CORONA VACCINE | कोरोनाची लस तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार?
कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत म्हणजे तुमच्या-आमच्यापर्यंत कशी पोहोचणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर याठिकाणी आपल्याला मिळणार आहे.
नागपूर: सीरम, भारत बायोटेक या लस निर्मिती कंपन्यांनी लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता कोरोनाची लस लवकर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण अशावेळी ही लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत म्हणजे तुमच्या-आमच्यापर्यंत कशी पोहोचणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर याठिकाणी आपल्याला मिळणार आहे. (Corona vaccine journey from company to ordinary citizen)
डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये कोरोना लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेसाठी राज्य सरकारनं जोरदार तयारी सुरु केली आहे. नागपूरचा विचार करायचा झाल्यास कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात 62 कोल्ड चेन पॉईंट सज्ज आहे. याच कोल्ड चेनच्या माध्यमातून कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
कोरोनाची लस ही 2 ते 8 डिग्री तापमानात साठवायची असते. त्यासाठी नागपूर जिल्ह्यातील 62 आरोग्य केंद्रात IRL म्हणजे आईस लाईन रेफ्रीजिरेटर सज्ज करण्यात आले आहेत. कोरोनाची लस उणे तापमानात साठवायची झाल्यास त्यासाठी 62 डीप रेफ्रीजिरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा लसीचा प्रवास
कोरोना लस निर्मिती केंद्रांकडून केंद्र सरकारला लसीचे डोस मिळाल्यानंतर ते केंद्राकडून राज्य सरकारला दिले जातील
केंद्राकडून लस मिळाल्यानंतर राज्य सरकार प्रत्येक विभागात त्या लसीचं वितरण करेल
त्यानंतर विभागीय स्तरावरुन प्रत्येक जिल्ह्यासाठी लस पाठवली जाईल
जिल्ह्यातील शितगृहांमध्ये लस साठवण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील शितगृहांमध्ये लसीचं वितरण केलं जाईल
त्यानंतर व्हॅक्सिन कॅरिअरमध्ये ही लस घेऊन ती लोकांना दिली जाणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे लस उत्पादक कंपनीपासून ते लसीकरणापर्यंत योग्य त्या प्रमाणातच ती साठवणं गरजेचं आहे.
भारत सरकारचा मेगा प्लॅन
भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरण्यासाठी आखून दिलेल्या समितीने आधी लस कुणाला द्यायची याबाबत काही सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी पोलीस, आर्मी आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्याचं सूचवण्यात आलं आहे. तर 27 कोटी 50 वर्षावरील आणि 50 वर्षाखालील नागरिकांना लस देण्यास सूचवण्यात आलं आहे. लसीकरण्यासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.
The current cold chain is capable of storing an additional quantity of COVID19 vaccine required for first 3 crore health workers and front line workers: Rajesh Bhushan, Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/kTBEtCOk7r
— ANI (@ANI) December 8, 2020
संबंधित बातम्या:
कोरोना लशीच्या नोंदणीसाठी ‘हे’ अॅप लोकांना मदत करणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती
केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?
Corona vaccine journey from company to ordinary citizen