नवी मुंबईत रेल्वे स्थानकांवरही कोरोना चाचणी; मिशन ‘ब्रेक द चेन – 2’ प्रखरतेने राबवण्याचे निर्देश

राज्यात कोरनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, पुणे या सारख्या शहरांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नवी मुंबईतील रेस्वे स्थानकांवरही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईत रेल्वे स्थानकांवरही कोरोना चाचणी; मिशन ‘ब्रेक द चेन - 2’ प्रखरतेने राबवण्याचे निर्देश
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 6:57 PM

नवी मुंबई : राज्यात कोरनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, पुणे या सारख्या शहरांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नवी मुंबईतील रेस्वे स्थानकांवरही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. (corona testing started on railway station in Navi Mumbai)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. साथरोग तज्ज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. या अंतर्गत पालिका प्रशासनाने सोमवारपासून शहरातील रेल्वेस्थानकांवर कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिशन ब्रेक द चेन – 2 प्रखरतेने राबवणार

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पालिकेच्या संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच, ‘मिशन ब्रेक द चेन – 2’ अधिक जागरुगतेने आणि प्रखरतेने राबविण्याची त्यांनी सूचना केली आहे. रुग्णांचा शोध जलद गतीने घेण्याकडेही विशेष लक्ष देण्यावर यावेळी प्रशासनाचा भर असणार आहे. शहरात दररोज 4 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र या कोव्हिड प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या ठिकाणीदेखील कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

आरटीपीसीआर टेस्टवर भर

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकावर महानगरपालिकेची आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. हे पथक सकाळी 8 ते 1 या वेळेत नागरिकांची कोरोना चाचणी करतील. एका आरोग्य तपासणी पथकामध्ये 6 जणांचा समावेश आहे. सोमवारी बेलापूर, नेरुळ, आणि वाशी या तीन रेल्वे स्थानकांवर तपासणी केंद्रे सुरु झाली आहेत. या पथकांव्दारे व्यक्तीची लक्षणे पाहून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी जवळपास 400 हून अधिक नागरिकांची ॲण्टिजन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. लवकरच उर्वरित रेल्वे स्थानकांवरही आरोग्य पथके कार्यान्वित करुन प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. (corona testing started on railway station in Navi Mumbai)

संबंधित बातम्या :

CM Uddhav Thackeray | आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी, काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोस्ट कोव्हिडचा नवीन प्रकार गंभीर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं अलर्ट

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.