मुंबईत दाखल कोरोना रुग्ण ट्रक आणि पायी प्रवास करत थेट भिवंडीत, आरोग्य यंत्रणाही चक्रावली

मुंबईतील एका रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण अचानक थेट भिवंडीत येऊन सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळला आहे (Corona Patient travel from Mumbai to Bhiwandi).

मुंबईत दाखल कोरोना रुग्ण ट्रक आणि पायी प्रवास करत थेट भिवंडीत, आरोग्य यंत्रणाही चक्रावली
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 2:12 AM

ठाणे : कोरोनाचा संसर्ग अगदी रुग्णाच्या स्पर्शातूनही होतो हे माहित असल्याने अशा रुग्णांच्या सुश्रुशेसाठी वैद्यकीय कर्मचारी देखील पीपीई किट्सचा उपयोग करतात. मात्र, भिवंडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईतील एका रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण अचानक थेट भिवंडीत येऊन सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळला आहे (Corona Patient travel from Mumbai to Bhiwandi). 51 वर्षीय हा रुग्ण बाहेर फिरत असल्याचं महानगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांच्या लक्षात येताच परिसरात एकच गोंधळ उडाला. ही बाब डॉक्टरांना लक्षात आणून दिल्यावर संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणीही झाली आहे.

संबंधित कोरोना रुग्णाला मुंबईतून भिवंडीत कोणी सोडले, तो इतर किती रुग्णांच्या संपर्कात आला असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर या सर्व गोष्टींचा तपास लावण्याचं आव्हान असणार आहे. संबंधित कोरोना रुग्ण भिवंडीतील ज्या भागात फिरताना आढळला तेथे जवळच महानगरपालिका कर्मचारी वसाहत असून तेथे सुमारे 200 नागरिक राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

22 एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता संबंधित रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने त्याला कोव्हिडं 19 रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदरच्या रुग्णास डायलेसिस आवश्यक असल्याने 22 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता त्याला मुंबईतील एका रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी रुग्णाची भाचीही रुग्णासोबत होती. त्यामुळे तिलाही क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

23 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजल्याच्या दरम्यान हा रुग्ण संबंधित कोरोना रुग्णालय आणि जवळच्या कर्मचारी वसाहत परिसरात सुमारे पाऊण तास घुटमळताना दिसला. त्यावेळी महानगरपालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवाशांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून याची माहिती दिली. डॉक्टरांनी बाहेर येऊन बघितले असता त्यांनी रुग्णास ओळखले आणि तात्काळ रुग्णवाहिकेतून त्याची पुन्हा मुंबईतील रुग्णालयात रवानगी केली. या घटनेचा मोबाईल व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना रुग्ण मुंबईत भिवंडीला कसा आला?

या सर्व घडामोडीत रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार तो रुग्णवाहिकेतून ठाणे येथे आला. तेथून पुढे एका ट्रकमध्ये बसून ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावरील राजनोली नाका या ठिकाणी उतरला. तेथून या रुग्णाने पायी प्रवास केला. त्यामुळे हा रुग्ण दाखल रुग्णालयातून बाहेर पडलाच कसा? त्याच्याकडे ट्रान्स्फर लेटर नव्हते, मग सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले का नाही, त्याला रुग्णवाहिका कोणी दिली व रुग्णवाहिका चालक त्यास रस्त्यावर उतरवून कसा गेला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी याबाबत स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 68, कोठे किती रुग्ण?

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात एकही रुग्ण नाही

‘कोरोना’शी झुंजताना प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत

धारावीसाठी बीएमसीचा अॅक्शन प्लॅन, 350 खासगी दवाखाने सोमवारपासून सुरु होणार

Corona Patient travel from Mumbai to Bhiwandi

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.