभूमीवर मंदिर खुलं असून देखिल भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी
सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं
कोरोनाचे सर्व नियम पाळून मंदिर प्रशासनाकडून दिलं जातंय दर्शन
वाढता कोरोना आणि संचारबंदीच्या पाश्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांची गणपतीपुळ्याकडे पाठ
-
येवल्यात उपचारादरम्यान 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, आतापर्यंत 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवला –
उपचारादरम्यान 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू
आतापर्यंत 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यातील २०२५ कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली
कोरोनावर १५७५ जणांनी मात करत केली घरवापसी
उर्वरित ३९० जण कोरोणा उपचार घेत आहे
गेल्या ४ दिवसात ७ कोरोणा बाधित रुग्णांचा मृत्यू
-
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात उद्यापासून 10 दिवस जनता कर्फ्यू
नाशिक –
– नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात उद्यापासून 10 दिवस जनता कर्फ्यू
– 1 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु
– देवळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत निर्णय
– कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जनता कर्फ्युचा निर्णय
– अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवणार
– किराणा दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय
-
नवी मुंबईत कोव्हिड नियंत्रणासाठी विभागनिहाय समन्वय अधिकारी नियुक्ती
नवी मुंबई :
कोव्हिड नियंत्रणासाठी विभागनिहाय समन्वय अधिकारी नियुक्ती
10 मार्चपासून मनपा क्षेत्रातील कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ
आठही विभागांसाठी विभाग प्रमुख दर्जाचे “समन्वय अधिकारी” नियुक्त
प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन ब्रेक द चेनच्या प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात
जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण होणेबाबत नियोजन
-
कामाशिवाय नागरिकांना कार्यालयात बोलावू नका, सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचे परिपत्रक
सोलापूर –
कामाशिवाय नागरिकांना कार्यालयात बोलावू नका
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाचे परिपत्रक
स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्यालय असल्याने छोट्या-मोठ्या कामासाठी जिल्हा परिषदेत होत असल्याने नागरिकांची गर्दी
त्यामुळे अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांना कार्यालयात न बोलावण्याचे आदेश
-
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 616 रुग्ण, तर सहा जणांचा कोरोनाने मृत्यू
सोलापूर –
शहर जिल्ह्यात कोरोनाचे 616 रुग्ण
तर सहा जणांचा कोरोनाने मृत्यू
एकूण रुग्णांची संख्या 61 हजार 99
त्यापैकी 53 हजार 644 बरे झाले
पाच हजार चारशे नऊ जणांवर उपचार सुरू
आतापर्यंत 1946 जणांचा कोरोनाने मृत्यू
-
बारामतीत गेल्या 24 तासात 149 जणांना कोरोना
बारामती –
– बारामतीत गेल्या 24 तासात 149 जणांना कोरोना
– काल झाली होती 768 जणांची तपासणी
– 174 जणांचा तपासणी अहवाल प्रतिक्षेत
– आतापर्यंत 9403 जणांना कोरोनाची लागण
– 162 जणांचा मृत्यू
-
पुणे कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे 61 ते 70 वयोगटातील रुग्णांचे
पुणे –
– कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक 2 हजार 936 मृत्यू हे 61 ते 70 वयोगटातील रुग्णांचे,
– जिल्ह्यात २९ मार्च २०२१ पर्यंत एकूण ९ हजार ८७३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– एकूण मृत्यूंमध्ये ६ हजार ८१५ पुरुष रुग्णांचा तर, ३ हजार ५७ महिला रुग्णांचा समावेश आहे.
– कोरोना मृत्यूमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
– जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कोरोना रुग्ण मृत्यू अहवालातून माहिती,
– सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये ५१ ते ६० वयोगटातील रुग्ण दुसऱ्या तर, ७१ ते ८० वयोगटातील रुग्ण हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
-
सोलापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही
सोलापूर –
सोलापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
तूर्तास जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही पण निर्बंध आणखीन कडक करण्यात येणार
ग्रामीण आणि शहरातील तपासण्याची संख्या वाढवण्यात येणार
सोलापूर जिल्ह्यात 57000 rt-pcr व दीड लाख रॅपिड टेस्टच्या किट उपलब्ध
-
पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येनं प्रशासनाची धावपळ
पुणे –
पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येनं प्रशासनाची धावपळ,
कोव्हीड सेंटर्स आणि खाटांची व्यवस्था करण्यासाठी मनुष्यबळ पडतंय अपूरं,
शहरातील 18 छोटे मोठे दवाखाने बंद करून कर्मचारी वर्ग कोव्हीड सेंटर्सला केला वर्ग,
महापालिका करणार तातडीची आरोग्य विभागात भरती,
50 एमबीबीएस, 50 बीएमएमएस ,100 नर्स, आणि 100 चतुर्थ श्नेणी कर्मचाऱ्यांची भरती,
आज आणि उद्या पार पडणार भरतीप्रक्रीया,
मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर दवाखाने पुन्हा सुरू होणार आरोग्य विभागाची माहिती
-
कोरोनाचा भय विसरुन रायगडमध्ये शिवजयंतीचा उत्साह
रायगड
कोरोनाचा भय विसरुन रायगडमध्ये शिवजयंतीचा उत्साह
मिरवणुका रद्द, ज्योत आणि सजावटींवर मंडळांचा भर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वच कार्यक्रम रद्द केले जात असताना रायगडमध्ये कोरोनाच भय विसरून उत्साहात आणि जल्लोशात शिवजयंत साजरी केली जात आहे.
मंडळांनी मिरवणुकी रद्द केल्या असल्यातरी शिवज्योत मोठ्या प्रमाणात आणल्या त्याच प्रमाणे सजावटींवर भर दिला आहे.
शिवज्योती प्रमाणेच नाक्या नाक्यावर सजावट करून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे.
-
पुणे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात रक्ताचा तुटवडा
पुणे –
– कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात रक्ताचा तुटवडा
– गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढलाय,
– सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता,
– रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
– नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन,
– २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती,
-
नागपुरात कोरोना मृत्यूचं तांडव सुरच
नागपूर –
नागपुरात कोरोना मृत्यूचं तांडव सुरच
चार दिवसांपासून मृत्यू सतत 50 च्या वर होत असल्याने प्रशासनाची वाढली चिंता
मागील 30 दिवसात 705 रुग्णांचा मृत्यू तर 73 हजर 365 रुग्णांची नोंद
शहरात सक्रिय रुंगणाची संख्या वाढली असून 38 हजार वर पोहचली
यातील 32 हजार होमआसोलेशन मध्ये आहे
तर 6 हजार पेक्षा जास्त खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे
परिस्थिती बघता प्रशासनाची व्यवस्था कोलमडण्याची शक्यता
-
औरंगाबाद शहरात एका दिवसात 43 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद –
औरंगाबाद शहरात एका दिवसात 43 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
आजपर्यंत कोरोना बधितांचा मृत्यूंचा सर्वात मोठा आकडा
काल दिवसभरात 1116 कोरोना रुग्णांची झाली वाढ
तर तब्बल 43 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू
एकाच दिवसात 43 जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ
-
वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुगणाची वाढ सुरुच
वसई-विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुगणाची वाढ सुरुच
मागच्या 24 तासात 114 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, तर आज दिवसभरत 2 जणांचा मृत्यू
71 जणांनी केली कोरोनावर मात
वसई-विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 32,952
कोरोना मुक्त झालेली रुग्ण संख्या 30,266
आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली संख्या 914
कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 1772
-
पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 1 लाख 18 हजार कोरोनामुक्त, प्लाझ्मा दान केले अवघ्या 2095 जणांनी
पिंपरी-चिंचवड
– शहरात तब्बल 1 लाख 18 हजार कोरोनामुक्त,प्लाझ्मा दान केले अवघ्या 2095 जणांनी
– कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे,परिणामी प्लाझ्माची मागणी वाढली
– मात्र जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत ते प्लाझ्मा दान करत नसल्याने शहरात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे
– सद्यस्थितीत शहरात प्लाझ्मा मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे
-
कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा ‘सल्ला’ न घेतलेल्या आणि महापालिकेला न कळवणाऱ्या रुग्णांवर आता असणार महापालिकेची नजर
पुणे –
कोरोनाची लागण होऊनही डॉक्टरांचा ‘सल्ला’ न घेतलेल्या आणि महापालिकेला न कळवणाऱ्या रुग्णांवर आता असणार महापालिकेची नजर
अशा रुग्णांच्या दारात रुग्णवाहिका पाठवून त्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार
कोरोनाची साथ रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू
त्याचाच भाग म्हणून घरी असलेल्या रुग्णांशी मोबाईलद्वारे संपर्कात राहून उपचाराची चौकशी करण्याची महापालिकेन केली व्यवस्था
त्यातून प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात राहून त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून त्यानंतरचे उपचारही घेण्याचे बंधनकारक
त्याकडे काणाडोळा करणाऱ्यांना जबरदस्तीने कोविड केअर सेंटरमध्ये नेणार
-
पुण्यात कोरोना रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यास सुरुवात
पुणे
कोरोना रुग्ण असलेल्या घरांच्या दारावर आता रुग्णांची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यास सुरुवात
मात्र, काही ठिकाणी हे स्टिकर्स काढले जात असल्याचे आलं समोर
दारावरचे स्टिकर्ड काढणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई होणार
आतापर्यंत लावलेल्या स्टिकर्सच्या पाहणीला महापालिकेकडून सुरवात
-
पुणे महापालिकेने लसीकरणाच्या मोहिमेचा जोर वाढवला
पुणे –
पुणे महापालिकेने लसीकरणाच्या मोहिमेचा जोर वाढवला
महापालिकेने तयार केला लसीकरणाचा ‘मास्टर’ प्लॅन
नव्याने २२३ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला
त्याला जर परवानगी मिळाल्यास लसीकरण केंद्राची संख्या ३४० इतकी होणार असून दिवसाला तब्बल ७० हजार जणांना लसीकरण करणे होणार शक्य
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती
Published On - Mar 31,2021 8:08 PM