COVID-19 vaccine: ड्राय रनमध्ये काय होणार; लोकांना लस दिली जाणार का?

प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल. | Corona dry run

COVID-19 vaccine: ड्राय रनमध्ये काय होणार; लोकांना लस दिली जाणार का?
देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 7:38 AM

मुंबई: कोरोना लसीसाठीची परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शनिवारी देशभरात ड्राय रन घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (Corona vaccine know full detail about Covid vaccine dry run)

ड्राय रन म्हणजे काय?

ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची सराव फेरी आहे. यानिमित्ताने डॉक्टर्स, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी कितपत तयार आहेत, हे तपासले जाईल. त्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये यंत्रणा उभारण्यात येईल. कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर याठिकाणी सर्वप्रथम लसीकरणाला सुरुवात होईल. ड्राय रनमध्ये एकप्रकारे लसीकरण प्रक्रियेचा सराव केला जाईल.

ट्रायल रन आणि ड्राय रनमध्ये काय फरक?

कोरोना लसीकरणाच्या ट्रायल रन आणि ड्राय रनमध्ये बराच फरक आहे. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पार पडली. यावेळी संबंधित स्वयंसेवकांना कोरोनाची लस प्रत्यक्षात देण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांना 28 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. 28 दिवस झाल्यावर स्वयंसेवकांना पुन्हा एक डोस दिला जातो. याउलट ड्राय रनमध्ये प्रत्यक्ष लस दिली जात नाही.

पुण्यात ड्राय रनची जय्यत तयारी

पुणे जिल्ह्य़ातील तीन ठिकाणी करोना लसीकरण सराव फेरी घेण्यात येईल. सकाळी नऊ वाजता पुण्यातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही सराव फेरी होणार आहे.

नागपुरात तीन ठिकाणी ड्राय रन

नागपुरात तीन ठिकाणी ड्राय रनची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर 25 लोक ड्राय रनमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्वांना प्रत्यक्षात लस दिली जाणार नाही. तर लसीकरणाची सराव चाचणी पार पडेल.

शहारी भागात डागा हॉस्पिटल आणि के टी नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ग्रामीण भागात कामठी रुग्णालय येथे ड्राय रन पार पडेल. प्रत्येक केंद्रावर चार व्हॅक्सिनेशन अधिकारी उपस्थित असतील.

ड्राय रनच्या प्रक्रियेत सर्वप्रथम covid app मध्ये एन्ट्री केल्या जातील. vaccine दिल्यासारखे करतील. मग संबंधित स्वयंसेवकाला काहीवेळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. जेणेकरुन त्याच्यावर लसीचे काही दुष्परिणाम होतात का, हे तपासता येईल.

संबंधित बातम्या:

सावधान, वॅक्सिन रजिस्ट्रेशनच्या नावावर लागू शकतो चुना

(Corona vaccine know full detail about Covid vaccine dry run)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.