मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग (corona virus pandemic) पुन्हा एकदा वाढला असून अनेक शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक (Nashik) , मुंबई (Mumbai), औरंगाबाद (Aurangabad) यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही शहरं पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जातंय. (Corona virus pandemic Mumbai Nashik and Aurangabad lockdown update detail information)
राजधानी मुंबई हे शहर अत्यंत दाट लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशीच रुग्णवाढ कायम राहिली तर आगामी काळात येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशत: लॉकडाऊचा इशारा दिला आहे.
अस्लम शेख यांनी अंशत: लॉकडाऊनचे विधान करण्याआधी मुंबईच्या आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना संसर्गाबाबत एक प्रेझेंटेशन दिलं. यावेळी वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यावर मुख्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली. या बैठकीत अंशतः लॉकडाऊनच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले.
औरंगाबादमध्येसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. येथे नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात असूनही प्रत्यक्षात मात्र या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या 11 मार्चपासून औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लागू असेल. औरंगाबादमधील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन याबाबत नुकतंच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अंशत: लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर औरंगाबाद शहरातील भाजी मंईडी, बाजारपेठात तुफान गर्दी होताना दिसत आहे.
या लॉकडाऊनसाठी लवकरच नवी नियमावली जारी केली जाणार आहे. यानुसार राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही.
रात्री 9 पर्यंत हॉटेल सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री 11 पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. त्यांनर आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. नाशिकमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाहिये. याच कारणामुळे नाशिकमध्ये लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेऊन आगामी काळात या संदर्भात घोषणा करतील. यापूर्वी येथील नाशिकचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये विचारविनिमय केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम आहे. येथे काल दिवसभरात 645 नवे रुग्ण आढळले होते तर आज या जिल्ह्यात नव्याने 675 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. येथे अवघ्या 2 दिवसांत 1320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.
जाणून घ्या तुमच्या शहरात कोरोना रुग्णांची स्थिती काय?
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
इतर बातम्या :
डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या; शिवसेना खासदार गावितांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
खामोश!! पहिल्याच रॅलीत ही भाषा शोभत नाही, शत्रुघ्न सिन्हांनी मिथुनला सुनावलं
महाराष्ट्राची स्थिती धोकादायक वळणावर, राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत