Corona : राज्यात कोरोना पाय पसरतोय! आज कोरोनाबाधींताचा आकडा 3 हजार पार;
मुंबईतील संसर्ग दर 12.74% इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत मुंबईत खळबळ उडाली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काल गुरुवारी, राज्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 2,813 होता. तो आज पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा चिंतेचे वातावरण बनले आहे. आज (शुक्रवारी) कोरोनाचे नवे रुग्ण 3081 समोर आले असून कोरोनाबाधीतांच्या (corona patient) आकड्यांनी आकडा 3 हजार पार केला आहे. तर या आठवड्यातील हा सगळ्यात जास्त नोंद झाली आहे. तर समाधानाची बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (health department) दिली आहे. तर आज दिवसभरात 1323 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून राज्यात सध्या सक्रिय रूग्णांची संख्या ही 13,329 झाली आहे.
Maharashtra | 3081 new COVID cases were reported today in the state while 1323 patients were discharged. With zero deaths today, active cases stood at 13,329 pic.twitter.com/d4oUxFF3ee
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 10, 2022
सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,04,709 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर आतापर्यंत 8,1237,544 जनांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. तर आज कोरोनाचा मृत्यूदर हा शुन्य राहील्याने मृतांचा आकडा हा 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारीही 2,701 एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
Maharashtra | Mumbai reports 1,956 new Covid cases today. With zero deaths in the city, 763 patients recovered in last 24 hrs. Active cases stand at 9,191 till now pic.twitter.com/Jvj9Iiyl1M
— ANI (@ANI) June 10, 2022
कोरोनावरून मुंबईत खळबळ
दरम्यान शुक्रवारी मुंबईत 1,956 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत शहरात एकही मृत्यू झाला नसून 763 रुग्ण बरे झाले आहेत. तर 9,191 सक्रिय प्रकरणे आहेत. मुंबईतील संसर्ग दर 12.74% इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे कोरोनावरून मुंबईत खळबळ उडाली आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून येथे जवळपास तिप्पट रुग्ण आढळून आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सांगितले की गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 15 टक्के प्रकरणे वाढली आहेत. गुरुवारी मुंबईत 1702 रुग्ण आढळले. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी अधिकाऱ्यांना कोविड चाचणी वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गुरुवारी देशात 7 हजार 584 रुग्ण
दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गुरुवारी देशात 7 हजार 584 रुग्ण आढळले होते. तर 24 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे रुग्णांची संख्या 4 कोटी 32 लाख 5 हजार 106 झाली होती. तर आतापर्यंत या संसर्गामुळे 5 लाख 24 हजार 747 लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचेही समोर आले होते. यापूर्वी बुधवारी देशात 7240 पॉझिटिव्ह आढळले होते. तर 8 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या 7 दिवसांचं कोरोना आकडेवारी बघितल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असल्याचंही समोर आलं 3 जूनला देशात केवळ 3945 पॉझिटिव्ह होते. आता ही संख्या 7584 वर पोहोचली आहे. यामुळे कोरोना संकटाचे ढग गडद होताना दिसतायेत.