नाशिकमध्ये कोरोनाचं थैमान, दिवसभरात 58 रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांचा आकडा 1356 वर
नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलं (Corona Patient increase Nashik) आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलं (Corona Patient increase Nashik) आहे. जिल्ह्यात काल (3 जून) दिवसभरात 58 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दोघांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1356 कोरोनाबाधित रुग्ण (Corona Patient increase Nashik) आहेत.
कोरोनाचा वाढत आकडा हा नाशिककरांसाठी धोकादायक आहे. जिल्ह्यातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. पण आता मालेगावनंतर नाशिक शहरातही रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासन हादरलं आहे.
जिल्ह्यात एकूण 1356 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 77 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 902 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.
राज्यातही काल दिवसभरात 2560 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 996 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा 74 हजार 860 वर पोहोचला आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 39 हजार 935 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यात काल 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या आता 2 हजार 587 वर पोहोचली आहे.
काल दिवसभरात कुठे किती जणांचा मृत्यू
मुंबई – 49
उल्हासनगर – 3
ठाणे – 2
नवी मुंबई – 3
वसई-विरार – 1
भिवंडी – 1
मीरा भाईंदर- 1
नाशिक- 8
धुळे – 4
जळगाव – 2
अहमदनगर – 1
नंदूरबार – 1
पुणे – 19
सोलापूर – 10
कोल्हापूर – 2
औरंगाबाद – 16
जालना – 1
लातूर- 1
अकोला – 2
इतर राज्ये – 3
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात 32,329 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांचा आकडा 74,860 वर
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 571 वर, गड्डीगोदाम, नाईक तलाव नवे हॉटस्पॉट!