Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोना लस, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 1 मार्चपासून नोंदणीची शक्यता : राजेश टोपे

राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण सुरु आहे. (Rajesh Tope On Corona Vaccination Third Phrase) 

राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोना लस, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 1 मार्चपासून नोंदणीची शक्यता : राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 6:30 PM

मुंबई : राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण 5 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे 1 मार्चपासून होऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope On Corona Vaccination Third Phrase)

राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

आतापर्यंत कोविन पोर्टलवर 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच 5 लाख 47 हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 41 हजार 453 जणांना लस देण्यात आली आहे.

1 मार्चपासून नोंदणी सुरु होण्याची शक्यता

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील व ज्यांना सहव्याधी आहे, अशा 50 वर्षाखालील व्यक्तींना लसीकरण करणार आहे. त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे 1 मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरु होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरु असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. (Rajesh Tope On Corona Vaccination Third Phrase)

संबंधित बातम्या : 

इंटरनेटवर नोकरीची जाहीरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड

कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की खोतांना कळेल; शरद पवारांना डिवचल्यानंतर मुश्रीफांचं उत्तर

काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.