Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 44 पैकी 34 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

एकवेळ कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करणारा अहमदनगर जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे प्रवास करत आहे (Corona Virus Updates of Ahmednagar district).

अहमदनगर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 44 पैकी 34 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 7:19 PM

अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी काही ठिकाणी दिलासादायक चित्रही पाहायला मिळत आहे. एकवेळ कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करणारा अहमदनगर जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे प्रवास करत आहे (Corona Virus Updates of Ahmednagar district). अहमदनगरमधील एकूण 44 कोरोना रुग्णांपैकी 34 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत. आजच (6 मे) संगमनेरमधील 4 आणि जामखेडमधील 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूणच आशादायक वातावरण तयार झालं आहे.

आज या 6 कोरोना रुग्णांची बूथ हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर ते कोरोनामुक्त असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांची आपआपल्या घरी रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला. एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी आता 8 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 1 हजार 648 व्यक्तींच्या नमुन्यांची कोरोना चाचणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 557 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, या रुग्णांवर उपचार करणार्‍या बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र राबणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केलं. नागरिकांनी लॉकडाऊन काळात दाखवलेल्या संयमाचे आणि सहकार्याचे सर्व मंत्र्यांनी आणि जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आभार मानले. तसेच आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्याचे आवाहन केले.

एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी आता 8 रुग्ण उपचार घेत आहेत. दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने 18 व्यक्तींचे नमुने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवले होते. यापैकी 16 जणांचे अहवाल आले असून ते निगेटिव्ह आले आहेत. संगमनेर येथे 4 नेपाळी व्यक्ती 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे 14 दिवसानंतर स्त्राव नमुने घेतले असता ते पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांचे 7 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, जामखेड येथील कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत 1 हजार 648 व्यक्तींच्या स्त्रावांची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 557 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या

मुंबईत असंच सुरु राहीलं, तर आर्मी बोलवावी लागेल, मग नागरिकांच्या अडचणी वाढतील : किशोरी पेडणेकर

नोकरभरती रद्द नको, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या, रोहित पवारांची मागणी

Corona Virus Updates of Ahmednagar district

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.