महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा दावा

एकिकडे मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली, तरी दुसरीकडे राज्यातील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचा दावा मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केला आहे (Neeraj Hatekar on Corona Situation Maharashtra).

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा दावा
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 3:30 PM

मुंबई : एकिकडे मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली, तरी दुसरीकडे राज्यातील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचा दावा मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केला आहे (Neeraj Hatekar on Corona Situation Maharashtra). त्यांनी महाराष्ट्रातील कोविड – 19 च्या आकडेवारीचा अभ्यास करुन त्यावरुनच हे निष्कर्ष काढल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच बरं होण्याचा दर, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आणि संसर्गाचं प्रमाण यात चांगली सुधारणा होत आहे.

सध्या सर्वच स्तरावर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र राज्याची स्तिथी गंभीर झाल्याचं सांगितलं जात आहे. परंतु आपल्या राज्यात हळूहळू परिस्थिती सुधारत असल्याचा दावा मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील कोविड-19 च्या आकडेवारीचा अभ्यास करुन काही सकारात्मक बाबी पुढे आणल्या आहेत. या अभ्यासाअंती त्यांनी कोरोनाबद्दलची स्थिती दाखवणारे ग्राफिक्स देखील जाहीर केले आहेत. यात डेथ आणि रिकव्हरी रेट, डबलिंग पिरिअड, आर इफेक्ट अशा काही घटकांचा समावेश आहे.

नीरज हातेकर म्हणाले, “महाराष्ट्रात कोविड 19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या आहे त्यापेक्षा दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ (डबलिंग पिरिअड) जितका जास्त तितकी परिस्थिती सुधारत आहे असं समजलं जातं. महाराष्ट्रात हाच डबलिंग पिरिअड हा सातत्याने वाढतो आहे. ही सर्वांसाठी दिलासादायक स्थिती आहे. कोविड इफेक्टिव्ह आर म्हणजेच एका कोरोना रुग्णांकडून इतरांकडे होणारा कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण हे देखील महाराष्ट्रात कमी होत आहे. सुरुवातीला ही संख्या 4 च्या आसपास होती. मात्र त्यानंतर ही आरची संख्या सातत्याने कमी होत आहे. ही आरची संख्या जितकी कमी तितका आपण कोरोनावर विजय मिळवला आहे. हे संसर्गाचं प्रमाण हळूहळू शन्याकडे जात आहे. ही संख्या जितकी शुन्याच्या जवळ जाईल तितकी परिस्थिती सुधारते आहे असं आपल्याला म्हणता येईल.”

यावेळी प्राध्यापक नीरज हातेकर यांनी काळजी घ्या, नियम पाळा असं सांगताना काळजीग्रस्त मात्र होऊ नका, असाही सल्ला दिला आहे. तसेच पोलीस, डॉक्टर, नर्सेस आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्या कष्टाला यश येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

Lockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट

कोरोनाबाधित एका रुग्णाने हजारोंची चिंता वाढवली, बीडमध्ये 12 गावं कडकडीत बंद!

Pimpri Chinchwad | निगडी-आकुर्डीत 180 कोरोनाग्रस्त, पिंपरीत कोणत्या प्रभागात किती?

संबंधित व्हिडीओ :

Neeraj Hatekar on Corona Situation Maharashtra

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.