Vaibhav Naik Corona | सिंधुदुर्गातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण
सिंधुदुर्गातील शिवसेनेचे बुलंद नेते आणि आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Shivsena MLA Vaibhav Naik tested Corona Positive) आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील शिवसेनेचे बुलंद नेते आणि आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Shivsena MLA Vaibhav Naik tested Corona Positive) आहे. वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनेकांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाची चिंता वाढली (Shivsena MLA Vaibhav Naik tested Corona Positive) आहे.
वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. लॉकडाऊनच्या काळात आमदार नाईक यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वैभव नाईक हे दोन-तीन दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जिल्हा दौऱ्यासोबत होते. आमदार नाईक यांच्या सहवासात जिल्ह्यातील अनेक लोक आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी संपर्कात आलेले आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
आतापर्यंत राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच नाशिकमधील शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र दराडे हे येवला शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना समजले. यानंतर दराडे यांनी तातडीने कोरोना तपासणी केली. त्यानंतर त्यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यासोबत सिंधुदुर्गातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. येथील कोरोना रुग्ण संख्या न वाढावी यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्नही सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोना, कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ