Costal Road : वरळीतील ‘लोटस जेट्टी’बाबत स्थानिक मच्छिमारांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
न्यायालयानं पालिकेची बाजू मान्य करत कोस्टल रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पा विरोधातील याचिका थेट निकाली काढली आहे.
मुंबई : कोस्टल रोडच्या कामात अडथळा आणणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं बुधवारी नकार दिला आहे. वरळी तील मच्छिमारांचे या बांधकामामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. या मच्छिमारांना लोटस जेट्टीचा वापर सहजपणे करता येणार आहे. असा जोरदार युक्तीवाद प्रतिज्ञापत्राद्वारे पालिकेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. न्यायालयानं पालिकेची ही बाजू मान्य करत कोस्टल रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पा विरोधातील याचिका थेट निकाली काढली आहे.(The High Court rejected the petition challenging the work of Coastal Road)
वरळीतील ‘लोटस जेट्टी’ येथील काही मच्छिमारांनी कोस्टल रोडला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या इथं काम सुरू असल्यानं जेट्टीच्या वापरावर निर्बंध घातले जात आहेत, त्यामुळे इथं मासेमारी करता येत नाही. अशावेळी पालिकेनं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत काही मच्छिमारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. पालिकेच्यावतीनं ज्येष्ठ वकील अस्पि चिनॉय आणि अॅड. जोएल कार्लोस यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं.
याचिका निव्वळ गैरसमज पसरवणारी – बीएमसी
ही याचिका निव्वळ गैरसमज पसरवणारी असून ती फेटाळून लावावी. या ठिकाणी पालिका नेविगेशन ब्रिज बांधणार आहे, त्यामुळे जेट्टीत बोटींना येण्यासाठी ,जाण्यासाठी सोईस्कर ठरणार आहे. निव्वळ कोस्टल रोड प्रकल्प रखडवण्यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं इथं निष्पन्न होत आहे. त्यामुळे हायकोर्टानं याचिकाकर्त्यांचा दावा ग्राहय धरू नये, असा दावा पालिकेच्यावतीनं करण्यात आला. हायकोर्टानं हा युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला व याचिका निकाली काढली आहे.
कोस्टल रोड प्रकल्प काय आहे?
कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35. 6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.
हा रोड मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड 9. 98 किमी लांबीचा असणार आहे. कोस्टल रोडवर 1650 वाहनं पार्किंगची सोय असेल. याच्या बांधकामासाठी 4 दशलक्ष मेट्रिक टनचं मटेरियल लागणार आहे. माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार आहेत. कोस्टल रोडमुळं 26 हजार कोटी रुपयांची 90 हेक्टर जमीन खुली होणार आहे. विशेष म्हणजे पुरामध्येही कोस्टल रोडचा वापर शक्य होणार आहे.
कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?
- साडे सहा किलोमीटरचे बोगदे
- आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
- सिग्नल फ्री मार्ग
- 34 % इंधन बचत होणार
- 1650 वाहन पार्किंगची सोय
- 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
- माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
- 4 वर्षाचा कालावधी
- 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
- पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार
गडकरीजी मानलं… 24 तासांत ‘एक्स्प्रेस वे’चा अवघड भाग बांधला; विश्वविक्रमाचे फडणवीसांकडून कौतुक https://t.co/3mCj0SEa67 #Devendrafadnavis #NitinGadkari #NHAI @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 3, 2021
संबंधित बातम्या :
स्पेशल रिपोर्ट : उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडला हायकोर्टाचा ब्रेक !
The High Court rejected the petition challenging the work of Coastal Road