Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात तूर्तास लॉकडाऊनचा विचार नसल्याचं, कठोर निर्बंध लागणार?

| Updated on: Jan 06, 2022 | 6:20 AM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : राज्यात तूर्तास लॉकडाऊनचा विचार नसल्याचं, कठोर निर्बंध लागणार?
कोरोना विषाणू
Follow us on

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 578 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार259 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे. सोमवारी राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे. राज्यात 3 जानेवारीला ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jan 2022 10:21 AM (IST)

    राज्यात तूर्तास लॉकडाऊनचा विचार नसल्याचं, कठोर निर्बंध लागणार

    राज्यात तूर्तास लॉकडाऊनचा विचार नसल्याचं कळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात उच्च स्तरीय बैठक सुरु होती. या बैठकीत निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. मात्र, तूर्तास लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याची माहिती आहे.

  • 04 Jan 2022 01:30 PM (IST)

    नवी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू

    नवी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. डीडीएमएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयात 50 टक्के उपस्थितीद्वारे काम सुरु ठेवावं, असं सांगण्यात आलं आहे. तर, एम्सनं कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.


  • 04 Jan 2022 01:15 PM (IST)

    राज ठाकरेंच्या निवासस्थानामधील एक कर्मचारी कोरोनाबाधित

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी एक कर्मचारी काल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

    त्यामुळे ‘शिवतीर्थ’ येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी येणे अपेक्षित आहे.

    दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या आहेत.

  • 04 Jan 2022 12:51 PM (IST)

    राज्यातील कोविड निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील : विजय वडेट्टीवार

    राज्यातील कोविड निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, कोरोना परिस्थिती व काही मंत्री बाधित झाल्याने मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलल्याची आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती,

    परिस्थितीनुसार निर्बंध अधिक कडक करण्याचे स्थानिक प्रशासनाला दिले आहेत निर्देश,

  • 04 Jan 2022 12:31 PM (IST)

    Eknath Shinde Corona : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना संसर्ग

    Eknath Shinde Corona : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना संसर्ग

  • 04 Jan 2022 12:12 PM (IST)

    बीकेसी कोविड सेंटरमधे गेल्या चार दिवसांत 300 कोरोना रुग्ण दाखल

    बीकेसी कोविड सेंटरमधे गेल्या चार दिवसांत 300 कोरोना रुग्ण दाखल …

    – 1 तारखेपासून आत्तापर्यंत 300 रुग्ण दाखल..,4 रुग्णांना लागला ऑक्सिजन… जास्त रुग्ण हे सौम्य लक्षण असलेले, बऱ्याच रुग्णांमध्ये लक्षण नाहीत…

    – बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर ऊपचार सुरू…

  • 04 Jan 2022 10:56 AM (IST)

    Nashik Corona Update : नाशिकच्या पंचवटीतील दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील आणखी 10 विद्यार्थिनींना कोरोना

    – नाशिककरांच्या चिंतेत आणखी भर
    – पंचवटीतील दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील आणखी 10 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह
    – दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोरोनाबधित विद्यार्थिनींची संख्या 27 वर
    – 2 दिवसांपूर्वी  महाविद्यालयाच्या वसतिगृहातील 17 विद्यार्थिनी कोरोनाबधित आढळल्या होत्या
    – बाधित विद्यार्थिनींवर विलगीकरणात उपचार सुरू
    – बाधित विद्यार्थिनींच्या उपचार आणि देखरेखीसाठी महाविद्यालय प्रशासनाकडून 2 स्वतंत्र डॉक्टरांची नेमणूक

  • 04 Jan 2022 10:09 AM (IST)

    भाजप आमदार अतुल भातखळकर यांना कोरोना ससंर्ग

    भाजप आमदार अतुल भातखळकर यांना कोरोना ससंर्ग

  • 04 Jan 2022 09:51 AM (IST)

    भारतात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद, 124 जणांचा मृत्यू

    भारतात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद, 124 जणांचा मृत्यू

  • 04 Jan 2022 09:33 AM (IST)

    कर्नाटक सरकारचा अजब फतवा, राज्यात प्रवेशासाठी दोन डोस सोबतच आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा

    कोल्हापूर : कर्नाटक सरकारचा अजब फतवा

    राज्यात प्रवेशासाठी दोन डोस सोबतच rt-pcr अहवाल सक्तीचा

    Rtpcr अहवाल नसणाऱ्या वाहनधारकांना पाठवल जातय परत

    कर्नाटकी फतव्यामूळे प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप

    दोन डोसच सर्टिफिकेट, युनिव्हर्सल पास असताना rtpcr सक्ती कशा साठी वाहनधारकांचा सवाल

  • 04 Jan 2022 09:08 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर झाला दुप्पट

    नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्या वाढीचा दर वाढला रुग्ण वाढीचा दर झाला दुप्पट……
    आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची संख्या 13….

    जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या..
    27

    नंदुरबार 19

    शहादा 06
    नवापूर 01
    तळोदा01
    धडगाव 00
    अक्कलकुवा00

  • 04 Jan 2022 08:22 AM (IST)

    Arvind Kejriwal Corona : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना संसर्ग

    Arvind Kejriwal Corona : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.

  • 04 Jan 2022 08:06 AM (IST)

    नाशिकमध्ये मंगल कार्यालयं, बाजारपेठा पालिकेच्या रडारवर

    नाशिक – मंगल कार्यालयं, बाजारपेठा पालिकेच्या रडारवर

    50 पेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी जमल्यास कार्यलय थेट सील करण्याची कारवाई

    मंगल कार्यालयांवर वॉच ठेवण्यासाठी खास पथक होणार तयार

    बाजारपेठा आणि हॉटेल्स वर देखील अशीच कारवाई करण्याचे आदेश

    आजपासून 15 दिवस लग्नाची दाट तिथी असल्याने प्रशासन सतर्क

  • 04 Jan 2022 07:47 AM (IST)

    कोल्हापूर मध्ये आढळला आणखी एक ओमिक्रोन रुग्ण

    कोल्हापूर मध्ये आढळला आणखी एक ओमिक्रोन रुग्ण

    को वॅक्सिन चे दोन डोस घेऊन ही रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

    तर कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

    परदेशी प्रवास नसताना ही ओमीक्रोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क

    संपर्कात आलेल्या 16 जणांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केली तपासणी

  • 04 Jan 2022 07:46 AM (IST)

    पुण्यात कोरोनाचा वाढता धोका, दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित

    – पुण्यात कोरोनाचा वाढता धोका,

    – शहरातील कोरोना रुग्णामध्ये दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित,

    – मागील 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढ,

    – तसेच आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाल्याचं समजतंय.

  • 04 Jan 2022 07:44 AM (IST)

    विदर्भात कोरोना रुग्णवाढ सुरुच, चिंता वाढली ; 178 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – विदर्भात कोरोना रुग्णवाढ सुरुच, चिंता वाढली

    – विदर्भात 178 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – गेल्या 24 तासांत एकट्या नागपुर जिल्ह्यात वाढले तब्बल 133 कोरोना रुग्ण

    – नागपूर पाठोपाठ अकोल्यात 11 नव्या रुग्णांची नोंद

    – भंडारा जिल्ह्यात नऊ तर चंद्रपूर जिल्ह्यात सात नवे कोरोना रुग्ण

  • 04 Jan 2022 07:24 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील कोरोना निर्बधाबाबत आज निर्णय

    पुणे –

    – जिल्ह्यातील कोरोना निर्बधाबाबत आज निर्णय,

    – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज 4:30 वाजता कोरोना आढावा बैठक,

    – या बैठकीत शाळा, उद्यान आणि सार्वजनिक वाहतूकीवर निर्बंध यावर निर्णय होण्याची शक्यता,

    – शहर आणि जिल्ह्यात अडीच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्या झालीय.

  • 04 Jan 2022 07:19 AM (IST)

    मुंबईत कोरोनाच्या 8082 नवीन रुग्णांची भर, 90 रुग्ण लक्षण विरहित

    मुंबईत कोरोनाच्या 8082 नवीन रुग्णांची भर पडलीये. मात्र त्यापैकी 7272 (90 टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत.

    त्यामुळे एकूण रुग्णांपैकी केवळ 574 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले असुन त्यापैकी केवळ 71 रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासलीये…

    सध्या पालिकेकडे कोविड बधितांसाठी 30,565 बेड तयार असून त्यातील केवळ 3735 (12.2 टक्के) बेड भरले आहेत

  • 04 Jan 2022 06:31 AM (IST)

    Bhiwandi : भिवंडी चिंबी पाडा शासकीय आश्रमशाळा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

    भिवंडी चिंबी पाडा शासकीय आश्रमशाळा कोरोना बाधितांची संख्या वाढली
    एकूण बाधित संख्या 30
    23 मुली
    05 मुले
    02 कर्मचारी

  • 04 Jan 2022 06:30 AM (IST)

  • 04 Jan 2022 06:29 AM (IST)

    Nagpur Vaccination : नागपूरमध्ये पहिल्या दिवशी 13453 मुलांचं लसीकरण

    15 ते 18 वयोगटातील लसीकरण संदर्भात प्राप्त आकडेवारीनुसार नागपूर ग्रामीण मध्ये 6615 तर नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्राप्त आकडेवारीनुसार 6838 असे एकूण 13,453 मुलांचे लसीकरण झाले आहे.