Corona Goddess Temple | कोंबडे-बकऱ्यांचा बळी, सोलापुरात चक्क ‘कोरोना देवी’चे मंदिर

कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले असून देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.

Corona Goddess Temple | कोंबडे-बकऱ्यांचा बळी, सोलापुरात चक्क 'कोरोना देवी'चे मंदिर
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 5:17 PM

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील पारधी वस्ती सध्या चर्चेत आहे (Corona Goddess Temple In Solapur). राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन सुरु असताना, इकडे कोरोना देवीचे मंदिर उघडण्यात आले आहे. पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून ‘कोरोना’ नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Corona Goddess Temple In Solapur).

कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले असून देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे. तर अनिस हा केवळ भावनेचा बाजार असल्याचं सांगितलं आहे.

अंधश्रदा विषयक कितीही कायदे काढले तरी समाजातील अंधश्रद्धा अद्यापही हद्दपार होत नाही. आजही भावनेचा बाजार मांडून अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करुन, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेवून अज्ञातांकडून कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे.

सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. इकडे मात्र पारधी वस्तीत कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करुन त्याचे पूजन केल्याने त्यांचा अशिक्षितपणा उघड झाला आहे. विशेष म्हणजे या कोरोना देवीचा प्रभाव ही लोकांना जाणवू लागल्याचं इथल्या वस्तीतल्या लोकांचं म्हणणं आहे (Corona Goddess Temple In Solapur).

कहर म्हणून लोक त्यात कशाची जोड देतील याचा नेम नाही. कोरोनाबाईसाठी कोंबडे कापले जातात, देवासाठी हा प्रकार होत असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करत असताना इकडे मात्र भलतंच सुरु आहे. आमचा रोग जावा, सुख मिळावे म्हणून कोरोनाबाईला इथे जागा दिली आहे. त्यामुळे देवाच्या कृपेमुळे तोंडाला कपडे लावायची गरज नसल्याचं सांगितलं जातं आहे.

वस्तीतल्या महिलांना ही अकल्पीत देवी मोठा आधार वाटू लागली आहे. आम्ही कोरोणादेवीची स्थापन केली. आम्ही तिला मरेपर्यंत माणणार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरु आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले होईल, अशी आशा या महिलांनी व्यक्त केली आहे.

तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गोष्टीचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली आहे. माणसाचे मन भावनिकतेने विचार करते, त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे दिसून येत असल्याचं अनिसने म्हंटलं आहे.

Corona Goddess Temple In Solapur

संबंधित बातम्या :

‘वंचित बहुजन आघाडीने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला का?’ प्रकाश आंबेडकर म्हणतात…

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.