नागपुरात एकाच कुटुंबातील तिघे कोरोनामुक्त, पक्षाघात झालेल्या पित्याचीही मात

एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाने कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून घरी आल्यानंतर या तिघांचेही जंगी स्वागत करण्यात (Nagpur Three People Corona Virus Free) आले.

नागपुरात एकाच कुटुंबातील तिघे कोरोनामुक्त, पक्षाघात झालेल्या पित्याचीही मात
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 9:21 AM

नागपूर : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजारच्या पार गेला (Nagpur Three People Corona Virus Free)  आहे. यात नागपुरात 44 रुग्ण आढळले आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे काल (14 एप्रिल) नागपूरमधील तीन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाने कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून घरी आल्यानंतर या तिघांचेही जंगी स्वागत करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या (Nagpur Three People Corona Virus Free) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे मात्र नागपूरमधील जरीपटका भागात राहणाऱ्या तीन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हे तिघेही एकाच कुटुंबातील आहे. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाने कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे वडिलांना पक्षाघात असतानाही वैद्यकीय आणि डॉक्टरांच्या मदतीनं त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

हे तिघेही खामला येथील रुग्णाच्या संपर्कात आले होते. मात्र त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. हे तिघेही घरी येताच त्यांनी दृष्ट काढण्यात आली. आरती ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले. हे तिघेही सुखरुप घरी आल्याने कुटुंबातील सदस्यांनीही समाधान व्यक्त केले.

दरम्यान कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या नागपुरातील रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 684 वर गेली आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सर्वाधिक 1 हजार 756 रुग्ण आढळले आहेत. तर उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात 44 रुग्ण आढळले आहे. नागपुरातील कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक आहे. तर दुसरीकडे उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत (Nagpur Three People Corona Virus Free) आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.