CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली (Corona patient increase maharashtra) आहे.

CORONA : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 6:05 PM

नागपूर : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली (Corona patient increase maharashtra) आहे. नुकतंच यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही दुबईतून आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 9 जण दुबईला गेली होती. यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघेही यवतमाळमधील आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूरनंतर यवतमाळमध्येही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

नागपूरमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण

नागपुरात आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. नागपुरात आता एकूण चार कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या नव्या रुग्णाला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात (Corona patient increase maharashtra) आले आहे.

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच नागपुरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यासोबत देशातीलही कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होऊन 84 झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल’, (WHO Declare Corona As Pandemic) असं WHO ने सांगितलं.

विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेड्सची व्यवस्था

राज्यात नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेड्स उपलब्ध आहेत. 12 मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या देशातून आलेल्या इतर प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठी या प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 685 प्रवाशांपैकी 383 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 10
  • नागपूर – 4
  • मुंबई – 4
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1
  • यवतमाळ – 2

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च

संबंधित बातम्या :

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

कोरोनाचा प्रेक्षकांना फायदा, प्रिमियम पॉर्न व्हिडीओ फ्री

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.