Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccination : रायगड जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्रावर जमावबंदी!, हुज्जत घालणाऱ्यांवर कायद्याचा बडगा

लसीकरण केंद्रावर विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Corona Vaccination : रायगड जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्रावर जमावबंदी!, हुज्जत घालणाऱ्यांवर कायद्याचा बडगा
corona-vaccination
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 11:23 PM

रायगड : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात राबवली जात आहे. पण कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर मोठी गडबड पाहायला मिळतेय. तसंच अनेकांना लसीकरण केंद्रांवरुन आल्या पावली माघारी फिरावं लागत आहे. अशावेळी लसीकरण केंद्रावर विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. (Curfew order in the 200 meter area of ​​Corona Vaccination Center in Raigad district)

रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर होणारी अनावश्यक गर्दी, त्याचबरोबर केंद्रावर होणारा गोंधळ टाळण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज प्रशासनाला जमावबंदीचे आदेश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

लसीकरण केंद्रात कुणाला प्रवेश ?

1. पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी आलेल्या व्यक्तीची सक्षम नोंद असेल 2. ज्या व्यक्तींना सक्षम अधिकाऱ्यांनी टोकन किंवा पास दिले असतील 3. लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरात वास्तव्यास असलेली व्यक्ती किंवा जीवनावश्यक वस्तू पुरवणारी व्यक्ती 4. लसीकरण केद्रांशी निगडीत वैद्यकिय सेवा पुरवणारी व्यक्ती 5. पोलीस अधिकारी, अशा लोकांनाच लसीकरण केद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रवेश असणार आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केलेल्या आदेशात वरील बाबी नमूद करण्यात आल्या आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी नाहक गर्दी टळणार आहे. त्याचबरोबर निर्माण होणारा गोंधळही कमी होईल. दरम्यान, लसीकरणासाठी गर्दी करुन वैद्यकिय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तींवर कायद्याचा बडगा उगारला जाईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा- थोरात

महसूलमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्यासाठी एक पत्रच थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनेही त्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारं पत्र थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकाराचे लसीकरण करण्याबाबत आता राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाविरोधाच्या लढाईत महाराष्ट्राची खमकी साथ, पुढच्या चार दिवसात उस्मानाबादच्या साखर कारखान्यात ऑक्सिजन तयार होणार

माणुसकी मेली, एकीकडे आपलं माणूस गमावल्याचं दु:ख, दुसरीकडे खासगी रुग्णावाहिका चालकांकडून लुटमार

Curfew order in the 200 meter area of ​​Corona Vaccination Center in Raigad district

दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.